प्रस्तावना : सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याचे मुख्य कारणांपैकी एक म्हणजे चक्री भुंगा, त्याला Soybean Girdle Beetle असे देखील म्हणतात. चक्री भुंगा हा कारणीभूत ठरतो.सोयाबीन पिकावरील कीड/कीटक नियंत्रण हा महत्वाचा मुद्दा आहे.सोयाबीन पिकावर अनेक किडीचा प्रादुर्भाव होतो आज आपण चक्री भुंग्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेबणार आहोत.
हा पिकाचे कसे नुकसान करते ? त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे कोणती ? त्यावर कसा उपाय करावा ? हे मुद्दे सामाविस्ट असणार आहेत मात्र त्या अगोदर अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती व योजना त्यात मोबाइलला बार मिळविण्यासाठी तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता .खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
चक्री भुंगा किडीची ओळख | चक्री भुंगा किडीची ओळख
शेतकरी मित्रानो,सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये ही कीड मुख्य किडीं म्हणून ओळखली जाते.राज्यातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.हि कीड अतिशय हानिकारक आहे. त्याची प्रौढ कीड नारंगी रंगाची पाहायला मिळते, तिच्या पंखांचा खालचा भाग काळा असतो.त्याच्या डोक्यावर दोन उभट शिंग असतात त्याला काही शेतकरी अँटेना असे म्हणतात.हि अँटेना शरीराच्या लांबी एवढ्याच व मागे वळलेल्या दिसतात .
या किडीची अळी पाय विरहित व पिवळ्या रंगाची असते.पूर्ण विकसित अळी साधारणतः २ सें. मी. लांबीची असते. मुंगे गर्द भुरकट काळ्या पंखामुळे सहज ओळखता येतात.खालील फोटोत दिसणारा कीटक तुम्ही पहिला असेल तर हाच तो चक्री भुंगा आहे.
चक्री भुंगा किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे
चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव ओळखणे अतिशय सोपे आहे.सोयाबीन मध्ये सहज फेरफटका मारताना तुम्ही हे सहज ओळखू शकता. मादी पानाचे कोवळे देठ,वरील फांदी किंवा मुख्य खोडावर गोलाकार आकाराचे दोन चक्र बनविते.त्यामुळे फांदीच्या आता जायला जागा तयार होते.
पुढे अळी अंड्यातून बाहेर निघून या काप घेतलेल्या जागेतून आतील खोडात शिरते व खोडाचा आतील भाग खाऊन रोपाला पोकळ बनविते.त्यामुळे पिकाला बनविलेले अन्न झाडामध्ये सर्वत्र पसरायला अडचणी येतात.जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला योग्य पुरवठा होत नाही.याचाच परिणाम झाडाला फुले व शेंगा लागण्यावर दिसतो म्हणजेच काय तर उत्पादनात मोठी घट होते.
पूर्ण विकसित अळी रोपाला आतूनच कापून टाकते, त्यामुळे पीक मोडून जमिनीवर पडते. चक्री भुंग्याची अळी ही पुन्हा जमिनीवर शिल्लक असलेल्या उभ्या झाडाचा शरीराच्या लांबी एवढा तुकडा कापून त्याच्या आतमध्ये बऱ्याच दिवस पडून राहते.व मग पुन्हा दुसऱ्या पिढीसाठी कोष अवस्था धारण करून पतंग होते व अंडे घालून पुन्हा पिकावर प्रादुर्भाव होते.
सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी ?
इथे क्लिक करून पहा.
संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जून- जुलै महिन्यात दिल्या गेलेल्या अंड्यामधून तयार झालेली अळी त्याच खरीप हंगामामध्ये कोषामध्ये रूपांतरित होते. थोड्या दिवसांनंतर प्रौढ कीड कोषातून बाहेर निघून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते. जुलैमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
आर्थिक नुकसान पातळी.
चक्री भुंगा किडीचे व्यवस्थापनाचे उपाय.
१. जास्त दाट पेरणी करू नये व पेरणी करताना खतांबरोबर फोरेट १० जी १० कि. ग्रॅ. प्रति हे. जमिनीत फेकीव पद्धतीने जमिनीत टाकावे तसेच नत्र खतांचा संतुलित वापर करावा.
२. उभ्या पिकात प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून शेताबाहेर खड्ड्यात पुरावेत.
३. पिकावर प्रादुर्भाव दिसताच रासायनिक कीटकनाशक ट्रायझोफॉस ४० इ.सी. ६२५ मि.ली. प्रति हेक्टर किंवा थायक्लोप्रिड २१.७ एस.सी. ७५० मि.ली. प्रति हे. ५०० ते ७०० ली. पाण्यात मिसळून फवारावे.