कबड्डी वाण लावण्या अगोदर जाणून घ्या | kabaddi cotton seeds | कबड्डी कापूस बियाणे-दुप्पट उत्पन्न देणारे वाण

tulsi cotton seeds kabaddi | भरगोस उत्पनातून शेतकरी झाला समाधानी.

kabaddi cotton seeds

kabaddi cotton seeds :- नमस्कार शेतकरी मित्रानो आमच्या न्युज पोर्टल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या या भागांमध्ये आपण कबड्डी या वनाविषयी जाणून घेणार आहोत. त्याचं कारण असं की आपल्याला भरपूर शासक कमेंट आल्या होत्या की, सर कबड्डी या बना विषयी माहिती द्या.आजच्या लेखामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी बघण्याच्या आहे.ज्यामध्ये आपण कबड्डी वाण्याचे वैशिष्ट्य बघणार आहे. लेखाच्या माध्यमातून हे वाण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेश मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये कबड्डी या वाणाचे योग्य अंतर आपण कोणतं घेतलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.ज्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न हे मिळेल.

मागील वर्षी बर्याच शेतकऱ्यानी हे वाण घेतले असता मोठ्या प्रमाणावर त्यांना फायदा झाला,त्यांना कधी न झालेलं उत्पन्न कबड्डी या वाणाने दिले.याचं उत्पन्न सुद्धा चांगला आहे त्यामुळे बिनधास्त हे वाण आपण लावू शकतो.मात्र कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली .पुढील वर्षी शेतकऱ्याना चांगल्या भावाची अपेक्षा आहे.

कबड्डी वाणाचे महत्वाचे वैशिट्य | kabaddi cotton seeds

खालील पैकी काही महत्वाचे वैशिट्य असल्या कारणाने शेतकऱ्याची या वाणास पसंती आहे. मागच्या वर्षी काही प्लॉटची व्हिजिट केली होती त्यामुळे निदर्शनात आलं की,kabaddi हे वान अतिशय उत्तम असं वाण आहे.

  1. या वाणाचे वजन चांगले आहे. बोंडाच वजन ते 6 ते 7 ग्रॅम पर्यंत जातं.
  2. सोबतच हे वाण जे आहे ते पाण्याचा जरी ताण पडला तरीही या वाणाला सहनशील असं हे वान आहे.
  3. अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोरडवाहू आणि बागायतीसाठी सुद्धा हे उपयुक्त असे वाण आहे.
  4. हा सुद्धा एक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत उपस्थित झाला होता की कोरडवाहूसाठी चांगला आहे की बागायतीसाठी? तर दोन्ही साठी हे वाण उपयुक्त असी आहे.
  5. हे वेचणीस सोपं वान आहे आणि उच्च प्रतीचा धागा या वाणापासून आपल्याला मिळतो म्हणजेच उच्च प्रतीचा धागा आपल्याला मिळाला तर आपल्याला बाजार भाव हा देखील चांगला मिळतो.
  6. एक समान आकाराचे आणि भरपूर बोंड या वनाला लागतात.
  7. बुडापासून ते शेंड्यापर्यंत पाच पाकळी बोंड इथे लागतात.90% च्या वर आपल्याला पाच पाकळी बोंड या वाणाची पाहायला मिळतात
  8. रोगप्रतिकारक शक्ती या वाणाची चांगली आहे

कबड्डी वाण लागवडीसाठी निवडल्यास घ्यावयाचे अंतर | seeding distance of kabaddi cotton seeds

कापसाचे पीक घायचे झाल्यास कापसाचे अंतर हे अतिशय महत्वाचे ठरते आणि त्यावरच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढ व घट ठरते. कारण अंतर फार महत्त्वाचं असते कुठलेहि वानाची निवड करताना, कुठलेही वाण्याचा आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा अंतर हे फार महत्त्वाचे असते.शेतकऱ्यानो काही अंतर इथे सांगणार आहे ते म्हणजे मध्यम जमिनीसाठी,भारी जमिनीसाठी सोबतच प्रदेशानुसार म्हणजेच आपापल्या विभागानुसार काही अंतर सांगणार आहे जसे की,मराठवाड्यासाठी कुठलं अंतर योग्य आहे? पश्चिम महाराष्ट्र, खानदेश साठी कुठला अंतर योग्य आहे? विदर्भासाठी कुठलं अंतर योग्य आहे? तर अशा पद्धतीने आपण अंतराची विभागणी केली आहे आपापल्या भागानुसार तुम्ही लागवड करू शकता.

शेती विषयक नवनवीन माहितीसाठी व योजना साठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

अ.क्र.विभागअंतरजमीन
1मराठवाडा4 x 2( मध्यम )कोरडवाहू
2मराठवाडा6 x 1( भारी ) बागायती
3मराठवाडा5 x 1 ( मध्यम ) बागायती
4विदर्भ3 x 2( मध्यम ) कोरडवाहू
5विदर्भ4 x 3( भारी ) बागायती
6पश्चिम महाराष्ट्र3 x 3( भारी ) बागायती
7पश्चिम महाराष्ट्र3 x 2( मध्यम ) कोरडवाहू
8पश्चिम महाराष्ट्र4 x 2 ( भारी ) बागायती
9पश्चिम महाराष्ट्र3 x 3( मध्यम ) बागायती

तर सर्वप्रथम आपण मराठवाड्यासाठी अंतर बघू, त्यासोबत त्यामध्ये आपण कोरडवाहू जमिनीसाठी काय अंतर असायला पाहिजे बागाची जमिनीसाठी काय अंतर असलं पाहिजे.मराठवाड्यासाठी जे अंतर आहे ते चार बाय दीड फुटाचा आपण इथे घ्यायला पाहिजे ते म्हणजे कोरडवाहू जमिनीसाठी चार बाय दीड फुटाचा अंतर मराठवाड्यासाठी आपण येथे घेऊ शकतो.

सोबतच मराठवाड्यासाठी बागायती जर जमीन असेल तुमची मराठवाड्यातून आपण शेतकरी बांधव असाल आणि बागायती जर जमीन असेल तर आपल्याला भारी जमिनीसाठी सहा बाय एक फूट आणि मध्यम जर जमीन असेल आपली तर पाच बाय एक फूट असं अंतर इथे घ्यायला पाहिजे जर आपण विदर्भाच्या शेतकरी असाल तर विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू जमिनीसाठी तीन बाय दोन फूट असेल तर योग्य राहील आणि बागायती जमीन साठी चार बाय तीन फूट हे योग्य आणि योग्य अंतर राहील.

भाऊ इथे क्लिक करा

2023 साठी कापसाचे टॉप 5 वाण-कोणताही एक वाण लावा आणि मालामाल व्हा

आपण जर खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र येथील शेतकरी असाल तर भारी जमिनीसाठी तीन बाय तीन फुटी अंतर घ्यावं आणि मध्यम जमिनीसाठी तीन बाय दोन फुटे अंतर घ्यावं हेच अंतर आहे कोरडवाहूसाठी. नंतर बागायती जर जमीन असेल आणि भारी उच्च प्रतीची जमीन असेल तर आपण चार बाय दोन फुटे अंतर घ्यावं आणि मध्यम जमीन चला तर आता या वाणाची लागवड करायची झाल्यास अंतर कसे घायचे हे समजून घेऊया.

शेतकरी बांधवांनो दिलेल्या माहितीप्रमाणे आपण हे अंतर घेऊ शकता आणि आपले उत्पन्नात भरीव अशी वाढ करू शकता. कबड्डी वना बद्दल तसेच कापूस या पिकाबद्दल आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन माहिती येत असतात.जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या याची लागवड मागच्या वर्षी केलेली असेल त्यांनी आपल्या कमेंट मध्ये जाऊन सांगा हे वाण कशा प्रकारचे आहे.चला तर भेटूया पुढच्या न्यूजमध्ये. अशीच प्रकारची नवनवीन माहितीसाठी आमच्यासोबत जोडून राहा….
धन्यवाद

kapus lagvad antar 2023 | कापसाचे हे अंतर सगळ्यात फायद्याचे-जमिनी निहाय अंतर पद्धती

कापसासाठी कोणती अंतर पद्धत सर्वात फायद्याची -kapus lagvad antar 2023 

kapus lagvad antar 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,जर तुम्हाला कापसाचे एकरी होणारे उत्पादन दुप्पट वाढव्हायचे असेल तर हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे.तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल मात्र कापसाचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी kapus antar हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.पुढे याबाबत सविस्तर माहिती पाहूया..

kapus lagvad antar 2023

सध्या अनेक शेतकरी कापसाचे विविध अंतर निवडून प्रयोग करतात तसेच विविध लागवड पद्धतीचा अवलंब करताना दिसतात.मात्र त्यांच्या उत्पन्नात फारशी वाढ होताना दिसत नाही.करण त्यांनी निवडलेली अंतर पद्धत चुकीची असते .काही वेळेला अंतर योग्य असत मात्र जमीन त्या अंतरासाठी योग्य नसते. कापसातील अंतर निवडताना तुमची जमीन काशी आहे हे लक्षात हे घेतले पाहिजेत.जमिनीचे 3 प्रकार लक्षात घेऊनच अंतर निवडा करण काही अंतर पद्धती तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढवतात तर काही अंतर शेतकऱ्याचं मोठं नुकसान करून जातात.

जमिनीचे प्रकार व लागवडीची पद्धत

चला तर शेतकरी मित्रानो,सुरुवातीला आपण जमिनीचे प्रकार लक्षात घेऊ म्हणजे लागवडीचे अंतर निवडतांना अडचण येणार नाही.

आताच बघा-कापूस टॉप 5 वाण -सर्वात जास्त लावल्या जाणारे व शेतकऱ्याच्या पसंतीचे कापूस वाण

भारी जमीन/कळीची जमीन

शेतकरी मित्रानो, या जमिनीत काळ्या मातीचे प्रमाण अधिक प्रमाणात असते तसेच या जमिनीचे शेंद्रिय कर्ब हा जास्त असतो.या जमिनीत चांगले उत्पन्न होते.विशेष म्हणजे या नत्र, स्फुरद, तसेच पालाश चे प्रमाण योग्य असते.

मध्यम जमीन

मध्यम जमिनीत काळ्या मातीचे प्रमाण कमी प्रमाणात असते.या जमिनीचा शेंद्रिय कर्ब देखील कमी असतो .हि जमीन काळ्या जमिनीच्या तुलनेत कमी पाणी धरून ठेवते .या जमिनीतून पाण्याचा निचरा थोडा लवकर होते त्यामुळे हा या जमिनीचा एक फायदा आहे.

मध्यम जमीन

या जमिनीत काळ्या मातीचे प्रमाण अतिशय कमी किंवा नाहींच्या बरोबर असून या जमिनीत मुरमाचा भाग जास्त असतो.या जमिनीचा शेंद्रिय कर्ब खूपच कमी असते त्यामुळे या जमिनीत उत्पन्न हे खूपच कमी असते .हि जमीन अजिबात पाणी धरून ठेवत नाही त्यामुळे या जमिनीला अधिक पाण्याची आवशकता पडते.

कापसाचे सर्वात बेस्ट ७ वाण बघा सविस्तर व्हिडिओ

कापसाची योग्य अंतर पद्धत कोणती?

सुरुवातीला पाहूया काळ्या म्हणजे भारी जमिनीसाठी शेतकऱयांनी कोणत्या लागवड पद्धतीचा उपयोग केला पाहिजेत जेणे करून उत्पनात मोठी वाढ होईल.कोणते अंतर कोणत्या जमिनीसाठी योग्य राहील या बाबतचा रकाना खाली दिलेला आहे. यात पाहून तुम्ही समजून घेऊ शकता काळ्या म्हणजेच भारी जमिनीत कोणते अंतर घ्यावे? माध्यम जमिनीत कोणते अंतर घ्यावे ? तसेच हलक्या जमिनीत कोणते अंतर घ्यावे.

तसेच हे अंतर निवडल्यास एकरी झाडाची संख्या किती बसणार हे देखील रकान्यात दिलेले आहे.यावरून तुम्हाला झाडाची संख्या देखील लक्षात येईल व कापसाचे एकरी होणारे उत्पन्न देखील काढता येईल.आम्ही सांगितल्या प्रमाणे अंतर घेऊन नक्कीच शेती करा उत्पन्नात हमखास वाढ होईल.

अ.क्र.अंतर पद्धतजमिनीचा प्रकारझाड संख्या ( एकरी )
1सामान अंतर पद्धत
5 x 5
4 x 4
कळीची जमीन /भारी जमीन
1742
2722
2सामान अंतर पद्धत
3 x 3
2 x 2

माध्यम जमीन
हलकी जमीन

4840
10890
3विषम अंतर पद्धत
6 x 1
6 x 1.5
6 x 2
कळीची जमीन /भारी जमीन
7260
4840
3630
4विषम अंतर पद्धत
5 x 1
5 x 1.5
5 x 2
कळीची जमीन /भारी जमीन
8712
5808
4356
5विषम अंतर पद्धत
4 x 1
4 x 1.5
4 x 2
कळीची जमीन /भारी जमीन
10809
7260
5445
6पावली लागवड पद्धत
6 x पावली
5 x पावली
4 x पावली
3 x पावली

कळीची जमीन /भारी जमीन
कळीची जमीन /भारी जमीन
माध्यम जमीन
हलकी जमीन
अंतर उपलब्ध नाही
7पाटा पद्धत ( अमृत पॅटर्न )
7 x 5 x 1
6 x 4 x 1
5 x 4 x 1
कळीची जमीन /भारी जमीन
कळीची जमीन /भारी जमीन
माध्यम जमीन
अंतर उपलब्ध नाही

4×1 लागवड अंतर पद्धत

kapus lagvad antar :- ४ x1 .5 लागवड अंतर पद्धत :- हि अंतर पद्धत देखील बऱ्याच प्रमाणात वापरली जाते. या पद्धतीला काही शेतकऱ्याची पसंती आहे.कारण बरेच असे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात दोन झाडातील अंतर वाढविले असता झाड दाटतात त्यामुळे असे ज्या शेतकऱ्याच्या शेतात होते त्या शेतकऱ्यासाठी हि लागवड पद्धत फायद्याची ठरते.या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर हे ४ फूट असते आणि २ झाडातील अंतर हे १.५ फूट असते.यामुळे यामध्ये अधिक मोकळी जागा असते आणि झाडाला फुटवे करण्यासाठी हि पद्धत महत्वाची ठरते.या लागवड पद्धतीचा दुसरा फायदा असा कि या लागवड पद्धतीत झाडाची पातेगल होत नाही आणि बुरशीजन्य रोजाचा प्रॅदुर्भाव कमी होतो.

4×1.5 लागवड अंतर पद्धत


4×1.5 kapus lagvad antar :- हि अंतर पाहत मोठ्या प्रमाणात वापरली जात असून या पद्धतीला शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पसंती आहे.
या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर हे ४ फूट असते आणि २ झाडातील अंतर हे १ फूट असते.यामुळे मोकळी जागा जास्त असते आणि झाडाला फुटवे करण्यासाठी हि पद्धत महत्वाची ठरते.या लागवड पद्धतीचा दुसरा फायदा असा कि या लागवड पद्धतीत झाडाची पातेगल होत नाही आणि गरमीमुळे बुरशीजन्य रोजचा प्रॅदुर्भाव कमी होतो.

4×2 लागवड अंतर पद्धत

4×2 kapus lagvad antar 2023 :- हि अंतर पद्धत देखील काही प्रमाणात वापरली जात असून या पद्धतीला काही शेतकऱ्याची पसंती आहे.
या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर हे ४ फूट असते आणि २ झाडातील अंतर हे २ फूट असते.यामुळे यामध्ये अधिक मोकळी जागा असते आणि झाडाला फुटवे करण्यासाठी हि पद्धत महत्वाची ठरते.या लागवड पद्धतीचा दुसरा फायदा असा कि या लागवड पद्धतीत झाडाची पातेगल अजिबात होत नाही आणि गरमीमुळे बुरशीजन्य रोजाचा प्रॅदुर्भाव कमी होतो.मात्र या लागवड पद्धतीचा तोटा असा कि या लागवड पद्धतीमध्ये झाडाची संख्या अगदी कमी बसते व व्यवस्थापनामध्ये चूक झाल्यास उत्पनात घाट होण्याची शक्यता असते.

Chilli leaf curl virus Control | मिरची पिकातील वायरस रोगावर हा रामबाण उपाय

काय आहे मिरची पिकावरील चुरड-मुरडा रोग? | Chilli leaf curl virusजाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो,हा लेख तुमच्या साठी अतिशय महत्वाचा असून मिरची पिकातील वायरस रोगावरती हा रामबाण उपाय ठरणार आहे. होय शेतकरी बंधूंनो या लेखात आपल्याला मिरची पिकावरील ( Chilli leaf curl virus ) कोकडा-बोकडा किंवा चुरडा मुरडा या नावाने संबोधल्या जाणाऱ्या एका वायरस बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत.

त्याच्यावरती संपूर्ण एकात्मिक उपाय आपण कशाप्रकारे करू शकतो याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.त्यामुळे शेतकरी बंधुनो लेख खूप महत्त्वाचा आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की हा लेख तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.

Chilli leaf curl virus

लगेच अर्ज करा-शेतकऱ्याना बियाणे मिळणार अगदी मोफत पहा काय आहे योजना?

मिरची हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्वाचे पीक असून शेतकऱ्याना सर्वात जास्त पैसा मिळवून देणारे पीक आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही .महाराष्ट्रात विदर्भ,मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील बऱ्याच जिल्ह्यात तसेच विशेष करून सातारा,पुणे,औरंगाबाद, धुळे,या जिल्ह्यांमध्ये मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

मात्र प्रत्येक शेतकऱ्याला मिरचीचे भरगोस उत्पन्न घेता येत नाहीय कारण मिरची उत्पादक शेतकरी नेहमी एका समस्येने ग्रस्त असतात ती म्हणजे मिरची पिकावर होणारा वायरस अटॅक.चुरडा – मुरडा, घुबड्या, बोकड्या या नावांनी या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविधओळखले जाते.

मिरची पिकावरील चुरडा-मुरडा,बोकड्या रोगाची लक्षणSymptoms of leaf curl disease

Chilli leaf curl virus :- या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे आपल्या मिरची पिकावरील झाडाची पाने वरील बाजूस वळलेली दिसून येतात.मिरचीच्या पानांचा गुच्छ झालेला आपल्याला दिसून येतो.शेतकरी बंधूंनो त्या झाडांना फुले आणि फळे आपल्याला कमी प्रमाणात लागलेली दिसून येतात.झाडाची नवीन पाने बारीक येतात.मिरची पिकात पानांवर सुरकुत्या किंवा पानगोळा होण्यासारखी लक्षणे दिसतात. झाडाची वाढ होत नाही त्या झाडाची वाढ खुंटते.

रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाचे संपूर्ण पाने गाळून पडतात,तसेच यावर बाहेरच म्हणजे रोगाचा प्रसार आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येतो,हा प्रादुर्भाव रस शोषक किडीमार्फत झालेला दिसून येतो. म्हणूनच आपल्याला या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बंधुनो त्या ठिकाणी रस शोषक किडींचे नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण पीक आपल्या हातून जाऊन शेतकर्याचं मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

Chilli leaf curl virus | मिरची पिकावर या अवस्थेत कोणकोणत्या किडींचा/किटकांचा प्रादुर्भाव होतो

मिरची पिकाची इतर पिकाच्या तुलनेत मोट्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागते कारण हे पीक रोगास जास्त संवेदनशील असते.त्यावर रोगांचा अटक लवकर होतो व त्याचे नियंत्रण वेळेवर करणे गरजेचे असते.त्यामुळे मिरची पिकावर अटॅक करणाऱ्या किडी/कीटकांची आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे जेणे करून त्यांचे नियंत्रण तात्काळ करता येईल.

अ.क्र.किडी/किटकरोग
1पांढरी माशी भुरी
2थ्रिप्स ( फुलकिडे )मर
3लाल/पिवळा कोळी बोकड्या
4फळ पोखरणारी आळीपानावरील पांढरे ठिपके
5तुडतुडेकेवडा

मिरची पिकावरील चुरडा-मुरडा,बोकड्या रोगाचे नियंत्रण व व्यवस्थापन कसे करावे?

पिकावरील या भयानक व्हायरस आहे.त्यामुळे त्याचे एकात्मिक उपाययोजना केली तरच या विविध रोगावरती नियंत्रण शक्य आहे. रोग नियंत्रणाची पद्धत काय आहे ते समजून घेऊया.शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण मिरचीचा प्लॉट लावत असतो त्यावेळेस आपल्याला मिरचीच्या चारी बाजूंनी शेडनेट किंवा जुन्या साड्या त्या ठिकाणी बांधायचे आहेत. शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा आपल्याला चार ते पाच प्रादुर्भावग्रस्त रोपे त्या ठिकाणी आढळून येतील त्यातील रोगग्रस्त रोपे काढून प्लॉटच्या बाहेर काढून त्या ठिकाणी नष्ट करायचे आहे.

Breaking बातमी-खताचे नवीन भाव जाहीर-पहा नवीन भाव काय आहेत.

शेतकरी बंधूंना आपल्याला माहित आहे की, या वायरसचा प्रसार हा रस शोषक किडीमार्फत होतो म्हणूनच आपल्याला प्रति एकरी दहा पिवळे चिकट सापळे आणि 10 निळे चिकट सापळे आपल्या प्लॉटमध्ये लावायचे आहेत.शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून त्या ठिकाणी निम तेलाची आपल्याला दोन मिली प्रतिलिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे.

शेतकरी बंधूंनो मात्र या वायरसनी आपल्या मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर अटॅक केला असेल तर मी पुढे सांगत असलेली कीटकनाशके आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मिरची पिकावरती आलटून पालटून फवारणी द्वारे वापरायचे आहेत.याने मात्र या रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल. खालील पैकी कोणतेही एकाच कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे.

मिरची वरील रोगावर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक

शेतकरी मित्रानो ,मिरची वरील या विविध रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी खालील पैकी कोणतेही एकच कीटकनाशक आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापरायचे आहे.फवारणी करताना पाण्याचे योग्य प्रमाण घेणे अतिशय आवश्यक आहे.तसेच कीटकनाशकाचे योग्य प्रमाण देखील अतिशय महत्वाचे ठरते.

अ.क्र.घटक नावकीटकनाशक
1इमामेक्टिन बेंझॉइड 1.5 +फिप्रोनील ३.५ scअपेक्स-50
2फ्लूबेन्डामीड १९.९२ + थायक्लोप्रिड १९.९२बेल्ट एक्सपर्ट (बायर)
3इंडोक्साकार्ब 14.5 एससी+एसिटामिप्रिड 7.7 एसपीकाईट घरडे केमिकल
4थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सीसिजेंटा अलिका

अशा प्रकारे शेतकरी बंधुनो ही वेगवेगळे कीटकनाशके आपल्याला आपल्या पिकावरती आलटून पालटून फवारणी द्वारे वापरायचे आहेत.आता याचे प्रमाण शेतकरी बंधूंना आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पिकावरती कोणत्या किडींचा किती प्रादुर्भाव आहे, याच्यानुसार ठरवायचे आहेत, अंदाजे त्या ठिकाणी आपण 0.5 ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी मिसळून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे म्हणजे सिलिकॉन युक्त स्टिकर मिसळून आपल्या मिरची पिकावरती त्याठिकाणी फवारणी द्वारे वापरायचे आहे.

खालील टेबल हा फक्त इंग्रजीमध्ये आहे.

No.ContentInsecticide
1Emamectin Benzoate 1.5 Fipronil 3.5 ScApex
2Flubendiamide 19.92% + Thiacloprid 19.92% w/w SCBelt Expert ( Bayer )
3Indoxacarb 14.5% + Acetamiprid 7.7% SCGharda
4Thiamethoxam 12.6% + Lambda Cyhalothrin 9.5% ZC – 200 mlSyngenta Alika

नमो शेतकरी योजनेला मंजुरी | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023 कशी असेल नमो शेतकरी योजना?

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023 मंजुरी मिळाली.३० मे रोजी मंत्रिमंडळात झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना 12 हजारांचा निधी मिळणार. 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

बियाणे अनुदान योजना 2023 | Biyane Anudan Yojna 2023 -यांनाच मिळणार योजनेचा लाभ


pm kisan yojna च्या धरतीवर cm kisan yojna राज्य सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार त्याच बरोबर केंद्र सरकार देखील शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार आहेत. केंद्राच्या pm किसान योजनेचे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.असा निर्णय ३० मे २०२३ रोजी घेतलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ज्या प्रमाणे pm किसान योजनेत शेतकऱ्याना वर्षाकाठी ६००० रुपयांची रक्कम मिळणार आहे त्याच प्रमाणे या योजनित आणखी ६००० हजार रुपयांची रक्कम वाढून एकूण १२००० रुपये शेतकऱ्याना दिले जाणार आहेत.
त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे असे म्हणता येईल.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023 | कधी पासून लागू होणार . शेतकऱ्याना किती पैसे मिळणार.

शेतकऱ्याना आर्थिकदृष्ठ्या सक्षम करण्यासाठी या योजनेची रचना करण्यात अली असून,पूर्वी मिळणारा पैसा शेतकऱ्याना अपुरा होत असलेल्या कारणाने आता निधीत मोठी वाढ करण्यात अली आहे.बऱ्याच दिवसा पासून हि योजना लागू होणार अशी चर्चाच होत होती, मात्र अजून पर्यंत त्यावर ठोस निर्णय झाला नव्हता .

आता मात्र मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून योजनेला प्रशाशकीय मान्यता देखील देण्यात अली आहे.हि योजना जून महिन्याच्या दुसर्या किंवा तिसर्या हप्त्यात सुरु करण्यात येणार असून जूनच्या शेवटच्या हप्त्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला चार महिन्याच्या अंतराने २००० मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.तेव्हा या योजनेचा पहिला हेपता २००० रुपये शेतकर्याच्या खात्यात येणार आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna चा अर्ज कुठे करायचा? कागदपत्र काय लागणार ?

Namo Shetkari Mahasanman Nidhi या योनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही कारण हि योजना pm kisan nidhi योजनेत विलीन करण्यात येणार असून या योजनेसाठी पात्र असलेले सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार आहेत.

मात्र हि योजना सुरु झाल्यानंतर शेतकऱ्याना काही कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.त्या कागदपत्रासाची यादी खालील प्रमाणे प्रमाणे आहे.


१) आधार कार्ड


२) बँक खाते


३) ७/१२ व ८ आ


४)राशन कार्ड


५) मोबाईल नंबर


६) pm किसान ekyc स्लिप

नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी करावे लागणार ३ कामसविस्तर माहिती

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ३ काम करावे लागणार आहेत.


१) pm किसान खात्याची kyc करणे
२) बँक खात्याची kyc करणे
३) land सीडींग करणे


ह्या तीन गोष्टी सविस्तर समजून घेण्यासाठी वरील लिंक क्लिक करा.

crop insurance new update | फक्त एक रुपयात मिळवा पीकविमा -असा करा अर्ज | pikvima yojna update

पीकविमा योजना नवीन अपडेट | crop insurance new update-अशी करा अर्ज प्रक्रिया   

crop insurance new update

crop insurance new update :- मित्रांनो राज्यातील आपल्या शेतकरी बांधवांसाठी दोन अशा महत्त्वाच्या आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याच्या घोषणा राज्य सरकारने यापूर्वी केल्या होत्या ज्याबाबत राज्य सरकार ठोस निर्णय कधी घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मात्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची 30 मे 2023 रोजी झालेल्या बैठकिमध्ये निर्णय घेतला आहे.आणि हाय निर्णय शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे.

पेरणी अनुदान योजनेतून शेतकऱ्याना मिळणार १० हजार रुपयांची मदत

मग मित्रांनो तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की ते महत्त्वाचे आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याची निर्णय नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो यातील पहिला जो महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे, आता आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना केवळ एक रुपयात पीक विमा मिळणार आहे.हो मित्रानो हे अगदी खार आहे . मित्रांनो मंत्रिमंडळाच्या 30 मे 2023 च्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना ( crop insurance only in 1 rupaya )एक रुपयात पीक विमा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पिक विमा मिळणार आहे महत्त्वाचे म्हणजे उर्वरित रकमेचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. याबाबतची घोषणा अर्थमंत्री माननीय श्री देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती आता मित्रांनो या प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

crop insurance new update

crop insurance update अर्ज कुठे करायचा? फी किती व कशी भरायची?

शेतकरी मित्रानो,तुम्हाला तर माहीतच आहे कि,जर तुम्हाला तुमच्या पिकाचा विमा काढायचा असेल तर मात्र csc केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागतो,किंवा घरच्या घरी मोबाइलला वर देखील हा अर्ज तुम्ही भरून घेऊ शकता मात्र त्यासाठी तुम्हाला आमच्या लेखाच्या माध्यमातून मदत केली जाईल.

आपण अगोदर बऱ्याच वेळा पिकविम्यासाठी ओंलीने अर्ज केला असेल आणि त्यावेळी पीक विमा काढणत्यासाठी वेगवेगळ्या पिकासाठी मोठी रक्कम तुम्हाला भरावी लागली होती.
२०२२ मध्ये वेगवेगळ्या पिकासाठी लागू असलेला शेतकरी हिस्सा रकम खालील प्रमाणे होती.

अनुक्रमांकपिके पीकविमा २०२२ चा लाभार्थी हिस्सा ( एकरी रक्कम)
1कापूस
924 रुपये
2 तूर 294.42 रुपये
3सोयाबीन 369.68 रुपये
4मुंग 203.6 रुपये
5उडीद 203.6 रुपये
8भुईमूग 257.83 रुपये
11 ज्वारी 228.32 रुपये

सदर डाटा फक्त तुम्हाला समजण्यासाठी असून यवतमाळ जिल्ह्याचा २०२२ चा शेतकरी हिस्सा होता हे लक्षात घ्यावे.पूर्वी शेतकऱ्याकडे विमा काढण्यासाठी पुरेशे पैसे नसल्या कारणाने शेतकरी विमा काढू शकत नव्हते,
शेतकरी मित्रानो आत्ता गरीबात गरीब शेतकरी पीकविमा काढू शकतो कारण आता फक्त शेतकऱ्याना पिकविम्यासाठी १ रुपया फी भरून सहभाग नोंदवायचा आहे.बाकी उर्वरित हिंसा केंद्र व राज्य सरकार भरणार आहेत.हि आता शेतकरी मित्रांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे असे म्हणता येईल.

Required documents for crop insurance form | पीकविमा काढताना लागणारी कागदपत्र

कोणताही अर्ज भारतांना काही आवश्यक कागदपत्राची आवशकता असते .पीकविमा काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची खालील प्रमाणे यादी आहे .विमा काढायला जाताना हे कागदपत्रे सोबत घेऊन जावे.

अनुक्रमांककागदपत्र
1आधार कार्ड
2बँक खाते
3७/१२ व ८आ
4पीकपेरा
5मोबाईल नंबर

कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोठा आला |  वेबसाइट झाली सुरु लगेच अर्ज करा

खालील प्रश्नाची उतारे देखील तुम्हाला लवकरच दिली जातील

  1. पीक विम्याचा हप्ता किती आहे?
  2. पीएम फसल विमा योजनेत फलोत्पादन प्रीमियम किती आहे?
  3. पीक विम्यामध्ये प्रीमियम काय आहे?
  4. प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी कोण पात्र आहेत?
  5. राष्ट्रीय कृषी विमा योजना म्हणजे काय?
  6. विमा योजना म्हणजे काय?
  7. पिक विमा हेक्टरी किती 2023?
  8. पिक विमा हेक्टरी किती?
  9. पिक विमा योजना कोणासाठी फायदेशीर आहे?

संपूर्ण योजना व शेतीची माहिती मिळवा मोबाईल वर

Exit mobile version