या शेतकऱ्याच्या खात्यात येणार 22,000 हजार रुपये -पहा तारीख ठरली
Ativrushti Anudan:-शेतकरी मित्रानो,आता पर्यंत शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती ती वेळ आलेली आहे.कारण आता तुमच्या खात्यात तुमची अतिवृष्टी अनुदाना ची रक्कम मिळणार आहे.हि महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.मागील मंत्रिमंडळाच्य बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्याना पीकविमा ( crop insurance ) मिळत असतो मात्र सरकारच्या माध्यमातून मागे झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात येणार आहे …हि अपडेट अतिशय महत्वाची तुमच्यासाठी आहे.तुम्हाला माहीतच असेल सततचा पाऊस,अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याच्या शेत पिकांचं मोट्या प्रमाणावर नुकसान झालं होत.
त्यामुळे राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.त्याप्रमाणे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानी करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने शेतकऱ्याना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.हि मदत कोणत्या शेतकऱ्याना मिळणार?किती मदत मिळणार?हि मदत कधी मिळणार या बाबतची सविस्तर माहित आज आपण पाहूया .
शेतकऱ्यांना किती मदत मिळणार ? किती रक्कम मंजूर झाली पहा सविस्तर
आता शेतकऱ्यांना घोषणा केल्या प्रमाणे १५०० कोटी एव्हढी रक्कम वितरणास सुरुवात झाली आहे.
आनंदाची बातमी अशी कि आता शेतकऱ्याना केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार आता वेगवेगळ्या जमिनी निहाय म्हणजेच जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये मिळणार आहे.
तर ज्या शेतकऱ्याकडे बागायत क्षेत्र आहे त्यांच्यासाठी पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत दिली जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे फळपिके आहेत त्यांना मात्र जास्त नुकसान भरपाई दिली जाणार आहे.या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर एव्हढी मदत देण्यात येणार आहे.
PM किसान योजनेत मोठा बदल -लगेच करावे लागणार हे काम, नाहीतर मिळणार नाहीत पैसे.
आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कि आमच्याकडे १० एकर क्षेत्र आहे तर आम्हाला किती मदत मिळेल.तेव्हा तुम्ही लक्षात घ्यावे कि हि मदत किंवा फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.शेतकऱ्याचे शासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आता 5 जून रोजी शासनाने 22 कोटी 80 लाख 4 हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
पहिले दर काय ? काय आहेत आताचे सुधारित दर.
बऱ्याच वेळी अतिवृष्टी व इतर कारणाने मोठा प्रमाणावर नुकसान होत असते.मात्र मिळणारी मदत हि फारच कमी असते.त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याना अपेक्षित मदत मिळत नाही .
आता मात्र मिळणाऱ्या अनुदानात मोठा बदल करण्यात आला असून .पहिल्या दरामध्ये वाढ करत दारसुधारणा करण्यात आली आहे.
पहिले दार किती होते व आताचे दारात काय सुधारणा झाली हे खालील तक्त्याच्या माध्यमातून समजून येईल.
अ.क्र. | मागील दार | सुधारित दर | वाढ |
---|---|---|---|
1 | 6800 | 8500 | 1700 |
2 | 13500 | 17000 | 4500 |
3 | 18000 | 22500 | 4500 |
पहा कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर
अ.क्र. | जिल्हा | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | निधी |
---|---|---|---|---|
1 | अकोला | १३३६५६ | ९१८४५.९९ | ८६७२.७० |
2 | जालना | २१४७९३ | १४७३४०.२३ | १३४२२.२८ |
3 | अमरावती | २०३१२१ | १२७५९६.०२ | १२९५७.३६ |
4 | अहमदनगर | २९२७५१ | १९०४७०.३३ | २४१०१.४३ |
5 | परभणी | १८८५१३ | ८२७९२.०२ | ७०३७.३२ |
6 | बुलडाणा | २६८३२३ | १३५१७५.६० | ११४९०.२ |
7 | वाशिम | ६३७१६ | ४७०२९.३० | ३९९८.४९ |
8 | सोलापूर | ४९१६८ | ४०६७४.८६ | ४६८९.८५ |
9 | नागपूर | ६१६१ | ४८३२.८१ | ६२३.२३ |
10 | जळगाव | ६२८५९ | २७५३७.०० | ४५१४.७३ |
11 | छ.संभाजीनगर ( औरंगाबाद ) | ४०१४४६ | २५३२३९.८५ | २२६९८.११ |
12 | धाराशिव (उस्मानाबाद) | २१६०१३ | १५९३८७.३७ | १३७०७.५८ |
13 | नाशिक | ११२७४३ | २६०२७.२८ | २५८३.३६ |
14 | बीड | ४३७६८८ | २२४०२३.३० | १९५०३.२७ |
एकूण | २६५०९५१ | १५५७९७१.९६ | १५००००.०० |