kapus dusri favarni हिच करा मोठा फायदा होईल. एकरी खर्च फक्त २०० रुपये
kapus dusri favarni : शेतकरी मित्रानो तुमचे कापसाचे उत्पन्न मोठया प्रमाणावर वाढवायचे असल्यास तुम्हाला kapus dusari favarni करणे अतिशय महत्वाचे ठरते.आज आपण कापसावर दुसरी फवारणी कोणती करावी फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक वापरावे? कोणते बुरशीनाशक वापरावे? तसेच आणखी काय वापरावे कि तुमचा कापूस पाहण्यासारखा होईल.तुम्हाला १०० % रिझल्ट मिळेल.
मात्र त्या अगोदर अशाच नवनवीन माहिती थेट मोबाईल पाहिजे असेल तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.ग्रुप लिंक खाली दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
मित्रानो कापसाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर मात्र योग्य त्या वेळी कापसावरील कीड / कीटक नियंत्रण करणे हे अतिशय महत्वाचे आहे.आता असे गृहीत धरूया कि तुम्ही कापसावरील पहिली फवारणी केली.आणि तुम्हाला कापूस पिकावरील दुसरी फवारणी करायची आहे. मात्र कोणतीही फवारणी करताना सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे कि,अगोदर आपल्या पिकावर कोणते कीटक / किडीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि मगच त्याचा नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी.
आता कापूस पिकाची पाहणी केली असता आपल्या पिकावर तीन किडीचा प्रादुर्भाव दिसतो.
१) तुडतुडे.
२) मावा.
३) पांढरी माशी.
आता या किडींचा नियंत्रण करण्यासाठी अगोदरच्या फवारणीमध्ये इमिडाक्लोप्रिड किंवा थायमोथॉक्झाम हा घटक वापरला असेल मात्र परत तेच किटकनाशक वापरू नका आता मात्र kapus dusari favrni मध्ये उलाला ( ulala ) हा घटक वापरायचा आहे याचा खूप चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे.फवारणी मध्ये खालील आणखी काही घटक घेतल्यास कापूस पिकाचा चांगला विकास होईल ज्यामुळे कापसाचे फुटवे वाढतील,कापसाच्या पांढऱ्या मुलांची संख्या वाढेल.रस शोषक किडी नियंत्रित होतील व बुरशीजन्य रोग नियंत्रित होतील, असे एकूण 4 फायदे हे या फवारणीमुळे तुम्हाला मिळतील.
अ.क्र. | घटक/कीटकनाशक | प्रमाण |
---|---|---|
1 | उलाला ( ulala ) | ५ ते ८ ग्राम |
2 | १९ : १९ : १९ | १०० ग्राम |
3 | ह्यूमिक ऍसिड | ४० मिली /३५ gram |
4 | साफ / मॅन्कोझेब | ४० ग्राम |