kanda anudan yojna : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिला टप्पा ३०० कोटींचा.
kanda anudan yojna : टोमॅटोचे भाव वाढले मात्र कांद्याच्या भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले कारण आता कांद्याला सरासरीच्या तुलनेत कमी भाव लागत आहे.मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे, आता कांद्यापोटी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार? किती अनुदान मिळणार? या बाबत सविस्तर माहिती पाहण्याअगोदर जर तुम्हाला योजना व माहिती थेट मोबाईल वर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करू शकता.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार असून लवकरच या अनुदान वाटपाला सुरुवात होणार आहे.२०२३ या वर्षातील १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधी मध्ये शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्यालाच फक्त राज्य शासनाने हे अनुदान जाहीर केले आहे.या अनुदान वाटपाला येत्या बुधवार पासून वाटप सुरु सून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हि रक्कम येणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये ३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ३०० कोटी रुपयांची निधी वितरित होणार आहे.उर्वरित शेतकऱ्यांसाठी दुसरा टप्पा सुरु केला जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दुष्काळ व कांद्याच्या भावात झालेली घट लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला अनुदान देण्याचा विचार केला आहे.या काळामध्ये विक्री केलेल्या कांद्याला प्रति शेतकरी ३५० रुपये एव्हढे अनुदान देण्यात येणार असून प्रति शेतकरी फक्त २०० क्विंटल पर्यंतच अनुदान देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये १० कोटीपेक्षा जास्त मागणी असलेल्या तसेच १० कोटीपेक्षा कमी मागणी असलेल्या अशा एकूण २४ जिल्ह्यासाठी अनुदान वाटप केले जाणार असून यामध्ये प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहे.तर उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्पयात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
RTO New Rule : पहा कोणत्या देशात गाड्यासाठी किती स्पीड लिमिट
१० हजार पेक्षा जास्त मागणी असलेले जिल्हे
अ.क्र. | अ.क्र. जिल्ह्याचे नाव |
---|---|
1 | नाशिक |
2 | उस्मानाबाद |
3 | पुणे |
4 | सोलापूर |
5 | नगर |
6 | छ.संभाजीनगर |
7 | धुळे |
8 | जळगाव |
9 | कोल्हापूर |
10 | बीड |
१० हजार कमी जास्त मागणी असलेले जिल्हे
अ.क्र. | अ.क्र. जिल्ह्याचे नाव |
---|---|
1 | नागपूर |
2 | सांगली |
3 | सातारा |
4 | रायगड |
5 | चंद्र्पुर |
6 | ठाणे |
7 | अमरावती |
8 | बुलढाणा |
9 | वर्धा |
10 | लातूर |
11 | यवतमाळ |
12 | अकोला |
13 | जालना |
14 | वाशीम |