Gay Gotha Yojna 2023 | गायगोठा,शेळी शेड व कुकुटपालन साठी आता १००% अनुदान मिळणार | sheli shed yojna | kukkut palan shed yojna.
Gay Gotha Yojna 2023 : – नमस्कार शेतकरी मित्रानो,तुमच्यासाठी गाय/म्हेश/शेळी गोट्याची योजना याबाबत महत्वाची उपडते घेऊन आलो आहोत.शेतकरी मित्रानो नेहमी शेतकरी या योजनेची आतुरतेने वाट पाहत असतात कारण या योजनेत ५०%ते १००% एव्हढं अनुदान सरकारच्या माध्यमातून देण्यात येते.
चला तर शेतकरी मित्रानो,योजनेसाठी अर्ज कसा करायचा?अर्जाचा नमुना कुठे मिळेल ? योजनेच्या अटी शर्ती काय आहेत? याच्यासाठी कागदपत्र काय लागतात.मित्रानो योजनेच्या संदर्भातील अर्जाच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती तुम्हाला देणार आहोत .तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.अर्जाचा नमुना मिळवा इथे क्लिक करा
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णय नुसार राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार ती योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत गायगोठा, शेळीपालन शेड तसेच कुक्कुटपालनाचा शेड या तिन्ही वैयक्तिक लाभाची योजना राबवल्या जातात.
Gay Gotha Yojna 2023 :- मित्रांनो मात्र या योजनेचा लाभ देत असताना मोठा अडचणी येतात कारण या योजनेची पायमेन्ट हि रोजगार हमी अंतर्गत होते.याच्यामध्ये गाय गोठ्यामध्ये कुशल आणि कुशल मध्ये ८ व 92 चा रेशियो आहे.या योजनेत पात्र व्हायचं असेल तर मात्र वैयक्तिक वृक्ष लागवड ज्यामध्ये बांधावरील वृक्ष लागवड त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवडकरणे गरजेची असते. किंवा सार्वजनिक कामावरील शंभर दिवसाची मजुरी असेल तरच ते लाभार्थी पात्र होऊन या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो.
pm किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार नाही | PM Kisan Update
मित्रांनो याच्यामध्ये गाय गोठा; ज्यामध्ये छत विहिरीत गाय गोटा आणि छता सहित गाय गोठा ह्या दोन घटकाला मंजुरी देण्यात येते.या दोन्ही योजनेसाठी अटी वेगळ्या आहेत. मित्रांनो याच्यासाठीच्या अर्जाचा नमुना याच्यासाठी लागणारे कागदपत्र सुद्धा आज आपण पाहणार आहोत .
खरंतर अर्जाच्या नमुन्यात सर्व गोष्टी म्हणजेच अटी देण्यात आलेल्या आहेत.त्याचबरोबर लाभार्थ्याच्या पात्रतेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना गाय गोटा, कुकूटपालन शेड आणि शेळीपालन शेड वैयक्तिक योजना मिळू शकते.
योजना व योजनेचे अनुदान रक्कम विवरण.
शेतकरी मित्रानो या योजनेचे अनुदान कसे आहेत हे खालील तक्त्यात दिलेले आहे.खालील तक्त्यामध्ये योजनेचं नाव त्यासाठी मंजून एकूण रक्कम दिली आहे त्याबरोबर मजुरांना किती पैसे दिले जाणार आहेत ते देखील दाखविले आहे.त्याच बरोबर साहित्यासाठी एकूण किती रक्कम असणार आहे ते देखील तक्त्यात दाखविले आहे.
अ.क्र. | योजना | मजुरी रक्कम | साहित्य रक्कम | एकूण रक्कम |
---|---|---|---|---|
1 | जनावरांचा गोठा बांधणे 1 छतविरहित | ४२१६ | ४१,१०७ | ४५३२३ |
1 | जनावरांचा गोठा बांधणे 2 छतासह | ६४४८ | ७१,००० | ७७४४८ |
2 | शेळी पालन शेड 2 ते १० शेळ्या करीता अनुदान | ४४६४ | ४५००० | ४९४६४ |
3 | कुक्कूटपालन शेड १०० पक्ष्यांकरीता अनुदान | ४९६० | ४५००० | ४९९६० |
Gay Gotha Yojna 2023 योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
सदर योजनेचा अर्ज करायचा असल्यास आपल्याला खालील कागदपत्र आवश्यक आहेत.हि कागदपत्र अर्जासोबत लावणे अनिवार्य आहे.अपुरे कागदपत्रे असल्यास तुम्हाला हि योजना मिळणार नाही तुम्ही अपात्र व्हाल.
१) आधार कार्ड
२ ) बँकेचे पासबुक
३ ) जागेचा उतारा
४ ) सातबारा किंवा घराचा 8 अ ऊतारा
५ ) रेशन कार्ड
६ ) जातीचा दाखला
७ ) 2 गायी असल्याबाबतचा दाखल
८ ) ग्रामसभेचा ठराव
९ ) रहिवासी दाखला
१० ) विहित नमुन्यातील अर्ज
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
हि अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने असून तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी या करीत अर्ज सदर करावा लागतो .तुम्हाला सर्वप्रथम अर्जाचा नमुना घ्यायचा आहे.हा अर्ज नमुना तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये किंवा त्या जवळ असलेल्या झेरॉक्स वर मिळून जाईल.
नमुना अर्ज भरून घेतल्या नंतर तो संपूर्ण भरावा,त्यामध्ये अचूक माहिती भरल्या नंतर त्यासोबत संपूर्ण कागदपत्रे जोडून तुम्ही हा अर्ज पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागात जमा करू शकता.
मात्र जर तुम्हाला तो विभाग सापडला नाही तर हा अर्ज तुम्ही पंचायत समितीच्या आवक-जावक विभागात जमा करा व त्याची ओसी घ्या म्हणजे तुम्ही तिथे अर्ज भरला याचा पुरावा तुमच्याकडे राहील.