raigad rain news

raigad rain news : पुराच्या पाण्याचा आणखी एक थरार – रायगड किल्ल्यावरील पुराचे दृश्य

raigad rain news : धबधब्याच्या पाण्यातून पुरामुळे अनेक लोक वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली असताना, एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत असून, अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेले दिसत आहेत..हा काही नदी नाल्यांचा पूर नाही.. ज्यामुळे तुम्ही या लोकांना म्हणाल…. “हे लोक बिन्डोक आहेत की काय “.. सदर घटना ही किल्ले रायगड येथे घडली असून अचानक आलेल्या पुरात किल्ल्यावर आलेली अनेक लोक अडकली.. तेव्हा संपूर्ण बातमी वाचा तसेच हा संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी आमच्या KTN मराठी या youtube चॅनेल ला आणि आमच्या ( facebook ) फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ..

राज्याच्या अनेक भागात मॉन्सून दाखल झाला असतांना.राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे.आणि देशात तसेच राज्यात पुराच्या पाण्यात अनेक लोक वाहून गेल्याच्या अनेक घटना देखील घडल्या आहेत ..असे असतांना किल्ले रायगड येथे देखील अनेक पर्यटक वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्याची दुर्घटना घडली आहे . त्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे..तर त्याचा एक विडिओ देखील प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे.

पिकाने चक्क शेतकऱ्याला दिला आवाज – चमत्कारी व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Raigad rain news : किल्ले रायगड वर अडकले शेकडो पर्यटक

raigad rain news : घटना अशी आहे की काल दिनांक 7 जुलै रविवार रोजी सुट्टी असल्याने अनेक जण किल्ले रायगडावर फिरायला आले होते.. गडावर आलेल्या लोकांची चांगलीच गर्दी जमली होती.. दरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी घराकडे जाण्यासाठी गडावरून पायऱ्याने खाली उतरायला सुरुवात केली. गडावरून अर्ध्यात आल्यानंतर पावसात मोठी वाढ झाली आणि ढगफुटी सदृश्य पाऊस गडावर झाल्याने उतरत्या पायऱ्यांनी वेगाने पाणी वाहू लागले..

पायऱ्यांनी पाणी वाहू लागल्याने लोकांची एकच खळबळ उडाली आणि पाहता पाहता पाण्याचे रूपांतर वेगाने वाहणाऱ्या पुरात झाले.. ही घटना दुपारच्या सुमारास साडेतीन ते चार वाजता घडली असून नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मुलासह गडावर आलेले अनेकजण बेजार झाल्याचे चित्र पाहायला मिळाले..

गडांच्या इतरही भागात जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून गडाच्या विविध भागातून पाण्याची धबधबे खाली वाहत होती.. प्रशासन सध्या ॲक्शन मोडवर असून या भागामध्ये लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *