सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू-kusum solar pump yojna 2023

असे करा सोलर पंपसाठी अर्ज | kusum solar pump yojna 2023 online registration

नमस्कार शेतकरी मित्रानो,तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी.आजपासून म्हणजेच 17 मे 2023 पासून kusum solar pump yojna 2023 चे नवीन अर्ज सुरू झाले असून आता तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

आता आपण या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहोत ज्यामध्ये अर्ज कसा करावा,पात्रता काय?अवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ?

अर्ज ऑनलाईन करण्यासाठी इथे क्लिक करा

हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून तो तुम्ही स्वता करू शकता किंवा मग csc /महा ई-सेवा केंद्रावर जाऊन करू शकता.मात्र csc चालक अर्ज online करण्यासाठी काही फि आकारतात..

योजनेची पात्रता इथे बघा | kusum solar pump yojna 2023

सदर योजना हि राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून चालवली जात असून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते.सदर योजनेसाठो महाऊर्जा विभाग नेमला असून mahaurja solar yojna अर्जाची व निवडीची प्रक्रिया पूर्ण करते…

खरं तर गेल्या एका वर्षांपासून हि योजना बंद होती असे म्हणायला काहीच हरकत नाही..करण गेल्या एका वर्षांपासून कोठा उपलब्द नसल्या कारणाने शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत…

आता मात्र पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्यात आली असून काही जिल्ह्यासाठी कोठा उपलब्ध करून देण्यात आला आहे

कोणते सोलर पंप वितरित होणार | kusum solar pump list

असे तर मार्केट मध्ये खूप प्रकारची म्हणजेच विविध HP ची सोलर पंप उपलब्ध आहेत पण पी एम कुसुम योजने अंतर्गत 2023 मध्ये खलील hp ची सोलर पंप वाटप होणार आहेत..

  • 3 HP
  • 5 HP
  • 7.5 HP
  • 10 HP

इथे पहा-ऑनलाइन अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागते वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही kusum solar pamp योजनेची आवश्यक लागणारी कागदपत्रे पाहू शकता.

बियाणे अनुदान योजना 2023 | Biyane Anudan Yojna 2023 -यांनाच मिळणार योजनेचा लाभ

शेतकऱ्यांना बियाणं साठी मिळणार १०० % अनुदान | Biyane Anudan Yojna 2023

नमस्कार शेतकरी मित्रानो , राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना आता बियाणे वाटप करण्यात येणार असून,बियाणे अनुदान योजना 2023 मध्ये कशी मिळवायची हे पाहणार आहोत.

बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते? ,त्या अनुदानावर पिके कोणती मिळणार ?, Biyane Anudan Yojna 2023 पात्रता काय?, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील?, अर्ज कुठे आणि कसा करायचा? हि संपूर्ण माहिती संबंधित लेखात आपण सविस्तर बघणार आहोत.

सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात तुम्हाला देणार आहोत.या योजनेअंतर्गत तुम्हाला १०० % लाभ मिळवायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

हे वाचा-गॅसचे दर कमी झाले – २०० रुपये सबसिडी मिळनार

Biyane Anudan Yojna 2023 संपूर्ण माहिती

सरकार शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवत असतो गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागा अंतर्गत बियाणे अनुदान योजना २०२३ हि योजना चालविली जात असून Maha DBT पोर्टल वरून याचा अर्ज करावा लागेल.मात्र त्यासाठी शेतकऱ्याना काही काम कारवी लागणार आहेत.

या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येते.

या लॉटरी पद्धतीद्वारे ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळतात . ज्या पिकाच्या बियाण्यासाठी अर्ज केला आहे त्याच्या उपलब्धतेनुसार त्याच पिकाचे बियाणे व वाण मिळतात. बियाणे उपलब्ध नसल्यास तुमची निवड होत नाही .

बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

हे लक्षात घ्या :- बियाणे अनुदान योजनेत शेतकरी बांधवांना दोन प्रकारच्या बियाण्यांची वाटप करण्यात येत असते.पहिला बियाण्याचा प्रकार म्हणजे प्रमाणित बियाणे व दुसरा प्रकार म्हणजे पीक प्रात्यक्षिक बियाण्यांची वाटप करणे.या दोन्ही बियाणामध्ये विविध पिकाचा समावेश करण्यात आला असून त्याची यादी खाली दिलेली आहे.

बियाणे योजनेत शेतकऱ्याला /लाभार्थ्याना दोन प्रकारचे अनुदान देण्यात येते जे त्यांनी अर्जात मागणी केलेली असेल. मिळणारे अनुदान खालील प्रमाणे असेल

प्रमाणित बियाणे करिता ५०% अनुदान देण्यात येते
प्रात्यक्षिक बियाणासाठी १०० % अनुदान देण्यात येते

योजनेत मिळणाऱ्या बियाणाची यादीbiyane yojna seeds list

1. सोयाबीन

2. तूर

3. कापूस

4. उडीद

5. मूग

6. वेळेवर उपलब्ध होणारे इतर पीक

बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना करायची कामे

पहिले काम :- शेतकऱ्यांना maha dbt पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
हा अर्ज तुम्ही स्वता करू शकता किंवा csc केंद्रावर देखील तुमचा अर्ज भरून दिला जातो.मात्र त्यासाठी तुमच्याकडून काही फी आकारली जाते.

दुसरे काम :- सुरुवातीला अर्ज भरताना तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते अन्यथा तुमचे रजिस्टेशेंन होत नाही व तुमचा अर्ज भरला जाणार नाही.
१) आधार कार्ड
२ ) ७/१२
३ ) ८ अ
४ ) मोबाईल क्रमांक
५) बँक खाते
तुमची निवड झाल्यावर तुम्हाला आणखी काही कागद पात्र अपलोड करावी लागतात .

तिसरे काम :- csc केंद्रावर अर्ज भारत असताना संपूर्ण माहिती योग्य आहे का ते एकदा पडताळून आवश्यक बघा .माहिती योग्य असल्यास केंद्र चालकाला अर्ज भरायला सांगा .

चौथे काम :- संपूर्ण अर्ज भरून झाल्यास csc चालकांकडून id आणि password आवश्यक घ्या.

पाचवे काम :- अर्ज भरल्याची पावती व अर्जाची पेमेंट पावती जरूर घ्या ..

सहावे काम :- तुमच्या मोबाईल नंबरवर तुमची निवड झाल्यास लगेच दिलेल्या विहित वेळेत सांगितलेली कागदपत्रे अपलोड करा.

बियाणे अनुदान योजना २०२३ साठी आवश्यक कागदपत्रे

१) 7/12 प्रमाणपत्र.
२) 8-अ प्रमाणपत्र.
३) उपकरणांचे कोटेशन
४) एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी).
५) राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक
६) शेतकऱ्याचे हमीपत्र.
७) पूर्वसंमती पत्र.

जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बियाणाची यादी

अ. क्र. बियाणे प्रकार जिल्हे
1भातनाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली
2कडधान्य सर्वच जिल्हे
3गहूसोलापूर, बीड, नागपूर
4भरडधान्य मक्कासांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव
5बाजरी नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद
6ज्वारीनाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ
7कापूसअमरावती, वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ. वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
8ऊसऔरंगाबाद, जालना, बीड.

सोलर पंप फक्त 5 हजार रुपयात -pm Kusum Solar yojna शेतकऱ्यांसाठी 95 % सबसिडी |

5 हजारात कसा मिळणार सौर पंप- Pm Kusum Solar yojna

नमस्कार शेतकरी मित्रानो, आजची शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाची योजना असून फक्त 5 हजार रुपयात सौर पंप कसा मिळणार या साठी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत तेव्हा संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या..

सोलर पंप योजना : हि योजना 08 मार्च 2019 रोजी सुरू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेचं नाव मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजना या नावाने चालविली जात होती आता मात्र प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या नावाने चालू आहे.

हि योजना भारत सरकारच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येत असून पीएम कुसुम सोलर पंप योजना या नावाने चालविली जाते.

हे वाचा -नमो शेतकरी योजनेचे 2 हजार या तारखेला जमा होणार

हि योजना ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली चालविली जात असून . या योजनेचे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे तसेच जीवाश्म इंधनावरील शेतकऱ्यांचे अवलंबन कमी करणे,शास्वत ऊर्जा प्रस्थापित करणे व हे आहे.ही योजना 2030 पर्यंत बिगर-जीवाश्म-इंधन स्त्रोतांपासून विद्युत उर्जेच्या स्थापित क्षमतेचा वाटा 40% पर्यंत वाढविण्याच्या दिशेने पहिले आणि महत्वपूर्ण पाऊल टाकणार आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदान मिळते..हि योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून राबविण्यात येत असून दोघांचाही सबसिडीच्या 50-50 टक्के हिसा आहे. तर सबसिडी (solar pump subsidy) व्यतिरिक्त 5 किंवा 10% स्वहिस्सा शेतकऱ्यांनाच भरावा लागतो..हे आनुदान तुम्हाला कसे मिळेल हे आपण आता जाणून घेऊ..

सोलर पंप योजना (Pm Kusum Solar pump yojna) 5 हजारात कशी मिळेल ?

खरं तर हि योजना जवळजवळ शेतकऱ्यांना 90% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे अनुदान 95 टक्के आहे..आणि याच लाभार्थ्यांना हे सोलर पंप (solar pump) फक्त 5 हजार किंवा 5 टक्के किंमतीत मिळतात. या दोन्ही प्रवर्गातील लाभार्थ्या व्यतिरिक्त इतरांना 90 % अनुदानावर किंवा 10% किंमतीत solar pump yojna पुरविली जाते..

कुसुम सोलर पंप योजना नोंदणी कशी कराल | kusum solar pump yojana maharashtra

चला तर आज जाणून घेऊया कोणत्याही लाभार्थ्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन (Pm Kusum Solar yojna online apply ) कशी करायची? कुठे करायची? हे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो . हि प्रक्रिया अगदी सोपी आहे मात्र जर तुम्हालाआ यातील काहीच समजत नसल्यास आपण जवळच्या csc केंद्रावर जा ते तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करून देतील.आणि जर काय तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया स्वता करायची असेल तर खालील ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन संपूर्ण माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता

कुसुम सोलर पंप योजना नोंदणीसाठी खालील बटन क्लीक करा

सौर पंप योजनेसाठी पात्रता अटी व नियम

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभ घेण्यासाठी नियम व अटी खलील प्रमाणे आहेत

  • अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा
  • तो शेतकरी असावा
  • त्याच्या नावाने शेतीचा 7/12 असावा
  • प्रति मेगावॅटसाठी सुमारे २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

1)आधार कार्ड,ओळखपत्र


2) रेशनकार्ड/शिधापत्रिका


3)नोंदणीची प्रत,


4)बँक खाते. पासबुक ,


5)7/12 व 8 अ


6) शेताचा नकाशा

7) शेजाऱ्यांचे लाईट बिल

8)पासपोर्ट आकाराचा फोटो,


9)मोबाईल क्रमांक

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र?

१) शेतकरी
२) सहकारी संस्था
३) शेतकर्‍यांचा गट
४) जल ग्राहक संघटना
५) शेतकरी उत्पादक संस्था

सौर पंप किंमत | solar water pump price

सोलर पंप HPसोलर पंप किंमत
3 HP सोलर पंपकिंमत : 1,56,000
5 HP सोलर पंपकिंमत : 2,32,000
7.5 HP सोलर पंपकिंमत : 3,80,000
10 HP सोलर पंपकिंमत : 4,68,000

मागेल त्याला घरपोच वाळू फक्त ६०० रुपये ब्रास-Sand booking on mahakhanij

Sand booking on mahakhanij-अशी करा ऑनलाईन बुकिंग

नमस्कार वाचक बंधुनो, आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असून,नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं Sand booking on mahakhanij नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. 1 मे 2023 पासून या धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार अशी माहिती मिळाली आहे.नवीन धोरणानुसार,घरकुल लाभार्थांना 600 रुपये प्रती ब्रास म्हणजेच 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे.
६०० रुपये दराने वाळू कशी मिळणार? अर्ज कुठे करायचा? अटी-शर्ती काय? तेव्हा बातमी पाहूया सविस्तर ..

PM किसान चा १४ वा हाप्ता तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला तर माहीतच आहे सध्या प्रधानमंत्री आवास योजना सुरु असून संपूर्ण भारतभर २०२४ हे उद्दिष्ट घेऊन १२०.२५ लाख घरांना सध्या मंजुरी मिळाली असून ७३ लाखाहून अधिक घर पूर्ण झाली आहेत

घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्वाची लागणारी बाब आहे रेती,घरकुल योजनेचा पहिला व दुसरा टप्पा सुरु असून मोठ्या प्रमाणावर घराचे बांधकाम सुरु आहेत.आता या बांधकामात मोठा अडथळा निर्माण होत असून रेती खूप मोठी समस्या बनली आहे.रेतीसाठी लाभार्थ्यांना खूप जास्त पैसे मोजावे लागत आहेत. सरकार कडून मिळणारे अनुदान अपुरे पडत आहेत आणि रेती माफिया आता नाही त्या भावात रेती विक्री करत आहेत.यालाच पर्याय आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी रेती घरकुलाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

फक्त ६०० रुपये ब्रास दराने घरकुलासाठी रेती बुकिंग Sand booking on mahakhanij करता येणार आहे.वाळू वाहतुकीचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीला बांधकामासाठी वाळू हवी असल्यास वाळूची मागणी ऑनलाईन नोंदवता येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. पण काय आहे हे धोरण? त्यानुसार वाळू विक्री कशी होणार?

मागेल त्याला घरपोच वाळू

मागेल त्याला घरपोच वाळू-रेतीसाठी बुकिंग कुठे करायची

आता आपण संपूर्ण प्रक्रिया सांगणार अहो तेव्हा नीट समजून घ्या कि Sand booking on mahakhanij कशी करायची

सर्वप्रथम Google ओपन करा,Google home पेज ओपन झाल्यानंतर त्यात mahaakhanij असे type करून enter करा ज्या प्रकारे तुम्हाला खालील फोटोत दिसत आहे

sand booking on mahakhanij

आता सर्वात पहिले दिसणारी mahakhanij Revenue Department लिंक क्लिक करा

लिंक क्लिक केल्यानंतर महाखनिज ची official website उघडेल.जसे कि तुम्ही पाहू शकता

sand booking on mahakhanij

mahakhanij च्या website वर आल्यानंतर सर्व प्रथम आपल्याला Login या बटन वर क्लिक करायचं

आता एक नवीन पेज उघडेल. त्यावर खालील प्रमाणे २ नाव दिसतील

LOGIN आणि SIGN UP

SIGN UP या बटन वर क्लिक करा

नाव, ई-मेल ,मोबईल नंबर टाईप करा

वरील पूर्ण माहिती भरून SUBMIT बटन वर क्लिक करा

आता तुम्ही टाकलेल्या मोबईल नंबर वर ५ अंकी OTP येईल

तो टाकून पुन्हा SUBMIT वर क्लिक करा

आता तुमच्या मोबईल वर User ID येईल जो तुमचा मोबईल नंबर आहे व तिथेच password जनरेट करण्याची लिंक येईल . ती क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो password निवड ..
आता नवीन पेज उघडेल त्यावर सुरुवातीला तुमचा id टाका,खाली पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून submit करा..
आता तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे नवीन पेज उघडेल

संपूर्ण प्रोफाइल पूर्ण केल्याशिवाय आपल्याला sand booking on mahakhanij होऊ शकणार नाही संपूर्ण प्रोफाइल पूर्ण करा..

इथे तुम्ही पाहू शकता कि तुमची संपूर्ण profile रिकामी आहे. ती तुम्हाला सुरवातीला पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या पेणच्या बटन वर क्लिक करा ..आता नवीन पेज उघडेल जो खालील प्रमाणे दिसेल

आता तुम्ही सुरुवातीची सर्व माहिती भरून घ्या.
ज्यात नाव,ई-मेल,मोबईल आणि राज्य अगोदरच भरलेले असेल.
आता सुरुवातीला…
जिल्हा नीवडा
नंतर तालुका निवडा
नंतर गाव निवडा
तुमचा पूर्ण पत्ता टाका
तुमचा पिन कोड टाका

आता बाजूला बघा, यात तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
यात Adhar card हे अगदी अनिवार्य आहे .
आता तुमच्याकडे यापैकी बरेच कागदपत्र असतील,असणारे कागदपत्रे अपलोड करून update बटन दाबा.
आता खालील पेज दिसत आहे यातील संपूर्ण माहिती भरून घ्या

आता Registar project या मेणूतील संपूर्ण माहिती भरून घ्या

संपूर्ण योजना व शेतीची माहिती मिळवा मोबाईल वर

Exit mobile version