पेरणी अनुदान योजना कशी मिळेल | Perni Anudan Yojna-२०२३
Perni Anudan Yojna-२०२३ :- नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिहंगाम १० हजार रुपये निविष्ठा अनुदान द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचा नुकसान होत आहे. खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये अतिवृष्टी होत आहे. जोरदार गारपीट देखील होत आहे तसेच अवेळी पाऊस देखील होत आहे.हेच काय तर कधी मोठा पावसाचा खंड पडतो. या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा नुकसान होतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते.
अशा परिस्थितीमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून गारपीट,अवेळी पाऊस नुकसान भरपाई,अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानिसाठी शेतकऱ्यांना एक वेळ अनुदान दिले जातात परंतु अनुदान वेळेत मिळत नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते पैसे उपलब्ध नसतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला अनुदान मिळवून सुद्धा शेतीत पिकवता येत नाही.आणि याच पार्श्वभूमी या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदाना देण्यापेक्षा एक वेळचं निविष्ठ अनुदान देण्यात यावे अशा प्रकारचे मागणे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाला करण्यात आलेली आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांना Perni Anudan Yojna-२०२३ हि योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.
दुबार पेरणी,अतिवृष्टी व पाऊस खंड पडल्यास योजना कामाची
मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2022 मध्ये मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे.त्याच बरोबर वातावरणाचं संतुलन बदलत चाललेलं आहे या सर्वाचा विचार करता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच सुद्धा संकट येऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची नापीके असेल, आत्महत्या असतील अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी,शेतकऱ्याला सफल करण्यासाठी अशा प्रकारचं जर निविष्ठ अनुदान एक वेळ दिलं तर शेतकरी या ठिकाणी दुबार पेरणी सारखा संकट आलं तरी समोर जाऊ शकतात.
खरीप,हंगाम रब्बी हंगाम अशा प्रत्येक हंगामासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणून एक वेळचा अनुदान १० हजार रुपये द्यावा अशा प्रकारचा दिलासादायक एक प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे.ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो.
बियाणे मिळवा १००% अनुदानावर लगेच अर्ज करा -पहा नेमकी योजना आहे तरी काय ?
मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर नुकसान भरपाई असतील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही शेतकऱ्यांना मिळतात परंतु त्याची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस शेतकऱ्यांकडे अनुदानाचे पैसे उपलब्ध नसतात यासर्वाचा विचार केला तर अशी सरसकट मदत जर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली तर नक्कीच शेतकरी समाधानी होईल.
आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव स्वीकारला जातोय की नाही? शेतकऱ्याना हे अनुदान मिळणार कि नाही? हे सांगता येणार नाही. याची प्रक्रिया चालू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अजूनपर्यंत या बाबतचा शासन निर्णय (GR) आलेला नाही.मित्रांनो 2023 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याची योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याचे एक राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी दर्शवलेली आहे मात्र अजून हि योजना अजून सुरु झाली नाही.मात्र हि योजना अंतिम टप्य्यात असल्याचं सांगितलं जात आहे .
१० हजार अनुदान कधी? व कसे मिळणार?
शेतकरी मित्रानो,मराठवाडा व विदर्भातील काही शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हि योजना लागू केली जाऊ शकते.या योजनेचा विचार केला तर सध्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याचा सर्वे स्थानिक पातळी वरती चालू असल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वे जून महिन्याचा १० तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सर्वे पूर्ण झाल्यास हि योजना तात्काळ राबविली जाणार आहे. कारण रब्बी हंगाम तोंडावर आला असून पंजाब डंख यांनी मॉन्सून अंदाज देखील वर्तविला आहे .
शेतकरी मित्रानो,मराठवाडा व विदर्भातील काही शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हि योजना लागू केली जाऊ शकते.या योजनेचा विचार केला तर सध्या आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्याचा सर्वे स्थानिक पातळी वरती चालू असल्याचं सांगितलं जात आहे हा सर्वे जून महिन्याचा १० तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
योजनेचा कोटा वाढला-पहा सविस्तर बातमी- आता सर्वच शेतकऱ्याना मिळणार सोलार पंप
सर्वे पूर्ण झाल्यास हि योजना तात्काळ राबविली जाणार आहे. कारण रब्बी हंगाम तोंडावर आला असून पंजाब डंख यांनी मॉन्सून अंदाज देखील वर्तविला आहे .या अनुदानाची पुढील प्रक्रिया नेमकी कशी असेल हे अजून पर्यंत स्पष्ट करण्यात आले नाही त्यामुळे हि योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्याना online फार्म भरावा लागेल कि ofline अर्ज करून हे अनुदान मिळेल हे सांगता येणार नाही तेव्हा आमच्या सोबत जोडून राहा शेती विषयक व योजना लगेच तुमच्या मोबाइलला वर मिळवा.