Tag Archives: सोयाबीन दुसरी फवारणी

आता शेतकऱ्याना मिळणार सोयाबीनचे २८ क्विंटल एकरी उत्पन्न | Soyabin lagvd padhat 2023 |  SOYABEAN FARMING FULL INFORMATION

नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी हा लेख अतिशय महत्वाचा आहे कारण आता तुमच्या सोयाबीनचे उत्पन्न एकरी २८ क्विंटल होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणार अहो .तुम्हाला देखील हे पटणार नाही मात्र आपल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यानी हे रेकॉड तोड उत्पादन घेतलं आहे आणि आज त्या बदल सविस्तर माहिती पहाणार आहोत .

तो शेतकरी कोण आहे? शेतकरी कुठे राहतो? त्या शेतकऱ्यानी कोणत्या वाणाची निवड केली?लागवड पद्धत ( Soyabin lagvd padhat 2023 ) कोणती वापरली? खात व्यवस्थापन तसेच कीटकनियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरले हि संपून माहिती.तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.हे व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुमचे देखील उत्पन्न ४-५ क्विंटल वरून २८ क्विंटल मिळेल .

सांगलीच्या शेतकऱ्याचं रेकॉर्ड तोड उत्पादन ५ क्विंटलहून थेट २८ क्विंटल.Soyabin lagvd padhat 2023

जर मित्रानो सर्व सामान्य शेतकऱ्याला विचारलं कि तुम्हाला सोयाबीनचा एकरी उत्पन्न किती मिळालं तर त्या शेतकऱ्याचं उत्तर असेल, ५ क्विंटल.दुसरा शेतकरी म्हणेल १० आणि जास्तीत जास्त १५ क्विंटल, या पेक्षा अधिक उत्पन्न अजून पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला मिळालं नाही,

मात्र सांगली जिल्ह्याचे रहिवाशी असलेले प्रशांत भानुदास पाटील यांनी भारतातील रेकॉड तोड उत्पादन म्हणजे एकरी २८ क्विंटक एव्हढं घेतलं आहे.ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत आणि विविध प्रयोग आपल्या शेतात कटात असताततेव्हा त्यांनी लागवडी पासून तर काढणी पर्यंत केलेलं व्यवस्थापन आपण बघूया.

पूर्वमशागत

प्रशांत पाटील यांनी इतर शेतकऱ्या प्रमाणेच जमिनीची पूर्वमशागत केली ज्यामध्ये त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केली त्यानंतर जनीं मोकळी होण्यासाठी ट्रॅक्टरने रोटर केले आणि त्यानंतर ३.५ फुटाचे बेड पडले.

जमीन

तसे तर कोणत्याही जमिनीत आपण सोयाबीन घेऊ शकतो मात्र भारी कळीची जमीन सोयाबीन पिकासाठी अधिक फायदेशीर ठरते .म्हणजेच काय तर या जमिनीत खूप जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते.सोयाबीन पीक योग्य पद्धतीने घेण्यासाठी जमिनीचा PH हा ७.५ ते ८ असावा.व शेंद्रीय कर्रब १ % असावा .

प्रशांत पाटील यांची जमीन काळी भारी जमीन असून पाण्याचा चीनला निचरा होणारी आहे.तुम्ही सोयाबीन लागवडीसाठी माध्यम जमिनीची देखील निवड करू शकता..मात्र या जमिनीत तुम्हाला शेंद्रीय खताचे व्यवस्थापन करावे लागेल.

हवामान आणि लागवड वेळ

Soyabin lagvd padhat 2023 : प्रत्येक पिकासाठी हवामान आणि लागवडीची वेळ हि फारच महत्वाची ठरते. कारण वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळे तापमान आवश्यक असते.आणि या वातावरणात या पिकाचे अधिक उत्पन्न मिळू शकते अन्यथा फारच कमी उत्पन्न मिळते.त्यानंतर म्हणत्वाचा दुसरा विषय कि लागवड हि वेळच्या वेळेत करणे गरजेचे असते कारण.

सोयाबीन लागवडीची वेळ पहिली तर १ जून ते १० जुलैच्या आत असावी कारण या वेळेत तापमान बियाणे उगवणीसाठी चांगले राहते . २५ ते ३० डिग्री सेल्शियस तापमान हे सोयाबीन पिकासाठी अतिशय आवश्यक आहे.या तापमानात चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकते.

वेगवेगळ्या महिन्यात तापमान बदलत असते आणि आवश्यक तापमानात लागवड न झाल्यास बीज उगवण क्षमतेवर मोठा परिणाम होतो.आणि याचाच परिणाम थेट उत्पनावर होतो.प्रशांत पाटलाच्या मते ढगाळ वातावरण हे सोयाबीन पिकासाठी चांगले असते.मात्र पावसात खंड हा आवश्यक असतो सतत पाऊस असल्यास सोयाबीनचे उत्पन्न फार कमी होते.

सोयाबीनची शेती हि बऱ्याच राज्यात केली जात आणि सोयाबीन लागवडीस योग्य वातावरण असलेले वातावरण हे पुढील राज्यात अनुकूल आहे
१) महाराष्ट्र.
२) गुजरात
३) मध्यप्रदेश
४) कर्नाटक
५) तेलंगणा
६) आंध्रप्रदेश
वरील पैकी कोणत्याही राज्यात शेतकरी मित्र सोयाबीन लागवड करू शकतात .

सोयाबीनच्या कोणत्या वाणाची निवड करावी.

सध्या मार्केट मध्ये खूप जास्त वाण आहेत मात्र आपल्या जमिनीनुसार तसेच विभगा नुसार सोयाबीन वाणाची निवड करावी.या संबंधित आपला ऑलरेडी एक लेख आहे त्यात दिलेले आहे कि सर्वात जास्त उत्पन्न्न देणारे ५ सोयाबीनचे वाण कोणते ?
खालील लिंक क्लिक करून लेख वाचा..

हे देखील वाचा-2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण

प्रशांत पाटील यांनी फुले अग्रणी तसेच फुले किमया वाणाची निवड केली होती मात्र आता त्यापेक्षाही अधिक उत्पन्न देणारे वाण आहेत .तुम्ही फुले दुर्वा हे वाण लागवडीसाठी वापरू शकता.एकरी १५ किलो बियाणे लावावे.हे वाण 100 ते 105 दिवससाचे आहे.या वाणापासून एकरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न सहज घेऊ शतक .पाटील यांच्यासारखे व्यवस्थापन केल्यास २० क्विंटलच्या वर उत्पन्न घेता येईल.

फले अग्रणी सोयाबीन वाण

फले अग्रणी सोयाबीन वाणाचे खालील 2 महत्वाचे वैशिट्य आहेत.

अनुक्रमांकवाणाचे नावप्रसारित वर्षकालावधीवैशिट्यउत्पन्न (हेक्टरी)
1फले अग्रणी2013-2014१००-१०५ दिवस1)बक्टेररयल पुरळसाठी सहनशील. 2)महाराष्ट्र व मध्यभारतासाठी प्रसाररत.२२-२४ क्विंटल

फुले दुर्वा

फुले दुर्वा सोयाबीनचे खालील 2 महत्वाचे वैशिट्य आहेत.

अनुक्रमांकवाणाचे नावप्रसारित वर्षकालावधीवैशिट्यउत्पन्न (हेक्टरी)
1KDS- 992 (फुले दुर्वा) 2021100 ते 105 दिवस1)तांबेरा रोग,जिवाणूजन्य ठिपके रोगासाठी प्रतिकारक्षम
2) मोठ्या आकाराचे  दाणे
15 te 25क्विंटल

फुले किमया

तुम्हाला लवकर येणारे वाण पाहिजे असेल तर फुले किमया या वाणाची तुम्ही निवड करू शकता.हे वाण ९० दिवसात काढायला येते

फुले किमया सोयाबीनचे खालील 3 महत्वाचे या वाणाचे वैशिट्य आहेत.

अनुक्रमांकवाणाचे नावप्रसारित वर्षकालावधीवैशिट्यउत्पन्न (हेक्टरी)
1फुले किमया (के डी एस 753) ——95 ते 100 दिवस1)तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो. 
2) दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
3)तेलाचा उतारा 18.25 %
10 te 15 क्विंटल

जमिनीनुसार सोयाबीन बियाणांचे प्रमाण

शेतकरी मित्रानो, बरेच शेतकरी मित्र पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी करतात.आणि त्यांना एकरी ३० किलो बियाणे पेरणीसाठी लागतात.त्यापासून त्यांचे होणारे उत्पन्न फक्त ५-६ क्विंटल एव्हढे कमी होते कारण ते बियाणांचे प्रमाण अतिशय चुकीचे आहे,यात सोयाबीन दाटते त्यामुळे ती फक्त उभट वाढते परिणामी फुटवे कमी प्रमाणात लागतात व उत्पन्न फारसे होत नाही.

बियाणांचे योग्य प्रमाण


सोयाबीनच्या कोणत्याही वना पासून तुम्हाला जास्त उत्पन्न घायचे असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे बियाणांचे प्रमाण घ्यावे.
१) पेरणीसाठी – २२ ते २५ किलो
२) लागवडीसाठी- १२ ते १५ किलो

सोयाबीन बीजउगवण क्षमता

सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणी करणे हि अतिशय महत्वाची बाब आहे .तुम्हाला तर माहीतच आहे कि,मार्केट मध्ये बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे. तसेच आपण जर बाहेरून बियाणे विकत घेत असाल तर ते बियाणे कसे आहे हा सांगता येत नाही.आणि जर आपण या बियाणाची उगवण क्षमता न तपासता पेरणी किंवा लागवड केली तर बियाणे निघत नाही.

परिणामी दुबार पेरणी करावी लगे.शेतकऱ्याच मोठं नुकसान होते व मोठ्या प्रमाणावर पैसा वाया जातो सोबतच वेळ देखील निघून जाते. म्हणून प्रशांत पाटील सांगतात कि,पेरणी किंवा लागवड करण्या अगोदर बियाणी उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी.

बीज उगवण क्षमता कशी करावी?

बीज उगवण करण्याच्या अनेक पद्धती आहेत मात्र एक सोपी पद्धत जी पाटील यांनी सांगितली आहे ज्यामुळे लवकरात लवकर बीज उगवण क्षमता तुम्ही करू शकता.त्यासाठी तुम्हाला बारदाना म्हणजेच एका पोत्याची गरज लागेल आणि ते सुरुवातीला ओले करून घ्यावे जसे कि तुम्हाला खालील फोटोत दिसत आहे.आता तुम्ही विकत आणलेल्या किंवा घरच्या बियाणातील १०० दाणे घेऊन १०-१० च्या १० लाईन मध्ये पोत्यावर ठेवायच्या आणि पोट गुंडाळून बांधून घायचे आहे.हे पोटे तुम्हाला अंधार असलेल्या खोलीत/ठिकाणी ठेवायचे आहे.

आणि त्यावर पाणी टाकत राहायचे जेणे करून त्यात ओलावा कायम रहित.आणि ५ दिवसा नंतर हे पोटे सोडून बघायचे.आता बियाणाची पाहणी करायची व जे बी उगवले नाही ते बाजूला घेऊन मोजायचे आहे.हे बी जर ५ निघाले आणि ९५ बिया उगवल्या तर समजायचे कि या बियाणाची उगवण क्षमता ९५% आहे.

बियाणे उगवण क्षमता करताना एक गोस्ट लक्षात घ्यावी कि, बियाणाची उगवण क्षमता जर ७० ते ८० टक्के किंवा त्यावर असेल तर हे बियाणे पेरणी किंवा लागवडीसाठी चांगले आहे.७० % पेक्षा कमी उगवण असेल तर ते बियाणे शेतकऱ्यानी वापरू नये.

सोयाबीन बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करणे हे आताच्या काळात अतीशय महत्वाचे आहे.कारण बरेच शेतकरी बीज उगवण तपासणी करतात आणि बियाणाची पेरणी/लागवड करतात मात्र मग लक्षात येते कि बियाणे खूपच कमी उगवले.खार पहिले तर हे बियाणे चांगले असतात मात्र जमिनीत बियाणे पेनरी नंतर बियाणाला बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

हेच नाही तर बियाणे चांगले उगवले मात्र काहीच दिवसात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा तसेच कीटकांचा प्रादुर्भाव होतो म्हणून बियाणाला बुरशीची तसेच कीटक नाशकाची व वेगवेगळ्या जिवाणूंची प्रकारीया करावी. चला आता जाणून घेऊया प्रशांत पाटील यांनी कोणती बीज प्रक्रिया केली.

आपल्याला आपल्या जमिनीसाठी लागणाऱ्या बियाणाच्या प्रमाणानुसार पुढील व्यवस्थापन करायचे आहे.जर आपल्याकडे १५ किलो बियाणे असेल तर त्यासाठी आपल्याला २५० ग्राम PSB ,२५० ग्राम रायझोबियम,३०० मिली पाणी १०० ग्राम गुळ तसेच बुरशीचा प्रभाव होऊ नाही म्हणून ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणास 10 ग्रॅम असे मिश्रण बनवून बियाणाला लावायचे आहे.गुळाचा फायदा असा कि हे चिकट असल्या कारणाने बियाणाला योग्य पद्धतीने लागते.सोबतच आपण वापरलेल्या जिवाणूंची संख्या वाढ

सोयाबीन लागवड पद्धत 2023 | Soyabin lagvd padhat 2023

बरेच शेतकरी मित्र पारंपरिक पद्धतीने पेरणी करतात आणि याच कारणाने त्यांचे उत्पन्न घटते असे म्हणायला काहीच हरकत नाही.कारण पारंपरिक शेती मध्ये बियाणे अधिक प्रमाणात वापरले जाते त्यामुळे पीक दाटते आणि ते फक्त उभट वाढते त्याचे फुटवे होत नाही.

सोयाबीनचे जास्त उत्पन्न घ्याचे असतील तर मात्र प्रशांत पाटील यांच्यासारखे लागवडीचे अंतर किंवा लागवडीची पद्धत तुम्हाला घ्यावी लागेल.प्रशांत पाटील हे सोयाबीन लागवडीसाठी बेड पद्धतीचा वापर करतात.त्यांनी अगोदर शेतात ३.५ फुटाचे बेड पडून घेतले आणि मग नंतर बेडच्या उतरत्या दोन्ही बाजूने एका ठिकाणी ३-३ बियाणे टोकन केले. टोकन करत असताना दोन तासातील अंतर १ फूट आणि दोन झाडातील अंतर ९ इंच आहे.

ज्यामुळे झाडात मोकळी जागा राहते आणि सोयाबीन फुटवे करते. बेड लागवड पद्धतीचा फायदा असा कि जास्त पाऊस झाला तर बेडच्या मधीं असलेल्या नालीतून पाणी निघून जाते.जरी जमिनीत पाणी साचून राहिले तर सोयाबीनच्या पिकावर फारसा परिणाम होत नाही किंवा मुळावर बुरशी येत नाही आणि पाऊस कमी झाला तर बेड मध्ये ओलावा टिकून राहते.

सोयाबीन खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे.आपण जर खत योग्य पद्धतीने दिले तर जास्त उत्पादन होते कारण ज्या प्रमाणे आपल्याला जेवण आवश्यक असते आणि आपण योग्य आहार घेतला तरच आपले शरीर सुधृढ राहते व आपण जास्त काम करू शातो त्याच प्रमाणे पिकाचे देखील आहे.

पिकाला देखील रोगमुक्त राहण्यासाठी योग्य खताची आवशकता असते.
आपण सर्व शेतकरी पेरणी करताना खत देत असतो मात्र प्रशांत पाटील यांचं मात्र थोडं वेगळं गणित आहे.ते पूर्व मशागत करताना खताचे व्यवस्थापन करतात.हे पाहून तुम्हाला त्यांची पद्धत चुकीची वाटेल मात्र कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.

प्रशांत पाटील यांनी पहिले नांगरणी केली आणि मग रोटर केले आणि त्या नंतर खताचे व्यवस्थापन केले.रोटर केल्या नंतर सिंगल सुपर फॉस्पेट ( SSP) एकरी ३ बॅग म्हणजे १५० किलो अधिक निंबोळी पेंड एक बॅग ५० kg,हि पेंड वापरल्यास मुळ्यांना कीड लागत नाही.

सोबत १० किलो सल्फर अधिक ३० किलो पोटॅश असे एकूण मिश्रण बनवून ट्रॅक्टरने बेड पाडण्याचे अगोदर जमिनीवर फेकून द्यायचे आणि नंतर बेड पडून घ्यायचे म्हणजे टाकलेले खत बेडमध्ये चांगल्या प्रकारे बुजून जाईल.आणि जर तुमच्या जमिनीचा PH कमी असेल तर मात्र तुम्हाला जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी जीप्सम टाकावे लागेल.

सोयाबीन तणनाशक व्यवस्थापन

आपण सोयाबीन उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व गोष्टी करतो मात्र तणनियंत्रण हे न केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर म्हणजे ७० % उत्पन्न घटते .त्यामुळे तणनियंत्रण हि बाब महत्वाची आहे.तणनियंत्रण दोन प्रकारे आपण करू शकतो एक मजूर लावून निंदण करून किंवा मग रासायनिक तणनाशकाचा वापर करून.वेळेवर मजूर मिळत नाहीत त्यामुळे रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणनियंत्रण सोपं आहे.

प्रशांत पाटील यांनी पेरणी नंतर लगेच फवारणी करण्याचे तणनाशक फवारणी केली.हे तणनाशक फवारणी केल्यास ४० दिवसा पर्यंत कोणतेच तण उगवत नाही.मार्केट मध्ये अनेक तणनाशक मिळतात त्यापैकी तुम्ही कोणतेही एक तणनाशक वापरू शकता मात्र Oxyflourfen हा घटक चांगला आहे.याची फवारणी पेरणीनंतर २४ तासाच्या आता करायची आहे.प्रति एक लिटर पाण्यासाठी १ मिली असे प्रमाण घ्यायची आहे.फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.तरच हे चांगल्या प्रकारे तणनियंत्रण करू शकते.

सोयाबीन कीटकनाशक नियंत्रण

कोणत्याही पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घायचे झाल्यास त्या पिकावरील कीड/कीटक नियंत्रण करणे आवश्यक असते नाहीतर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास ७० ते १००% नुकसान होण्याची शक्यता असते.पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो म्हणून योग्य वेळी योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

फवारण्याचे व्यवस्थापन करत असताना आपले पीक किती दिवसाचे आहेत हे लक्षात घ्यावं व त्यानुसार दिवसाचे अंतर घ्यावे.सोयाबीन लवकर येणारे असल्यास फवारण्या लवकर लवकर घ्याव्या.किंवा मग उशिरा येणारे सोयाबीन असल्यास जास्त काळ प्रभाव करणारे कीटक नाशक वापरावे.

टीप :- हे फवारणीचे व्यवस्थापन फुले अग्रणी या वाणासाठी प्रशांत पाटील यांनी केलेले आहे .तेव्हा आपण निवड करत असलेलं वाण किती दिवसाचं आहे? त्यावर कोणते रोग येतात? या गोष्टीचा विचार करून फवारण्यात व्यवस्थापन करावे.

सोयाबीन पहिली फवारणी

पहिली फवारणी हि पीक लागवडीपासून १० व्या दिवशी करावी .या फवारणीमध्ये क्लोरोपायरीफॉस १ मिली प्रति १ लिटर पाण्यासाठी घ्यावे.तुम्ही हे कोणत्याही कंपनीचे क्लोरोपायरीफॉस घेऊ शकता.शेंद्रीय शेती करत असाल तर निंबोळी अर्कांची फवारणी करता येईल.

सोयाबीन दुसरी फवारणी

दुसरी फवारणी हि अतिशय महत्वाची ठरते, कारण आता पीक मोठे झालेले असते आणि त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला असतो.आणि त्यावर योग्य फवारणी घ्यावी.हि फवारणी लागवडीपासून २५ दिवसाणी घ्यावी.ज्यामध्ये १९ : १९ : १९ हे विद्राव्य खात ४ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी अधिक सूक्ष्मअन्नद्रव्य ( micronitron ) ३ ग्रॅम पती १ लिटर पाण्यासाठी.

सोयाबीन तिसरी फवारणी

तिसरी फवारणी हि लागवडीपासून ४५ दिवसांनी घ्यावी.आता तुमचे पीक फुलावस्थेमध्ये असते.५% फुल दिसत असताना हि फवारणी तुम्हाला घायची आहे.त्यामुळे या वेळी देखील एक फवारणी तुम्हाला घायची आहे.या फवारणीत क्लोरोपायरीफॉस ५०% २ मिली प्रति १ लिटर पाण्यासाठी अधिक १२ : ६१ : ०० हे ४ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी असे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

सोयाबीन चौथी फवारणी

चौथी फवारणी हि लागवडीपासून 7० दिवसांनी घ्यावी.आता तुमचे पीक शेंगा आवस्थेमध्ये असते.हि फवारणी शेंगा भरण्यासाठी महत्वाची ठरते.फवारणीत m45 बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी अधिक 00 : 52 : 34 हे 5 ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी असे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

सोयाबीन पाचवी फवारणी

हि शेवटची फवारणी असून हि फवारणी फारच महत्वाची आहे. कारण हि फवारणी तुमच्या दाण्याचा आकार व सोयाबीनचा चकाकी वाढवते तसेच शेंगा लवकर भरायला मदत करते.या फवारणीत ०० ०० 50 हे विद्राव्य खात 7 ग्रॅम अधिक m45 हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी.

शेतकरी मित्रानो सोयाबीनच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी खालील काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या

१) पेरणीसाठी फक्त २0 ते २२ किलो बियाणे वापरावे.
२) लागवडीसाठी- १२ ते १५ किलो बियाणे वापरावे
3)तांबेरा रोग,जिवाणूजन्य ठिपके रोगासाठी प्रतिकारक्षम वाण निवडावे
4) सुपिक व मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन पेरणीसाठी निवडावी.
5) नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा..
४) पेरणी योग्य वेळी करावी.
६) पेरणीच्या अगोदर बियाणे उगवणशक्ति तपासून पाहावी.
७) शक्यतो शेतक-यांनी घरचे बियाणे वापरावे.
८) बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करूनच बियाणे पेरावे .
९) बियाणे जास्त खोलवर पेरू किंवा लावू नये.
१०) उताराला आडवी तसेच पूर्व- पश्चिमी पेरणी करावी.
११) पीक फुलो-यावर असताना कोणत्याच कीटकनाशकाची फवारणी करू नये.त्याने फुलगळ होण्याची शक्यता असते.
१२) चिभडं जमीन असेल तर बेडवर लागवड करावी.
१3) योग्य वेळी फवारणी व तणनियंत्रण करावे.