Ativrusti nuksan bharpai 2023

अखेर शासनाची मदत जाहीर | Ativrusti nuksan bharpai 2023 | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार

Ativrusti nuksan bharpai 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चारशे एक कोटी रुपयांच्या मदतीचा वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, सन २०२१-22 या कालावधीमध्ये गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.परंतु या बाधित शेतकऱ्यांना अद्याप देखील मदतीचे वितरण करण्यात आले नव्हतं.

Ativrusti nuksan bharpai 2023

आताची मोठी बातमी- नमो शेतकरी योजनेला मंजुरी | या दिवशी खात्यात पैसे होणार जमा

या शेतकऱ्यांना मदत वितरण करण्याकरता 5 जून 2023 रोजी एका अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आलेले आहे.ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना चारशे एक कोटी रुपयांची मदत वितरित केले जाणार आहे.यात कोणते जिल्हे असणार आहेत? कोणत्या शेतकऱ्याना हि मदत मिळणार आहे? या बाबतची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात बघणार अहो, तेव्हा हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

सन २०२१-22 या कालावधीमध्ये गारपिट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे, बहुवार्षिक पिकांचं नुकसान झालेलं होतं. याचबरोबर बऱ्याच साऱ्या घरांची पडझड झालेली होती. तसेच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं किंवा बऱ्याचदा नागरिकांचा नुकसान झालेलं होतं,अशा नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्याकरता 401 कोटी 70 लाख 70 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावरती थेट जमाकरण्यात येणार आहे .

विभागनिहाय अशी असणार वाटप होणारी निधी | Ativrusti nuksan bharpai

सध्या ४ महसूल विभागासाठी हे निधीचे वाटप केले जाणार असून या महसूल विभागातील बाधित सर्व जिल्हे व तालुक्यासाठी हा निधी लागू राहणार आहे.हा निधी लवकरच वाटप केला जाणार असल्याची माहिती मिळत असून शेतकऱ्याच्या /लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात हि रक्कम जमा केली जाणार आहे.

महसुल विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे

अ.क्र.विभागमंजूर निधी
1अमरावती२४ कोटी ५७ लाख ९५ हजार
2नाशिक६३ कोटी ९ लाख ७७ हजार
3पुणे५ कोटी ३७ लाख ७० हजार
4छत्रपती संभाजी नगर८४ कोटी ७५ लाख १९ हजार

Ativrusti nuksan bharpai 2023 वाटतांना बँकांना शासनाचे निर्देश व निधी वाटपाचे वैशिट्य

बऱ्याच शेतकऱ्यानी शेतीसाठी किंवा व्यवसायासाठी विविध बँकाकडून कर्ज घेतलेले असते आणि अशा वेळी हे आर्थिक मदत शेतकऱयांच्या खात्यात जमा झाली कि बँका या मदतीच्या रकमेमधून कर्ज वसुली करून घेतात.अशावेळी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही म्हणून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करूनये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.अशी वसुली केल्यास संबंधित बँकेवर कायदेशीर कार्यवाही केली जाण्याची मोठी शक्यता आहे.

इथे क्लिक करून नुकसान भरपाईचा शासन निर्णय बघा -हि आहे जिल्हा निहाय यादी

अतिवृष्टी झाल्या नंतर शेती बरोबर इतर लोकांचे देखील मोठा प्रमाणावर नुकसान झाले आहेत,मदतीसाठी लागू असलेले घटक खालील प्रमाणे आहेत

अ.क्र.लागू घटक
1शेतपिकाचे नुकसान
2घरगुती भांडी
3मृत जनावरानां मदत
4शेडच्या नुकसानीसाठी मदत
5पडझड झालेली कच्ची/ पक्की घर
6कारागीर / बारा बलुतेदार
7मत्स्य व्यवसाय नुकसानी करता अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *