सोयाबीन सुधारित वाण | soybean biyane | soybean new variety

soybean new variety 2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण

soybean new variety,

soybean new variety मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्ये आता खरीप हंगाम 2023 ला सुरुवात होणार आहे. तुम्ही मोबाईल वर, टीव्ही वर किंवा वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या हवामान विभागाचे अंदाज देखील पाहिले असतील. मान्सून 10 ते 15 जून पर्यंत संपूर्ण भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रकारचा म्हणजे सरासरी 90% मानसून यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला भेटणार आहे.

त्यामुळे ही आनंदाची वार्ता आहे. आता आपल्याला लगबगिने खरीप हंगाम 2023 च्या पूर्व तयारीला लागणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून आपल्याला हे देखील पाहणं गरजेचं आहे की,यंदाच्या खरीप हंगामामध्ये आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. यासाठी माते परीक्षण करा. माती परीक्षण च्या रिपोर्टवरच्या आधारे ठरवा की आपल्या जमिनीमध्ये कोणते पीक येऊ शकतात.

soybean new variety

या ५ पैकी पेरणीनंतर लगेच कोणताही एक तणनाशक वापरा-सोयाबीन पीकात एकही तन निघणार नाही

या खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन हे पीक लावणार असाल तर एक प्रश तुमच्या मनात आला असेल की सोयाबीन पिकाच नेमकं कोणतं वाण यंदाच्या हंगामात आपण पेरलं पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर या लेखात आम्ही देणार आहोत. मार्केटमध्ये हे टॉप 5 सोयाबीन पिकाची वाण आहेत. त्यांच्या विशेषता आपण पाहणार आहोत. त्याचे उत्पादन आपण पाहणार आहोत आणि त्यांचे शिफारस देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर सोयाबीन लावणार असाल तर खास करून तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

KDS ९९२ फुले दुर्वा सर्वात जास्त उत्पादन देणार वाण | soybean Top variety 2023

soybean best variety 2023 :- सध्या शेतकऱ्याची पसंती असलेलं व सर्वात जास्त उत्पन्न देणार वाण म्हणून हे वाण प्रचलित आहे.या वाणाला फुले दुर्वा तसेच काही शेतकरी KDS-९९२ असे या वाणाला म्हणतात.तांबेरा रोगास तसेच जिवाणूजन्य ठिपके इत्यादी रोगांना हा वाण प्रतिकारक आहे. याचा परिपक्वता कालावधी जर आपण पाहिला तर जवळजवळ 100 ते 105 दिवसांमध्ये हे वाण काढणीला येते .हार्वेस्टरने तुम्ही याची काढणी सहजपणे करू शकता आणि खास करून या वाणामध्ये तेलाचे प्रमाण पाहिलं तर फुले ध्रुवा मध्ये तुम्हाला १८.२ % तेलाची मात्रा त्या ठिकाणी मिळू शकतात.

soybean new variety
अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1KDS- 992 (फुले दुर्वा) 2021100 ते 105 दिवस1)तांबेरा रोग,जिवाणूजन्य ठिपके रोगासाठी प्रतिकारक्षम
2) मोठ्या आकाराचे  दाणे

soybean new variety

फुले संगम (के डी एस 726)  | FULE SANGAM KDS-726 SOYBEAN VARIETY

soybean variety 2023:-तिसरा नंबर येतो ते म्हणजे फुले संगम या वाणाचा.या वाणाला ( fule sangam ) फुले संगम 726 या नावाने
शेतकरी ओळखतात.हे वाण १०५ ते १२० दिवसात काढायला येऊ शकतो आणि तेलाचा उतारा जर आपण पाहिला तर जवळजवळ 18 पूर्णांक 42 टक्के एवढा आहे त्यामुळे हे देखील तुम्हाला लागवडीसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.या वाणाला ५ पाने आपल्याला पाहायला मिळतात.याचे उत्पन्न २५ ते ३२ क्विंटल हेक्टरी हपऊ शकते.

फुले संगम (के डी एस 726)  FULE SANGAM KDS-726
अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1फुले संगम
(के डी एस 726) 
२०१६100 ते 105 दिवस1)तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण
2)खोडकूज,खोडमाशी किडीस,मूळकूज रोगास प्रतिकारक
3)दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा अधिक
२३ -२५ क्विंटल

ग्रीन गोल्ड 3344 सोयाबीन वाण | GREEN GOLD 3344 SOYABIN SEEDS

soybean top variety :-या वाणाचे नाव आहे ग्रीन गोल्ड 3344. हे सोयाबीन वाण देखील मोठ्या प्रमाणावर सध्या प्रचलित असून .खूप चांगलं उत्पादन शेतकर्याना मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो हे पानाचा पसारा कमी व निमुळते पान असलेले वाण आहे. याच कारणाने सूर्यप्रकाश शेवटपर्यंत पोहचत असल्यामुळे बुडापासून ते शेंडापर्यंत तुम्हाला शेंगा शेंगा या ठिकाणी दिसणार आहेत.तब्बल २० ते 25 टक्के शेंगा तुम्हाला चार दाण्याच्या दिसणार आहेत आणि कापणीत जरी उशीर झाला या वाणासाठी तरी देखील शेंगा न फुटणाऱ्या त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे वाण आहे.

GREEN GOLD 3344 SOYABIN SEEDS
अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1ग्रीन गोल्ड सोयाबीन 3344100 ते 105 दिवस1)कमी व निमुळते पान
2)बुढापासून शेंड्या पर्यंत शेंगाच शेंगा.
3) 30 टक्के शेंगा 4 दाण्यांच्या. 
4)काढणीला उशीर झाला तरी न फुटणाऱ्या शेंगा
25 -30 क्विंटल

फुले किमया (के डी एस 753) | FULE KIMAYA KDS-753

हे वाण देखील फाऊल संगम प्रमाणेच अधिक उत्पादन देणारे आहे मात्र त्या वाणाच्या तुलनेत लवकर येणारे हे वाण आहे.या वाणाला फुले किमया म्हणजेच KDS -753 या नावाने शेतकरी ओळखतात. याचा परिपक्वता कालावधी शेतकरी मित्रांनो 95 ते 100 दिवसाचा आहे. तुम्ही पाहू शकता की अतिशय कमी कालावधीमध्ये निघणार हे पीक आहे. याचा कालावधी 95 ते 110 दिवसांचा आहे मात्र कापणी उशीर जरी झाला तरी त्याच्या शेंगा फुटत नाहीत.हे वाण शेंगा तडकण्यास सहनशील आहे असे म्हणता येईल. या वाणाचा तेलाचा उतारा 17 ते १९ टक्क्यांपर्यंत मिळू शकतो.

soybean new variety
अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1फुले किमया (के डी एस 753) 95 ते 100 दिवस1)तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो. 
2) दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
3)तेलाचा उतारा 18.25 %
क्विंटल

फले अग्रणी KDS-344 | FULE AGRANI KDS-344 soybean variety 2023

soybean new variety 2023 :-फुले अग्रणी ( FULE AGRANI ) या वाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो सोयाबीन फुले अग्रणी-३४४ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारे सन 2015 मध्ये प्रसारित करण्यात आलेली वान आहे. या वाणाची लागवड करत असताना मध्यम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उत्तम असते. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या फुले अग्रणी वानाची पेरणी किंवा लागवड ही जून महिन्याचा दुसरा पंधरवडा ते जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत करता येते या वाणाची पेरणी केल्यास प्रति एकरी २२ ते 25 किलो बियाणे लागते. या वाण्याचा पीक परिपक्वतेचा कालावधी 105 ते 110 दिवस असतो.योग्य नियोजनाने या वनाची लागवड केल्यास 25 ते 30 उत्पादन घेता येते. या वाणाची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म याविषयी बोलायचे झाल्यास दक्षिण महाराष्ट्र,तेलंगणा,आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. तांबेरा रोगास प्रतिकारक आणि तेलाचे प्रमाण 18.6% असणारे हे वान आहे.महाराष्ट्रासाठी तांबेरा प्रभावीत बागासाठी हेवान उत्तम आहे.

अनुक्रमांकवाणाचे नाव प्रसारित वर्ष कालावधी वैशिट्य उत्पन्न (हेक्टरी)
1फले अग्रणी2013-2014१००-१०५ दिवस1)बक्टेररयल पुरळसाठी सहनशील. 2)महाराष्ट्र व मध्यभारतासाठी प्रसाररत.२२-२४ क्विंटल
soybean new variety

मंडळी वाणाच्या संपूर्ण माहितीसाठी हा खालचा विडिओ नक्क्की बघा

👇👇👇👇👇👇👇👇


सोयाबीन चे हे वाण सर्वात फायदेशीर | टॉप सोयाबीन वाण | fule sangam | fule agrani | top soyabin

Leave a Comment