Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update | किती मदत मिळणार? पात्र जिल्हे कोणते?- चला पाहूया सविस्तर
Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update :- मित्रांनो मार्च, एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस किंवा गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुमच्या पिकाचं खरोखरच नुकसान झालेला असेल तर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम ( Ativrushti Nuksan Bharpai 2023 ) तुमच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे. यासाठी भरपूर प्रमाणात निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित झालेला आहे. मार्च-एप्रिलमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत एक जीआर ( GR) देखील आलेला आहे या जीआरमध्ये राज्यातील 22 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२३ मदत २२० कोटी मदत GR इथे बघा
Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update :- या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 222 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो कोणते 22 जिल्हे पात्र आहेत? यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? असेल तर या एकूण 222 कोटी मधून तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे? आणि तो निधी वितरित करण्यासाठी जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत? याची सुद्धा माहिती या जीआर मध्ये दिलेले आहे.
हीच माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.जर मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जर आमच्या न्युज पोर्टल वर नवीन असाल आणि सर्व माहिती व योजना मोबाइलला वे मिळवायच्या असतील तर आमच्या न्युजला followo करा किंवा आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.
काय आहे GR ? कोणाला मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ?
चला मित्रांनो, सविस्तर जीआर आपण पाहायला सुरुवात करूया. तर पाहू शकता मित्रांनो मार्च एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 5 जून 2023 रोजी हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.
आता या जीआरची प्रस्तावना आपण सर्वप्रथम पाहूयात मित्रांनो पाहू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण
राज्यात माहे मार्च एप्रिल 2023 या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. अवेळी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतपिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झालेले आहेत तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर पर्यंत मर्यादित विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
तर मित्रांनो शासन निर्णय पहा म्हणजे तुम्हाला निधी किती मिळालेला आहे ही गोष्ट लक्षात येईल मित्रांनो पाहू शकता मार्च एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 222 कोटी 65 लाख 34 हजार इतका निधी सोबतच्या प्रपत्र दर्शवल्याप्रमाणे जिल्हा निहाय्य वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर मित्रांनो 222 कोटीचा निधी आहे तो निधी जिल्हानिहाय कशा पद्धतीने वितरित करण्यात आलेला आहे याच्याबद्दलचा एक प्रपत्र दाखवण्यात आलेला आहे आणि ते प्रपत्र सुद्धा आता आपण पाहणार आहोत.
महसूल विभाग निहाय जिल्ह्याची यादी जाहीर Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update
नागपूर विभाग (एप्रिल 2023)
तर मित्रांनो पाहू शकता दिनांक 5 जून 2023 सोबतचे प्रपत्र तर मित्रांनो हे प्रपत्र तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम इथे जिल्हा दिलेला आहे नागपूर नुकसानाचा कालावधी आहे, एप्रिल 2023. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 403. 403 शेतकऱ्यांसाठी एकूण निधी 21 लाख 71 हजार एवढा आहे.. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानासाठी 303 शेतकरी पात्र असणार आहेत आणि वर्धा जिल्ह्यासाठी एकूण 24 लाख 4 हजार एवढा निधी प्राप्त असणार आहे.
अ. क्र. | जिल्हा | कालावधी | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | एकुण निध (रु लाखात) |
---|---|---|---|---|---|
1 | नागपूर | एप्रिल 2023 | 403 | 125.79 | 21.71 रु लाखात |
2 | वर्धा | एप्रिल 2023 | 303 | 136.28 | 24.04 |
3 | भंडारा | एप्रिल 2023 | 1612 | 557.59 | 95.15 |
4 | गोंदिया | एप्रिल 2023 | 442 | 172.07 | 30.93 |
5 | चंद्रपूर | एप्रिल 2023 | 1418 | 1745.97 | 179.61 |
6 | गडचिरोली | एप्रिल 2023 | 2350 | 1137.86 | 193.86 |
एकूण | 6528 | 3875.56 | 545.30 |
त्यानंतर भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये 1612 शेतकरी पात्र असणार आहेत या 1612 शेतकऱ्यांसाठी भंडारा जिल्ह्यामध्ये 95 लाख पंधरा हजार एवढा निधी वितरित केला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी 442 शेतकरी पात्र आहेत. एकूण निधी 30 लाख 93 हजार एवढा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1418 शेतकरी पात्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कोटी 69 लाख 61 हजार एवढा निधी असणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यातील 2350 शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी 93 लाख 86 हजार एवढा निधी असणार आहे.
नागपूर विभाग (मार्च 2023)
एकूण नागपूर विभागातील एप्रिल महिन्यामध्ये नुकसान झालेले शेतकरी 6528 असणार आहेत आणि एप्रिल 2023 मध्ये नुकसान झालेला एकूण नागपूर विभागाचा निधी 5 कोटी 45 लाख 30 हजार एवढा असणार चाळीस लाख तीस हजार एवढा असणार आहे त्यानंतर मित्रांनो एकूण नागपूर विभागाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या नुकसानाचा डाटाखाली दाखवलेला आहे
अ. क्र. | जिल्हा | कालावधी | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | एकुण निध (रु लाखात) |
---|---|---|---|---|---|
1 | नागपूर | मार्च 2023 | 5540 | 4441.60 | 907.46 |
3 | भंडारा | मार्च 2023 | 591 | 128.18 | 21.81 |
4 | गोंदिया | मार्च 2023 | 457 | 150.50 | 25.40 |
5 | चंद्रपूर | मार्च 2023 | 958 | 375.95 | 54.31 |
6 | गडचिरोली | मार्च 2023 | 2632 | 1257.28 | 178.05 |
एकूण | 10178 | 6353.51 | 1187.03 |
नाशिक विभाग (1 ते30 एनिल, 2023)
अ. क्र. | जिल्हा | कालावधी | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | एकुण निध (रु लाखात) |
---|---|---|---|---|---|
1 | नाशिक | १ ते ३० एप्रिल 2023 | 82913 | 45293.72 | 8022.60 |
3 | धुळे | १ ते ३० एप्रिल 2023 | 4879 | 2613.88 | 451.80 |
4 | नंदुरबार | १ ते ३० एप्रिल 2023 | 1118 | 283.55 | 50.12 |
5 | जळगावं | १ ते ३० एप्रिल 2023 | 19046 | 13384.99 | 2665.48 |
6 | अहमदनगर | १ ते ३० एप्रिल 2023 | 47583 | 27078.39 | 4693.08 |
एकूण | 155539 | 88654.53 | 15883.08 |
अमरावती विभाग (17 ते30 एनिल,2023)
अ. क्र. | जिल्हा | कालावधी | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | एकुण निध (रु लाखात) |
---|---|---|---|---|---|
1 | अमरावती | 17 ते30 एनिल,2023 | 10529 | 5847.16 | 1194.74 |
3 | अकोला | 17 ते30 एनिल,2023 | 11186 | 5885.60 | 1026.33 |
4 | यवतमाळ | 17 ते30 एनिल,2023 | 12530 | 5697.51 | 974.10 |
5 | बलुडाणा | 17 ते30 एनिल,2023 | 7006 | 3532.21 | 620.37 |
6 | वानिम | 17 ते30 एनिल,2023 | 5022 | 2973.59 | 514.97 |
एकूण | 46273 | 23936.07 | 4330.51 |
. त्यानंतर पुणे विभागांमध्ये सोलापूर जिल्हा आहे नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आहे. अमरावती विभागांमध्ये, अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 22 जिल्हे पात्र असणार आहेत आणि या 22 जिल्ह्यांची लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा जीआर मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊन पाहू शकता तर या शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय डाऊनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने मार्च एप्रिल 2023 च्या अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबतची थोडक्यात माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या लेखाला लाईक करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, धन्यवाद.