soyabin pivli padali

soyabin pivli padali – सोयाबीनची पाने पिवळी होण्याची कारणे व त्यावरील उपाय

soyabin pivli padali – काय आहेत कारण काय उपाय करावा.

soyabin pivli padali : शेतकरी मित्रांनो,सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी चिंतेत पडले आहेत ते म्हणजे कि,त्यांची सोयाबीन पिवळी पडली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणवे शेतकरी घाबरले आहेत. तुमचं सुद्धा सोयाबीन जर पिवळा पडत असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. सोयाबीन हे पिवळा पडत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत की सोयाबीनवर कोणता रोग आला? किं कोणती बुरशी आली? किंवा इतर कोणते कारण आहे? चला तर जाणून घेऊया की सोयाबीन पिवळा पडण्याचे नेमके कोणकोणते कारण असू शकतात?

मात्र त्या अगोदर जर तुम्हाला अशी माहिती व योजना थेट मोबाइलला वर मिळवायच्या असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे .

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

एलो मोझॅक : एलो मोझॅक हा सोयाबीन पिकावर येणार महत्वाचा रोग असून या रोगाचा पिकावर प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला काही झाडे पिवळे होतात व काहीच दिवसात संपूर्ण सोयाबीन पिवळे पडते,सर्व पाने गाळून पडतात आणि पिकाचे १००% नुकसान होते.

सततचा पाऊस किंवा जमिनित पाणी सतावून राहणे : शेतकरी मित्रानो सोयाबीन पिवळे पडण्यामागे अनंत करणे आहेत मात्र सर्वात महत्त्वाच आणि सर्वात पहिलं सोयाबीन पिवळा पडण्याचा कारण म्हणजे अतिशय जोरदार पाऊस किंवा मग जास्तीत जास्त वेळासाठी असलेला पाऊस. म्हणजे जर पाऊस जास्त झाला तर आपल्या जमिनीत तर ते जास्त वेळेसाठी साठवून राहते आणि त्यामुळे वापसा होत नाही आणि त्यामुळे सोयाबीन हे पिवळा पडू शकत.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच खात्यात येणार.

चुनखडीयुक्त जमीन : दुसरं कारण म्हणजे शेतजमीन जर चुनखडीयुक्त असेल तर सोयाबीन पिवळे पडू शकते. अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुनखडीचे प्रमाण असते आणि या कारणाने तुमचे सोयाबीन किंवा कापूस पीक पिवळे पढू शकते. हे सुद्धा एक महत्त्वाचा कारण सोयाबीन पिवळे पडण्यासाठी पाहायला मिळू शकते.

सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता : आपल्या पिकाला मुख्य अन्नद्रव्याची तसेच सुक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते.त्याला योजि वेळी ते मिळाले तर उत्पादन वाढते तसेच त्याच्या कमतरतेमुळे उत्पादन घटू शकते.मात्र जर सोयाबीन पिकाला झिंक व फेरस या सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज असताना त्याची कमतरता झाली तर सोयाबीन पिवळे पडते.

तणनाशकामुळे विपरीत प्रमाण : बऱ्याच वेळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत होते अशावेळी तान नियंत्रणासाठी शेतकरी तान नाशकांचा वापर करतात व त्याचा परिणाम मग पिकावर दिसू लागतो, पिकाची वाढ थांबते आणि सोयाबीन तसेच कापूस पीक हे आपल्याला पिवळे होताना दिसते.मात्र ७ ते ८ दिवसात त्यामध्ये आपोआप हिरवेपणा येतो.

सोयाबीन पिवळे पडल्यास हे करा उपाय | soyabin pivli padali

एलो मोझॅकवर उपाय : एलो मोझॅक हा सोयाबीन पिकावर येणार महत्वाचा रोग असून या रोगाचा पिकावर प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला काही झाडे पिवळे होतात व काहीच दिवसात संपूर्ण सोयाबीन पिवळे पडते.सुरुवातीला सोयाबीन पिकामध्ये असे झाड दिसू लागल्यास लगेच उपटून त्याचा जमिनीमध्ये गाडावे.हा रोग राशशोषक किडीमुळे अत्यंत झपाट्याने वाढ होते त्यामुळे या रोगावर नियंत्रण करायचे असल्यास राशशोषक किडीवर नियंत्रण करण्यासाठी फवारणी घ्यावी.

फेरस व झिंक वापर : मित्रानो सोयाबीन पीक पिवळे दिसत असतील तर तुम्ही झिंक सल्फेट ची फवारणी घेऊ शकता त्यासोबत फेरस हे दिखील घेऊन पिवळे झालेले सोयाबीन हिरवे होण्यास मदत होईल.
फवारणी करताना तुम्ही हे सुक्षन्नद्रव्य कोणत्याही कीटकनाशक किंवा टॉनिक सोबत मिक्स करून फवारू शकता.

सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी :मुख्य अन्नद्रव्य सोबत पिकाला जवळ जवळ सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते.आपण असे एक एक वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीत घेतल्यापेक्षा एकाच वेळी सर्व घाट घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो.अशावेळी मार्केट मध्ये उपलब्ध असलेले सर्व समावेशक सूक्ष्म अन्नद्रव्य आपण फवारणीत घेऊ शकतो यामध्ये सर्वच घटक एकत्र मिळतात.

अमिनो ऍसिडयुक्त टॉनिकचा वापर : तुम्हाला कदाचित माहिती नसेल मात्र पिकाला अमिनो ऍसिड घटकाची फवारणी केल्यास पीक हिरवे होते .अमिनो ऍसिडचा वापर करून तुम्ही सोयाबीन हिरवे करू शकता.मार्केटमध्ये खूप टॉनिक मिळतात त्यापैकी कोणत्याही टॉनिकचा तुम्ही वापर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *