योजना, सरकारी योजना मागेल त्याला घरपोच वाळू फक्त ६०० रुपये ब्रास-Sand booking on mahakhanij May 3, 2023 pratap bodkhe Leave a comment Sand booking on mahakhanij-अशी करा ऑनलाईन बुकिंग नमस्कार वाचक बंधुनो, आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असून,नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं Sand booking on mahakhanij नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. 1 मे 2023 पासून या धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार अशी माहिती मिळाली आहे.नवीन धोरणानुसार,घरकुल लाभार्थांना 600 रुपये प्रती ब्रास म्हणजेच 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे. ६०० रुपये दराने वाळू कशी मिळणार? अर्ज कुठे करायचा? अटी-शर्ती काय? तेव्हा बातमी पाहूया सविस्तर .. PM किसान चा १४ वा हाप्ता तारीख पाहण्यासाठी इथे क्लिक करा तुम्हाला तर माहीतच आहे सध्या प्रधानमंत्री आवास योजना सुरु असून संपूर्ण भारतभर २०२४ हे उद्दिष्ट घेऊन १२०.२५ लाख घरांना सध्या मंजुरी मिळाली असून ७३ लाखाहून अधिक घर पूर्ण झाली आहेत घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्वाची लागणारी बाब आहे रेती,घरकुल योजनेचा पहिला व दुसरा टप्पा सुरु असून मोठ्या प्रमाणावर घराचे बांधकाम सुरु आहेत.आता या बांधकामात मोठा अडथळा निर्माण होत असून रेती खूप मोठी समस्या बनली आहे.रेतीसाठी लाभार्थ्यांना खूप जास्त पैसे मोजावे लागत आहेत. सरकार कडून मिळणारे अनुदान अपुरे पडत आहेत आणि रेती माफिया आता नाही त्या भावात रेती विक्री करत आहेत.यालाच पर्याय आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी रेती घरकुलाला देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त ६०० रुपये ब्रास दराने घरकुलासाठी रेती बुकिंग Sand booking on mahakhanij करता येणार आहे.वाळू वाहतुकीचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीला बांधकामासाठी वाळू हवी असल्यास वाळूची मागणी ऑनलाईन नोंदवता येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. पण काय आहे हे धोरण? त्यानुसार वाळू विक्री कशी होणार? मागेल त्याला घरपोच वाळू मागेल त्याला घरपोच वाळू-रेतीसाठी बुकिंग कुठे करायची आता आपण संपूर्ण प्रक्रिया सांगणार अहो तेव्हा नीट समजून घ्या कि Sand booking on mahakhanij कशी करायची सर्वप्रथम Google ओपन करा,Google home पेज ओपन झाल्यानंतर त्यात mahaakhanij असे type करून enter करा ज्या प्रकारे तुम्हाला खालील फोटोत दिसत आहे sand booking on mahakhanij आता सर्वात पहिले दिसणारी mahakhanij Revenue Department लिंक क्लिक करा लिंक क्लिक केल्यानंतर महाखनिज ची official website उघडेल.जसे कि तुम्ही पाहू शकता sand booking on mahakhanij mahakhanij च्या website वर आल्यानंतर सर्व प्रथम आपल्याला Login या बटन वर क्लिक करायचंआता एक नवीन पेज उघडेल. त्यावर खालील प्रमाणे २ नाव दिसतीलLOGIN आणि SIGN UPSIGN UP या बटन वर क्लिक करानाव, ई-मेल ,मोबईल नंबर टाईप करावरील पूर्ण माहिती भरून SUBMIT बटन वर क्लिक कराआता तुम्ही टाकलेल्या मोबईल नंबर वर ५ अंकी OTP येईलतो टाकून पुन्हा SUBMIT वर क्लिक करा आता तुमच्या मोबईल वर User ID येईल जो तुमचा मोबईल नंबर आहे व तिथेच password जनरेट करण्याची लिंक येईल . ती क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो password निवड ..आता नवीन पेज उघडेल त्यावर सुरुवातीला तुमचा id टाका,खाली पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून submit करा..आता तुम्ही पाहू शकता खालील प्रमाणे नवीन पेज उघडेल संपूर्ण प्रोफाइल पूर्ण केल्याशिवाय आपल्याला sand booking on mahakhanij होऊ शकणार नाही संपूर्ण प्रोफाइल पूर्ण करा.. इथे तुम्ही पाहू शकता कि तुमची संपूर्ण profile रिकामी आहे. ती तुम्हाला सुरवातीला पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या पेणच्या बटन वर क्लिक करा ..आता नवीन पेज उघडेल जो खालील प्रमाणे दिसेल आता तुम्ही सुरुवातीची सर्व माहिती भरून घ्या.ज्यात नाव,ई-मेल,मोबईल आणि राज्य अगोदरच भरलेले असेल.आता सुरुवातीला…जिल्हा नीवडानंतर तालुका निवडानंतर गाव निवडातुमचा पूर्ण पत्ता टाकातुमचा पिन कोड टाका आता बाजूला बघा, यात तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत.यात Adhar card हे अगदी अनिवार्य आहे .आता तुमच्याकडे यापैकी बरेच कागदपत्र असतील,असणारे कागदपत्रे अपलोड करून update बटन दाबा.आता खालील पेज दिसत आहे यातील संपूर्ण माहिती भरून घ्या आता Registar project या मेणूतील संपूर्ण माहिती भरून घ्या Relatedmaha dbt yojna-नव्या कृषी मंत्र्याचा मोठा निर्णय आता मागेल त्याला मिळणार योजना | maha dbt portalJuly 17, 2023In "कृषी बातमी"Ration card aadhar link आता राशन धान्य ऐवजी मिळणार मोठी रक्कमJuly 14, 2023In "सरकारी योजना"नमो शेतकरी योजनेला मंजुरी | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023June 3, 2023In "योजना"