sanjay gandhi niradhar yojna :-नमस्कार मित्रांनो,.आज मंत्रिमंडळात निर्णय भरपूर निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामधला हा एक मंत्रिमंडळ निर्णय ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती योजनाया बाबतचा आहे.आजचा सरकारचा हा निर्णय फारच महत्वाचा ठरणार आहे.
त्यासंदर्भातला हा निर्णय नेमका काय आहे ते आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.आणि अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
sanjay gandhi niradhar yojna व श्रावणबाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ
मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना या बद्दल तुम्हाला तर माहीतच असेल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये आता मानधनात वाढ होणार आहे.
निराधार महिला व पुरुषांना आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतुन दरमहा 500 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आज हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या या दोन्ही योजनेत 1000 हजार रुपये इतके मासिक अर्थसाह्य देण्यात येते आता त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते मानधन 1500 रुपये इतके होणार आहे. एक अपत्य असल्यास या विधवा लाभार्थ्यांना सध्या 1100 तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थींना 1200 इतके मासिक अर्थसहाय्यद देण्यात येते.आता या अनुदानात अनुक्रमे आता 400 रुपये व 300 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे सादर योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्त्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.sanjay gandhi niradhar yojna आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांत मिळून 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजर 400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यताता देण्यात आलेली आहे.
Ration Card anudan :- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करत असताना पुन्हा एक मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा मला बंद करून त्यांना थेट बँक खात्यात मिळणार अनुदान.शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना shendari ration card च्या माध्यमातून माल मिळणे बंद झाले आहे.
मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना आता धन्या ऐवजी थेट पैशाचे अनुदान दिले जाणार असा निर्णय घेण्यात आला होता.त्यासाठी काही अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना सांगितल्या ते अर्ज शेतकऱ्यांनी भरून तहसील कार्यालयात दिले या नंतर देखील अजून पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळाला नाही .हि योजना फक्त कागदावरच राहील असे आता शेतकऱ्यांनाच मत येत आहे.
शेतकऱ्यांना किती धान्य मिळते? दर काय?
अगोदर वेगवेगळ्या रेशन कार्डाचा लाभ शेतकऱ्याना धान्याच्या स्वरूपात होता .शेतकऱ्याना तसेच इतर नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून थेट धान्य दिले जात होते.त्यानंतर शेतकऱ्याना प्राधान्य गटामध्ये समाविष्ट करून त्यांना २५ किलो असे धान्य देण्यात येऊ लागले.
हे धान्य त्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ या दराने मिळू लागला.अंतोदय रेषेत धारकांना याच दराने ३५ किलो माल दिला जातो.इतरांना देखील अशाच प्रकारे दर लागू होते. मात्र अंतोदय व APL ,BPL व प्राधान्य गट यांना वेगवेगळे किलोचे प्रमाण मिळतात.
मागील काही दिवसा पासून मात्र शेतकऱ्यांना मिळणारे धान्य बंद करून प्रति व्यक्ती १५० रुपयांची घोषणा करण्यात आली व लवकरच तुमच्या खात्यात हे अनुदान येणारच सांगितलं.१ जानेवारी २०२३ ला या अनुदानाचा मुहूर्त देखील ठरला होता मात्र कोणत्याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तर मिळालं नाही सोबतच त्यांना मिळणार धान्य देखील बंद झाल्याने आता शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.
हि शेतकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.सरकार नुसती योजनेची घोषणा करतो मात्र प्रत्यक्ष मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही.यामुळे आता शेतकऱ्यांना किराणा दुकानातून धान्य खरेदी करावे लागत आहे.संबंधित विभागाशी विचारणा केली असता योजना सुरु करण्यासाठी गतीने काम सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र हि गती कासवाची आहे असे शेतकरी वर्ग म्हणत आहे.बऱ्याचं शेतकऱ्याची माहिती जमा करणे बाकी आहे.काही जिल्ह्याची माहिती पूर्ण जमा झाली मात्र अजून देखील त्यांना अनुदान मिळालं नाही.
धान्य मिळत नसल्यास लगेच हे काम करा.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत कि ते शेतकरी गटात नाहीत मात्र त्यांना देखील दुकानदाराच्या माध्यमातून धान्य दिले जात नाही.पुरवठा निकक्षक यांना विचारणा केली असता ज्या शेतकऱ्यांचे ration card aadhar link नसल्या कारणाने त्यांचे फिंगर प्रिंट येत नाही व त्यांचे धान्याचे ट्रॅनजेकशन होत नाही .जर असे काही शेतकरी असतील तर लवकरात लवकर आपले adhar card रेशन सोबत लिंक करून घ्यावे त्यांचा माल सुरु होईल.
या शेतकऱ्याच्या खात्यात येणार 22,000 हजार रुपये -पहा तारीख ठरली
Ativrushti Anudan:-शेतकरी मित्रानो,आता पर्यंत शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती ती वेळ आलेली आहे.कारण आता तुमच्या खात्यात तुमची अतिवृष्टी अनुदाना ची रक्कम मिळणार आहे.हि महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.मागील मंत्रिमंडळाच्य बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्याना पीकविमा (crop insurance ) मिळत असतो मात्र सरकारच्या माध्यमातून मागे झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात येणार आहे …हि अपडेट अतिशय महत्वाची तुमच्यासाठी आहे.तुम्हाला माहीतच असेल सततचा पाऊस,अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याच्या शेत पिकांचं मोट्या प्रमाणावर नुकसान झालं होत.
त्यामुळे राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.त्याप्रमाणे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानी करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने शेतकऱ्याना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.हि मदत कोणत्या शेतकऱ्याना मिळणार?किती मदत मिळणार?हि मदत कधी मिळणार या बाबतची सविस्तर माहित आज आपण पाहूया .
शेतकऱ्यांना किती मदत मिळणार ? किती रक्कम मंजूर झाली पहा सविस्तर
आता शेतकऱ्यांना घोषणा केल्या प्रमाणे १५०० कोटी एव्हढी रक्कम वितरणास सुरुवात झाली आहे. आनंदाची बातमी अशी कि आता शेतकऱ्याना केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार आता वेगवेगळ्या जमिनी निहाय म्हणजेच जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये मिळणार आहे.
तर ज्या शेतकऱ्याकडे बागायत क्षेत्र आहे त्यांच्यासाठी पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत दिली जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे फळपिके आहेत त्यांना मात्र जास्त नुकसान भरपाई दिली जाणार आहे.या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर एव्हढी मदत देण्यात येणार आहे.
आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कि आमच्याकडे १० एकर क्षेत्र आहे तर आम्हाला किती मदत मिळेल.तेव्हा तुम्ही लक्षात घ्यावे कि हि मदत किंवा फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.शेतकऱ्याचे शासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आता 5 जून रोजी शासनाने 22 कोटी 80 लाख 4 हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
पहिले दर काय ? काय आहेत आताचे सुधारित दर.
बऱ्याच वेळी अतिवृष्टी व इतर कारणाने मोठा प्रमाणावर नुकसान होत असते.मात्र मिळणारी मदत हि फारच कमी असते.त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याना अपेक्षित मदत मिळत नाही .
आता मात्र मिळणाऱ्या अनुदानात मोठा बदल करण्यात आला असून .पहिल्या दरामध्ये वाढ करत दारसुधारणा करण्यात आली आहे. पहिले दार किती होते व आताचे दारात काय सुधारणा झाली हे खालील तक्त्याच्या माध्यमातून समजून येईल.
आता pm kisan samman nidhi yojna आलेली असून शेतकऱ्यासाठी आताची हि मोठी बातमी आहे.तुम्हाला तर माहीतच आहे कि केंद्र सरकारच्या माध्यमातून pm kisan yojna राबविली जात होती. या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्याना वर्षाकाठी ६००० हजार रुपये मिळत होते आता मात्र या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.नेमका काय बदल झाला आता कोणते शेतकरी पात्र राहणार? कोणते शेतकरी अपात्र होणार?
cm kisan yojna 2023 म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या बाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आला असून आता खर्च शेतकऱ्याना ६ हजार ऐवजी १२००० मिळणार का या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय ( GR ) आलेला आहे .हीच संपूर्ण माहिती आजच्या लेखात तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा ..
शेतकरी मित्रानो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यात मान्यता देण्यात अली असून या संदर्भातील अतिशय महत्वाचा शासन निर्णय १५ जून २०२३ रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.या मध्ये बरेच निर्णय घेण्यात आलेले असून आता आपण सविस्तर पाहूया.
पीएम किसान योजनेचं स्वरूप व अडचणी | PM KISAN YOJNA
केंद शासनाने शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM kisan yojan) सुरू केली होती.हे तर तुम्हाला माहीतच आहे,आणि त्यानुसार फक्त शेतकरी कुटुंबास म्हणजे पती-पत्नी व 18 वर्षा खालील त्यांचा मुलं यांचा त्यात समावेश होता.
pm kisan yojna update :- या शेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष ६ हजार रुपये लाभ दिला जात होता.यामध्ये दर चार मकहन्यांनी रु. 2000/- अशी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होती होती. आणि आतापर्यन्त हि योजना सुरळीत चालू देखील आहे. मात्र मधेच काही शेतकर्याचे हे पैसे मिळणे बंद झाले त्यामुळे बरेच शेतकरी गोंधळले होते.मग सरकारच्या माध्यमातूम बोगस शेतकऱ्याना हटविण्यासाठी पाम किसान खात्याची ekyc केली गेली आणि जे शेतकरी नव्हते ते अपात्र ठरविण्यात आले.
आता पात्र शेतकऱ्यासाठी हि योजना सुरळीत चालू आहे .हि योजना चांगल्या प्रकारे चालविली जात असल्याने pm kisan samman nidhi yojna ची नोंद देश पातळीवर घेण्यात आली. मात्र 2021 पासून सदर योजनेच्या कामकाजात अडथळे येऊ लागले नंतर पी.एम.किसान योजना कृषी विभागाकडे द्या अशी मागणी होऊ लागली.मात्र असं न होता विविध विभागांनी या योजनेचं काम सांभाळायला सुरुवात केली
.आणि यातूनच हि योजनेच्याअडचणी आणखीच वाढल्या .सादर पी.एम.किसान योजना राबविण्यात येणा-या अडचणी विचारात घेवून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी 30 मे २०२३ रोजीच्या मंत्रीमंडलाच्या बैठिीत मान्यता देण्यात आली .
पीएम किसान योजने बाबत मह्त्वाचा शासन निर्णय |pm kisan samman nidhi yojna
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 15 फे ब्रुवारी 2019 च्या शासन निर्णया नुसार राज्यात येण्यासाठी तसेच सदर योजना राबविताना बऱ्याचशा येणा-या अडचणी विचारात घेऊन या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा हा मुख्य हेतू आहे.
कुणीही पात्र लाभार्थी या योजने अंतर्गत वंचित राहू नाही या करिता प्रत्येक विभाग निहाय कामे वाटून देण्यात आलेली आहेत.आता प्रत्येक विभागासाठी कार्यपद्धती सोपविण्यात आलेली आहे.आणि ह्या जबाबदाऱ्या त्या त्या विभागाला चोख पार पाडाव्या लागणार आहेत.अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही होईल असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत.
कोणत्या विभागाला काय कार्य पार पडावे लागणार | विभाग निहाय जबाबदाऱ्या व कर्तव्य
शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या
प्रत्येक विभागाला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत मात्र शेतकऱ्याना देखील काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत. १) pm किसान योजनेसाठी अर्ज करणे २)pm kisan ekyc करणे. ३) बँक खाते आधार सोबत जोडणी करणे. ४) आधार कार्ड नियमित अपडेट करणे. ५) शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे .
कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या काय?
कृषी विभागाला खूप जास्त जबाबदाऱ्या दिल्या असून शेतकऱ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आलेलं आहे.कृषी विभागाचे काही काम व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.
१) स्वता अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मान्यता देणे. २) तालुका स्तरावर पोर्टलवर लाभार्थ्याची नोंदणी करणे . ३) अपात्र लाभार्थ्याला पडताळणी करून बॅड करणे. ४) वेळोवेळी डेटा दुरुस्त झाल्यास नोंद ठेवणे ५) शेतकऱ्यांची भौतिक तपासणी करणे. ६) चुकीने अपात्र झालेल्या शेतकऱ्याना पात्र करणे. ७) लाभार्थी मयत झाल्यास त्याची नोंद करून बाहेर काढणे. ८) शेतकऱयांच्या तक्रारी सोडविणे व त्यांना मदत करणे . ९) योजना अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रचार व प्रसार करणे.
महसूल विभागाच्या जबाबदाऱ्याव कार्य
कृषी विभागा प्रमाणे महसूल विभागाल देखील बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या आहेत.शेतकऱ्याना वेळोवेळी आलेल्या काही अडचणी महसूल विभागाला सोडवाव्या लागणार आहेत.या विभागाचे काही काम व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत. १) भूमी अभिलेख नोंदणी योग्य आहे पाहणे. २) लँड शेडींग अपडेट करून पात्र शेतकऱ्याना प्रमाणित करणे. ३) ७/१२ व ८ बाबत काही अडचण आल्यास त्या सोडविणे. ४) अपात्र लाभार्थ्याने योजनेच्या माध्यमातून मिळविलेल्या रकमा परत घेणे. ५) अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेल्या माहिती पोर्टल ला देणे.
pm किसान योजनेत काय बदल झालेत नवीन कार्य पद्धती काय
खरं तर ११ कोटीहून अधिक शेतकऱ्याचे या योजनेसाठी अर्ज केले होते सुरुवातीला शेतकर्याना सुरळीत हप्ते देखील मिळत होते मात्र जस जसे एक एक वर्ष निघून जात होते तास तसे या योजनेच्या अडचणी वाढत जाऊन मोठ्या प्रमाणावर शेतकरी नाराज होऊ लागले कारण त्यांना मिळणारा हप्ता बंद झाला होता.त्यानंतर सरकारच्या माध्यमातून ekyc करायला लावली ,बँक खात्याला आधार जोडायला सांगिले,लँड शेडींग करायला सांगितले.
एव्हढाच काय तर आधार कार्ड अपडेट करायला सांगितले.ह्या साऱ्या गोष्टी करून देखील लाखो शेतकऱ्याचे हप्ते पेंडिंग राहिले.अजूनही ते शेतकरी या कार्यालयातून त्या कार्यालयात पायपीट करत आहेत.या सर्व अडचणीच्या अनुशंगाने आता मात्र नवीन कार्यपद्धती लागू करण्यात अली आहे. या कार्यपद्धतीचे खालील काही म्हणत्वाचे मुद्दे आहेत.
१) अर्जदाराने केंद्र सरकारच्या पोर्टलवर स्वता नोंदणी करावी किंवा तालुका कृषी अधिकार्याच्या मदतीने सल्ल्याने कंसच मार्फत आवश्यक कागद \पत्रासह नोंदणी करावी.
२) अर्जदाराणे नोंदणी केल्यानंतर तो अर्जदार खर्च शेतकरी आहे का यांची पूर्ण पडताळणी करण्यासाठी तहसीलदाराला पोर्टल उपलब्ध करून देणे
३) तहसीलदाराने संबंधित अर्जदार शेतकऱ्याचे कागदपत्र पडताळणी करून शेतकऱ्याना पात्र असेच अपात्र ठरवतील.
४) तहसीलदाराने पात्र ठरविल्या नंतर आता महसूल विभाग पुन्हा त्याचे फेर पडताळणी करून पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाला माहिती सादर करतील.
५) तालुका व जिल्हा कृषी अधिकारी यानंतर लाभार्थी इतर नियमात बसतात का हे पडताळणी करतील.
६) तहसील दाराची सर्व प्रक्रिया झाल्या नंतर तालिका व जिल्हा कृषी अधिकारी हा शेतकरी पात्र आहे कि अपात्र आहे हे ठरवतील.अपात्र ठरविल्यास पोर्टल वर त्याचे कारण स्पस्ट करतील.
७)आता तालुका व जिल्हा स्तरावरून संपूर्ण प्रक्रिया पार पडल्या नंतर राज्यस्थरावरून त्याची शेवटची मान्यता देण्यात येईल.
राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची जबाबदारी
pm किसान योजनेसाठी शेतकऱ्यानी अर्ज केल्यापासून तर तालुका स्तरावरील संपूर्ण प्रक्रिया पार पडल्या नंतर आता काम सुरु होते ते राज्यस्तरीय समितीच.या समितीला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत ज्या खालील प्रमाणे आहेत.
१) पाम किसान योजनेशी संबंधित सर्व विभागावर देखरेख ठेवणे व त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या दूर करणे.
२) योजना सुरळीत चालू आहे कि नाही यावर लक्ष्य ठेवणे.
३) राज्य व केंद्र सरकार यांच्यात समन्वय प्रथापित करणे व वेळोवेळी योजनेचा पाठपुरावा करणे.
४) योजनेत काही अडचणी आल्यास त्या दूर करणे व त्याच्या बदला बाबत निर्णय घेणे.
५) प्रत्येक सहा महिन्यात हि योजना सुरळीत चालू आहे? का त्यात काही अडचणी आहेत का?या साठी आढावा बैठक घेणे.
राज्यस्तरावरील अंमलबजावणी प्रमुख
राज्यस्तरीय समितीची रचना करत असताना त्यात मुख्य अंमलबजावणी प्रमुखांची निवड करण्यात अली आहे.या समितीतील सर्व सदस्यांना विस्वासात घेऊन या अंमलबजावणी प्रमुखाला कार्य करावे लागते.या प्रमुखाला देखील जबाबदाऱ्या व कार्य देण्यात आले आहेत.
१) पाम किसान योजनेशी संबंधित अर्जाची पडताळणी करून त्यांना पात्र व अपात्र करणे.
२) योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी आलेल्या शंका व तक्रारींचे निवारण करणे.
3) प्रत्येक तीन महिन्यात हि योजना सुरळीत चालू आहे? का त्यात काही अडचणी आहेत का?या साठी आढावा बैठक घेणे व त्याची आमल बजावणी करणे.
ग्रामस्तरीय समितीचे कार्य व जबाबदारी :-
या समितीच खूप महत्वाचं काम असून इतर समित्या प्रमाणे हि समिती आपले कार्य पार पडत असते.या समितीच्या नावावरूनच लक्षात येते कि हि गाव पातळीवर काम करणारी समिती आहे.या समितीमध्ये गाव स्तरावरील विविध विभागाचे कर्मचारी आहेत.या समितीत पुढील प्रमाणे सदस्य असतात
१) कृषी सहायक. २) तलाठी ३) ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी ४) सचिव वि.का.से.स .सो.
या समितीच्या खालील प्रमाणे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
१) योजनेची प्रसिद्धी व प्रसार करणे. २) गाव पातळीवर शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी सोडवणे. ३) केंद्र व राज्य सरकारने बाबी लाभार्थाकडून पूर्ण करून घेणे
आताच्या घडीची हि सर्वात मोठी घोषणा आहे. namo shetkari yojna 2023 लागू होणार आहे असे आपण सांगितले होते.हि योजना लागू झाल्यास शेतकऱ्याना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार ,अशी जोरदार चर्चा चालली होती.आता मात्र या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या मानधनांसोबत आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच cm kisan yojna ला मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत आता वार्षिक 6 हजार रुपये असे एकूण 12000 रुपये मानधन मिळणार आहेत.कारण या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 15 जून 2023 रोजी काढण्यात आलेला आहे
चला तर शेतकरी मित्रानो,या शासन निर्णयाच्या माध्यमातून हि शेतकरी योजना कशाप्रकारे राबवली जाणार ?योजने अंतर्गत कोणते लाभार्थी पात्र होणार ?अर्ज कसा व कुठे करायचा ? पहिल्या हप्त्याचे वितरण कधी केले जाणार? या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याघेणार आहोत.
मित्रांनो ३० मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळीय बैठकीत 2023 च्या बजेटमध्ये केलेली एक महत्त्वाचे अशी घोषणा केली होती.ती म्हणजे शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना शेतकऱ्यासाठी लागू केली जाणार. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र त्या बाबतचा ठोस शासन निर्णय अजून पर्यंत आला नव्हता.आता मात्र हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
२०१९ मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी pm kisan yojna हि लागू करण्यात अली होती .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना वार्षिक ६ हजार मिळत होते.हे ६ हजार एकूण चार चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येत होते.आणि मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी मुले शेतकरी हतबल झाला असल्याने त्यांना हक्काचं वाढीव उत्पन्न उपलब्ध करून देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात अली आहे.
या देखील योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये देणार येणार असून तीन तीन महिन्याच्या अंतराने २ +२+२ असे ६ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत.एकूणच काय तर कमी किसान योजना लागू झाल्यावर शेतकर्याना थेट 12 हजार मिळणार आहेत.या योजनेची अंमलबजावणी आता आज रोजी प्रसारित झालेल्या शासन निर्णया नुसार केली जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी पात्रता काय?
namo shetkari yojna 2023:-या योजनेचा लाभ जर शेतकरी मित्राना मिळवायचा असेल तर काही निकस हे राज्य सरकारच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले आहेत या निकषांची पूर्ती करणारा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना या योजनेसाठी प्रमाण म्हणून वापरण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2020 मध्ये निर्गमित करण्यात आलेलया आहेत.या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून राज्यांमध्ये ही cm किसान योजना राबवली जाणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी/निकष व पात्रता खालील प्रमाणे आहेत.
१) पाम किसान योजनेत पात्र असणारा प्रत्येक पात्र लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहील . २) पाम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेला मात्र पाम किसान योजनेसाठी पात्र असणारा लाभार्थी देखील पात्र राहील.
नमो शेतकरी योजना कशी राबविली जाणार त्याची कार्यपद्धती कशी राहणार ?
शेतकरी मित्रानो,पाम किसान योजने प्रमाणेच या योजनेची कार्यप्रणाली असणार आहे.ज्या पद्धतीने चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळते त्याच पद्धतीने या देखील योजनेची प्रक्रिया राहणार आहे.वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.cm किसान योजनेचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.
नमो शेतकरी योजना अर्ज कुठे करावा ?
namo shetkari yojna 2023 : -या योजनेसाठी स्वतंत्र असा अर्ज करण्याची गरज नाही ,कारण ज्या शेतकऱ्याना pm किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्वांना या योजनेत पात्र केलं जाणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी रखुम ठेवलेल्या निधीतून लाभ देण्यात येणार आहे.सध्या या योजनेच्या कार्यप्रणालीसाठी कोणतेही पोर्टल उपलब्ध नाही.
मात्र लवकरच त्यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे अशी सूचना देण्यात अली आहे.pm किसान योजना व cm किसान योजना यांचे पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात यावे व एकाच वेळी त्यांना हे अनुदान मिळण्यास मदत होईल तसेच दोन्ही लाभार्थ्याच्या संख्येत होणारा बदल लक्षात येईल व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धत कशी असणार?
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतगधत कें द्र शासनाच्या PM-KISAN योजनेनुसार खालील खालील वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट रकम पाठविण्यात येणार.खालील प्रमाणे खात्यात येणार पैसे.
अ.क
हप्ता
कालािधी (महिना )
रक्कम
1
पहिला हप्ता
एप्रिल ते जुलै
2000 रुपये
2
दुसरा हप्ता
ऑगस्ट ते नोव्हेंबर
2000 रुपये
3
तिसरा हप्ता
डिसेंबर ते मार्च
2000 रुपये
नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र होणार
जर तुम्ही pm किसान योजनेत अपात्र असाल तर या योजनेसाठी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता. या काही गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होऊ शकतात.
१) जर शेतकऱ्यानी pm किसान सन्मान निधी योजनेची ekyc केली नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता. २) तुम्ही तुमच्या बँक खात्याची kyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. ३) तुमचे धार कार्ड अपडेट न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. ४) तुमचे बँक खाते बंद पडल्यास तुमच्या खात्यात हि रक्कम येणार नाही या कारणाने देखील तुम्ही अपात्र होऊ शकता. ५) तुम्ही लँड शेडींग न केल्यास अपात्र होऊ शकता.
PM KISAN EKYC कशी करायची?
चला तर आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान खात्याची ekyc कशी करायची.ekyc करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्राला भेट देऊ शकता.हे केंद्रचालक काही फी घेऊन तुमची ekyc करून देतील.हि प्रक्रिया करायला फक्त ५ मिनिटे लागतात.ekyc करायला जात असताना आपले आधार कार्ड व pm किसान पोर्टल सोबत जोडून असलेला मोबाईल सोबत घेऊन जावे,कारण या मोबाईल वर opt येतो.
बँकेची kyc कशी करावी / बँकेत आधार प्रमाणीकरण कसे करावे?
आता कोणत्याही योजनेची निधी /पैसा तुमच्या खात्यावर येण्यासाठी बँकेची kyc करणे खूपच गरजेचं झालं आहे.कारण आता कोणतेही पेमेंट आधार बेस झाले आहे.तुम्ही बँकेचे आधार प्रमाणीकरण केले नाही तर मात्र तुमच्या खात्यावर येत नाही हे लक्षात घ्यावे.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि बँकेत तुम्हाला kyc अर्ज मिळतो तो अर्ज पूर्ण अचूक भरून बँकेत द्यायचा आहे.त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे.आधार प्रमाणीकरण होण्यासाठी ४ ते ५ दिवसाचा कालावधी लागतो .
पी एम किसान खात्याची लँड शेडींग कशी करायची
लँड शेडींग हि अतिशय महत्वाची आहे यावरून ठरते कि तुम्ही शेतकरी आहेत कि नाही.हि प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे कारण बरेच बोगस शेतकरी/लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. लँड शेडींग करण्यासाठी तुमचा ७/१२ व ८ अ हे घेऊन तुमाला तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे .तिथे गेल्या नंतर समोरील सर्व प्रक्रिया ते कर्मचारी करून देतात .
तुमचे बँक खाते कसे सुरु करावे ?
खरं पाहाता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे बँक खाते सुरु असणे आहे.कारण जर तुमचे खातेच चालू नसतील तर मात्र तुमच्या खात्यावर पाठविले जाणारे कोणतेच पैसे येणार नाहीत व तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही.तेव्हा बँक खाते कसे सुरु करावे व त्यासाठी कोणाला भेटावे हे आता पाहूया.या साठी तुम्हाला थेट बँकेत जायचं आहे.तिथे गेल्यावर तेथील मॅनेजरला तुम्हाला भेटून तुमचे खाते बंद झाल्याचं सांगायचं आहे.
पुढे तुमचे बँक खाते का बंद पडले हे ते तुम्हाला सांगतील आणि बँक खाते सुरु करण्यासाठी तुमची मदत करतील.तुम्ही बऱ्याच दिवसा पासून बँकेत व्यवहार न केल्याने तुमचे बँक खाते बंद पडू शकते .अशा वेळी तुम्हाला तुमच्या खात्यात १०० रुपये भरणा करायचा आहे.तुमचे खाते आता activate म्हणजे चालू होईल.तुम्ही kyc केली नसेल तरी तुमचे खाते बंद पडू शकते अशावेळी तुम्ही kyc करून घ्या खाते आपोआप सुरु होईल .