Category Archives: शेती सल्ला

farmming information

khodmashi : सोयाबीन पिकावरील खोडमाशी किडीची ओळख व नियंत्रण

खोडमाशी ( khodmashi ) किडीची ओळख


khodmashi : शेती मधून अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर मात्र फवारण्याचे योज्य व्यवस्थापन करावे लागते मात्र त्यासाठी शेतात असलेल्या किडींची ओळख करून घेणे अतिशय महत्वाचे आहे.प्रौढ खोडमाशी आकाराने फक्त २ मि.मी. व चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ खोडमाशी दलपत्र किंवा पानाच्या आतमध्ये अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडणारी या किडीची छोटी अळी पिकाला नुकसानकारक असते. पूर्ण विकसित अवस्थेत ही अळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणतः ३ ते ४ मि.मी. लांबीची असते.

अशाच नवनवीन माहिती व योजनेसाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खोडमाशी ( khodmashi ) किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

पानाच्या शिरांद्वारे अळी सोयाबीनच्या खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. उगवणीपासून ७ ते १० दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसू लागतात. तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो व झाडे वाळून नष्ट होतात. त्यामुळे शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते. खोडमाशी सोयाबीन पिकावर जीवनाच्या ४ ते ५ पिढ्या राहतात. पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये khodmashi चा प्रादुर्भाव झाल्यास खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.

खोडमाशी किडीच्या आर्थिक नुकसान पातळी


सोयाबीन हे लवकर येणारे पीक असून कमी वेळामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो.मात्र वेळोवेळी बारीक पाहणी करूनच फवारणीचे नियोजन केले असता फवारणीचा खर्च काही करता येते.फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घ्यावी.१० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे सोयाबीन मध्ये दिसत असल्यास फवारणीचे नियोजन करावे.

खोडमाशी किडीच्या व्यवस्थापनाचे उपाय

१.पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम ७० डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. २.रासायनिक कीटकनाशक पीक ७ ते १० दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच क्लोरोपायरीफॉस २० टक्के इ.सी. १.५ लीटर प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के इ.सी. ८०० मि.ली. प्रति हे. किंवा इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. १ ली. प्रति हे. किंवा क्लोरॅथुनिलीप्रोल १८.५ टक्के एस. सी. १५० मि.ली. किंवा इथिऑन ५० टक्के इ.सी. १५०० मी.ली. ५०० ते ७०० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

आता ई पीक पाहणी साठी Digital crop Survey application.

Digital crop Survey application : मित्रांनो पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र,शेतातील पाण्याच्या साधनांची तसेच झाडांचा अचूक डेटा संकलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वे विकसित करण्यात आलेला आहे आणि याच एप्लीकेशनच्या माध्यमातून येत्या काळामध्ये राज्यांमध्ये ईपीक पाहणी केली जाणार आहे.तेव्हा अशाच नवनवीन माहिती व योजनेसाठी आपला whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

मित्रांनो सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून ईपीक पाहणी प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून शेतकरी याच्याच माध्यमातून ईपीक पाहणी करत आहेत परंतु, या पाहणी करत असताना बऱ्याच साऱ्या सदोषिती ईपीक पाहणी केल्या जात आहेत, दुरून फोटो काढता येतात किंवा डाटा चुकीचा देखील याच्यामध्ये भरला जात आहे परिणामी अचूक माहिती संकलित करण्यामध्ये मोठ्या समस्या येत आहेत.

त्यामुळे आता केंद्र शासनाच्या माध्यमातून हे डिजिटल क्रॉप सर्व ॲप विकसित करण्यात आलेले आहे, जे देशातील 12 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरती वापरण्यासाठी देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये राज्यातील 114 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात एक-दोन गावाचा समावेश करून हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास देण्यात आलेला आहे.

Digital crop Survey application : चुकीच्या कामाला बसणार आळा

एप्लीकेशनचे वैशिष्ट्ये : याच्यामध्ये चुकीचा डाटा भरला जाऊ शकत नाही किंवा लाभार्थ्याला याच्यामध्ये आपली ईपीक पाहणी करत असताना 50 मीटरच्या अंतरावरून फोटो काढण्यात बंधनकारक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे चुकीच्या पिकाचा फोटो किंवा चुकीचे फोटो याच्यामध्ये अपलोड करता येणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीने ईपीक पाहणी याच्यामध्ये करता येणार नाही.

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

२०२४ मध्ये येणार अँप : या अँपमुळे हा प्रकल्प आता प्रायोगिक तत्त्वावरती वापरल्यानंतर 2024 च्या खरीप हंगाम पासून पूर्ण राज्यामध्ये या ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनच ईपीक पाहणी करता येणार आहे. तो पर्यंत त्या मध्ये आणखी काही नवीन बदल देखील केले जाऊ शकतात.मात्र सध्या हि पाहणी ईपीक पाहणी या अँपच्या
माध्यमातून करून घ्यावी.

epik pahani अंतिम तारखेत वाढ : 31 ऑगस्ट 2023 हि अंतिम तारीख होती मात्र बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करायची अजून बाकी असल्याने त्यामध्ये आणखी १५ दिवसाचा कालावधी वधूब देण्यात अली आहे.तेव्हा लवकरात लवकर आपण आपली राहिलेली पीक पाहणी करून .७/१२ वर पेरे चढवून घ्यावे.

soyabin favarni | सोयाबीन पीक आले धोक्यात | सोयाबीन फवारणी

soyabin favarni : सोयाबीनवर झाला माव्याचा प्रादुर्भाव.

soyabin favarni : सोयाबीन पिकाचे दिवसेन दिवस मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घटताना दिसत आहे आणि त्यातच आता सोयाबीन पिकात माव्याचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.राज्यातील बहुतांश शेतकऱ्याला या किडीने त्रस्त केले आहे तर अजून माव्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

चला तर आता मावा नियंत्रण करण्यासाठी तसेच सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी नियोजन सांगणार आहोत.मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशीच नवनवीन माहित व योजना थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खरं पाहिलं तर कधीच माव्याचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर दिसत नाही मात्र मागील वर्षांपासून सोयाबीनच्या काही वाणांवर माव्याचा प्रादुर्भाव होत आहे.हा वाणा निवडी वरील विपरीत परिणाम नसून वातावरणातील झालेला विपरीत परिणाम होय.म्हणजेच काय तर पावसाचा खंड आणि तापमानात वाढ झाल्यास मावा प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण आहे.

अळी व इतर किडीच्या तुलनेत पांढरी माशी व मावा हा पिकासाठी खूप घातक असून त्यावर लवकरात लवकर नियंत्रण करणे गरजेचे असते.मावा तसेच अळी आणि पिकाचा विकास होण्यासाठी हि फवारणी महत्वाची ठरणार आहे फवारणीत पुढील घातक घेऊन सोयाबीन फवारणी घ्या.

सोयाबीन फवारणीत कोणता घटक घ्यावी.

१ ) कीटकनाशक : सॉलोमन = २५ मिली प्रति १५ लिटर पंप
२) विद्राव्य खात : ० : ५२ : ३४ : १०० ग्राम मिली प्रति १५ लिटर पंप
३) बुरशीनाशक : मॅन्कोझेब : ३५ ते ४० ग्राम प्रति १५ लिटर पंप..


सूचना :- फवारणी करताना योग्य प्रमाण घ्यावे .फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
पावसाचे वातावरण असल्यास फवारणीत स्टिकर घ्यावे.

 आता तुम्हाला मिळणार आहेत १२ हजर रुपये.लगेच अर्ज करा आणि योजना मिळवा.

epik pahani ची 31 ऑगष्ट हि अंतिम तरिख | ईपीक पाहणी का करावी.

येत्या ६ दिवसात epik pahani करा नाहीतर होतील हे ५ नुकसान.

शेतकरी मित्रानो,हि बातमी अतिशय धक्कदायक आहे.जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्ही epik pahani केली नसेल तर मात्र तुमचे खूप मोठे नुकसान होणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्या.चला तर शेतकरी मित्रानो आपण आज पाहूया काय आहे अंतींम तारीख? आणि काय नुकसान होऊ शकतात? मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती व योजना जर मोबाइलला वर पाहिजेत असतील तर मात्र तुम्ही आमचा whtasapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

epik pahani

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्य सरकारने मागील काही वर्षा पासून ईपीक पाहणीचे काम शेतकऱ्यांना सोपविले असून ईपीक पाहणी न केल्यास मात्र आता काही योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.ईपीक पाहणी करणेसाठी आता फक्त ५ दिवस राहिले असून येत्या ५ दिवसाच्या आत ईपीक पाहणी करून घ्यावी लागणार आहे.नाहीतर एकूण ५ नुकसान होणार आहेत.

कोणते नुकसान होणार ?

१) पीक विमा मिळणार नाही.
२) पी.एम.किसान योजनेत अडथळा
३) पीककर्ज मिळण्याचं अडचण
४) अतिवृष्टी नुकसान किंवा कोरडा दुष्काळ मदत मिळणार नाही.
५) सरकारचे कोणतेच अनुदान मिळणार नाही.

काय करावे लागणार ?

वरील सर्व बाबी साठी शेतकऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकते तेव्हा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ईपीक पाहणी करून घ्यावी.कारण पूर्वी तलाठी / पटवारी ७/१२ वर पेरे चढवत होते मात्र आता सरकारच्या मते ईपीक पाहणीच्या माध्यमातून पेरे चढवायचे आहेत.आणि शेतकऱ्यांनि पेरे चढवणे बंधनकारक आहेत.

अशी करा ईपीक पाहणी त्यासाठी इथे क्लिक करा

सोयाबीन चक्री भुंगा नियंत्रण | Soybean Girdle Beetle | सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा कीड नियंत्रण

प्रस्तावना : सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याचे मुख्य कारणांपैकी एक म्हणजे चक्री भुंगा, त्याला Soybean Girdle Beetle असे देखील म्हणतात. चक्री भुंगा हा कारणीभूत ठरतो.सोयाबीन पिकावरील कीड/कीटक नियंत्रण हा महत्वाचा मुद्दा आहे.सोयाबीन पिकावर अनेक किडीचा प्रादुर्भाव होतो आज आपण चक्री भुंग्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेबणार आहोत.

Soybean Girdle Beetle

हा पिकाचे कसे नुकसान करते ? त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे कोणती ? त्यावर कसा उपाय करावा ? हे मुद्दे सामाविस्ट असणार आहेत मात्र त्या अगोदर अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती व योजना त्यात मोबाइलला बार मिळविण्यासाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता .खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

चक्री भुंगा किडीची ओळख | चक्री भुंगा किडीची ओळख

शेतकरी मित्रानो,सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये ही कीड मुख्य किडीं म्हणून ओळखली जाते.राज्यातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.हि कीड अतिशय हानिकारक आहे. त्याची प्रौढ कीड नारंगी रंगाची पाहायला मिळते, तिच्या पंखांचा खालचा भाग काळा असतो.त्याच्या डोक्यावर दोन उभट शिंग असतात त्याला काही शेतकरी अँटेना असे म्हणतात.हि अँटेना शरीराच्या लांबी एवढ्याच व मागे वळलेल्या दिसतात .

Soybean Girdle Beetle

या किडीची अळी पाय विरहित व पिवळ्या रंगाची असते.पूर्ण विकसित अळी साधारणतः २ सें. मी. लांबीची असते. मुंगे गर्द भुरकट काळ्या पंखामुळे सहज ओळखता येतात.खालील फोटोत दिसणारा कीटक तुम्ही पहिला असेल तर हाच तो चक्री भुंगा आहे.

चक्री भुंगा किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव ओळखणे अतिशय सोपे आहे.सोयाबीन मध्ये सहज फेरफटका मारताना तुम्ही हे सहज ओळखू शकता. मादी पानाचे कोवळे देठ,वरील फांदी किंवा मुख्य खोडावर गोलाकार आकाराचे दोन चक्र बनविते.त्यामुळे फांदीच्या आता जायला जागा तयार होते.

Soybean Girdle Beetle

पुढे अळी अंड्यातून बाहेर निघून या काप घेतलेल्या जागेतून आतील खोडात शिरते व खोडाचा आतील भाग खाऊन रोपाला पोकळ बनविते.त्यामुळे पिकाला बनविलेले अन्न झाडामध्ये सर्वत्र पसरायला अडचणी येतात.जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला योग्य पुरवठा होत नाही.याचाच परिणाम झाडाला फुले व शेंगा लागण्यावर दिसतो म्हणजेच काय तर उत्पादनात मोठी घट होते.

पूर्ण विकसित अळी रोपाला आतूनच कापून टाकते, त्यामुळे पीक मोडून जमिनीवर पडते. चक्री भुंग्याची अळी ही पुन्हा जमिनीवर शिल्लक असलेल्या उभ्या झाडाचा शरीराच्या लांबी एवढा तुकडा कापून त्याच्या आतमध्ये बऱ्याच दिवस पडून राहते.व मग पुन्हा दुसऱ्या पिढीसाठी कोष अवस्था धारण करून पतंग होते व अंडे घालून पुन्हा पिकावर प्रादुर्भाव होते.

सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी ?
इथे क्लिक करून पहा.

संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जून- जुलै महिन्यात दिल्या गेलेल्या अंड्यामधून तयार झालेली अळी त्याच खरीप हंगामामध्ये कोषामध्ये रूपांतरित होते. थोड्या दिवसांनंतर प्रौढ कीड कोषातून बाहेर निघून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते. जुलैमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
आर्थिक नुकसान पातळी.

चक्री भुंगा किडीचे व्यवस्थापनाचे उपाय.

१. जास्त दाट पेरणी करू नये व पेरणी करताना खतांबरोबर फोरेट १० जी १० कि. ग्रॅ. प्रति हे. जमिनीत फेकीव पद्धतीने जमिनीत टाकावे तसेच नत्र खतांचा संतुलित वापर करावा.


२. उभ्या पिकात प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून शेताबाहेर खड्ड्यात पुरावेत.


३. पिकावर प्रादुर्भाव दिसताच रासायनिक कीटकनाशक ट्रायझोफॉस ४० इ.सी. ६२५ मि.ली. प्रति हेक्टर किंवा थायक्लोप्रिड २१.७ एस.सी. ७५० मि.ली. प्रति हे. ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारावे.