Tag Archives: कापसाची योग्य अंतर पद्धत कोणती?

kapus lagvad antar 2023 | कापसाचे हे अंतर सगळ्यात फायद्याचे-जमिनी निहाय अंतर पद्धती

कापसासाठी कोणती अंतर पद्धत सर्वात फायद्याची -kapus lagvad antar 2023 

kapus lagvad antar 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,जर तुम्हाला कापसाचे एकरी होणारे उत्पादन दुप्पट वाढव्हायचे असेल तर हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे.तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल मात्र कापसाचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी kapus antar हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.पुढे याबाबत सविस्तर माहिती पाहूया..

kapus lagvad antar 2023

सध्या अनेक शेतकरी कापसाचे विविध अंतर निवडून प्रयोग करतात तसेच विविध लागवड पद्धतीचा अवलंब करताना दिसतात.मात्र त्यांच्या उत्पन्नात फारशी वाढ होताना दिसत नाही.करण त्यांनी निवडलेली अंतर पद्धत चुकीची असते .काही वेळेला अंतर योग्य असत मात्र जमीन त्या अंतरासाठी योग्य नसते. कापसातील अंतर निवडताना तुमची जमीन काशी आहे हे लक्षात हे घेतले पाहिजेत.जमिनीचे 3 प्रकार लक्षात घेऊनच अंतर निवडा करण काही अंतर पद्धती तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढवतात तर काही अंतर शेतकऱ्याचं मोठं नुकसान करून जातात.

जमिनीचे प्रकार व लागवडीची पद्धत

चला तर शेतकरी मित्रानो,सुरुवातीला आपण जमिनीचे प्रकार लक्षात घेऊ म्हणजे लागवडीचे अंतर निवडतांना अडचण येणार नाही.

आताच बघा-कापूस टॉप 5 वाण -सर्वात जास्त लावल्या जाणारे व शेतकऱ्याच्या पसंतीचे कापूस वाण

भारी जमीन/कळीची जमीन

शेतकरी मित्रानो, या जमिनीत काळ्या मातीचे प्रमाण अधिक प्रमाणात असते तसेच या जमिनीचे शेंद्रिय कर्ब हा जास्त असतो.या जमिनीत चांगले उत्पन्न होते.विशेष म्हणजे या नत्र, स्फुरद, तसेच पालाश चे प्रमाण योग्य असते.

मध्यम जमीन

मध्यम जमिनीत काळ्या मातीचे प्रमाण कमी प्रमाणात असते.या जमिनीचा शेंद्रिय कर्ब देखील कमी असतो .हि जमीन काळ्या जमिनीच्या तुलनेत कमी पाणी धरून ठेवते .या जमिनीतून पाण्याचा निचरा थोडा लवकर होते त्यामुळे हा या जमिनीचा एक फायदा आहे.

मध्यम जमीन

या जमिनीत काळ्या मातीचे प्रमाण अतिशय कमी किंवा नाहींच्या बरोबर असून या जमिनीत मुरमाचा भाग जास्त असतो.या जमिनीचा शेंद्रिय कर्ब खूपच कमी असते त्यामुळे या जमिनीत उत्पन्न हे खूपच कमी असते .हि जमीन अजिबात पाणी धरून ठेवत नाही त्यामुळे या जमिनीला अधिक पाण्याची आवशकता पडते.

कापसाचे सर्वात बेस्ट ७ वाण बघा सविस्तर व्हिडिओ

कापसाची योग्य अंतर पद्धत कोणती?

सुरुवातीला पाहूया काळ्या म्हणजे भारी जमिनीसाठी शेतकऱयांनी कोणत्या लागवड पद्धतीचा उपयोग केला पाहिजेत जेणे करून उत्पनात मोठी वाढ होईल.कोणते अंतर कोणत्या जमिनीसाठी योग्य राहील या बाबतचा रकाना खाली दिलेला आहे. यात पाहून तुम्ही समजून घेऊ शकता काळ्या म्हणजेच भारी जमिनीत कोणते अंतर घ्यावे? माध्यम जमिनीत कोणते अंतर घ्यावे ? तसेच हलक्या जमिनीत कोणते अंतर घ्यावे.

तसेच हे अंतर निवडल्यास एकरी झाडाची संख्या किती बसणार हे देखील रकान्यात दिलेले आहे.यावरून तुम्हाला झाडाची संख्या देखील लक्षात येईल व कापसाचे एकरी होणारे उत्पन्न देखील काढता येईल.आम्ही सांगितल्या प्रमाणे अंतर घेऊन नक्कीच शेती करा उत्पन्नात हमखास वाढ होईल.

अ.क्र.अंतर पद्धतजमिनीचा प्रकारझाड संख्या ( एकरी )
1सामान अंतर पद्धत
5 x 5
4 x 4
कळीची जमीन /भारी जमीन
1742
2722
2सामान अंतर पद्धत
3 x 3
2 x 2

माध्यम जमीन
हलकी जमीन

4840
10890
3विषम अंतर पद्धत
6 x 1
6 x 1.5
6 x 2
कळीची जमीन /भारी जमीन
7260
4840
3630
4विषम अंतर पद्धत
5 x 1
5 x 1.5
5 x 2
कळीची जमीन /भारी जमीन
8712
5808
4356
5विषम अंतर पद्धत
4 x 1
4 x 1.5
4 x 2
कळीची जमीन /भारी जमीन
10809
7260
5445
6पावली लागवड पद्धत
6 x पावली
5 x पावली
4 x पावली
3 x पावली

कळीची जमीन /भारी जमीन
कळीची जमीन /भारी जमीन
माध्यम जमीन
हलकी जमीन
अंतर उपलब्ध नाही
7पाटा पद्धत ( अमृत पॅटर्न )
7 x 5 x 1
6 x 4 x 1
5 x 4 x 1
कळीची जमीन /भारी जमीन
कळीची जमीन /भारी जमीन
माध्यम जमीन
अंतर उपलब्ध नाही

4×1 लागवड अंतर पद्धत

kapus lagvad antar :- ४ x1 .5 लागवड अंतर पद्धत :- हि अंतर पद्धत देखील बऱ्याच प्रमाणात वापरली जाते. या पद्धतीला काही शेतकऱ्याची पसंती आहे.कारण बरेच असे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात दोन झाडातील अंतर वाढविले असता झाड दाटतात त्यामुळे असे ज्या शेतकऱ्याच्या शेतात होते त्या शेतकऱ्यासाठी हि लागवड पद्धत फायद्याची ठरते.या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर हे ४ फूट असते आणि २ झाडातील अंतर हे १.५ फूट असते.यामुळे यामध्ये अधिक मोकळी जागा असते आणि झाडाला फुटवे करण्यासाठी हि पद्धत महत्वाची ठरते.या लागवड पद्धतीचा दुसरा फायदा असा कि या लागवड पद्धतीत झाडाची पातेगल होत नाही आणि बुरशीजन्य रोजाचा प्रॅदुर्भाव कमी होतो.

4×1.5 लागवड अंतर पद्धत


4×1.5 kapus lagvad antar :- हि अंतर पाहत मोठ्या प्रमाणात वापरली जात असून या पद्धतीला शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पसंती आहे.
या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर हे ४ फूट असते आणि २ झाडातील अंतर हे १ फूट असते.यामुळे मोकळी जागा जास्त असते आणि झाडाला फुटवे करण्यासाठी हि पद्धत महत्वाची ठरते.या लागवड पद्धतीचा दुसरा फायदा असा कि या लागवड पद्धतीत झाडाची पातेगल होत नाही आणि गरमीमुळे बुरशीजन्य रोजचा प्रॅदुर्भाव कमी होतो.

4×2 लागवड अंतर पद्धत

4×2 kapus lagvad antar 2023 :- हि अंतर पद्धत देखील काही प्रमाणात वापरली जात असून या पद्धतीला काही शेतकऱ्याची पसंती आहे.
या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर हे ४ फूट असते आणि २ झाडातील अंतर हे २ फूट असते.यामुळे यामध्ये अधिक मोकळी जागा असते आणि झाडाला फुटवे करण्यासाठी हि पद्धत महत्वाची ठरते.या लागवड पद्धतीचा दुसरा फायदा असा कि या लागवड पद्धतीत झाडाची पातेगल अजिबात होत नाही आणि गरमीमुळे बुरशीजन्य रोजाचा प्रॅदुर्भाव कमी होतो.मात्र या लागवड पद्धतीचा तोटा असा कि या लागवड पद्धतीमध्ये झाडाची संख्या अगदी कमी बसते व व्यवस्थापनामध्ये चूक झाल्यास उत्पनात घाट होण्याची शक्यता असते.