तुम्ही खरेदी केलेले खत बोगस तर नाही ना ?- कृषी विभागाने केले Bogus fertilzer जप्त.
Bogus fertilzer:-शेतकरी आता मोट्या प्रमाणावर संकटात सापडला आहे. पहिलेच वेळेत पाऊस पडत नसल्यास तो हवालदिल झाला असून नावं संकट त्याच्यापुढे आले आहे.शेतकऱ्यांना आता पेरणी करायची आहे, त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर खताची आवश्यकता लागणार आहे मात्र जर तुम्ही खात खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल तर सावधान !
कारण आता बाजारात बोगस बनावटी खत विक्री सुरु आहे.तुम्हाला विस्वास बसत नसेल मात्र हे अगदी खरं आहे कारण जालना जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.बातमी अशी कि,घनसावनगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील नामांकित कंपनीमधून हजारो खाताच्या बोगस बनावटी खतावर छापा टाकला आहे.
हे आहेत चालू वर्षाचे २०२३ चे खताचे नवीन भाव-इथे क्लिक करून पहा भाव.
कृषी विभागाच्या पथकाने पुणे,छत्रपती संभाजी नगर व जालना या तीन ठिकाणी काही कृषी केंद्रावर सोमवारी दिनांक १९/०६/२०२३ रोजी छापा टाकून मोठी कार्यवाही केली आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार कृषी विभागाच्या पथकाने गुपित माहितीच्या आधारे वरील तीन जिल्ह्यामध्ये दुपार पासून कार्यवाहीला सुरुवात केली असता दिवसभर व उशिरा रात्री पर्यंत हि कार्यवाही चालली.
यामध्ये पथकाने नामांकित कंपनीच्या ५ हजाराहून खताच्या रिकाम्या गोण्या व मोठ्या प्रमाणावर बनावटी खताचा साठा जप्त केला .गुपित माहिती मिळाल्या नंतर कृषी विभागाने तीर्थपुरी येथील नामांकित कंपनीच्या खताच्या बॅगची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असता तिन्ही कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त एका कृषी केंद्रावर धाड टाकली.
शेती व योजनांची माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी इथे क्लीक करा.
सूत्राने दिलेली माहिती खरी निघाल्या नंतर मात्र आणखी कसून चाकाशी केल्या गेली. यामध्ये रिकाम्या बॅग व बनावटी खत असल्यास समोर आलं.ह्या रिकाम्या खातांच्या बॅगा नामांकित खताच्या असल्या तरी यामध्ये बोगस खत विक्री होत असल्याने एकाच खळबळ उडाली.
मागील वर्षी देखील कृषी विभागया मोठ्या कार्यवाही नंतर हजारो टन बोगस खात साठा जप्त केला होता.अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. शेतकरी शेतामध्ये मोठा प्रमाणावर राबतात मात्र त्याच्या उत्पनात कवडीचीही वाढ होत नाही आहे या सर्व गोष्टीला हे बोगस खात तर जबाबदार नाही ना? असा प्रश्न देखील समोर येत आहे.