Tag Archives: घासा किंवा डोझोमॅक्स

कापूस उगणीपूर्व/उगवणी नंतरची 4 तण नाशके l kapus tan nashak l cotton pre-emergence Herbicide

cotton pre-emergence Herbicide कापूस उगणीपूर्व/उगवणी नंतरची टॉप ६ तण नाशक

kapus tan nashak :- कापूस पिकातील तननियंत्रण हा अतिशय महत्वाचा विषय ठरला आहे.कारण कापसाचे तान नियंत्रण योग्य पद्धतीने केले नाही तर मात्र कापूस उत्पादनात मोठी लक्षणीय घाट होते.त्यामुळे तान व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. कापूस पिकात उत्पादन घटीची 60 ते ७० पर्यंत टक्केवारी दिसून येते. शेतकरी मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण कापूस तन उगवणी पूर्व आणि उगवणी नंतरची अशी प्रभावी सहा तणनाशक पाहणार आहोत. चला तर मग पाहूया हे तननाशक कधी आणि किती वापरली पाहिजे? त्यांचा मार्केटमध्ये रेट काय आहे? ही सर्व माहिती पाहणार आहोत.

चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील तन नियंत्रण करणे फार महत्वाचं कशामुळे आहे.शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील तण नियंत्रण योग्य वेळी नाही केल्यास आपल्याला किती तोटा होतो?आणि प्रभावी तन नियंत्रण कशा पद्धतीने करावं? शेतकरी मित्रांनो शेतात वाढणाऱ्या निर्णयात्रांमुळे अन्नद्रव्य,पाणी, हवा,जागा आणि सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत कापूस पिकासोबत तळ स्पर्धा करत असते आणि त्याची फक्त मोठ्या प्रमाणावर वाढ होते.त्याचा सर्वांगीण विकास होत नाही.त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर प्रमाणात घट येत असते.पिकाच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी पाणी देणे आणि आंतरमशाग अशा विविध कामात अडथळा निर्माण होतो.

कापसाचे वाण निवडतांना ह्या 6 गोष्टी लक्षात घ्या | kapus | kabaddi cotton seeds

हे आहेत कापसाचे सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 वाण -एकरी २० ते २५ क्विंटल उत्पन्न.

मागील दोन वर्षात कापूस हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे परिणामी तन नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना खूप श्रम आणि पैसा खर्च करावा लागला आहे. कापूस तन स्पर्धेचा संवेदनशील कालावधी कापूस पिकात पीक स्पर्धेचा संवेदनशील कालावधी 20 ते 60 दिवसांपर्यंत असतो या काळात तन नियंत्रण केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते या कालावधीनंतर पित्त मुक्त ठेवलं तरी उत्पादनात झालेली घट भरून येत नाही.सुरुवातीच्या काळात तणांचा मोठा प्रादुर्भाव होतो सुरुवातीच्या नऊ आठवड्यांपर्यंत म्हणजेच 60 दिवसांपर्यंत म्हणजेच दोन महिन्यांपर्यंत कपाशीचे पीक तणमुक्त ठेवणं फार गरजेचं असतं त्यामुळे आपण एकात्मिक तंत्र नियंत्रण सुद्धा करू शकता.

1) स्टॊम्प तननाशक (पेंडीमेथिलिन 30 % EC ) | Stomp Tan nashak (Pendimethalin 30 Ec cotton herbcide)

cotton pre-emergence Herbicide :- शेतकरी मित्रांनो कपाशी पिकातील एक नंबरचा तन नाशक आपण पाहणार आहोत ते आहे पेंडीमेथिलिन 30% EC हे तणनाशक. तन उगवनि पूर्व म्हणजेच कपाशी पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी आपण जमिनीवरती फवारायचा आहे. स्टॊम्प ( Stomp ) नावाने आपल्याला बाजारामध्ये मिळेल.100 मिली प्रति 16 लिटर पाण्यासाठी फवारण्यासाठी शिफारस आहे. त्याचप्रमाणे एक ते दीड लिटर प्रति एकर साठी फवारणीसाठी शिफारस आहे. आपल्याला एक लिटरची बॉटल 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान बाजारामध्ये उपलब्ध मिळते.

2) टाटा पनिडा  तननाशक | TATA PANIDA Tan nashak (HERBICIDE ) (Pendimethalin 30 % EC)

शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील दोन नंबरच तननाशक आहे टाटा कंपनीचं ओनिडा ग्रांडी पेंडी मिथिलिन 38.7% CS हा घटक यामध्ये आहे.शेतकरी मित्रांनो हे तन नाशक सुद्धा कापूस उगवणी पूर्व म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारायचा आहे. शेतकरी मित्रांनो हे तन नाशक 600 ते 700 मिली प्रति एकर 150 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो 60 मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे. टाटा पनिडा ग्रंडी हे तन नाशक आपल्याला ७०० मिली ची बॉटल बाजारामध्ये 450 ते 500 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध होऊ शकते.

3) घासा किंवा डोझोमॅक्स | Ghasa Tan nashak (pyrithiobac sodium 6% Quizalofop ethyl 4%)

cotton pre-emergence Herbicide:-शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं नाशक आपण कापूस पिकातील पाहणार आहोत pyrithiobac sodium 6 + quizalofop ethyl 4 टक्के. या तणनाशकाचा एकरी 400 मिली प्रति एकर साठी आपल्याला याचा डोस घ्यावा लागणार आहे.40 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण हि फवारणी करू शकता. सर्वसाधारणपणे प्रति एकर साठी 150 लिटर पाणी लागत. शेतकरी मित्रांनो हे तन नाशक आपल्याला घासा किंवा डोझोमॅक्स या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होईल.1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान मिळू शकते. हे तणनाशक आपण कापूस उगवल्यानंतर उभ्या पिकात कापूस पीक 20 ते 30 दिवसांचा असताना आपण हे फवारणी करायचा आहे.त्याच प्रमाणे आपण फवारणीनंतर पाच ते दहा दिवस कपाशीमध्ये डवरणी करायची नाही.

4) स्वीप पावर (अमोनियम 13.5% डब्ल्यू डब्ल्यू एस एल) Sweep Power tan nashak (Ammonium 13.5% SL) Herbicides

शेतकरी मित्रांनो 4 नंबरचं तन नाशक पाहणार आहोत ते आहे अमोनियम 13.5% wwsl या फॉर्म्युलाशन मध्ये हा घटक आहे हे आपल्याला यूपीएल कंपनीचा स्वीप पावर या नावाने बाजारमध्ये उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो हे एक नवीन नॉन सिलेक्टिव्ह तन नाशक आहे कापूस पिकातील कठीण तन मारण्यासाठी हे तन नाशक आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. शेतकरी मित्रांनो या फोटोमध्ये जे आपण गवत पाहतात हे कठीण गवत आपण ह्या तन नाशकाच्या माध्यमातून नियंत्रित करू शकतो फवारणीसाठी प्रमाण 1000 ते 1200 ml प्रति एकर दीडशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी 100 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो स्वीप पावर हे तन नाशक आपल्याला एक लिटरची बॉटल बाजारामध्ये 800 ते 900 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध होईल.

सोयाबीन साठी सर्वात चांगले पीक उगवण पूर्व तणनाशक – कोणताच गावात निघणार नाही