Tur new seed : – शेतकरी मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्ये आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे.तसेच लवकरच मॉन्सूनच देखील आगमन होणार आहे.खरीप हंगामामध्ये जर तुम्हाला तूर हे पीक घ्यायचं असेल तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला तुर पिक लागवडीसाठी, तुर पिकाच्या काही सुधारित जातींची म्हणजे सुधारित वाणांची या ठिकाणी नावे सांगणार आहेत.त्यांचा कालावधी सांगणार आहे. त्या वाणांची वैशिष्ट्ये सांगणार आहेत.
ज्याच्यामुळे तुम्हाला तुर पिकाची लागवड करण्यासाठी त्या ठिकाणी बऱ्याच काही आयडिया मिळतील म्हणजेच की, कोणतं वाण आपण निवडणूक पाहिजे? कोणता वाण नाही निवडलं पाहिजे? जमिनीुसार हंगामानुसार आपल्या क्षेत्रामध्ये कोणते वाण चांगल्या प्रकारे उगवणे या सर्व गोष्टींची शहानिशा आपण आजच्या लेखामध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुर पिकाची लागवड करणारा आसाल तर मला वाटतं खास करून तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरणार आहे. माझी विनंती आहे हा लेख संपूर्ण पहा आणि लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.
TUR NEW SEEDS-नवीन तूर वाण निवडताना लक्षात घ्यायच्या ५ गोष्टी | उत्पादन नक्की वाढेल
महाराष्ट्र मध्ये खास करून पाहिलं तर (tur variety in maharashtra) विदर्भ मराठवाडा अशा भागांमध्ये आपल्याला तुर पिकाची जास्त लागवड झालेली दिसून येते. तुर पीक तुम्ही वेगवेगळ्या हवामानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेऊ शकता. तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तसेच पाण्याची धारण क्षमता चांगली असतील जमीन असेल, उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल. सेंद्रिय कार्ब त चांगला असेल.
जमिनीचा कार्ब ०.५ ते ०.६ असेल त्या जर जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बिनधास्तपणे त्या जमिनीमध्ये दोन पिकाची लागवड म्हणजेच पेरणी करू शकता परंतु हे करताना आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की लागवड करताना कोणत्या जातीची लागवड करावी. कारण मार्केटमध्ये भरपूर साऱ्या जाती आहेत. कोणती जात आमच्या क्षेत्रासाठी चांगले आहे? आमच्या हवामानासाठी चांगली आहे? आणि त्या जातीपासून तुम्हाला काय मिळणार आहे? याची माहिती तुम्हाला मिळणे खूप गरजेचे आहे.
1) आयसीपीएल ८७११९ अशा | Asha–TUR NEW SEEDS
हे वाण देखील आता पर्यंत शेतकऱ्याना खूप चांगलं उत्पन्न देत आलेलं आहे.या वाणाचे दाणे टपोरे असल्याने बाजार भाव हा चांगला मिळतो.आयसीपीएल ८७११९ अशा असं या वाणाचं नाव आहे.हे 185 ते 190 दिवस कालावधी चे वाण आहे. या ठिकाणी देखील आपल्याला दाणे जे आहेत ते लाल रंगाचे मिळतात परंतु या ठिकाणी टपोरे दाणे तुम्हाला मिळतात.
आयसीपीएल ८७११९ अशा वाणाचे काही वैशिट्य
आयसीपीएल ८७११९ अशा वाणाचे काही महत्वाचे वैशिट्य आपण आता पाहणार आहोत याच कारणाचे हे वाण जास्तीत जास्त शेतकरी या वाणाची मोट्या प्रमाणावर लागवड/पेरणी करतात
१) टपोऱ्या शेंगा
२) लाल रंगाचे दाणे असल्याने चांगला दर
३) मर व वांझ रोगास प्रतिकार
४) शेंगा पोखरणाऱ्या अळीस व शेंग माशीसाठी प्रतिकारक
५) १८५ ते १९० दिवसात येणारे वाण
2 ) फुले राजेश्वरी तूर वाण | FULE RAJESWARI TUR SEEDS
शेतकरी मित्रांनो,फुले राजेश्वरी हे वाण देखील मागील काही वर्षांपासून शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत.या वाणा पासून देखील चांगले उत्पन्न शेतकर्याना मिळत आहे.या वाणाचा कालावधी १३० ते १४० दिवस आहे.हे वाण लवकरात लवकर तयार होते त्यामुळे तूर पिकानंतर दुसरे पीक घ्यायचे असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. या दाण्याचा रंग आपल्याला लाल पाहायला मिळेल.हे वाण सलग लागवड किंवा आंतरपीक पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यासाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे.
3) BDN-708 ( AMOL ) TUR SEEDS | बिडीएन -८०७ अमोल तूर वाण
हे वाण बरेच शेतकरी वापरतात .या वाणा पासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती या वाणा बाबत अधिकच आहे.जवळजवळ 155 ते 165 दिवसाच्या कालावधीचा आहे. या वाणाच्या काही विशेषतः पाहिल्या तर कोरडवाहू शेतीसाठी हे खास करून शिफारशीत करण्यात आलेला आहे याचे दाणे जे आपल्याला मिळतात .
हे देखील वाचा-सोयाबीनची हे वाण २०२३ मध्ये देईल सर्वात जास्त उत्पन्न
ते चांगले गर्द लाल रंगाचे मिळतात मध्यम जमिनीमध्ये याची लागवड तुम्ही सहजरीत्या करू शकता. मर व वांझ या रोगास खास करून हे वाण प्रतीकारक आहेत. संरक्षित पाणी देण्याची जरी तुमच्याकडे सोय नसेल तुम्ही शंभर टक्के पावसावरती शेती जरी करत असाल तर अमोल म्हणजेच बीडीएस 708 हे वाण तुम्ही त्या ठिकाणी लागवडीसाठी सहजपणे निवडू शकता.
BDN -७०८ अमोल वाणाचे काही वैशिट्य
१) कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी योग्य
२) लाल दाणा असल्याने चांगला भाव लागतो.
३) माध्यम जमिनीत लागवडीसाठी योग्य
४) मर व वांझ रोगास प्रतिकारक
५) कमी पाण्याची गरज
4) बी एस एम आर तूर वाण | BSMR–TUR SEEDS
पुढचं वाण आहे ते आहे बीएसएमआर आहे. याचे दाणे जे असतात ते लाल दाणे असतात. फुलांचा रंग तुम्हाला पिवळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे फुलण्याच्या आधी कळी अवस्थेत जर त्या ठिकाणी पावसाचा खंड पडला तर या अवस्थेत तुम्हाला थोडसं तुर पिकास पाणी देणे आवश्यक आहे. हे वाण देखील मर व वांझ अशा रोगास चांगल्या प्रकारे प्रतिकार आहे. झाडाची उंची तुम्हाला 175 ते 190cm ची या ठिकाणी मिळणार आहे.
हे देखील वाचा-कापूस टॉप 5 वाण जे एकरी देतात सर्वात जास्त उत्पन्न ,१५ ते २० क्विंटल एव्हरेज
बी एस एम आर वाणाचे काही वैशिट्य
१) अधिक उत्पन्न
२) लाल रंगाचे दाणे असल्याने चांगला दर
३) मर व वांझ रोगास प्रतिकार
४) भरगोस शेंगाचं शेंगा
5) BDN -७११ TUR BEST SEEDS | बिडीएन ७११ तूर वाण
BDN -७११ हे वाण खूप चांगले असून मराठवाडा व पक्ष्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड होत असलेले वाण आहे .हे वाण 155 दिवस कालावधीचे आहे. हलक्या मध्यम जमिनी तसेच कोरडवाहू जमिनीत देखील हे तुम्ही वान सहज प्रकारे लावू शकतात.या वाणाचे दाणे पांढरे आहेत. या वानापासून खूप चांगलं उत्पन्न मिळते .हे देखील वाण मर व वांझ रोगास चांगल्या प्रकारे प्रतिकारक आहे. कमी वार्षिक परजमा पर्जन्यमान असलेल्या भागात देखील तुम्ही या वनाची निवड सहजपणे करू शकतात.या झाडाची उंची 120 ते 155 cm मिळू शकते.
BDN -७०८ अमोल वाणाचे काही वैशिट्य
१) कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी योग्य
२) लाल दाणा असल्याने चांगला भाव लागतो.
३) माध्यम व भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य
४) मर व वांझ रोगास प्रतिकारक
५) कमी पाण्याची गरज
6) BDN -७१6 TUR NEW SEEDS | बिडीएन ७१6 तूर वाण
BDN -७१६ हे वाण देखील शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देत आहे.हे वाण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी २०१६ साली प्रसारित केले आहे.या तुरीचा रंग हा लाल आहे .हे वाण पेरणीपासून काढणी पर्यंतचा कालावधी १६५ ते १७० दिवस आहे .हे वाण थोडं उशिरा काढणीला येते.तुम्ही या वाणाची लागवड माध्यम व भारी जमिनीत करू शकता.एकरी १० ते १५ क्विंटल पर्यंत शेतकऱ्यानी उत्पन्न घेतलं आहे.
BDN -७16 वाणाचे काही वैशिट्य
१) टपोऱ्या दाण्याच्या शेंगा
२) लाल रंगाचे दाणे असल्याने बाजार भाव चांगला मिळतो.
३) मर व वांझ रोगास प्रतिकार असे वाण
४) उत्तम प्रतीची डाळ मिळते
५) १६५ ते १७० दिवसात येणारे वाण
7 ) विपुल तूर वाण | VIPUL TUR NEW SEEDS
या वाणाचा नाव विपुल आहे.हे वाण 145 ते 160 दिवस कालावधीचे हे वाण आहे.हे देखील वाण शेतकरी काही प्रमाणात वापरताना दिसतात. या वाणाचा वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे पाहायला मिळतात.एक तर दाण्याचा रंग लाल आहे. मध्यम आकाराचे दाणे असलेलं हे वाण आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये हे लागवड केल्यानंतर शेतकऱ्याना चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळत आहे. मर व वांज रोगास हे विपुलता वाण चांगल्या प्रकारे प्रतिकारक आहे.याची लागले/पेरणी माध्यम ते भारी जमिनीत करता येईल.
BDN -७16 वाणाचे काही वैशिट्य
१) माध्यम आकाराच्या शेंगा
२) भाव चांगला मिळतो.
३) मर व वांझ रोगास प्रतिकार
4) १4५ ते १७० दिवसात येणारे वाण
पाऊस व जमीन निहाय तुरीचे वर्गीकरण तक्ता
या लेखात आपण ७ सुधारित वाणा बद्दल सविस्तर माहिती पहिली आहे .आता जाणून घेऊया जमिनीच्या प्रकारानुसार आणि पावसाचा कमी अधिक प्रमाणावर वानांची निवड कशी करावी.या वाणाची नेमकी शिफारस काय आहे. आपण हे वाण तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी केलेले आहेत. एक म्हणजे मध्यम स्वरूपाचा पर्जन्यमान.दुसरा म्हणजे पाऊस अधिक असलेला तसेच माढाम जमिनीसाठी लागवड करायचे वाण.
अ. क्र. | वाण | विवरण |
---|---|---|
1 | अशा ८७११९ | माध्यम, भारी जमीन |
2 | विपुल | माध्यम, |
3 | BDN -७१6 | बागायती ,भारी जमीन |
4 | BDN -७११ | बागायती, भारी जमीन |
5 | बी एस एम आर | बागायती ,माध्यम |
6 | फुले राजेश्वरी | बागायती ,भारी जमीन |
7 | BDN-708 | कोरडवाहू,बागायती |