lek ladki yojna | आता मुलींना मिळणार 1 लाख रुपये. पहा काय आहे योजना.

lek ladki yojna सरकार मुलींना देणार शिक्षणाला आधार.

lek ladki yojna या बाबत तुम्ही कधी ऐकलं आहे का? कारण आता तुमच्यासाठी हि मोठी बातमी आहे.तुम्हाला मुलगी आहे आणि तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची तुम्हाला काळजी वाटत असेल तर मात्र तुम्ही घाबरू नका.आता तुमच्यासाठी सरकार एक योजना राबवत असून तुमच्या मुलीला आता 1 लाख रुपये मिळणार आहेत.

lek ladki yojna

हि योजना कशी मिळवायची? अर्ज कुठे करायचा ? कागदपत्रे काय लागणार ? योजनेची पात्रता काय ? तेव्हा या योजनेबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.मात्र जर तुम्हाला अशाच नवीन योजना थेट मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता. खाली ग्रुप लिंक दिली आहे.

lek ladki yojna

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

हि राज्य शासनाची नवीन योजना असून २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेला मंजुरी मिळाली आहे.या अधिवेशनात अनेक योजनेला मंजुऱ्या मिळाल्या आहेत मात्र त्यापैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे ( lek ladki yojna ) लेक लाडकी योजना.

मागील काही वर्षात मुली व मुलामध्ये मोठा भेद करून मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसून येत आहे याचाच विचार करून राज्य सरकारने मुलींना आर्थिकदृष्ट्या साक्षम व आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना राबविली असून आता मुलींना या योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये मुलींना देण्याचा निर्णय घेतला आहे.

लेक लाडकी योजनेचं योजनेचं स्वरूप | Scheme format of Lek Ladki scheme.

या योजनेतून मिळणारे पैसे हे एकाच वेळेत न मिळता वेगवेगळा कालावधी लागू करण्यात आला आहे जेणे करून मुलीला आवश्यक त्या वेळी हे पैसे कमी येतील किंवा त्यांना पैशाचा फायदा होईल.मुलींच्या जन्म नंतर तिला ५००० रुपये मिळतील.ती पाहिलीत गेल्या नंतर तिला ४ हजार दिले जातील.

त्याच प्रमाणे सहावीला गेल्यावर तिला ६ हजार रुपये व अकरावीला ऍडमिशन घेतल्या नंतर ८ हजार रुपये मिळणार आहेत.मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्या अगोदर २३ हजार व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रोख रक्कम मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेची पात्रता | Eligibility of Lek Ladki yojna/Scheme

हि योजना सर्वांसाठी लागू नाही त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व अटी शासनाने लागू केल्या आहेत.ह्या पात्रता व अटींची पूर्तता करणाऱ्या मुलीचं या योजनेसाठी पात्र असतील.योजनेच्या अटी व पात्रता खालील प्रमाणे आहेत.

१) मुलगी हि महाराष्ट्राची रहिवाशी असावी.

२) मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा.

lek ladki yojna

ठिबकसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार १०० % अनुदान
इथे क्लिक करून करा अर्ज.

3) लाभार्थ्याकडे पिवळे व शेंदरी राशन कार्ड असावे.

4) हि योजना फक्त २ मुलींकरिता लागू राहील.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. | lek ladki yojna document

१) आधार कार्ड

२) मुलीचे किंवा आई वडिलांचे बँक खाते.

३) उत्पन्नाचा दाखला.

४) रहिवाशी प्रमाणपत्र.

५ ) कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड

६) पासपोट साईज फोटो.

७) मोबाईल क्रमांक

Leave a Comment