khodmashi : सोयाबीन पिकावरील खोडमाशी किडीची ओळख व नियंत्रण

खोडमाशी ( khodmashi ) किडीची ओळख


khodmashi : शेती मधून अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर मात्र फवारण्याचे योज्य व्यवस्थापन करावे लागते मात्र त्यासाठी शेतात असलेल्या किडींची ओळख करून घेणे अतिशय महत्वाचे आहे.प्रौढ खोडमाशी आकाराने फक्त २ मि.मी. व चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ खोडमाशी दलपत्र किंवा पानाच्या आतमध्ये अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडणारी या किडीची छोटी अळी पिकाला नुकसानकारक असते. पूर्ण विकसित अवस्थेत ही अळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणतः ३ ते ४ मि.मी. लांबीची असते.

khodmashi

अशाच नवनवीन माहिती व योजनेसाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.

khodmashi

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

खोडमाशी ( khodmashi ) किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

khodmashi

पानाच्या शिरांद्वारे अळी सोयाबीनच्या खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते. उगवणीपासून ७ ते १० दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात. खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसू लागतात. तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो व झाडे वाळून नष्ट होतात. त्यामुळे शेतातील रोपांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते. खोडमाशी सोयाबीन पिकावर जीवनाच्या ४ ते ५ पिढ्या राहतात. पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये khodmashi चा प्रादुर्भाव झाल्यास खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.

खोडमाशी किडीच्या आर्थिक नुकसान पातळी


सोयाबीन हे लवकर येणारे पीक असून कमी वेळामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो.मात्र वेळोवेळी बारीक पाहणी करूनच फवारणीचे नियोजन केले असता फवारणीचा खर्च काही करता येते.फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घ्यावी.१० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे सोयाबीन मध्ये दिसत असल्यास फवारणीचे नियोजन करावे.

खोडमाशी किडीच्या व्यवस्थापनाचे उपाय

१.पेरणीच्या वेळी थायमेथोक्झाम ७० डी. एस. ची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. २.रासायनिक कीटकनाशक पीक ७ ते १० दिवसांचे असताना किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच क्लोरोपायरीफॉस २० टक्के इ.सी. १.५ लीटर प्रति हे. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के इ.सी. ८०० मि.ली. प्रति हे. किंवा इथोफेनप्रॉक्स १० इ.सी. १ ली. प्रति हे. किंवा क्लोरॅथुनिलीप्रोल १८.५ टक्के एस. सी. १५० मि.ली. किंवा इथिऑन ५० टक्के इ.सी. १५०० मी.ली. ५०० ते ७०० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

khodmashi

gas new rate | गॅसच्या किमतीत मोठी घट | असे आहेत नवीन दर

Leave a Comment