Tag Archives: लाल/पिवळा कोळी

Chilli leaf curl virus Control | मिरची पिकातील वायरस रोगावर हा रामबाण उपाय

काय आहे मिरची पिकावरील चुरड-मुरडा रोग? | Chilli leaf curl virusजाणून घ्या सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो,हा लेख तुमच्या साठी अतिशय महत्वाचा असून मिरची पिकातील वायरस रोगावरती हा रामबाण उपाय ठरणार आहे. होय शेतकरी बंधूंनो या लेखात आपल्याला मिरची पिकावरील ( Chilli leaf curl virus ) कोकडा-बोकडा किंवा चुरडा मुरडा या नावाने संबोधल्या जाणाऱ्या एका वायरस बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत.

त्याच्यावरती संपूर्ण एकात्मिक उपाय आपण कशाप्रकारे करू शकतो याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत.त्यामुळे शेतकरी बंधुनो लेख खूप महत्त्वाचा आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की हा लेख तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.

Chilli leaf curl virus

लगेच अर्ज करा-शेतकऱ्याना बियाणे मिळणार अगदी मोफत पहा काय आहे योजना?

मिरची हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्वाचे पीक असून शेतकऱ्याना सर्वात जास्त पैसा मिळवून देणारे पीक आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही .महाराष्ट्रात विदर्भ,मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील बऱ्याच जिल्ह्यात तसेच विशेष करून सातारा,पुणे,औरंगाबाद, धुळे,या जिल्ह्यांमध्ये मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

मात्र प्रत्येक शेतकऱ्याला मिरचीचे भरगोस उत्पन्न घेता येत नाहीय कारण मिरची उत्पादक शेतकरी नेहमी एका समस्येने ग्रस्त असतात ती म्हणजे मिरची पिकावर होणारा वायरस अटॅक.चुरडा – मुरडा, घुबड्या, बोकड्या या नावांनी या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविधओळखले जाते.

मिरची पिकावरील चुरडा-मुरडा,बोकड्या रोगाची लक्षणSymptoms of leaf curl disease

Chilli leaf curl virus :- या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे आपल्या मिरची पिकावरील झाडाची पाने वरील बाजूस वळलेली दिसून येतात.मिरचीच्या पानांचा गुच्छ झालेला आपल्याला दिसून येतो.शेतकरी बंधूंनो त्या झाडांना फुले आणि फळे आपल्याला कमी प्रमाणात लागलेली दिसून येतात.झाडाची नवीन पाने बारीक येतात.मिरची पिकात पानांवर सुरकुत्या किंवा पानगोळा होण्यासारखी लक्षणे दिसतात. झाडाची वाढ होत नाही त्या झाडाची वाढ खुंटते.

रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाचे संपूर्ण पाने गाळून पडतात,तसेच यावर बाहेरच म्हणजे रोगाचा प्रसार आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येतो,हा प्रादुर्भाव रस शोषक किडीमार्फत झालेला दिसून येतो. म्हणूनच आपल्याला या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बंधुनो त्या ठिकाणी रस शोषक किडींचे नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण पीक आपल्या हातून जाऊन शेतकर्याचं मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

Chilli leaf curl virus | मिरची पिकावर या अवस्थेत कोणकोणत्या किडींचा/किटकांचा प्रादुर्भाव होतो

मिरची पिकाची इतर पिकाच्या तुलनेत मोट्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागते कारण हे पीक रोगास जास्त संवेदनशील असते.त्यावर रोगांचा अटक लवकर होतो व त्याचे नियंत्रण वेळेवर करणे गरजेचे असते.त्यामुळे मिरची पिकावर अटॅक करणाऱ्या किडी/कीटकांची आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे जेणे करून त्यांचे नियंत्रण तात्काळ करता येईल.

अ.क्र.किडी/किटकरोग
1पांढरी माशी भुरी
2थ्रिप्स ( फुलकिडे )मर
3लाल/पिवळा कोळी बोकड्या
4फळ पोखरणारी आळीपानावरील पांढरे ठिपके
5तुडतुडेकेवडा

मिरची पिकावरील चुरडा-मुरडा,बोकड्या रोगाचे नियंत्रण व व्यवस्थापन कसे करावे?

पिकावरील या भयानक व्हायरस आहे.त्यामुळे त्याचे एकात्मिक उपाययोजना केली तरच या विविध रोगावरती नियंत्रण शक्य आहे. रोग नियंत्रणाची पद्धत काय आहे ते समजून घेऊया.शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण मिरचीचा प्लॉट लावत असतो त्यावेळेस आपल्याला मिरचीच्या चारी बाजूंनी शेडनेट किंवा जुन्या साड्या त्या ठिकाणी बांधायचे आहेत. शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये जेव्हा आपल्याला चार ते पाच प्रादुर्भावग्रस्त रोपे त्या ठिकाणी आढळून येतील त्यातील रोगग्रस्त रोपे काढून प्लॉटच्या बाहेर काढून त्या ठिकाणी नष्ट करायचे आहे.

Breaking बातमी-खताचे नवीन भाव जाहीर-पहा नवीन भाव काय आहेत.

शेतकरी बंधूंना आपल्याला माहित आहे की, या वायरसचा प्रसार हा रस शोषक किडीमार्फत होतो म्हणूनच आपल्याला प्रति एकरी दहा पिवळे चिकट सापळे आणि 10 निळे चिकट सापळे आपल्या प्लॉटमध्ये लावायचे आहेत.शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून त्या ठिकाणी निम तेलाची आपल्याला दोन मिली प्रतिलिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे.

शेतकरी बंधूंनो मात्र या वायरसनी आपल्या मिरची पिकात मोठ्या प्रमाणावर अटॅक केला असेल तर मी पुढे सांगत असलेली कीटकनाशके आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मिरची पिकावरती आलटून पालटून फवारणी द्वारे वापरायचे आहेत.याने मात्र या रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल. खालील पैकी कोणतेही एकाच कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे.

मिरची वरील रोगावर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक

शेतकरी मित्रानो ,मिरची वरील या विविध रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी खालील पैकी कोणतेही एकच कीटकनाशक आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापरायचे आहे.फवारणी करताना पाण्याचे योग्य प्रमाण घेणे अतिशय आवश्यक आहे.तसेच कीटकनाशकाचे योग्य प्रमाण देखील अतिशय महत्वाचे ठरते.

अ.क्र.घटक नावकीटकनाशक
1इमामेक्टिन बेंझॉइड 1.5 +फिप्रोनील ३.५ scअपेक्स-50
2फ्लूबेन्डामीड १९.९२ + थायक्लोप्रिड १९.९२बेल्ट एक्सपर्ट (बायर)
3इंडोक्साकार्ब 14.5 एससी+एसिटामिप्रिड 7.7 एसपीकाईट घरडे केमिकल
4थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सीसिजेंटा अलिका

अशा प्रकारे शेतकरी बंधुनो ही वेगवेगळे कीटकनाशके आपल्याला आपल्या पिकावरती आलटून पालटून फवारणी द्वारे वापरायचे आहेत.आता याचे प्रमाण शेतकरी बंधूंना आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पिकावरती कोणत्या किडींचा किती प्रादुर्भाव आहे, याच्यानुसार ठरवायचे आहेत, अंदाजे त्या ठिकाणी आपण 0.5 ते 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी मिसळून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे म्हणजे सिलिकॉन युक्त स्टिकर मिसळून आपल्या मिरची पिकावरती त्याठिकाणी फवारणी द्वारे वापरायचे आहे.

खालील टेबल हा फक्त इंग्रजीमध्ये आहे.

No.ContentInsecticide
1Emamectin Benzoate 1.5 Fipronil 3.5 ScApex
2Flubendiamide 19.92% + Thiacloprid 19.92% w/w SCBelt Expert ( Bayer )
3Indoxacarb 14.5% + Acetamiprid 7.7% SCGharda
4Thiamethoxam 12.6% + Lambda Cyhalothrin 9.5% ZC – 200 mlSyngenta Alika