crop insurance पाहिजे तर लगेच हे काम कारा नाहीतर ; १ रुपयात पीक विमा मिळणार नाही
शेतकरी मित्रानो,आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीकविमा crop insurance मिळणार नाही.हे नेमकी काय अडचण आहे हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत सोबतच पाहूया कि १ रुपयात पीकविमा शेतकऱ्यांना मिळणार का? जर मिळणार तर त्यासाठी नेमकं काय करावं लागणार ? आणि या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार नाही या बाबतची सविस्तर माहिती.
अशीच नवनवीन माहिती व योजना तुम्हाला थेट तुमच्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली ग्रुपची लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १ रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा दिला जाईल असा निर्णय झाला आणि लगेच त्याबाबत शासन निर्णय देखील आला मात्र आता काही गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर मात्र हा विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही.
चला तर अगोदर जाणून घेऊया कि पीकविमा काढणे का गरजेचे आहे.मित्रानो तुम्ही पाहिलं असेल कि,लोक स्वतःचा विमा काढतात, कारण माणसाला कधी काय होईल हे सांगता येत नाही.विमा काढण्यामागे माणसाला विम्याचा संरक्षण मिळावं हा मुख्य उद्देश असतो.आणि विमा काढल्या नंतर जर त्यांना काही झालं तर त्यांना नुकसानीची भरपाई दिली जाते म्हणजेच काय तर पैसे मिळतो .विमा काढलेल्या रकमेच्या कितीतरी जास्त विम्याच्या स्वरूपात मिळतो.
हे आहेत राज्यातील नवीन 22 प्रस्तावित जिल्हे New district in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?
आता तुमच्या लक्षात आला असेल कि पीक विमा काढणे किती आवश्यक आहे.आता समजून घेऊ कि पीक विमा काढल्यास काय फायदा होतो.मित्रानो आपण पिकाची पेरणी करतो .आणो त्याचा विमा काढतो त्यावेळी जर विम्यामध्ये लागू असलेल्या कोणत्याही नैसर्गिक आपत्ती.
जसे कि,अतिवृष्टीचा पावसामुळे झालेले नुकसान ,पाऊस झाल्यावर आलेल्या पुरामुळे पिकाचे झालेले नुकसान किंवा विजेमुळे लागलेल्या जागेमुळे झालेल्या नुकसानीमुळे किंवा पेरणी केल्यानंतर दुष्काळ पडल्यास किंवा एखाद्या रोगामुळे झालेल्या पिकाचे नुकसान झाल्यास तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळते आणि त्याच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत मिळते.