Crop Loan

Crop Loan : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी -आता मिळणार ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

Crop Loan नव्या कर्ज योजनेबाबत तुम्हाला माहित आहे का? लगेच मिळवा कर्ज

हो मित्रानो तुम्हाला आता बिनव्याजी पीक कर्ज म्हणजेच Crop Loan सरकार देणार आहे. खरं पाहिलं तर सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतो, मात्र शेतकऱ्यांना ह्या योजना माहीतच नाहीत.आज आपण या कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहित थेट मोबाइल वर विनामूल्य पाहिजे असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.नवीन अपडेट येता तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून मेसेज येईल.ग्रुप लिंक खाली दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा यांनाच मिळणार लाभ

खरं पाहिलं तर हि खूप जुनी योजना होती.या योजनेची सुरुवात १ मे १९९९ झाली होती मात्र २०१२ मध्ये यात थोडे बदल करण्यात आले.मात्र ठाकरे सरकारने Crop Loan या योजनेला पुढे चालविले व या योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना कर्ज मध्ये सवलत दिली आहे.

या योजनेचा लाभ कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला होता.शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे फार महत्वाचे आहे कारण त्यांना वेळेवर कर्ज मिळाले तर शेतीचे नियोजन होऊ शकते.

सरकार शेतकऱ्यांना कर्ज उपलब्द करून देते,पेरणीच्या हंगात वेळेवर हे शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असतात.बरेच शेतकरी वेळेत कर्जाची परतफेड करतात मात्र बरेच शेतकरी कर्जाची परतफेड न करता तसेच कर्ज थकीत ठेवतात.

असे थकीत सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शेतकरी थकीत होऊ नये यावर उपाय म्हणून जर शेतकऱ्यांना सवलत दिली तर मात्र जास्तीत जास्त शेतकरी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वेळेत कर्जाची परतफेड करतील या हेतूने या योजनेत मोठे बदल ठाकरे सरकारने केले. पुढे मात्र कमालच झाली मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेत परतफेड करण्यास सुरुवात केली.

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचं स्वरूप व व्याजदर माहिती

Crop Loan हि योजना शेतकऱ्यांसाठी फारच फायद्याची ठरते कारण या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्जामध्ये सवलत दिली जाते.ह्या योजना सहकारी मध्यवर्ती बँक,कृषी सहकारी पथसंस्था विशेष करून पीक कर्ज वाटप करतात मात्र आता खासगी व ग्रामीण बँका सुद्धा आता पीक कर्ज वाटप करून सवलत योजनेच लाभ शेतकऱ्यांना देत आहेत.

चला ता समजून घेऊया कि,कर्ज परतफेडताना कशा पद्धतीने सवलत दिली जाते.
ह्या बँक शेतकऱ्यांना त्यांच्या जवळ असलेल्या शेतीच्या भांडवली मूल्याच्या आधारे पीक कर्ज उपलध करून देते.कोण्या शेतकऱ्याकडे किती एकर जमीन आहे यावर हे कर्ज अवलंबून असते.हे कर्ज २० हजार रुपया पासून तर ३ लाख पर्यंत असू शकते.

शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड ३० जून पर्यंत केल्यास शेतकऱ्यांना ३% कर्जामध्ये सवलत दिली जाते.किंवा कर्जाची परतफेड वेळेत केल्यामुळे प्रोत्साहन पार लाभ मिळतो असे म्हणता येईल.

पूर्वीच्या योजनेत बदल झाल्या नंतर २०१८-१९ या वर्षांमध्ये वाटप झालेल्या पीक कर्जावर हे अनुदान लागू करण्यात आले आहे.तसेच पुढेही हि योजना कार्यरत राहणार असेल.

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेतून ह्या ६ बँकच देतील कर्ज
इथे क्लिक करून माहिती पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *