कपाशी 7067 cotton seed खरचं चांगली आहे का ? जाणून घेऊया A टु Z माहिती

प्रस्तावना:- या वाणाचे नाव यु एस ॲग्री सीडीची 7067 आहे.7067 cotton seed या वाणाला देखील बरेच शेतकरी लागवड करतांना दिसत आहेत . .चला आता जाणून घेऊया नेमकं हे वाण आहे तरी कसं? या कपाशीचा कालावधी किती दिवसाचा आहे. लागवडीचे अंतर किती घायचे आहेत, म्हणजे किती अंतरावर लागवड करायला पाहिजे?

हे वाचा- मान्सून लांबणीवर -पंजाब डंख म्हणतात दुष्काळ पडणार.

7067 या वाणाच्या कपाशीचे बोन्डाचे वजन किती आहेत? तसेच हे कोणत्या राज्यासाठी शिफारस करण्यात आलेले आहेत? कोणत्या जमिनीत लागवड करावी? त्यापासून उत्पन्न किती मिळणार ? अशा तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नच उत्तर .तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की बघा us agri 7067 वाणाची A टु Z माहित तुम्हाला मिळणार आहे.

Agriseeds us 7067 cotton seeds वाणाचे नाव व कंपनीची संपूर्ण माहिती

या वाणाचे नाव US 7067 आहे.हे वाण us agriseeds या कंपनीचे आहे.या कंपनीने देखील मार्कीटमध्ये बरेच वाण आणले असून शेतकऱ्यानी ते वापरले असून चांगल्या प्रकारे शेतकऱ्याना उत्पन्न मिळालं आहे.त्याच बरोबर us ७०६७ हे वाण देखील सध्या फारच प्रचलित होत असून.या कंपनीचे अनेक वाण महाराष्ट्रा,गुजरात व कापसाचे सर्वात जास्त उत्पन्न घेतल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात देखील शेतकरी वापरतात.

जमिनी निहाय लागवडीचे अंतर किती असावे ?

कोणत्याही पिका पासून अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास त्या पिकाची लागवड अतिशय महत्वाची ठरते आणि त्यावरच शेतकऱ्याना होणारे उत्पन्न ठरत असते.त्यामुळे आम्ही सांगत असलेली लागवड पद्धत वापरा किंवा तुम्हा एखाद्या लागवडीचा विशेष अनुभव असेल तर ती लागवड पद्धत फायद्याची असेल तर ती लागवड देखील तुम्ही वापरू शकता आणि ती लागवड पद्धत कमेंट करून नक्की सांगा.

us 7067 cotton seeds या वाणाचा कालावधी किती दिवसाचा आहे असा तुमचा प्रश्न असेल तर हे वाण 160 ते 170 दिवसाचे आहे.या वाणाची लागवड तुम्हाला जर तुम्हाला भारी जमिनीत करायची असेल तर ४ बाय ४ वर करता येईल.जर माध्यम जमीन असेल तर मात्र ४ बाय १.५ किंवा ४ बाय १ वर करू शकता आणि माध्यम जमिनीत 3 बाय 2 अंतरावर या कपाशीचे आपण लागवड करायला पाहिजे किंवा ३ बाय ३ हे अंतर चांगले राहील यात झाडाची संख्या वाढेल.

us agri 7067 चे बोन्डाचे वजन व होणारे उत्पन्न

us agriseeds 7067:- बोन्डाचा आकार हा मुद्दा कापसाच्या बाबतीत अतिशय महत्वाचा असून बरेच शेतकरी नेहमी मोठ्या बोन्डाचे वाण लागवडीसाठी निवडतात.कारण कापसाचे मोठे बॉण्ड असेल तर अधिक उत्पन्न मिळण्याची मोठी शक्यता असते .करम मोठे बॉण्ड असेल तर त्याच वजन देखील जास्त भरते आणि त्यापासून उत्पन्न देखील अधिक होते.या ७०६७ या कापसाचे बॉण्ड आकाराने मोठे असून ५ ते ५.५ ग्रॅम आहे.

७०६७ हे वाण कोणत्या विभागात लावता येईल -कोणत्या राज्यासाठी शिफारस आहे?

कापसाचे वेगवेगळे वाण आहेत आणि ते प्रत्येक वाण एका विशिष्ट जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेले आहेत.त्याच बरोबर विविध विभागासाठी बनविण्यात आलेले आहेत.विभाग म्हणजे एखाद्या राज्यासाठी एखादे वाण चांगले येते तर तेच वाण दुसऱ्या राज्यात पाहिजे तसा एव्हरेज देत नाही. आता ७०६७ cotton seeds कोणत्या राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे असावा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही या वाणाची लागवड महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी ही US Agriseeds ची 7067 ही जात लावायला काही हरकत नाही.

us 7067 cotton seeds वाणाचे वैशिट्य

१) मध्यम ते भारी जमीन या वाणाच्या लागवडीसाठी योग्य.
२) कापूस वेचणीला सोपा आहे.
३) सर्व बोंड एकदाच वेचणीला येतात.त्यामुळे शेतकऱ्यांना फायद्याची अशी व्हरायटी आहे
४) रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षमता जास्त आहेत.
५) दुबार पीक घेण्यासाठी हे वाण अतिशय चांगले आहेत.

अ.क्र.यु. एस. 7067 ( US 7067 BG II)विवरण
1जमीनमध्यम,भारी
2सिंचनकोरडवाहू व बागायती
3कालावधी155 ते 160 दिवस
4बोंड आकारमोठा/वजनदार
5वजन5 ते 6ग्रॅम
6वेचणीससोपे
7उत्पन्नएकरी 7 ते 10 क्विंटल
9कार्यक्षमतारोगप्रतिकारक
10अंतर3 *2,4 x 1,3 x 3, 4 x 1.5
11लागवड वेळमे – जून

तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच पोर्टल ला सबस्क्राईब करून लेखाला लाईक करा. तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी लागवड करणार आहेत किंवा तुमच्या भागामध्ये कोणती व्हरायटीचांगली येते हे नाकीयच सांगा.

हे आहेत सर्वात जास्त उत्पन्न देणारे वाण-मिळणार एकरी १५ क्विंटलहुन अधिक उत्पन्न .

तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्या वाणाची माहिती पाहिजे आहे हे नक्की सांगा. ही माहिती तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुप मध्ये नक्की फॉरवर्ड करा कारण चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक करायला तयार आहे तर त्यामुळे कामाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही नक्की पार पाडा आणि हा लेख तुमचा पाशी असलेल्या whatsapp ग्रुप वर व शेतकरी ग्रुप मध्ये नक्की फॉरवर्ड करा.

Tur new seed -तुरीचे हे 7 वाण सर्वात फायद्याचे-हे आहेत या वाणाचे वैशिट्य-वाणाची निवड करण्याअगोदर नक्की वाचा | Top tur variety in maharashtra

Tur new seed : – शेतकरी मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्ये आता खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे.तसेच लवकरच मॉन्सूनच देखील आगमन होणार आहे.खरीप हंगामामध्ये जर तुम्हाला तूर हे पीक घ्यायचं असेल तर आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला तुर पिक लागवडीसाठी, तुर पिकाच्या काही सुधारित जातींची म्हणजे सुधारित वाणांची या ठिकाणी नावे सांगणार आहेत.त्यांचा कालावधी सांगणार आहे. त्या वाणांची वैशिष्ट्ये सांगणार आहेत.

ज्याच्यामुळे तुम्हाला तुर पिकाची लागवड करण्यासाठी त्या ठिकाणी बऱ्याच काही आयडिया मिळतील म्हणजेच की, कोणतं वाण आपण निवडणूक पाहिजे? कोणता वाण नाही निवडलं पाहिजे? जमिनीुसार हंगामानुसार आपल्या क्षेत्रामध्ये कोणते वाण चांगल्या प्रकारे उगवणे या सर्व गोष्टींची शहानिशा आपण आजच्या लेखामध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुर पिकाची लागवड करणारा आसाल तर मला वाटतं खास करून तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरणार आहे. माझी विनंती आहे हा लेख संपूर्ण पहा आणि लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.

TUR NEW SEEDS-नवीन तूर वाण निवडताना लक्षात घ्यायच्या ५ गोष्टी | उत्पादन नक्की वाढेल

महाराष्ट्र मध्ये खास करून पाहिलं तर  (tur variety in maharashtra) विदर्भ मराठवाडा अशा भागांमध्ये आपल्याला तुर पिकाची जास्त लागवड झालेली दिसून येते. तुर पीक तुम्ही वेगवेगळ्या हवामानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेऊ शकता. तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तसेच पाण्याची धारण क्षमता चांगली असतील जमीन असेल, उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल. सेंद्रिय कार्ब त चांगला असेल.

जमिनीचा कार्ब ०.५ ते ०.६ असेल त्या जर जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बिनधास्तपणे त्या जमिनीमध्ये दोन पिकाची लागवड म्हणजेच पेरणी करू शकता परंतु हे करताना आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की लागवड करताना कोणत्या जातीची लागवड करावी. कारण मार्केटमध्ये भरपूर साऱ्या जाती आहेत. कोणती जात आमच्या क्षेत्रासाठी चांगले आहे? आमच्या हवामानासाठी चांगली आहे? आणि त्या जातीपासून तुम्हाला काय मिळणार आहे? याची माहिती तुम्हाला मिळणे खूप गरजेचे आहे.

1) आयसीपीएल ८७११९ अशा | AshaTUR NEW SEEDS

हे वाण देखील आता पर्यंत शेतकऱ्याना खूप चांगलं उत्पन्न देत आलेलं आहे.या वाणाचे दाणे टपोरे असल्याने बाजार भाव हा चांगला मिळतो.आयसीपीएल ८७११९ अशा असं या वाणाचं नाव आहे.हे 185 ते 190 दिवस कालावधी चे वाण आहे. या ठिकाणी देखील आपल्याला दाणे जे आहेत ते लाल रंगाचे मिळतात परंतु या ठिकाणी टपोरे दाणे तुम्हाला मिळतात.

आयसीपीएल ८७११९ अशा वाणाचे काही वैशिट्य

आयसीपीएल ८७११९ अशा वाणाचे काही महत्वाचे वैशिट्य आपण आता पाहणार आहोत याच कारणाचे हे वाण जास्तीत जास्त शेतकरी या वाणाची मोट्या प्रमाणावर लागवड/पेरणी करतात

१) टपोऱ्या शेंगा
२) लाल रंगाचे दाणे असल्याने चांगला दर
३) मर व वांझ रोगास प्रतिकार
४) शेंगा पोखरणाऱ्या अळीस व शेंग माशीसाठी प्रतिकारक
५) १८५ ते १९० दिवसात येणारे वाण

2 ) फुले राजेश्वरी तूर वाण | FULE RAJESWARI TUR SEEDS

शेतकरी मित्रांनो,फुले राजेश्वरी हे वाण देखील मागील काही वर्षांपासून शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत.या वाणा पासून देखील चांगले उत्पन्न शेतकर्याना मिळत आहे.या वाणाचा कालावधी १३० ते १४० दिवस आहे.हे वाण लवकरात लवकर तयार होते त्यामुळे तूर पिकानंतर दुसरे पीक घ्यायचे असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. या दाण्याचा रंग आपल्याला लाल पाहायला मिळेल.हे वाण सलग लागवड किंवा आंतरपीक पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यासाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे.

3) BDN-708 ( AMOL ) TUR SEEDS | बिडीएन -८०७ अमोल तूर वाण

हे वाण बरेच शेतकरी वापरतात .या वाणा पासून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती या वाणा बाबत अधिकच आहे.जवळजवळ 155 ते 165 दिवसाच्या कालावधीचा आहे. या वाणाच्या काही विशेषतः पाहिल्या तर कोरडवाहू शेतीसाठी हे खास करून शिफारशीत करण्यात आलेला आहे याचे दाणे जे आपल्याला मिळतात .

हे देखील वाचा-सोयाबीनची हे वाण २०२३ मध्ये देईल सर्वात जास्त उत्पन्न

ते चांगले गर्द लाल रंगाचे मिळतात मध्यम जमिनीमध्ये याची लागवड तुम्ही सहजरीत्या करू शकता. मर व वांझ या रोगास खास करून हे वाण प्रतीकारक आहेत. संरक्षित पाणी देण्याची जरी तुमच्याकडे सोय नसेल तुम्ही शंभर टक्के पावसावरती शेती जरी करत असाल तर अमोल म्हणजेच बीडीएस 708 हे वाण तुम्ही त्या ठिकाणी लागवडीसाठी सहजपणे निवडू शकता.

BDN -७०८ अमोल वाणाचे काही वैशिट्य

१) कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी योग्य
२) लाल दाणा असल्याने चांगला भाव लागतो.
३) माध्यम जमिनीत लागवडीसाठी योग्य
४) मर व वांझ रोगास प्रतिकारक
५) कमी पाण्याची गरज

4) बी एस एम आर तूर वाण | BSMRTUR SEEDS

पुढचं वाण आहे ते आहे बीएसएमआर आहे. याचे दाणे जे असतात ते लाल दाणे असतात. फुलांचा रंग तुम्हाला पिवळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे फुलण्याच्या आधी कळी अवस्थेत जर त्या ठिकाणी पावसाचा खंड पडला तर या अवस्थेत तुम्हाला थोडसं तुर पिकास पाणी देणे आवश्यक आहे. हे वाण देखील मर व वांझ अशा रोगास चांगल्या प्रकारे प्रतिकार आहे. झाडाची उंची तुम्हाला 175 ते 190cm ची या ठिकाणी मिळणार आहे.

हे देखील वाचा-कापूस टॉप 5 वाण जे एकरी देतात सर्वात जास्त उत्पन्न ,१५ ते २० क्विंटल एव्हरेज

बी एस एम आर वाणाचे काही वैशिट्य

१) अधिक उत्पन्न
२) लाल रंगाचे दाणे असल्याने चांगला दर
३) मर व वांझ रोगास प्रतिकार
४) भरगोस शेंगाचं शेंगा

5) BDN -७११ TUR BEST SEEDS | बिडीएन ७११ तूर वाण

BDN -७११ हे वाण खूप चांगले असून मराठवाडा व पक्ष्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड होत असलेले वाण आहे .हे वाण 155 दिवस कालावधीचे आहे. हलक्या मध्यम जमिनी तसेच कोरडवाहू जमिनीत देखील हे तुम्ही वान सहज प्रकारे लावू शकतात.या वाणाचे दाणे पांढरे आहेत. या वानापासून खूप चांगलं उत्पन्न मिळते .हे देखील वाण मर व वांझ रोगास चांगल्या प्रकारे प्रतिकारक आहे. कमी वार्षिक परजमा पर्जन्यमान असलेल्या भागात देखील तुम्ही या वनाची निवड सहजपणे करू शकतात.या झाडाची उंची 120 ते 155 cm मिळू शकते.

BDN -७०८ अमोल वाणाचे काही वैशिट्य

१) कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी योग्य
२) लाल दाणा असल्याने चांगला भाव लागतो.
३) माध्यम व भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य
४) मर व वांझ रोगास प्रतिकारक
५) कमी पाण्याची गरज

6) BDN -७१6 TUR NEW SEEDS | बिडीएन ७१6 तूर वाण

BDN -७१६ हे वाण देखील शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देत आहे.हे वाण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी २०१६ साली प्रसारित केले आहे.या तुरीचा रंग हा लाल आहे .हे वाण पेरणीपासून काढणी पर्यंतचा कालावधी १६५ ते १७० दिवस आहे .हे वाण थोडं उशिरा काढणीला येते.तुम्ही या वाणाची लागवड माध्यम व भारी जमिनीत करू शकता.एकरी १० ते १५ क्विंटल पर्यंत शेतकऱ्यानी उत्पन्न घेतलं आहे.

BDN -७16 वाणाचे काही वैशिट्य

१) टपोऱ्या दाण्याच्या शेंगा
२) लाल रंगाचे दाणे असल्याने बाजार भाव चांगला मिळतो.
३) मर व वांझ रोगास प्रतिकार असे वाण
४) उत्तम प्रतीची डाळ मिळते
५) १६५ ते १७० दिवसात येणारे वाण

7 ) विपुल तूर वाण | VIPUL TUR NEW SEEDS

या वाणाचा नाव विपुल आहे.हे वाण 145 ते 160 दिवस कालावधीचे हे वाण आहे.हे देखील वाण शेतकरी काही प्रमाणात वापरताना दिसतात. या वाणाचा वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे पाहायला मिळतात.एक तर दाण्याचा रंग लाल आहे. मध्यम आकाराचे दाणे असलेलं हे वाण आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये हे लागवड केल्यानंतर शेतकऱ्याना चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळत आहे. मर व वांज रोगास हे विपुलता वाण चांगल्या प्रकारे प्रतिकारक आहे.याची लागले/पेरणी माध्यम ते भारी जमिनीत करता येईल.

BDN -७16 वाणाचे काही वैशिट्य

१) माध्यम आकाराच्या शेंगा
२) भाव चांगला मिळतो.
३) मर व वांझ रोगास प्रतिकार
4) १4५ ते १७० दिवसात येणारे वाण

पाऊस व जमीन निहाय तुरीचे वर्गीकरण तक्ता

या लेखात आपण ७ सुधारित वाणा बद्दल सविस्तर माहिती पहिली आहे .आता जाणून घेऊया जमिनीच्या प्रकारानुसार आणि पावसाचा कमी अधिक प्रमाणावर वानांची निवड कशी करावी.या वाणाची नेमकी शिफारस काय आहे. आपण हे वाण तीन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागणी केलेले आहेत. एक म्हणजे मध्यम स्वरूपाचा पर्जन्यमान.दुसरा म्हणजे पाऊस अधिक असलेला तसेच माढाम जमिनीसाठी लागवड करायचे वाण.

अ. क्र. वाण विवरण
1 अशा ८७११९माध्यम, भारी जमीन
2विपुलमाध्यम,
3BDN -७१6बागायती ,भारी जमीन
4BDN -७११बागायती, भारी जमीन
5बी एस एम आरबागायती ,माध्यम
6फुले राजेश्वरीबागायती ,भारी जमीन
7BDN-708कोरडवाहू,बागायती

Monsoon big news update-पंजाब डंख लाईव्ह | हवामान अंदाज- Panjabrao dakh live today | Havaman andaj today

Panjabrao dakh live today :- नमस्कार शेतकरी मित्रानो,चला तर पाहूया आजचा हवामान अंदाज.हे बातमी पत्र तुमच्यासाठी खूपच खास आहे.जर तुमची खरिपाची संपूर्ण तयारी झाली असेल तर आता केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती बनते? महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती या मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच हवामान खात्याच्या माध्यमातून मराठवाडा मध्य महाराष्ट्र याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक अपडेट आजच्या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Panjabrao dakh live today | पंजाब डख यांचा नवीन अंदाज काय ?

Panjabrao dakh live today : – पंजाबराव डाख साहेबानी देखील त्यांचा अंदाज जाहीर केला असून त्यांच्या मते १२ तारखी पासून राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची श्यक्यता आहे.पंजाबराव डख हे खूप प्रचलित हवामान अभ्यासक असून जवळजवळ ३ ते ४ लोकांना हवामान अंदाज वर्तवितात .पंजाब डख लाईव्ह येऊन तात्काळ शेतकऱ्यांना पाऊस येण्याची माहिती देतात.त्यांनी सांगितलेला ९० % अंदाज हा खरा ठरतो.तुम्हाला पंजाब डख साहेबांच्या हवामान अंदाजा बाबत काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा .डाख साहेबांचे रोज निशींचे संपूर्ण अंदाज पाहण्यासाठी आमच्या कृषी तंत्र न्युज ला subscribe करा तसेच आमचे कृषी न्युज २४ तास हे पोर्टल followo करा किंवा आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

मित्रांनो मान्सून अतिशय मंद गतीने याठिकाणी प्रवास करतोय मान्सून चार जूनला केरळमध्ये पोहोचेल असे परिस्थिती होते परंतु त्याला ८ जून ची वेळ लागलेली आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर पश्चिम समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ बनलेल्या विपरजॉय याचे सुद्धा तीव्र आहे ते तसेच आहे आणि हळूहळू हे उत्तर वायव्य दिशेच्या दिशेने सरकत आहे गुजरातला असलेला धोका पूर्णपणे टळलेलाआहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काही भागाला पावसाचे शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे.

चक्रीवादळामुळे कोणत्या जिल्ह्याला जास्त धोका ? -पहा सविस्तर माहिती | Panjabrao dakh live today

चक्रीवादळा मुळे समुद्रकिनाऱ्यावरती सहा किलोमीटर उंची वरती एक चक्राकार वाऱ्याची स्थिती झालेली आहे. आंध्रा लगतच्या समुद्रकिनाऱ्यावरती सुद्धा साधारणपणे दीड किलोमीटर उंची वरती चक्राकार वायू स्थिती झालेली कमी दाबाचे पट्टे त्या ठिकाणी तयार झालेले तर हे सुद्धा चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची मोठी शक्यता आहे त्याच्यामुळे मान्सून पुन्हा एकदा भेट पडेल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमी वरती राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे आहेत कापूस पिकासाठी सर्वात चांगले तणनाशक – एकदा वापरा आणि मग पहा कमाल

ज्याच्यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरचा काही भाग या भागाला या पावसाचा फटका बसू शकतो .याप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. धुळे जिल्ह्याचा काही भाग जळगाव जिल्ह्याचा काही भाग या भागांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याप्रमाणे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर जालन्याचा काही भाग याच प्रमाणे परभणीचा काही भाग आणि नांदेड जिल्ह्याचा काही भाग या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

याप्रमाणे विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचा काही भाग आणि वर्धा जिल्ह्याचा काही भाग अशा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेले मित्रांनो विपर जॉय जे चक्रीवादळ आहे.

या तारखेत मॉन्सून आगमनाची श्यक्यता – या जिल्ह्यात अधिक पाऊस

या हळूहळू उत्तर वायव्य दिशेकडे जाते त्याचा प्रभाव त्याचा जो मान्सूनवरील प्रभाव आहे हळूहळू कमी होईल परंतु पूर्वेला जे काही चक्रीवादळ उद्भवण्याची परिस्थिती आहे. किंवा ज्या चक्राकार हवेचे जे क्षेत्र बनलेले याच्यामुळे आता मान्सूनला वेग येईल अशा प्रकारची सुद्धा शक्यता आहे. येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये साधारण पुढच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रातील काही भाग व्यापेल अशा प्रकारची शक्यता आहे.

साधारणपणे 17 जून नंतर एका चांगल्या पावसाला अपेक्षा होईल अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात येते परंतु आता नऊ आणि 12 तारखेला या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाजत वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट होत. ज्याची माहिती आपल्याला चर्चा करतो भेटूयात नवीन माहितीचा नवीन अपडेट्स धन्यवाद

मार्च व एप्रील 2023 आतीवृष्टी नूकसान भरपाई चे पैसे आले | Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update | किती मदत मिळणार? पात्र जिल्हे कोणते?- चला पाहूया सविस्तर

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update :- मित्रांनो मार्च, एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस किंवा गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुमच्या पिकाचं खरोखरच नुकसान झालेला असेल तर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम ( Ativrushti Nuksan Bharpai 2023 ) तुमच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे. यासाठी भरपूर प्रमाणात निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित झालेला आहे. मार्च-एप्रिलमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत एक जीआर ( GR) देखील आलेला आहे या जीआरमध्ये राज्यातील 22 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२३ मदत २२० कोटी मदत GR इथे बघा

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update :- या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 222 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो कोणते 22 जिल्हे पात्र आहेत? यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? असेल तर या एकूण 222 कोटी मधून तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे? आणि तो निधी वितरित करण्यासाठी जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत? याची सुद्धा माहिती या जीआर मध्ये दिलेले आहे.

हीच माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.जर मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जर आमच्या न्युज पोर्टल वर नवीन असाल आणि सर्व माहिती व योजना मोबाइलला वे मिळवायच्या असतील तर आमच्या न्युजला followo करा किंवा आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

काय आहे GR ? कोणाला मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ?

चला मित्रांनो, सविस्तर जीआर आपण पाहायला सुरुवात करूया. तर पाहू शकता मित्रांनो मार्च एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 5 जून 2023 रोजी हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

आता या जीआरची प्रस्तावना आपण सर्वप्रथम पाहूयात मित्रांनो पाहू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण

राज्यात माहे मार्च एप्रिल 2023 या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. अवेळी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतपिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झालेले आहेत तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर पर्यंत मर्यादित विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

तर मित्रांनो शासन निर्णय पहा म्हणजे तुम्हाला निधी किती मिळालेला आहे ही गोष्ट लक्षात येईल मित्रांनो पाहू शकता मार्च एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 222 कोटी 65 लाख 34 हजार इतका निधी सोबतच्या प्रपत्र दर्शवल्याप्रमाणे जिल्हा निहाय्य वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर मित्रांनो 222 कोटीचा निधी आहे तो निधी जिल्हानिहाय कशा पद्धतीने वितरित करण्यात आलेला आहे याच्याबद्दलचा एक प्रपत्र दाखवण्यात आलेला आहे आणि ते प्रपत्र सुद्धा आता आपण पाहणार आहोत.

महसूल विभाग निहाय जिल्ह्याची यादी जाहीर Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

नागपूर विभाग (एप्रिल 2023)

तर मित्रांनो पाहू शकता दिनांक 5 जून 2023 सोबतचे प्रपत्र तर मित्रांनो हे प्रपत्र तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम इथे जिल्हा दिलेला आहे नागपूर नुकसानाचा कालावधी आहे, एप्रिल 2023. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 403. 403 शेतकऱ्यांसाठी एकूण निधी 21 लाख 71 हजार एवढा आहे.. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानासाठी 303 शेतकरी पात्र असणार आहेत आणि वर्धा जिल्ह्यासाठी एकूण 24 लाख 4 हजार एवढा निधी प्राप्त असणार आहे.

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1नागपूर एप्रिल 2023403125.79 21.71 रु लाखात
2वर्धाएप्रिल 2023303 136.28 24.04
3भंडाराएप्रिल 20231612 557.59 95.15
4गोंदियाएप्रिल 2023442 172.07 30.93
5चंद्रपूर एप्रिल 2023 1418 1745.97 179.61
6गडचिरोलीएप्रिल 20232350 1137.86 193.86
एकूण6528 3875.56 545.30

त्यानंतर भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये 1612 शेतकरी पात्र असणार आहेत या 1612 शेतकऱ्यांसाठी भंडारा जिल्ह्यामध्ये 95 लाख पंधरा हजार एवढा निधी वितरित केला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी 442 शेतकरी पात्र आहेत. एकूण निधी 30 लाख 93 हजार एवढा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1418 शेतकरी पात्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कोटी 69 लाख 61 हजार एवढा निधी असणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यातील 2350 शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी 93 लाख 86 हजार एवढा निधी असणार आहे.

नागपूर विभाग (मार्च 2023)

एकूण नागपूर विभागातील एप्रिल महिन्यामध्ये नुकसान झालेले शेतकरी 6528 असणार आहेत आणि एप्रिल 2023 मध्ये नुकसान झालेला एकूण नागपूर विभागाचा निधी 5 कोटी 45 लाख 30 हजार एवढा असणार चाळीस लाख तीस हजार एवढा असणार आहे त्यानंतर मित्रांनो एकूण नागपूर विभागाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या नुकसानाचा डाटाखाली दाखवलेला आहे

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1नागपूर मार्च 20235540 4441.60 907.46
3भंडारामार्च 2023591 128.18 21.81
4गोंदियामार्च 2023457 150.50 25.40
5चंद्रपूर मार्च 2023 958 375.95 54.31
6गडचिरोलीमार्च 20232632 1257.28 178.05
एकूण10178 6353.51 1187.03

नाशिक विभाग (1 ते30 एनिल, 2023)

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1नाशिक१ ते ३० एप्रिल 2023 82913 45293.72 8022.60
3धुळे१ ते ३० एप्रिल 2023 4879 2613.88 451.80
4नंदुरबार १ ते ३० एप्रिल 20231118 283.55 50.12
5जळगावं१ ते ३० एप्रिल 2023 19046 13384.99 2665.48
6अहमदनगर१ ते ३० एप्रिल 202347583 27078.39 4693.08
एकूण155539 88654.53 15883.08

अमरावती विभाग (17 ते30 एनिल,2023)

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1अमरावती 17 ते30 एनिल,202310529 5847.16 1194.74
3अकोला 17 ते30 एनिल,202311186 5885.60 1026.33
4यवतमाळ 17 ते30 एनिल,202312530 5697.51 974.10
5बलुडाणा 17 ते30 एनिल,20237006 3532.21 620.37
6वानिम 17 ते30 एनिल,20235022 2973.59 514.97
एकूण46273 23936.07 4330.51

. त्यानंतर पुणे विभागांमध्ये सोलापूर जिल्हा आहे नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आहे. अमरावती विभागांमध्ये, अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 22 जिल्हे पात्र असणार आहेत आणि या 22 जिल्ह्यांची लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा जीआर मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊन पाहू शकता तर या शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय डाऊनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने मार्च एप्रिल 2023 च्या अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबतची थोडक्यात माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या लेखाला लाईक करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, धन्यवाद.

आताची मोठी बातमी-या पिकाच्या हमी भावात वाढ –पहा नवीन भाव | MSP Kharif 2023 | New Msp of kharif crop 2023-24

MSP Kharif 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो, आमच्या कृषी न्युज २४ तास चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो केंद्र सरकारने खरीप 2023 24 या हंगाम करिता किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव 2023 वाढ केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन आधारभूत किमतीवर निर्णय झालेला आहे.

मित्रांनो या लेखामध्ये आता सविस्तर माहिती पाहूयात. हमीभावात पीक निहाय किती वाढ झालेली आहे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२३-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी (New Msp of kharif crop 2023-24) किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच एमएसपी मध्ये वाढ करायला मंजुरी दिलेली आहे.

मंडळी माहितीसाठी हि खालची निळी लिंक क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇

कबड्डी वाण लावण्या अगोदर जाणून घ्या- खरचं हे दुप्पट उत्पन्न देणारे वाण आहे का?

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे सरकारने विपणन हंगाम २०२३-24 साठी खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे. मित्रांनो आता या ठिकाणी विपणना हंगाम 2023 24 साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत कशी असणार आहे ते या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहूया. मित्रांनो या ठिकाणी आपण भाववाढी बाबतचा जो चार्ट पाहणार आहोत हा चार्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हवा असेल तर आपले whatsapp ग्रुपवरती वरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. ग्रुप ची लिंक मी ब्लॉगवर लावली आहे.

पीक निहाय हमीभाव तक्ता | MSP Kharif list 2023

अ.क्र.पिकाच नाव2022 चा हमीभाव2023 चा हमीभावहमीभाव वाढ
1भात20402183143 रुपये
2धान प्रथम श्रेणी20602203143
3संकरित ज्वारी29703180210
4ज्वारी मालदांडी29903225235
5बाजरी23502500150
6नाचणी35783846268
7मका19622090128
8तुरी66007000400
9मूग77558558803
10उडीद66006950350
11भुईमूग58506377527
12सूर्यफूल बिया64006760360
13सोयाबीन पिवळे43004600300
14तिळा78308635805
15कारळे72877734447
16कापूस माध्यम धागा60806620540
17कापूस लांब धागा63807020640

कापसाचे सर्वात उत्कृष्ट टॉप 5 वाण- शेतकऱ्यांना मिळणार सर्वात जस्ट उत्पन्न

मित्रांनो या ठिकाणी वरील तक्त्यामध्ये जो भाव दिलेला आहे तो प्रतिक्विंटल करिता या ठिकाणी दिलेला आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये या ठिकाणी पिकाच नाव दिलेल आहे. त्यानंतर तीसऱ्या रकान्यांमध्ये 2022 मध्ये असलेला हमीभाव दिलेला आहे त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये 2023 मध्ये त्याचा हमीभाव काय आहे हे दिलेलं आहे.तसेच मित्रांनो या पुढच्या कॉलम मध्ये 2023 करता हमीभावामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे.त्याबाबत माहिती दिलेली आहे तर आता एक एक करून या ठिकाणी पीक निहाय आपण माहिती पाहूया.

मित्रांनो धान म्हणजेच भात पिकाकरिता आता या ठिकाणी 2023 24 करिता 2183 रुपये इतका हमीभाव असणार आहे या ठिकाणी 143 रुपये इतकी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.त्यानंतर धान प्रथम श्रेणीतील भात याकरिता 223 रुपये इतका हमीभाव असून 143 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर संकरित ज्वारीकरिता या ठिकाणी आता 3180 रुपये इतका हमीभाव असणारा असून 210 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

मान्सूनचा पाऊस कधी येणार -पंजाबराव डंख यांचा नवीन अंदाज

त्यानंतर ज्वारी मालदांडी याकरिता 325 रुपये इतका हमीभाव ( MSP Kharif 2023 ) असणारा असून 235 रुपये इतकी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.त्यानंतर बाजरी करिता या ठिकाणी आता 2500 रुपये इतका हमीभाव असणार आहे 150 रुपयांनी या ठिकाणी वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यानंतर नाचणीकरिता आता या ठिकाणी 3846 रुपये इतका हमीभाव असणार आहे 268 रुपये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.

मका या पिकाकरिता या ठिकाणी 290 इतका हमीभाव ( MSP Kharif 2023 ) असणार असून या ठिकाणी 128 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुरी करिता या ठिकाणी आता 7000 रुपये इतका हमीभाव असणार आहे. चारशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मूग या पिकाकरिता आता 858 रुपये इतका हमीभाव असणारा असून 803 रुपये मी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.

उडीद पिकाकरिता 6950 रुपये हमीभाव असणारा असून 350 रुपये वाढ केलेली आहे भुईमूग या पिकाकरिता आता या ठिकाणी सहा हजार 377 रुपये इतका हमीभाव असणार असून 527 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर सूर्यफूल बिया करिता या ठिकाणी 6760 रुपये हमीभाव असणार असून 360 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.

त्यानंतर सोयाबीन पिवळे याकरिता 4600 इतका हमीभाव ( MSP Kharif for 2023 ) असणार असून तीनशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिळाकरिता याठिकाणी आता 8635 रुपये इतका हमीभाव असणारा असून 805 रुपयांनी या ठिकाणी वाढ ही करण्यात आलेली आहे. कारळे या पिकाकरिता 7734 रुपये मी वाचणार असून 447 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो मध्यम भागाच्या कापसाकरिता या ठिकाणी आता 6,620 रुपये इतका हमीभाव असणार असून 540 रुपये इतकी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

त्यानंतर लांब धाग्याच्या कापसाकरिता आता या ठिकाणी 7000 20 रुपये इतका हमीभाव असणार आहे 640 रुपये इतकी वाढ ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी येत्या हंगामा करिता आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच हमीभावांमध्ये वाढ करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.

संपूर्ण योजना व शेतीची माहिती मिळवा मोबाईल वर

Exit mobile version