Category Archives: शेती सल्ला

farmming information

Chilli leaf curl virus Control | मिरची पिकातील वायरस रोगावर हा रामबाण उपाय

काय आहे मिरची पिकावरील चुरड-मुरडा रोग? | Chilli leaf curl virusजाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो,हा लेख तुमच्या साठी अतिशय महत्वाचा असून मिरची पिकातील वायरस रोगावरती हा रामबाण उपाय ठरणार आहे. होय शेतकरी बंधूंनो या लेखात आपल्याला मिरची पिकावरील ( Chilli leaf curl virus ) कोकडा-बोकडा किंवा चुरडा मुरडा या नावाने संबोधल्या जाणाऱ्या एका वायरस बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत.

त्याच्यावरती संपूर्ण एकात्मिक उपाय आपण कशाप्रकारे करू शकतो याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.त्यामुळे शेतकरी बंधुनो लेख खूप महत्त्वाचा आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की हा लेख तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.

Chilli leaf curl virus

लगेच अर्ज करा-शेतकऱ्याना बियाणे मिळणार अगदी मोफत पहा काय आहे योजना?

मिरची हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्वाचे पीक असून शेतकऱ्याना सर्वात जास्त पैसा मिळवून देणारे पीक आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही .महाराष्ट्रात विदर्भ,मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील बऱ्याच जिल्ह्यात तसेच विशेष करून सातारा,पुणे,औरंगाबाद, धुळे,या जिल्ह्यांमध्ये मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

मात्र प्रत्येक शेतकऱ्याला मिरचीचे भरगोस उत्पन्न घेता येत नाहीय कारण मिरची उत्पादक शेतकरी नेहमी एका समस्येने ग्रस्त असतात ती म्हणजे मिरची पिकावर होणारा वायरस अटॅक.चुरडा – मुरडा, घुबड्या, बोकड्या या नावांनी या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविधओळखले जाते.

मिरची पिकावरील चुरडा-मुरडा,बोकड्या रोगाची लक्षणSymptoms of leaf curl disease

Chilli leaf curl virus :- या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे आपल्या मिरची पिकावरील झाडाची पाने वरील बाजूस वळलेली दिसून येतात.मिरचीच्या पानांचा गुच्छ झालेला आपल्याला दिसून येतो.शेतकरी बंधूंनो त्या झाडांना फुले आणि फळे आपल्याला कमी प्रमाणात लागलेली दिसून येतात.झाडाची नवीन पाने बारीक येतात.मिरची पिकात पानांवर सुरकुत्या किंवा पानगोळा होण्यासारखी लक्षणे दिसतात. झाडाची वाढ होत नाही त्या झाडाची वाढ खुंटते.

रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाचे संपूर्ण पाने गाळून पडतात,तसेच यावर बाहेरच म्हणजे रोगाचा प्रसार आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येतो,हा प्रादुर्भाव रस शोषक किडीमार्फत झालेला दिसून येतो. म्हणूनच आपल्याला या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बंधुनो त्या ठिकाणी रस शोषक किडींचे नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण पीक आपल्या हातून जाऊन शेतकर्याचं मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

Chilli leaf curl virus | मिरची पिकावर या अवस्थेत कोणकोणत्या किडींचा/किटकांचा प्रादुर्भाव होतो

मिरची पिकाची इतर पिकाच्या तुलनेत मोट्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागते कारण हे पीक रोगास जास्त संवेदनशील असते.त्यावर रोगांचा अटक लवकर होतो व त्याचे नियंत्रण वेळेवर करणे गरजेचे असते.त्यामुळे मिरची पिकावर अटॅक करणाऱ्या किडी/कीटकांची आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे जेणे करून त्यांचे नियंत्रण तात्काळ करता येईल.

अ.क्र.किडी/किटकरोग
1पांढरी माशी भुरी
2थ्रिप्स ( फुलकिडे )मर
3लाल/पिवळा कोळी बोकड्या
4फळ पोखरणारी आळीपानावरील पांढरे ठिपके
5तुडतुडेकेवडा

मिरची पिकावरील चुरडा-मुरडा,बोकड्या रोगाचे नियंत्रण व व्यवस्थापन कसे करावे?

पिकावरील या भयानक व्हायरस आहे.त्यामुळे त्याचे एकात्मिक उपाययोजना केली तरच या विविध रोगावरती नियंत्रण शक्य आहे. रोग नियंत्रणाची पद्धत काय आहे ते समजून घेऊया.शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण मिरचीचा प्लॉट लावत असतो त्यावेळेस आपल्याला मिरचीच्या चारी बाजूंनी शेडनेट किंवा जुन्या साड्या त्या ठिकाणी बांधायचे आहेत. शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा आपल्याला चार ते पाच प्रादुर्भावग्रस्त रोपे त्या ठिकाणी आढळून येतील त्यातील रोगग्रस्त रोपे काढून प्लॉटच्या बाहेर काढून त्या ठिकाणी नष्ट करायचे आहे.

Breaking बातमी-खताचे नवीन भाव जाहीर-पहा नवीन भाव काय आहेत.

शेतकरी बंधूंना आपल्याला माहित आहे की, या वायरसचा प्रसार हा रस शोषक किडीमार्फत होतो म्हणूनच आपल्याला प्रति एकरी दहा पिवळे चिकट सापळे आणि 10 निळे चिकट सापळे आपल्या प्लॉटमध्ये लावायचे आहेत.शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून त्या ठिकाणी निम तेलाची आपल्याला दोन मिली प्रतिलिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे.

शेतकरी बंधूंनो मात्र या वायरसनी आपल्या मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर अटॅक केला असेल तर मी पुढे सांगत असलेली कीटकनाशके आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मिरची पिकावरती आलटून पालटून फवारणी द्वारे वापरायचे आहेत.याने मात्र या रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल. खालील पैकी कोणतेही एकाच कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे.

मिरची वरील रोगावर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक

शेतकरी मित्रानो ,मिरची वरील या विविध रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी खालील पैकी कोणतेही एकच कीटकनाशक आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापरायचे आहे.फवारणी करताना पाण्याचे योग्य प्रमाण घेणे अतिशय आवश्यक आहे.तसेच कीटकनाशकाचे योग्य प्रमाण देखील अतिशय महत्वाचे ठरते.

अ.क्र.घटक नावकीटकनाशक
1इमामेक्टिन बेंझॉइड 1.5 +फिप्रोनील ३.५ scअपेक्स-50
2फ्लूबेन्डामीड १९.९२ + थायक्लोप्रिड १९.९२बेल्ट एक्सपर्ट (बायर)
3इंडोक्साकार्ब 14.5 एससी+एसिटामिप्रिड 7.7 एसपीकाईट घरडे केमिकल
4थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सीसिजेंटा अलिका

अशा प्रकारे शेतकरी बंधुनो ही वेगवेगळे कीटकनाशके आपल्याला आपल्या पिकावरती आलटून पालटून फवारणी द्वारे वापरायचे आहेत.आता याचे प्रमाण शेतकरी बंधूंना आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पिकावरती कोणत्या किडींचा किती प्रादुर्भाव आहे, याच्यानुसार ठरवायचे आहेत, अंदाजे त्या ठिकाणी आपण 0.5 ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी मिसळून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे म्हणजे सिलिकॉन युक्त स्टिकर मिसळून आपल्या मिरची पिकावरती त्याठिकाणी फवारणी द्वारे वापरायचे आहे.

खालील टेबल हा फक्त इंग्रजीमध्ये आहे.

No.ContentInsecticide
1Emamectin Benzoate 1.5 Fipronil 3.5 ScApex
2Flubendiamide 19.92% + Thiacloprid 19.92% w/w SCBelt Expert ( Bayer )
3Indoxacarb 14.5% + Acetamiprid 7.7% SCGharda
4Thiamethoxam 12.6% + Lambda Cyhalothrin 9.5% ZC – 200 mlSyngenta Alika

कापूस टॉप 5 वाण | cotton seed top variety 2023 | kapus top 5 biyane

कापसाचे सर्वात उत्कृष्ट वाण | kapus biyane 2023 | cotton seed top variety 2023

नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो.मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकाबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होत आहे आणि खरीप हंगाम म्हणलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल या भागातील प्रमुख पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जातं.भारतामध्ये कापूस पिकाला आपण पांढरे सोने देखील म्हणतो. भारतामध्ये नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जागतिक पातळीवरती कापूस पिकाला आता अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालेला आहे.

cotton seed top variety 2023

हे वाचा-RBI चा २००० च्या नोट बंदी बाबत मोठा निर्णय – नोट या तारखेच्या आत जमा करून घ्या

cotton seed top variety 2023 :- शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कापूस पिकाच्या पिकाबद्दल, लागवडीबद्दल चर्चा करत असतो,त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो तो म्हणजे की, यंदाच्या हंगामामध्ये कापूस पिकात कोणती वाण आपण लावायचं.

म्हणजेच काय कापूस पिकाची कोणती व्हरायटी आपण लावली पाहिजे.आजच्या लेखामध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत म्हणजेच काय तर मी तुम्हाला कापूस पिकाचे या ठिकाणी पाच अशा सुधारित जातींची नावे सांगणार आहेत की,ज्या जाती तुमच्या अधिक फायदेशीर राहतील तसेच हे वाण रोगांना कमी प्रमाणात बळी पडणार आहेत.

त्यांच्या उगवणीसाठी त्यांच्या वाढीसाठी तुम्हाला उत्पादन खर्च देखील कमी येणार आहे तसेच तुम्हाला उत्पादन आणि उत्पन्न देखील चांगले मिळणार आहे.

राशी 659 ( RASHI 659 SEEDS ) Cotton Seeds

हे देखील वाचा – महाबीज बियाणांचे २०२३ चे सुधारित दर जाहीर

cotton seed top variety 2023 :- चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पाहूया राशीचे एका सुधारित वाणाबद्दल ज्याचं नाव आहे राक्षी 659 (Rashi 659 variety ) हे वाण भारी जमिनीस शिफारस शिफारस काढण्यात आलेला आहे तसेच बागायती या दोन्ही प्रकारच्या सिंचनासाठी तुम्ही हे वाण वापरू शकता.

अधिक माहिती खलील रकरण्यात दिली आहे….

अ.क्र.राशी 659 विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी145 ते 160 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 12 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक

कबड्डी कापूस बियाणे (KABADDI) TULSI SEEDS | kabaddi cotton seeds

cotton seed top variety 2023 :- महाराष्ट्रात सध्या दुसरा क्रमांक हा कबड्डी कापूस बियाणे वाणाचा आहे.गेल्या 2 वर्षात या वाणांनी शेतकऱ्यांना खुप साथ दिली असून इतर वाणाच्या तुलनेत हे वाण शेतकऱ्यांच्या अधिक पसंतीस उतरले आहे.जवळजवळ सर्वच जमिनीमध्ये हे वाण तुम्ही लावू शकता. या वाणाची खास करून कोरडवाहु व बागायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.अधिक उत्पादन देणारे हे वाण असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं आहे.गेल्या 2 वर्षात फरदडसाठी हे वाण अतिशय उपयुक्त आहे..राशी 659 प्रमाणेच हे देखील अधिक उत्पादन देणारं वाण आहे.

अ.क्र.कबड्डी ( kabaddi) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी160 ते 180 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 8 ते 15 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10लागवड वेळमे ते जून

सुपरकॉट प्रभात सीड्स | Prabhat SuperCot BG II | Cotton Seeds

cotton seed top variety 2023 :- वरील २ वाणा प्रमाणेच २०२२ मध्ये प्रभात सीड्स च्या सुपरकॉट (supercot ) या वाणाने देखील विक्रम नोंदविला आहे.हे देखील वाण मोठ्या बंडाचे असून आधीक विक्रमी उत्पादन दिले असून भरपूर शेतकऱ्यानी या वाणाला पसंती दर्शविली आहे.हे वाण रसशोषक किडीसाठी तसेच लाल्या रोगासाठी अधिक प्रतिकारक आहे.बर्याच शेतकऱ्यानी या वाणापासून सहजरित्या १० ते १२ क्विंटल पर्यंत एव्हरेज घेतलं आहे.

अ.क्र.सुपरकॉट ( SuperCot BG II) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी160 ते 170 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5.5 ते 6.3 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 12 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर4 *1.5
11लागवड वेळमे ते जून

यु. एस. 7067 | us agri seeds US 7067 | US 7067 Cotton Seeds

us agri seeds US 7067 :- यु.एस. ७०६७ हे वाण माध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस करण्यात आलं असाल तरी हे वाण हलक्या जमिनीत देखील शेतकऱ्यांना बरच उत्पादन देऊन गेलं आहे. मागील २ वर्षात या वाणाने देखील शेतकऱ्यांना नाराज केलं नाही.हे वाण लवकर येणारे असल्याने हलक्या जमिनीत पावसाचा आधार घेत अधिक उत्पादन देत आहे.हे वाण विविध रोग व किडीसाठी प्रतिकारक आहे व दात लागवडीसाठी हे वाण चांगले आहे.बोन्डाचे वजन चांगले असून गोलाकार व मोठ्या बोन्डाचे वाण आहे.

अ.क्र.यु. एस. 7067 ( US 7067 BG II) विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी155 ते 160 दिवस
4बोंड आकार मोठा/वजनदार
5वजन5 ते 6ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 10 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2
11लागवड वेळमे

अजित १५५ | Ajeet 155 ( Ajeet seeds ) Cotton Seeds

अजित १५५ या वाणाला पाण्याचा ताण सहन होत असल्यामुळे हे वाण हलक्या जमिनीत देखील येते.त्यामुळे कोरडवाहू शेतकरी या वाणाचा जास्त प्रमाणात वापर करताना दिसतात.हे वाण आपण हलक्या,माध्यम व भारी जमिनीत देखील घेऊ शकतो.या वाणाचा बोन्डाचा आकार थोडा लहान असतो मात्र जास्त बोन्ड संख्या येत असल्याने अधिक उत्पन्न बघायला मिळते.मात्र हे कमी कालावधीचे वाण आहे.

अ.क्र.अजित १५५ ( Ajeet seeds) विवरण
1जमीनहलकी,मध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी145 ते 160 दिवस
4बोंड आकार मध्यम
5वजन5 ते 5.5 ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 6 ते 8 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2 / पावली
11लागवड वेळमे

राशीच्या आणखी काही वाणा बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा -धन्यवाद

Breaking News-महाबीज बियाणे नवीन भाव | Mahabeej seed rate kharif 2023 | बियाणांचे नवीन भाव झाले जाहीर

बियाणांचे नवीन भाव काय? | Mahabeej seed rate kharif 2023

Mahabeej seed rate kharif 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,आजची बातमी सर्वच शेतकऱ्यासाठी खूपच महत्वाची आहे.कारण आता शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचे चालू वर्षाचे सुधारित दर पत्रक उपलब्ध करून देत आहोत.सोयाबीन व्यतिरिक्त आणखी कोणते पीक समाविष्ट आहेत? कोणत्या शेतकऱ्यांना हे बियाणे मिळेल ? बियाणे मिळविण्यासाठी नेमकं काय करायचं हे संपूर्ण मार्गदर्शन या लेखात आहे. तेव्हा बातमी काय ती शेवट पर्यंत जरूर वाचा

शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे कि,गेल्या काही वर्षांपासून बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानावर बियाणे वाटप करतात ते तर तुम्हाला माहीतच असेल आता देखील महाबीजने ( Mahabeej ) २०२३ चे भाव जाहीर केले आहेत .

हे वाचा-आताची मोठी बातमी- शेतकऱ्यानो सरसकट पीकविमा झाला मंजूर

हे भाव शेतकऱ्यांना माहित होणे अतिशय गरजेचे आहेत, कारण सध्या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर दलालांचा सुळसुळाट आहे आणि हे दलाल शेतकऱ्याना हे महाबीज बियाणे मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने विकून त्याची मोट्या प्रमाणावर फसवणूक करतात.

सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023

अनुक्रमांक सोयाबीन वाण२० किलो भाव3० किलो भाव
1फुले संगम (Kds 726)20403,060
2फुले किमया (Kds 753)20403,060
3 DS 2281,820 2730
4MAUS 711,820 2730
5MAUS 612 20403,060
6MAUS 16220403,060
7Js 3351,820 2730
8Js 93051,820 2730
9MaCs 11882,0403060
10MACS 12812,0403060
11MAUS 1582,0403060

या बियाणाला देखील मिळणार महाबीज अनुदान | Mahabeej seed rate kharif 2023| mahabeej biyane price list 2023

सोयाबीन व्यतिरिक्त आणखी बऱ्याच पिकाच्या महाबीज बियाणांचे देखील जाहीर करण्यात आलेले आहेत या देखील बियाणासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना ते येणाऱ्या खरिप २०२३ साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अनुक्रमांकबियाणेवाणकिंमत/दर
1भातइंद्रायणी १० किलो बॅग600
2मूगउत्कर्ष पीकेव्हीएम-४ बीएम-२००३-२5kg=८७५
2kg=३६०
3तूरBDN-716 फुले राजेश्वर,पीकेव्ही तारा2kg=390
4तूरBSMR-७३६ मारुती,अशा (ICPS-87119)2KG=360
5उडीदAKU-10-1 TAQ-12KG=350
5KG=850
6सूर्याफुलसंकरित उर्यफूल500gm=150
7सुधारित बाजरीधनशक्ती=1.5kg
नागली-फुले नाचणी=1kg
165
110
8संकरित बाजरीमहाबीज-१००५ 1.5kg240
9संकरित ज्वारीसीएसएच-९, महाबीज-७ सीएसएच-१४ भाग्यलक्ष्मी-२९६ 3kg=420

सरकारने या कीटकनाशकांवर घातली बंदी शेतकरी येणार अडचणीत

शेतकऱ्यानो सावधान -हे किटकनाशक वापरल्यास होईल कार्यवाही

वापरण्यास बंदी घातलेले कीटकनाशक

नमस्कार शेतकरी मित्रानो,ही बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. कारन आज आपण भारत सरकारने बंदी घातलेली किटकनाशक जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना शेती करायची म्हटल की, शेतात येणाऱ्या विविध रोगाचा,विविध किटकाचा नायनाट करावा लागतो, अन्यथा शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांची उपजीविका होने कठिन आहे.

महामेश योजना जिल्हानिहाय अंतिम यादी इथे पहा

जर शेतकऱ्यांना शेतीमधे भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल तर किड/किटक नियंत्रण करणे अतिशय गरजेचे आहे.मात्र शेतकऱ्यांना होणाऱ्या विषबाधेचा विचार करता भारतीय सरकारने काही किटकनाशकावर बंदी घातली आहे…

भारत सरकारने दिनांक १८/५/२०२० रोजच्या राजपत्रानुसार १५ कृषी रसायनांवर बंदी घातली आहे

भारत सरकारने वरील राजपत्रानुसार खाली नमूद केलेले निवडक घटकावर बंदी घातली आहे

वापरण्यास बंदी घातलेले कीटकनाशक यादी

क्र. कीटकनाशके
1असिफेट
2बेनफ्युराकार्ब्
3कार्बोफ्युरॉन
4क्लोरपायरीफॉस
6डायकोफॉल
7
मॅलॅथिऑन
8
मिथोमिल
9
मोनोक्रोटोफॉस
10
क्विनॉलफॉस
11
थिओडिकार्ब्

आता सर्व शेतकऱ्यानी लक्षात घ्यावे कि,या पुढे मात्र भारत सरकार कृषी विभागा माध्यमातून मोठी कार्यवाही होणार असून जून महिन्यात सर्व शेतकऱ्याना सूचना दिली जाणार आणि त्यानंतर या सरकारने वापरण्यास बंदी घातलेल्या कीटकनाशकाची विक्री ,वाहतूक सोबतच वापर करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो वा कीटकनाशक उत्पादक कंपनी कोणाचाही विचार केली जाणार नाही असे कृषी मंत्र्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे . .