संपूर्ण कंपन्यांचे DAP ,१० २६ २६ ,२० २० ० १३ ,पोटॅश चे नवीन भाव जाहीर | fertilizer price list 2023
fertilizer price list 2023 :- शेती करायची म्हटलं कि शेतीला लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रासायनिक खात.आता पूर्वी प्रमाणे काहीच राहील नाही,पूर्वी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर होत होता आता मात्र सर्व शेतकरी फक्त आणि फक्त रासायनिक खताचा शेतीसाठी वापर करत आहेत.त्यामुळे सध्या चालू असलेल्या fertilizer price list 2023 शेतकऱ्याला माहित असणे गरजेचं आहे.
दरवर्षी खताच्या भावात वाढ होत राहते तर कधी भाव सुद्धा कमी होतात.त्यामुळे जर शेतकऱ्याला चालू असलेले fertilizer price list 2023 माहित नसतील तर कृषी चालक शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात व शेतकऱ्याकडून जास्त पैसे घेतात म्हणून आज आपण विविध कंपन्यांचे खताचे दर तुम्हाला सांगणार आहोत.ज्यामध्ये युरिया,DAP,१०:२६:२६, २० २० ० १३,त्याच बरोबर संपूर्ण खताचे चालू भाव सांगणार आहोत.
Fertilizer new rate 2023 | असे असणार आहेत २०२३ चे या कंपन्यांचे खताचे बाजार भाव / खताचे भाव.
युरिया खताचे २०२३ चे बाजार भाव | UREA Fertilizer new rate
चला तर आपण सुरुवातीला विविध कंपन्यांच्या युरियाच्या किमती काय आहेत हे जाणून घेऊया.खालील बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे २०२३ चे संपूर्ण भाव जाहीर केले आहेत.खात खरेदी करत असताना वेगवेगळ्या कंपन्यांचे खात हे शेतकरी खरेदी करत असतात.
हे देखील वाचा-आता शेतकऱ्याना मिळणार सोयाबीनचे २८ क्विंटल एकरी उत्पन्न
या कंपन्यांचे खताचे भाव जर आपल्याला माहित झाले तर कमी किमतीत उपलब्ध असलेल्या कंपनीचा युरिया आपण खरेदी करून आपला पैसा बचत करू शकतो. खाटांचे भाव खालील प्रमाणे दिलेले आहेत.
अ. क्र. | खताचे नाव | कंपनीचे नाव | वजन | भाव |
---|---|---|---|---|
1 | spic urea | spic | 45 kg | 266 रुपये |
2 | JK Mangla Urea | JK Mangla | 45 Kg | 266.5 रुपये |
3 | Narmada Urea | Narmada | 45 Kg | 266.50 रुपये |
4 | IFFCO Urea | IFFCO | 45 Kg | 266 रुपये |
5 | IPL Nim coted Urea | IPL | 45KG | 266 रुपये |
6 | RCF Ujwalaa urea | RCF Ujwalaa | 45KG | 266.50 रुपये |
7 | Gromor urea | Gromor | 45 kg | 266 रुपये |
8 | RFCL KISAN UREA | RFCL KISAN | 45KG | 266 रुपये |
9 | krubhako Urea | krubhako | 45kg | 266 रुपये |
10 | JK PPL UREA | JK PPL | 45KG | 266.50 रुपये |
11 | IFFCO Nano Urea | IFFCO | 500ml | 240 रुपये |
12 | NAGARJUN UREA | NAGARJUN | 45KG | 266.50 रुपये |
10 26 26 खताचे २०२३ चे भाव | 10 26 26 new fertilizer rate
आता जाणून घेऊया १० २६ २६ या खताचे भाव.वेगवेगळ्या कंपनीच्या भावात मोट्या प्रमाणावर तफावत दिसून येते.अशावेळी आपल्याला या खताचे भाव माहित असतील तर स्वस्त दरात उपलब्ध कमानीचे खत खरेदी करून आपण मोठ्या प्रमाणावर पैसे बचत करू शकतो.संपूर्ण वेगवेगळ्या कंपन्यांचे खताचे बाजार भाव
खाली दिले आहेत
अ. क्र. | खताचे नाव | कंपनीचे नाव | वजन | भाव |
---|---|---|---|---|
1 | IFFCO 10 26 26 | IFFCO | 50Kg | 1470 रुपये |
2 | Gromor 10 26 26 | Gromor | 50Kg | 1470 |
3 | KRUBHAKO 10 26 26 | KRUBHAKO | 50KG | 1470 |
4 | GROMOR ULTRA 10 26 26 | GROMOR | 50KG | 1235 |
5 | KISAN 10 26 26 | KISAN | 50KG | 1175 |
6 | PPL 10 26 26 | PPL | 50KG | 1250 |
7 | JAY KISAN 10 26 26 | 50KG | 1285 |
२० २० ० १३ खताचे २०२३ चे भाव | २० २० ० १३ new fertilizer rate
आता आपण मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपनीच्या २० २० ० १३ या खताचे २०२३ मध्ये नेमके काय भाव आहेत हे जाणून घेणार आहोत.कारण या कंपन्यांचे खताचे भाव हे वेगवेगळे असतात.आणि हे आपल्याला माहिती असणे गरजेचे असतात.
नाहीतर ज्या वेळी आपण कृषी केंद्रावर हि खात खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याकडून हे दुकानदार जास्त पैसे घेतात ,ते आपली फसवणूक करतात.आता तुमच्या लक्षात आलं असेल कि खाताचे भाव आपल्याला माहिती असणे गरजेचं का आहे.
अ. क्र. | खताचे नाव | कंपनीचे नाव | खताचे वजन | खताचे भाव |
---|---|---|---|---|
1 | spic 20 20 0 13 | spic | 50 kg | 1275 |
2 | gromor 20 20 0 13 | gromor | 50kg | 1300 |
3 | IFFCO 20 20 0 13 | IFFCO | 50Kg | 1400 |
4 | Mangla 20 20 0 13 | Mangla | 50 kg | 1350 |
5 | IPL 20 20 0 13- | IPL | 50Kg | 1470 |
6 | krubhako 20 20 0 13 | krubhako | 50Kg | 1450 |
7 | FACT 20 20 0 13 | 50kg | 1400 | |
8 | KISAN 20 20 0 13 50KG=1350 | KISAN | 50KG | 1350 |
DAP 18 46 00 खताचे २०२३ चे भाव | IFFCO DAP 50 kg price
DAP खता बाबत बोलायचं झाल्यास तुम्हाला माहीतच असेल कि,या खताचे भाव खूप महाग मिळते त्यामुळे DAP खताचे भाव सर्व शेतकऱ्याना माहिती असणे गरजेचे आहे .हे भाव शेतकऱ्याना माहिती असले कि स्वस्त खत पुरवठा करणाऱ्या कंपनीचे खत खरेदी करतील. आणि त्यांचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या या खताचे संपूर्ण भाव.
अ. क्र. | खताचे नाव | कंपनीचे नाव | खताचे वजन | खताचे भाव |
---|---|---|---|---|
1 | IPL DAP 18 46 00 | IPL | 50KG | 1350 |
2 | KISAN DAP | KISAN | 50 KG | 1350 |
3 | Gromor DAP | Gromor | 50 kg | 1370 |
4 | mangla DAP | Mangla | 50KG | 1350 |
5 | IFFCO DAP | IFFCO | 50KG | 13350 |
6 | KRUBHCO DAP | KRUBHCO | 50 KG | 1350 |
7 | SAMRAT DAP | SAMRAT | 50KG | 1350 |
8 | RCF DAP | RCF | 50 KG | 1200 |
9 | SPIC DAP | SPIC | 50KG | 1350 |
10 | GROMOR ULTRA DAP | GROMOR | 50KG | 1400 |
पोटॅश ( MOP ) खताचे २०२३ चे भाव | MOP new fertilizer rate
आता आपण एकूण ५ कंपन्यांचे पोटॅश २०२३ चे नवीन भाव काय आहेत पाहणार आहोत.ज्यामध्ये खाताचे नाव काय.खताचे भाव 2023.खताची कंपनी याबाबत सुद्धा माहिती देणार आहोत.खताच्या बॅगचे वजन किती किलोचे आहे हे देखील सांगणार आहोत .आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या कंपनीच्या खताचे भाव किती आहेत हि संपूर्ण माहिती खालील रकान्यात पाहायला मिळेल .
अ. क्र. | खताचे नाव | कंपनीचे नाव | खताचे वजन | खताचे भाव |
---|---|---|---|---|
1 | पोटॅश IPL MOP | IPL | 50KG | 1700 |
2 | पोटॅश GROMOR MOP | GROMOR | 50 KG | 1700 |
3 | पोटॅश ZUARI MANGLA MOP | ZUARI MANGLA | 50KG | 1700 |
4 | पोटॅश IFFCO MOP | IFFCO | 50KG | 1700 |
5 | पोटॅश KRUBHAKO MOP | KRUBHAKO | 50KG | 1700 |
UREA -युरिया काम काय ?युरियाचे फायदे काय.
चला आता थोडक्यात जाणून घेऊया कोणत्या खताचे काय फायदे असतात तसेच ते खात कधी वापरायचे.युरिया हे खात पिकासाठी अतिशय महत्वाचे असते.कारण या खतामध्ये नत्र हा घटक असतो आणि पिकाचा हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी हे काम करत असते .युरियामुळे नवीन पानं तयात होतात.
पिकात आलेला पिवळेपणा दूर होतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकाच्या वाढीसाठी नत्र खूप महत्वाचे असते .तुमचे पीक वाढत नसल्यास तुम्ही युरियाचा वापर करू शकता.मात्र अधिक प्रमाणात युरिया वापरयास झाड फक्त वाढत जातात म्हणून युरिया गोगय प्रमाणात वापरावा.
SSP सिंगल सुपर फॉस्फेट काय करते.त्याचे फायदे काय ?
सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये फॉस्फरस हा १४% असतो.सल्फर हा ११% तर कॅल्शियम २१ % असते.आणि हे घटक प्रत्येक पिकासाठी आवश्यक असतात. सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर योग्य पद्धतीने केल्यास झाडाचे फुटवे वाढण्यास मदत होते. याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होते.
या खताच्या वापराचा दुसरा फायदा असा कि हे खात वापरल्यास झाडाचे खोड हे मजबूत होते.बियाणातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी हे खात मदत करतात.यामुळे जमिनीतील पाण्याला धरून ठेवण्याची ताकत असते.
पोटॅश चे कार्य काय? पोटॅश वापराचे फायदे जाणून घ्या.
पिकासाठी पोटॅशचे अनन्यसाधारण महत्व आहे .या मुळे मुळांची योग्य अशी वाढ होते व जमिनीची अन्नद्रव्य घेण्यास पिकाला मदत होते.पिकांच्या फळांची वाढ करण्यासाठी पोटॅश काम करत असते.याने पिकाच्या शेंगा टपोऱ्या होतात दाण्याचा आकार वाढतो सोबतच त्याला रंग खुलतो व त्याला चकाकी येते .झाडातील प्रोटीन वाढविण्याचं काम देखील पोटॅश करत असते.प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेला पोटॅश मदत करते.