kabaddi cotton seeds

कबड्डी वाण लावण्या अगोदर जाणून घ्या | kabaddi cotton seeds | कबड्डी कापूस बियाणे-दुप्पट उत्पन्न देणारे वाण

tulsi cotton seeds kabaddi | भरगोस उत्पनातून शेतकरी झाला समाधानी.

kabaddi cotton seeds

kabaddi cotton seeds :- नमस्कार शेतकरी मित्रानो आमच्या न्युज पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या या भागांमध्ये आपण कबड्डी या वनाविषयी जाणून घेणार आहोत. त्याचं कारण असं की आपल्याला भरपूर शासक कमेंट आल्या होत्या की, सर कबड्डी या बना विषयी माहिती द्या.आजच्या लेखामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी बघण्याच्या आहे.ज्यामध्ये आपण कबड्डी वाण्याचे वैशिष्ट्य बघणार आहे. लेखाच्या माध्यमातून हे वाण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेश मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये कबड्डी या वाणाचे योग्य अंतर आपण कोणतं घेतलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.ज्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न हे मिळेल.

मागील वर्षी बर्याच शेतकऱ्यानी हे वाण घेतले असता मोठ्या प्रमाणावर त्यांना फायदा झाला,त्यांना कधी न झालेलं उत्पन्न कबड्डी या वाणाने दिले.याचं उत्पन्न सुद्धा चांगला आहे त्यामुळे बिनधास्त हे वाण आपण लावू शकतो.मात्र कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली .पुढील वर्षी शेतकऱ्याना चांगल्या भावाची अपेक्षा आहे.

कबड्डी वाणाचे महत्वाचे वैशिट्य | kabaddi cotton seeds

खालील पैकी काही महत्वाचे वैशिट्य असल्या कारणाने शेतकऱ्याची या वाणास पसंती आहे. मागच्या वर्षी काही प्लॉटची व्हिजिट केली होती त्यामुळे निदर्शनात आलं की,kabaddi हे वान अतिशय उत्तम असं वाण आहे.

  1. या वाणाचे वजन चांगले आहे. बोंडाच वजन ते 6 ते 7 ग्रॅम पर्यंत जातं.
  2. सोबतच हे वाण जे आहे ते पाण्याचा जरी ताण पडला तरीही या वाणाला सहनशील असं हे वान आहे.
  3. अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोरडवाहू आणि बागायतीसाठी सुद्धा हे उपयुक्त असे वाण आहे.
  4. हा सुद्धा एक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत उपस्थित झाला होता की कोरडवाहूसाठी चांगला आहे की बागायतीसाठी? तर दोन्ही साठी हे वाण उपयुक्त असी आहे.
  5. हे वेचणीस सोपं वान आहे आणि उच्च प्रतीचा धागा या वाणापासून आपल्याला मिळतो म्हणजेच उच्च प्रतीचा धागा आपल्याला मिळाला तर आपल्याला बाजार भाव हा देखील चांगला मिळतो.
  6. एक समान आकाराचे आणि भरपूर बोंड या वनाला लागतात.
  7. बुडापासून ते शेंड्यापर्यंत पाच पाकळी बोंड इथे लागतात.90% च्या वर आपल्याला पाच पाकळी बोंड या वाणाची पाहायला मिळतात
  8. रोगप्रतिकारक शक्ती या वाणाची चांगली आहे

कबड्डी वाण लागवडीसाठी निवडल्यास घ्यावयाचे अंतर | seeding distance of kabaddi cotton seeds

कापसाचे पीक घायचे झाल्यास कापसाचे अंतर हे अतिशय महत्वाचे ठरते आणि त्यावरच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढ व घट ठरते. कारण अंतर फार महत्त्वाचं असते कुठलेहि वानाची निवड करताना, कुठलेही वाण्याचा आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा अंतर हे फार महत्त्वाचे असते.शेतकऱ्यानो काही अंतर इथे सांगणार आहे ते म्हणजे मध्यम जमिनीसाठी,भारी जमिनीसाठी सोबतच प्रदेशानुसार म्हणजेच आपापल्या विभागानुसार काही अंतर सांगणार आहे जसे की,मराठवाड्यासाठी कुठलं अंतर योग्य आहे? पश्चिम महाराष्ट्र, खानदेश साठी कुठला अंतर योग्य आहे? विदर्भासाठी कुठलं अंतर योग्य आहे? तर अशा पद्धतीने आपण अंतराची विभागणी केली आहे आपापल्या भागानुसार तुम्ही लागवड करू शकता.

शेती विषयक नवनवीन माहितीसाठी व योजना साठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

अ.क्र.विभागअंतरजमीन
1मराठवाडा4 x 2( मध्यम )कोरडवाहू
2मराठवाडा6 x 1( भारी ) बागायती
3मराठवाडा5 x 1 ( मध्यम ) बागायती
4विदर्भ3 x 2( मध्यम ) कोरडवाहू
5विदर्भ4 x 3( भारी ) बागायती
6पश्चिम महाराष्ट्र3 x 3( भारी ) बागायती
7पश्चिम महाराष्ट्र3 x 2( मध्यम ) कोरडवाहू
8पश्चिम महाराष्ट्र4 x 2 ( भारी ) बागायती
9पश्चिम महाराष्ट्र3 x 3( मध्यम ) बागायती

तर सर्वप्रथम आपण मराठवाड्यासाठी अंतर बघू, त्यासोबत त्यामध्ये आपण कोरडवाहू जमिनीसाठी काय अंतर असायला पाहिजे बागाची जमिनीसाठी काय अंतर असलं पाहिजे.मराठवाड्यासाठी जे अंतर आहे ते चार बाय दीड फुटाचा आपण इथे घ्यायला पाहिजे ते म्हणजे कोरडवाहू जमिनीसाठी चार बाय दीड फुटाचा अंतर मराठवाड्यासाठी आपण येथे घेऊ शकतो.

सोबतच मराठवाड्यासाठी बागायती जर जमीन असेल तुमची मराठवाड्यातून आपण शेतकरी बांधव असाल आणि बागायती जर जमीन असेल तर आपल्याला भारी जमिनीसाठी सहा बाय एक फूट आणि मध्यम जर जमीन असेल आपली तर पाच बाय एक फूट असं अंतर इथे घ्यायला पाहिजे जर आपण विदर्भाच्या शेतकरी असाल तर विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू जमिनीसाठी तीन बाय दोन फूट असेल तर योग्य राहील आणि बागायती जमीन साठी चार बाय तीन फूट हे योग्य आणि योग्य अंतर राहील.

भाऊ इथे क्लिक करा

2023 साठी कापसाचे टॉप 5 वाण-कोणताही एक वाण लावा आणि मालामाल व्हा

आपण जर खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र येथील शेतकरी असाल तर भारी जमिनीसाठी तीन बाय तीन फुटी अंतर घ्यावं आणि मध्यम जमिनीसाठी तीन बाय दोन फुटे अंतर घ्यावं हेच अंतर आहे कोरडवाहूसाठी. नंतर बागायती जर जमीन असेल आणि भारी उच्च प्रतीची जमीन असेल तर आपण चार बाय दोन फुटे अंतर घ्यावं आणि मध्यम जमीन चला तर आता या वाणाची लागवड करायची झाल्यास अंतर कसे घायचे हे समजून घेऊया.

शेतकरी बांधवांनो दिलेल्या माहितीप्रमाणे आपण हे अंतर घेऊ शकता आणि आपले उत्पन्नात भरीव अशी वाढ करू शकता. कबड्डी वना बद्दल तसेच कापूस या पिकाबद्दल आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन माहिती येत असतात.जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या याची लागवड मागच्या वर्षी केलेली असेल त्यांनी आपल्या कमेंट मध्ये जाऊन सांगा हे वाण कशा प्रकारचे आहे.चला तर भेटूया पुढच्या न्यूजमध्ये. अशीच प्रकारची नवनवीन माहितीसाठी आमच्यासोबत जोडून राहा….
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *