Ration Card anudan :- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करत असताना पुन्हा एक मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा मला बंद करून त्यांना थेट बँक खात्यात मिळणार अनुदान.शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना shendari ration card च्या माध्यमातून माल मिळणे बंद झाले आहे.
मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना आता धन्या ऐवजी थेट पैशाचे अनुदान दिले जाणार असा निर्णय घेण्यात आला होता.त्यासाठी काही अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना सांगितल्या ते अर्ज शेतकऱ्यांनी भरून तहसील कार्यालयात दिले या नंतर देखील अजून पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळाला नाही .हि योजना फक्त कागदावरच राहील असे आता शेतकऱ्यांनाच मत येत आहे.
शेतकऱ्यांना किती धान्य मिळते? दर काय?
अगोदर वेगवेगळ्या रेशन कार्डाचा लाभ शेतकऱ्याना धान्याच्या स्वरूपात होता .शेतकऱ्याना तसेच इतर नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून थेट धान्य दिले जात होते.त्यानंतर शेतकऱ्याना प्राधान्य गटामध्ये समाविष्ट करून त्यांना २५ किलो असे धान्य देण्यात येऊ लागले.
हे धान्य त्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ या दराने मिळू लागला.अंतोदय रेषेत धारकांना याच दराने ३५ किलो माल दिला जातो.इतरांना देखील अशाच प्रकारे दर लागू होते. मात्र अंतोदय व APL ,BPL व प्राधान्य गट यांना वेगवेगळे किलोचे प्रमाण मिळतात.
कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार,किती Ration Card anudan मिळणार ?
मागील काही दिवसा पासून मात्र शेतकऱ्यांना मिळणारे धान्य बंद करून प्रति व्यक्ती १५० रुपयांची घोषणा करण्यात आली व लवकरच तुमच्या खात्यात हे अनुदान येणारच सांगितलं.१ जानेवारी २०२३ ला या अनुदानाचा मुहूर्त देखील ठरला होता मात्र कोणत्याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तर मिळालं नाही सोबतच त्यांना मिळणार धान्य देखील बंद झाल्याने आता शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.
हि शेतकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.सरकार नुसती योजनेची घोषणा करतो मात्र प्रत्यक्ष मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही.यामुळे आता शेतकऱ्यांना किराणा दुकानातून धान्य खरेदी करावे लागत आहे.संबंधित विभागाशी विचारणा केली असता योजना सुरु करण्यासाठी गतीने काम सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र हि गती कासवाची आहे असे शेतकरी वर्ग म्हणत आहे.बऱ्याचं शेतकऱ्याची माहिती जमा करणे बाकी आहे.काही जिल्ह्याची माहिती पूर्ण जमा झाली मात्र अजून देखील त्यांना अनुदान मिळालं नाही.
धान्य मिळत नसल्यास लगेच हे काम करा.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत कि ते शेतकरी गटात नाहीत मात्र त्यांना देखील दुकानदाराच्या माध्यमातून धान्य दिले जात नाही.पुरवठा निकक्षक यांना विचारणा केली असता ज्या शेतकऱ्यांचे ration card aadhar link नसल्या कारणाने त्यांचे फिंगर प्रिंट येत नाही व त्यांचे धान्याचे ट्रॅनजेकशन होत नाही .जर असे काही शेतकरी असतील तर लवकरात लवकर आपले adhar card रेशन सोबत लिंक करून घ्यावे त्यांचा माल सुरु होईल.