Tag Archives: गॅस योजना 2023

घरगुती गॅस सिलिंडरवर २०० रुपयांचे अनुदान- Pradhanmantri Ujjwala Yojana 2023-LPG Gas Subsidy- कोण पात्र कोण अपात्र..

Pradhanmantri Ujjwala Yojana २०० रुपये अनुदान कसे मिळणार?

चला तर वाचक मित्रानो, आज आपण Pradhanmantri Ujjwala Yojana अंतर्गत मिळणाऱ्या २०० रुपयाच्या अनुदाना बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत .
हि गॅस सबसिडी कोणाला मिळणार ? किती गॅस खरेदीवर मिळणार? कोणत्या वजनाच्या गॅसवर मिळणार हि संपूर्ण माहिती पाहणार आहोत

तुमच्यासाठी आली नवीन योजना
इथे क्लिक करून बघा

खरं तर या योजनेची सुरवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी १ मे २०१६ रोजी Pradhanmantri Ujjwala Yojana या नावाने संपूर्ण भारतात सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने महिलांना गॅस वाटपाला सुरुवात केली . या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना 14.2 किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येवू लागला.सुरुवातीला प्रति कुटुंब प्रति वर्ष १२ गॅस दिले जात होते सोबतच मोठ्या प्रमाणावर अनुदान देखील खात्यात जमा होत होते .
मात्र मागील २ वर्षात गॅसची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली असून ५०० रुपयात भरून मिळणारा गॅस हा आता १२०० रुपयार पोहचला आहे

आता मात्र सरकार या महागलेल्या गॅसचा विचार करता २०० रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली असून त्या संबंधित GR देखील लवकरच प्रसारित करणार आहे .

२०१६ पासून १ मार्च २०२३ पर्यंत या योजनेच्या 9.५९ कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. .Pradhanmantri Ujjwala Yojana च्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी हि सबसिडी लागू असून थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात हि रक्कम जमा करण्यात येईल


तुमच्यासाठी आली नवीन योजना
इथे क्लिक करून बघा

Pradhanmantri Ujjwala Yojana महत्वाची माहिती

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना फायदे

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे खूप मोठे फायदे आहेत. कारण जर आपण स्वता घरगुती गॅस खरेदी करायला गेलो तर १४ किलो वजनाचा गॅस हा आपल्याला ४५०० ते ५००० हजारापर्यंत मिळतो .
तर प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेतून हा गॅस फक्त २५० ते ५०० रुपयात मिळतो.
या व्यतिरिक्त आणखी काही फायदे खाली दिले आहे

Pradhanmantri Ujjwala Yojana कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते. (१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६०० / ५ किलो सिलेंडरसाठी रु. ११५०). यात खालील बाबींचा समावेश आहे:

१) सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव – १४.२ किलो सिलेंडरसाठी १२५० रु.


२) ५ किलो सिलेंडरसाठी ८०० रु.


३) प्रेशर रेग्युलेटर – १५० रु.


४) एलपीजी नळी – १०० रु.


५) घरगुती गॅस ग्राहक कार्ड – २५ रु.


६) “तपासणी / मांडणी / प्रात्यक्षिक शुल्क – ७५ रु.”

Pradhanmantri Ujjwala Yojana २०० रुपये अनुदान मिळविण्यासाठी अटी

सादर लाभार्थी हा प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजनेचा लाभार्ठी असावा.

सादर व्यक्तीचे बँक खाते आधार लिंक असावे.

लाभार्थी व्यक्तीचे बँक खाते सुरु असावे.

लाभार्थ्याच्या गॅस १४ किलोचा असावा.

तुमच्यासाठी आली नवीन योजना
इथे क्लिक करून बघा

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • लाभार्थीचे रेशन कार्ड
  • लाभार्थीचे मतदार ओळखपत्र
  • लाभार्थीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • टेलिफोन/वीज/पाणी बिल/घर कर पावती
  • कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
  • राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले स्व-घोषणापत्र
  • स्वताचे घर नसल्यास फ्लॅट वाटप / ताबा पत्र
  • लाभार्थी महिलेच्या बँक खाते

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी कोण घेऊ शकतो ?

दारिद्र्य रेषेखालील कुटुंब

प्रत्येक महिला

वनक्षेत्रात राहणारे कुटुंब

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती

बौद्ध / मागासवर्गीय

गरीब कुटुंब

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी

अति मागासवर्गीय

अंत्योदय अन्न योजना धारक लाभार्थी

वनवासी

बेटे आणि नदी बेटांचे रहिवासी