शेतकऱ्यांना बियाणं साठी मिळणार १०० % अनुदान | Biyane Anudan Yojna 2023
नमस्कार शेतकरी मित्रानो , राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना आता बियाणे वाटप करण्यात येणार असून,बियाणे अनुदान योजना 2023 मध्ये कशी मिळवायची हे पाहणार आहोत.
बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते? ,त्या अनुदानावर पिके कोणती मिळणार ?, Biyane Anudan Yojna 2023 पात्रता काय?, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील?, अर्ज कुठे आणि कसा करायचा? हि संपूर्ण माहिती संबंधित लेखात आपण सविस्तर बघणार आहोत.
सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात तुम्हाला देणार आहोत.या योजनेअंतर्गत तुम्हाला १०० % लाभ मिळवायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
हे वाचा-गॅसचे दर कमी झाले – २०० रुपये सबसिडी मिळनार
Biyane Anudan Yojna 2023 संपूर्ण माहिती
सरकार शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवत असतो गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागा अंतर्गत बियाणे अनुदान योजना २०२३ हि योजना चालविली जात असून Maha DBT पोर्टल वरून याचा अर्ज करावा लागेल.मात्र त्यासाठी शेतकऱ्याना काही काम कारवी लागणार आहेत.
या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येते.
या लॉटरी पद्धतीद्वारे ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळतात . ज्या पिकाच्या बियाण्यासाठी अर्ज केला आहे त्याच्या उपलब्धतेनुसार त्याच पिकाचे बियाणे व वाण मिळतात. बियाणे उपलब्ध नसल्यास तुमची निवड होत नाही .
बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
हे लक्षात घ्या :- बियाणे अनुदान योजनेत शेतकरी बांधवांना दोन प्रकारच्या बियाण्यांची वाटप करण्यात येत असते.पहिला बियाण्याचा प्रकार म्हणजे प्रमाणित बियाणे व दुसरा प्रकार म्हणजे पीक प्रात्यक्षिक बियाण्यांची वाटप करणे.या दोन्ही बियाणामध्ये विविध पिकाचा समावेश करण्यात आला असून त्याची यादी खाली दिलेली आहे.
बियाणे योजनेत शेतकऱ्याला /लाभार्थ्याना दोन प्रकारचे अनुदान देण्यात येते जे त्यांनी अर्जात मागणी केलेली असेल. मिळणारे अनुदान खालील प्रमाणे असेल
प्रमाणित बियाणे करिता ५०% अनुदान देण्यात येते
प्रात्यक्षिक बियाणासाठी १०० % अनुदान देण्यात येते
योजनेत मिळणाऱ्या बियाणाची यादी–biyane yojna seeds list
1. सोयाबीन
2. तूर
3. कापूस
4. उडीद
5. मूग
6. वेळेवर उपलब्ध होणारे इतर पीक
बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना करायची कामे
पहिले काम :- शेतकऱ्यांना maha dbt पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
हा अर्ज तुम्ही स्वता करू शकता किंवा csc केंद्रावर देखील तुमचा अर्ज भरून दिला जातो.मात्र त्यासाठी तुमच्याकडून काही फी आकारली जाते.
दुसरे काम :- सुरुवातीला अर्ज भरताना तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते अन्यथा तुमचे रजिस्टेशेंन होत नाही व तुमचा अर्ज भरला जाणार नाही.
१) आधार कार्ड
२ ) ७/१२
३ ) ८ अ
४ ) मोबाईल क्रमांक
५) बँक खाते
तुमची निवड झाल्यावर तुम्हाला आणखी काही कागद पात्र अपलोड करावी लागतात .
तिसरे काम :- csc केंद्रावर अर्ज भारत असताना संपूर्ण माहिती योग्य आहे का ते एकदा पडताळून आवश्यक बघा .माहिती योग्य असल्यास केंद्र चालकाला अर्ज भरायला सांगा .
चौथे काम :- संपूर्ण अर्ज भरून झाल्यास csc चालकांकडून id आणि password आवश्यक घ्या.
पाचवे काम :- अर्ज भरल्याची पावती व अर्जाची पेमेंट पावती जरूर घ्या ..
सहावे काम :- तुमच्या मोबाईल नंबरवर तुमची निवड झाल्यास लगेच दिलेल्या विहित वेळेत सांगितलेली कागदपत्रे अपलोड करा.
बियाणे अनुदान योजना २०२३ साठी आवश्यक कागदपत्रे
१) 7/12 प्रमाणपत्र.
२) 8-अ प्रमाणपत्र.
३) उपकरणांचे कोटेशन
४) एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी).
५) राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक
६) शेतकऱ्याचे हमीपत्र.
७) पूर्वसंमती पत्र.
जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बियाणाची यादी
अ. क्र. | बियाणे प्रकार | जिल्हे |
1 | भात | नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली |
2 | कडधान्य | सर्वच जिल्हे |
3 | गहू | सोलापूर, बीड, नागपूर |
4 | भरडधान्य मक्का | सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव |
5 | बाजरी | नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद |
6 | ज्वारी | नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ |
7 | कापूस | अमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ. वर्धा,नागपूर,चंद्रपूर. |
8 | ऊस | औरंगाबाद, जालना, बीड. |
3 thoughts on “बियाणे अनुदान योजना 2023 | Biyane Anudan Yojna 2023 -यांनाच मिळणार योजनेचा लाभ”