शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी Pik vima update 2023आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 2023 24 करता एक रुपयात पिक विमा योजना जाहीर केलेली आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आता शेतकरी मात्र अडचणीत येत आहे.आता मात्र मोट्या प्रमाणावर शेतकरी पिकविम्या पासून वंचित राहणार आहेत.
काय अडचण अली ? शेतकरी का वंचित राहणार ? याच बाबत सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. मात्र त्या अगोदर अशाच नवीन योजना थेट तुम्हाला मोबाइलला वर पाहिजे असल्यास तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
Pik vima update 2023 : सरकारी पोर्टल बंद, ताप मात्र शेतकऱ्यांना
पीकविमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यात सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी इच्छुक आहेत. परंतु आपला सहभाग नोंदवण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येत नाही.मित्रांनो पिक विमा योजनेचा अर्ज भरताना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज भरता यायला पाहिजे होता मात्र तो भरता येत नाही.
कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या माध्यमातून अर्ज भरत असताना शेतकऱ्याला “सेंड फायनान्शिअल आयडी” अशा प्रकारचा एरर येत आहे.या व्यतिरिक्त csc च्या माध्यमातून पिक विमा भरत असताना सुद्धा सीएससीच्या पोटाला PMFBY चे पोर्टल कनेक्ट होत नाही.सोबतच फोटो देखील लोड होत नाहीत आणि या सर्व कारणाने पिक विमा भरू शकत नाहीत.
जर पीक विमा भरायचा असेल तर मात्र दुसरी अडचण अशी कि महाराष्ट्र शासनाचे भूमी अभिलेख विभागाचं पोर्टल डाऊन राहत आहे.आणि शेतकऱ्याची शेती संबंधित माहिती लोड होत नाही.
त्याच्यामुळे आता csc कनेक्ट झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा लँड वेरिफिकेशन करण्यासाठी लँड रेकॉर्डची साईड कनेक्ट होत नाही .या सर्व कारणाने शेतकरी स्वतः Crop Insurance भरू शकत नाही. शेतकरी csc च्या माध्यमातून पिक विमा भरण्यासाठी गेला तर बऱ्याच csc धारकांना पिक विमा सुद्धा भरता येत नाही.
शेतकरी मित्रानो या सर्व गोष्टीमुळे तीन ते चार दिवसाचा कालावधी हा नाहक वाया जातो. सरकारच्या माध्यमातून या पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक आव्हान करण्यात येत आहे परंतु या बंद असलेल्या साईट बद्दल किंवा या बंद असलेल्या पोर्टल बद्दल कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
पीक विम्याच्या अंतिम तारखेचा csc धारकांना फायदा
मित्रानो पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै २०२३ हि शेवटची तारीख असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी हे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्यामुळे या शेवटच्या चार ते पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोड येणार हे नक्की.त्यामुळे हि Pik vima update अतिशय महत्वाची आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे पीक विमा अर्ज भरून घ्या
असे असताना पुन्हा साईट चालणार नाही, पुन्हा शेतकऱ्यांना Crop Insurance भरता येणार नाही आणि त्यावेळेस सुद्धा पिक विमा भरणारे शेतकरी जास्त असल्यामुळे आणि सीएससी धारकाकडे असेल किंवा जे दुकानदार असतील त्यांच्याकडे लोड असल्यामुळे पर्यायाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून जास्त पैशाची आकारणी सुद्धा केली जाऊ शकते.
तर मित्रांनो तुम्हाला या बाबत काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा सोबतच शासनाने कृषी विभागाने याला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर यावर लक्ष दिले पाहिजे आणि वेळ पडलीच तर शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
सविस्तर माहितीसाठी इथे किंवा खालील फोटो क्लिक करा