All posts by pratap bodkhe

कापूस टॉप 5 वाण | cotton seed top variety 2023 | kapus top 5 biyane

कापसाचे सर्वात उत्कृष्ट वाण | kapus biyane 2023 | cotton seed top variety 2023

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो.मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकाबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होत आहे आणि खरीप हंगाम म्हणलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील प्रमुख पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जातं.भारतामध्ये कापूस पिकाला आपण पांढरे सोने देखील म्हणतो. भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जागतिक पातळीवरती कापूस पिकाला आता अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेला आहे.

cotton seed top variety 2023

हे वाचा-RBI चा २००० च्या नोट बंदी बाबत मोठा निर्णय – नोट या तारखेच्या आत जमा करून घ्या

cotton seed top variety 2023 :- शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कापूस पिकाच्या पिकाबद्दल, लागवडीबद्दल चर्चा करत असतो,त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे की, यंदाच्या हंगामामध्ये कापूस पिकात कोणती वाण आपण लावायचं.

म्हणजेच काय कापूस पिकाची कोणती व्हरायटी आपण लावली पाहिजे.आजच्या लेखामध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तर मी तुम्हाला कापूस पिकाचे या ठिकाणी पाच अशा सुधारित जातींची नावे सांगणार आहेत की,ज्या जाती तुमच्या अधिक फायदेशीर राहतील तसेच हे वाण रोगांना कमी प्रमाणात बळी पडणार आहेत.

त्यांच्या उगवणीसाठी त्यांच्या वाढीसाठी तुम्हाला उत्पादन खर्च देखील कमी येणार आहे तसेच तुम्हाला उत्पादन आणि उत्पन्न देखील चांगले मिळणार आहे.

राशी 659 ( RASHI 659 SEEDS ) Cotton Seeds

हे देखील वाचा – महाबीज बियाणांचे २०२३ चे सुधारित दर जाहीर

cotton seed top variety 2023 :- चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पाहूया राशीचे एका सुधारित वाणाबद्दल ज्याचं नाव आहे राक्षी 659 (Rashi 659 variety ) हे वाण भारी जमिनीस शिफारस शिफारस काढण्यात आलेला आहे तसेच बागायती या दोन्ही प्रकारच्या सिंचनासाठी तुम्ही हे वाण वापरू शकता.

अधिक माहिती खलील रकरण्यात दिली आहे….

अ.क्र.राशी 659 विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी145 ते 160 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 12 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक

कबड्डी कापूस बियाणे (KABADDI) TULSI SEEDS | kabaddi cotton seeds

cotton seed top variety 2023 :- महाराष्ट्रात सध्या दुसरा क्रमांक हा कबड्डी कापूस बियाणे वाणाचा आहे.गेल्या 2 वर्षात या वाणांनी शेतकऱ्यांना खुप साथ दिली असून इतर वाणाच्या तुलनेत हे वाण शेतकऱ्यांच्या अधिक पसंतीस उतरले आहे.जवळजवळ सर्वच जमिनीमध्ये हे वाण तुम्ही लावू शकता. या वाणाची खास करून कोरडवाहु व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.अधिक उत्पादन देणारे हे वाण असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं आहे.गेल्या 2 वर्षात फरदडसाठी हे वाण अतिशय उपयुक्त आहे..राशी 659 प्रमाणेच हे देखील अधिक उत्पादन देणारं वाण आहे.

अ.क्र.कबड्डी ( kabaddi) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी160 ते 180 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 8 ते 15 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10लागवड वेळमे ते जून

सुपरकॉट प्रभात सीड्स | Prabhat SuperCot BG II | Cotton Seeds

cotton seed top variety 2023 :- वरील २ वाणा प्रमाणेच २०२२ मध्ये प्रभात सीड्स च्या सुपरकॉट (supercot ) या वाणाने देखील विक्रम नोंदविला आहे.हे देखील वाण मोठ्या बंडाचे असून आधीक विक्रमी उत्पादन दिले असून भरपूर शेतकऱ्यानी या वाणाला पसंती दर्शविली आहे.हे वाण रसशोषक किडीसाठी तसेच लाल्या रोगासाठी अधिक प्रतिकारक आहे.बर्याच शेतकऱ्यानी या वाणापासून सहजरित्या १० ते १२ क्विंटल पर्यंत एव्हरेज घेतलं आहे.

अ.क्र.सुपरकॉट ( SuperCot BG II) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी160 ते 170 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5.5 ते 6.3 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 12 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर4 *1.5
11लागवड वेळमे ते जून

यु. एस. 7067 | us agri seeds US 7067 | US 7067 Cotton Seeds

us agri seeds US 7067 :- यु.एस. ७०६७ हे वाण माध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आलं असाल तरी हे वाण हलक्या जमिनीत देखील शेतकऱ्यांना बरच उत्पादन देऊन गेलं आहे. मागील २ वर्षात या वाणाने देखील शेतकऱ्यांना नाराज केलं नाही.हे वाण लवकर येणारे असल्याने हलक्या जमिनीत पावसाचा आधार घेत अधिक उत्पादन देत आहे.हे वाण विविध रोग व किडीसाठी प्रतिकारक आहे व दात लागवडीसाठी हे वाण चांगले आहे.बोन्डाचे वजन चांगले असून गोलाकार व मोठ्या बोन्डाचे वाण आहे.

अ.क्र.यु. एस. 7067 ( US 7067 BG II) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी155 ते 160 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 10 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2
11लागवड वेळमे

अजित १५५ | Ajeet 155 ( Ajeet seeds ) Cotton Seeds

अजित १५५ या वाणाला पाण्याचा ताण सहन होत असल्यामुळे हे वाण हलक्या जमिनीत देखील येते.त्यामुळे कोरडवाहू शेतकरी या वाणाचा जास्त प्रमाणात वापर करताना दिसतात.हे वाण आपण हलक्या,माध्यम व भारी जमिनीत देखील घेऊ शकतो.या वाणाचा बोन्डाचा आकार थोडा लहान असतो मात्र जास्त बोन्ड संख्या येत असल्याने अधिक उत्पन्न बघायला मिळते.मात्र हे कमी कालावधीचे वाण आहे.

अ.क्र.अजित १५५ ( Ajeet seeds) विवरण
1जमीनहलकी,मध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी145 ते 160 दिवस
4बोंड आकार मध्यम
5वजन5 ते 5.5 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 6 ते 8 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2 / पावली
11लागवड वेळमे

राशीच्या आणखी काही वाणा बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा -धन्यवाद

२००० हजार रुपये नोटबंदी | 2000 note banned news | RBI withdraws Rs 2000 notes from circulation

हजार रुपयांची नोट बंद झाली का? | 2000 note banned news

सध्या २ हजार रुपयाच्या नोट बंदीची जोरदार चर्चा सुरु आहे मात्र दुसरीकडे आणखी एक चर्चा जोरदार वायरल होत आहे कि, २ हजाराची नोट बंदी झालीच नाही.आता नेमकं खरं काय हे जाणून घेणे अतिशय गरजेचं आहे .तेव्हा हा लेख पूर्ण वाचा. या बातमी पात्रात आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

२ हजाराची नोट बंदी झाली हे खरं आहे मात्र नोट बंदी बाबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून पर्यंत नागरिकांना माहित नसल्या कारणाने ते गोंधळलेले आहेत. मात्र आता हा संपूर्ण गोंधळ कायम दूर होणार आहे

नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख काय? | नोटा परत करायची तारिख काय

2000 note banned news :- नोट बंदी संदर्भात RBI कडून जरी करण्यात आलेल्या परिपत्रकात २००० रुपयाच्या नोट बंदी बाबत स्पस्ट करण्यात आले आहे कि,२ हजार रुपयांची नोट हि चलनातून हटविण्यात अली अली असली तरी वैध चलन म्हणून नोटेचा दर्जा कायम राहणार आहे असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( Reserve Bank of India ) यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

हे वाचा-गॅस झाला स्वस्त – गॅस सिलेंडर साठी मोठी सबसिडी जाहीर

आता आपण जाणून घेऊयात कि नोटा बदलून किंवा परत करण्याची शेवटची तारीख काय? हि नोट बंदी १७ मे पासून जाहीर करण्यात अली असून 23 मे २०२३ पासून नागरिकांना आपल्याकडील २ हजार रुपयाच्या नोटा बदलून घेता येतील.बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत लोकांनी अजिबात गर्दी करू नाही कारण २ हजाराची नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख हि ३० सप्टेंबर आहे.हेच नाही तर हि तारीख आणखी वाढविली जाऊ शकते.

२ हजाराच्या नोटा बँकेत जमकरण्या संदर्भातील RBI चे पत्रक

२ हजाराच्या नोटा बँकेत जमकरण्या संदर्भातील RBI चे पत्रक मराठीत वाचा

2000 note banned news

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

प्रिय महोदय / महोदया,

₹ 2000 मूल्याच्या बँक नोटा – चलनातुन पैसे काढणे; कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहील

कॅप्शन दिलेल्या विषयावरील आमच्या परिपत्रक DCM(Plg) No.S-236/10.27.00/2023-24 दिनांक 19 मे 2023 च्या पुढे, खालीलप्रमाणे सल्ला दिला जातो:

  1. काउंटर ओलांडून ₹ 2000 च्या नोटा बदलण्याची सुविधा लोकांना नेहमीच्या रीतीने प्रदान केली जाईल, म्हणजे, पूर्वी प्रदान केली जात होती.
  2. उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन शाखांमध्ये छायांकित प्रतीक्षा जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी योग्य पायाभूत सुविधा पुरविण्याचा बँकांना सल्ला दिला जातो.
  3. बँकांनी ₹2000 च्या बँक नोटांच्या ठेवी आणि विनिमयाचा दैनंदिन डेटा खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये राखून ठेवला पाहिजे आणि जेव्हा मागवले जाईल तेव्हा ते सबमिट करावे.

नोटा बदलून घेतांना या गोष्टी अनिवार्य

2000 note banned news :- ह्या नोटा बदलून घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत, त्या आपण थोडक्यात जाणून घेऊयात.प्रत्येकाला एक प्रश्न पडला आहे कि,कोणाला २ हजार रुपयाच्या नोटा बदलून घेता येतील?तुम्हाला जर नोटा बदलून पाहिजे असतील तर तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहेत.बँकेत खाते असतील तरच तुम्हाला ह्या नोटा बदलून मिळतील असं काही नाही,

तुमचे बँकेत खाते नसतील तरीही तुम्हाला २ हजाराच्या नोटा बदलून मिळतील मात्र त्यासाठी तुम्हाला ओळखपत्र किंवा काही कागदपत्र दाखवावे लागतील..हे कागदपत्रे खालील प्रमाणे असतील.

नोटा बदलताना लागणारी कागदपत्रे

तुमचे बँकेत खाते नसल्यास २ हजार रुपयाच्या नोटा बदलून घेण्यासाठी खालील पैकी कोणतेही एक ओळखपत्र बँक तुम्हाला मागू शकते.तुमच्याकडे ओळखपत्र नसल्यास मात्र तुम्हाला नोट बदलून मिळणार नाही

2000 note banned news

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) ड्रायविंग लायसन्स
४) पासपोर्ट

FAQ

1) २००० च्या नोटा वैध आहेत का ?


३० सप्टेंबर पर्यंत २ हजाराची नोट चलनात राहणार आहे ती बंद झाली असं म्हणून ती घेणे कोणताच दुकानदार नाकारू शकत नाही.दुकानदाराने असा कोणताही प्रकार केल्यास त्या दुकानदारावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.

2) २००० च्या नोटा कशा बदलून घेता येणार?

२ हजार रुपयांची नोट कोणत्याही बँकेत किंवा बँकेच्या शाखेत बदलून घेता येणार.मात्र तुमचे बँक शाखेत खाते नसल्यास तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.

3) २ हजाराच्या नोटा बदलण्याची मर्यादा किती? What is the maximum limit of return 2000 note to bank?

तुम्हाला २ हजार रुपयांची नोट बदलून दिली जाणार आहे, मात्र त्यासाठी RBI बँकेने मर्यादा घातली आहे.एक
व्यक्ती एक दिवस फक्त २० हजार रुपये बदलू शकतो. या पेक्षा जास्त नोटा बदलायच्या असल्यास तुम्ही घरातील अनेक सदस्यांना बँकेत घेऊन येऊन जास्त नोटा बदलू शकता.

4) बँकेत ओळखपत्राची गरज आहे का ?

तुम्हाला २ हजाराची नोट बदलवायची असेल तर हा मुद्दा जरूर समजून घ्या.तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्हाला बँकेत कोणतेही ओळख प्रमाणपत्र लागणार नाही. मात्र जर बँकेत तुमची खाती नसतील तर मात्र तुम्हाला बँकेत ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.

Breaking News-महाबीज बियाणे नवीन भाव | Mahabeej seed rate kharif 2023 | बियाणांचे नवीन भाव झाले जाहीर

बियाणांचे नवीन भाव काय? | Mahabeej seed rate kharif 2023

Mahabeej seed rate kharif 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,आजची बातमी सर्वच शेतकऱ्यासाठी खूपच महत्वाची आहे.कारण आता शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचे चालू वर्षाचे सुधारित दर पत्रक उपलब्ध करून देत आहोत.सोयाबीन व्यतिरिक्त आणखी कोणते पीक समाविष्ट आहेत? कोणत्या शेतकऱ्यांना हे बियाणे मिळेल ? बियाणे मिळविण्यासाठी नेमकं काय करायचं हे संपूर्ण मार्गदर्शन या लेखात आहे. तेव्हा बातमी काय ती शेवट पर्यंत जरूर वाचा

शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे कि,गेल्या काही वर्षांपासून बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानावर बियाणे वाटप करतात ते तर तुम्हाला माहीतच असेल आता देखील महाबीजने ( Mahabeej ) २०२३ चे भाव जाहीर केले आहेत .

हे वाचा-आताची मोठी बातमी- शेतकऱ्यानो सरसकट पीकविमा झाला मंजूर

हे भाव शेतकऱ्यांना माहित होणे अतिशय गरजेचे आहेत, कारण सध्या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर दलालांचा सुळसुळाट आहे आणि हे दलाल शेतकऱ्याना हे महाबीज बियाणे मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने विकून त्याची मोट्या प्रमाणावर फसवणूक करतात.

सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023

अनुक्रमांक सोयाबीन वाण२० किलो भाव3० किलो भाव
1फुले संगम (Kds 726)20403,060
2फुले किमया (Kds 753)20403,060
3 DS 2281,820 2730
4MAUS 711,820 2730
5MAUS 612 20403,060
6MAUS 16220403,060
7Js 3351,820 2730
8Js 93051,820 2730
9MaCs 11882,0403060
10MACS 12812,0403060
11MAUS 1582,0403060

या बियाणाला देखील मिळणार महाबीज अनुदान | Mahabeej seed rate kharif 2023| mahabeej biyane price list 2023

सोयाबीन व्यतिरिक्त आणखी बऱ्याच पिकाच्या महाबीज बियाणांचे देखील जाहीर करण्यात आलेले आहेत या देखील बियाणासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना ते येणाऱ्या खरिप २०२३ साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अनुक्रमांकबियाणेवाणकिंमत/दर
1भातइंद्रायणी १० किलो बॅग600
2मूगउत्कर्ष पीकेव्हीएम-४ बीएम-२००३-२5kg=८७५
2kg=३६०
3तूरBDN-716 फुले राजेश्वर,पीकेव्ही तारा2kg=390
4तूरBSMR-७३६ मारुती,अशा (ICPS-87119)2KG=360
5उडीदAKU-10-1 TAQ-12KG=350
5KG=850
6सूर्याफुलसंकरित उर्यफूल500gm=150
7सुधारित बाजरीधनशक्ती=1.5kg
नागली-फुले नाचणी=1kg
165
110
8संकरित बाजरीमहाबीज-१००५ 1.5kg240
9संकरित ज्वारीसीएसएच-९, महाबीज-७ सीएसएच-१४ भाग्यलक्ष्मी-२९६ 3kg=420

Big news-सरसकट पिक विमा मंजूर | Crop Loan List २०२३ | पात्र जिल्ह्याची यादी झाली जाहीर.

फक्त हेच जिल्हे पात्र आहेत । Crop Loan List २०२३

नमस्कार शेतकरी मित्रानो, तुमच्यासाठी आताची एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्याचा पिक विमा सरसकट मंजूर झालेला आहे. पिक विमा सरसकट जाहीर झालेल्या जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे.

Crop Loan List २०२३ बद्दल मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कि, हे शेतकरी कोण आहेत?नेमके कोणते जिल्हे आहेत? कोणकोणत्या पिकासाठी हा विमा मंजूर झाला आहे.मित्रांनो आज आपण हि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा लेख पूर्ण जरूर वाचा .

शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे, दरवर्षाला लाखो शेतकरी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या पिकाचा विमा काढतात. कारण दर वर्षी कोणत्या न कोणत्या कारणाने शेत पिकाचं नुकसान होते, ज्यात नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.

हे वाचा -२०२३ चे खाताचे दर। खत झाले स्वस्त

मागील दोन वर्ष म्हणजे २०२१ व २०२२ सालात शेतकरी मित्रानी मोट्या प्रमाणावर शेत पिकाचा विमा ( crop loan ) काढला होता आणि या वर्षात शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. मात्र या वर्षात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मिळणारी रक्कम मात्र मिळाली नाही.

२०२० मध्ये देखील असाच काहीसा प्रकार घडला होता, मात्र शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्या नंतर शेतकऱ्यांना २०२० चा विमा मिळाला.आता मात्र मागील वर्षातचा पीकविमा सरसकट मंजूर झाला आहे..

पीकविमा पात्र जिल्ह्याची यादी | Crop Loan List

राज्यात अनेक जिल्हे आहेत मात्र संपूर्ण जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र नाहीत कारण बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली नसल्याने हे जिल्हे वगळण्यात आलेले आहे।
यादीत दिलेले संपूर्ण जिल्हे पिकविम्यासाठी पात्र झाले असले तरी जिह्यातील काही तालुके हे वागल्यात आलेले आहेत हे लक्षात घ्यावे.

अनुक्रमांकपात्र जिल्हेपात्र गाव संख्या
1बुलढाणा98
2बीड144
3जालना64
4यवतमाळ161
5नाशिक91
6नांदेड114
7परभणी73
8 लातूर120
9वाशिम112
10अकोला146
11कोल्हापूर73
12संभाजीनगर119
एकूण १२एकूण १२एकूण 1315

Breaking बातमी-खताचे नवीन भाव जाहीर | Fertilizer Rate 2023 | fertilizer subsidy 2023

खत होणार स्वस्त अनुदान झाले जाहीर केंद्राचा मोठा निर्णय | fertilizer subsidy 2023

Fertilizer Rate 2023 :-शेतकरी मित्रानो नमस्कार,आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी , खताच्या बाबतीत सरकारने कोणता निर्णय घेतला.खताचे भाव वाढणार की कमी होणार?कोणत्या खताचे भाव काय राहणार?खताचे अनुदान 2023 मध्ये कसे राहणार? कोणत्या खाताचे भाव कायम राहणार? ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख संपूर्ण जरूर वाचा.

मागील वर्षाचे भाव व 2023 चे संभाव्य भाव

२०२१ चा विचार केला तर २०२२ मध्ये खताच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. मात्र या वर्षाला खताच्या दरात घट होण्याची शक्यता असून काही खताचे दर हे घटतील मात्र काही खताच्या किंमती कायम राहतील.२०२३ चे संभाव्य दर खालील रकान्यात दर्शविले आहेत

खताचे नाव२०२२ भाव२०२३ भाव शक्यता
युरिया 266266
DAP13501290
NPK14701400
MOP17001650

खताच्या किंमती आणि मिळणारे अनुदान Fertilizer price 2023

Fertilizer Rate 2023 :- राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता खतासाठी मोट्या प्रमाणावर अनुदान जाहीर झाले असून खताचे दर आता नियंत्रित राहणार आहेत.गेल्या काही वर्षांपासून आपण पाहताच आहोत कि खाटांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.ज्या मध्ये यूरिया (यूरिया),DAP,पोटॅश खताचा समावेश आहे तसेच संपूर्ण संयुक्त व मिश्र खताला हे अनुदान असणारे आहे.

हे वाचा :- pm किसान योजना १४ वा हप्ता कधी मिळणार

तुम्हाला माहीतच आहे कि रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. दरवर्षी खतांच्या भावात मोठी वाढ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. सोबतच शेतमालाला योग्य भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे.


दर वर्षाला खताचे भाव व अनुदान जाहीर होत असतात आणि याच मुळे खताच्या किंमती नियंत्रित राहतात आता सुद्धा सध्या सरकारने खताचे अनुदान जाहीर केले असून खताला 38 हजार कोटींचे अनुदान जाहीर केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या १७ मे २०२३ रोजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे

Fertilizer Rate 2023 | खताचे भाव वाढले का

Fertilizer Prices in Maharashtra २०२३ :- सध्या शेतीला रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.शेतकरी रासायनिक खताशिवाय शेती करूच शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झली आहे.यामुळे मागच्या 2 वर्षात रासायनिक खतांचे भाव खुपच वाढले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांच्या भावात भयंकर तेजी झाली होती.कच्च्या मालाचा तुटवडा आणि भाव वाढल्यामुळे खतांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते.मात्र सध्या तरी भाव वाढी संदर्भात कोणतीच चर्चा नाही.

Fertilizer price 2023 : – ईफको ( ifako) आणि इतर कंपन्या लवकरच आपले खताचे नवीन दर जाहीर करण्याची शक्यता आहे.मेच्या
शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खतांचे नवीन भाव जाहीर होण्याची शक्यता आहेत. तसेच भाव किती कमी झाले,भाव वाढले ? याबद्दल अपडेट वेळोवेळी तूम्हाला मिळत़च राहतील. येत्या हंगामात शेतकऱ्यांना स्वस्त दराने खतं उपलब्ध होण्याची श्यक्यता आसल्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीत खतांची खरेदी न करता योग्य तो निर्णय घ्यावा.

खताच्या अनुदाना शिवाय भाव

Fertilizer Rate 2023 :-मुळात खातांचे भाव हे शेतकऱ्यांना न परवडणारे असतात.हि खाते अनुदाना शिवाय विकत घेऊन शेती केल्यास खर्चाचे बरोबर उत्पन्न निघते त्यामुळे शेती अजिबात परवडत नाही.म्हणून सरकार शेतकऱ्यासाठी हि खात अनुदानावर उपलब्ध करून देतात पण तुम्हाला माहित आहे का या खतांच्या अनुदाना शिवाय किंमती काय आहेत .चला तर जाणून घेऊ खाली दिलेल्या टेबल च्या साह्याने.

खताचे नावअनुदाना शिवाय भाव
युरिया2450
DAP4073
NPK3291
MOP2654