Tag Archives: 2000 note banned news

२००० हजार रुपये नोटबंदी | 2000 note banned news | RBI withdraws Rs 2000 notes from circulation

हजार रुपयांची नोट बंद झाली का? | 2000 note banned news

सध्या २ हजार रुपयाच्या नोट बंदीची जोरदार चर्चा सुरु आहे मात्र दुसरीकडे आणखी एक चर्चा जोरदार वायरल होत आहे कि, २ हजाराची नोट बंदी झालीच नाही.आता नेमकं खरं काय हे जाणून घेणे अतिशय गरजेचं आहे .तेव्हा हा लेख पूर्ण वाचा. या बातमी पात्रात आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

२ हजाराची नोट बंदी झाली हे खरं आहे मात्र नोट बंदी बाबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून पर्यंत नागरिकांना माहित नसल्या कारणाने ते गोंधळलेले आहेत. मात्र आता हा संपूर्ण गोंधळ कायम दूर होणार आहे

नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख काय? | नोटा परत करायची तारिख काय

2000 note banned news :- नोट बंदी संदर्भात RBI कडून जरी करण्यात आलेल्या परिपत्रकात २००० रुपयाच्या नोट बंदी बाबत स्पस्ट करण्यात आले आहे कि,२ हजार रुपयांची नोट हि चलनातून हटविण्यात अली अली असली तरी वैध चलन म्हणून नोटेचा दर्जा कायम राहणार आहे असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( Reserve Bank of India ) यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

हे वाचा-गॅस झाला स्वस्त – गॅस सिलेंडर साठी मोठी सबसिडी जाहीर

आता आपण जाणून घेऊयात कि नोटा बदलून किंवा परत करण्याची शेवटची तारीख काय? हि नोट बंदी १७ मे पासून जाहीर करण्यात अली असून 23 मे २०२३ पासून नागरिकांना आपल्याकडील २ हजार रुपयाच्या नोटा बदलून घेता येतील.बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत लोकांनी अजिबात गर्दी करू नाही कारण २ हजाराची नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख हि ३० सप्टेंबर आहे.हेच नाही तर हि तारीख आणखी वाढविली जाऊ शकते.

२ हजाराच्या नोटा बँकेत जमकरण्या संदर्भातील RBI चे पत्रक

२ हजाराच्या नोटा बँकेत जमकरण्या संदर्भातील RBI चे पत्रक मराठीत वाचा

2000 note banned news

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

प्रिय महोदय / महोदया,

₹ 2000 मूल्याच्या बँक नोटा – चलनातुन पैसे काढणे; कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहील

कॅप्शन दिलेल्या विषयावरील आमच्या परिपत्रक DCM(Plg) No.S-236/10.27.00/2023-24 दिनांक 19 मे 2023 च्या पुढे, खालीलप्रमाणे सल्ला दिला जातो:

  1. काउंटर ओलांडून ₹ 2000 च्या नोटा बदलण्याची सुविधा लोकांना नेहमीच्या रीतीने प्रदान केली जाईल, म्हणजे, पूर्वी प्रदान केली जात होती.
  2. उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन शाखांमध्ये छायांकित प्रतीक्षा जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी योग्य पायाभूत सुविधा पुरविण्याचा बँकांना सल्ला दिला जातो.
  3. बँकांनी ₹2000 च्या बँक नोटांच्या ठेवी आणि विनिमयाचा दैनंदिन डेटा खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये राखून ठेवला पाहिजे आणि जेव्हा मागवले जाईल तेव्हा ते सबमिट करावे.

नोटा बदलून घेतांना या गोष्टी अनिवार्य

2000 note banned news :- ह्या नोटा बदलून घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत, त्या आपण थोडक्यात जाणून घेऊयात.प्रत्येकाला एक प्रश्न पडला आहे कि,कोणाला २ हजार रुपयाच्या नोटा बदलून घेता येतील?तुम्हाला जर नोटा बदलून पाहिजे असतील तर तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहेत.बँकेत खाते असतील तरच तुम्हाला ह्या नोटा बदलून मिळतील असं काही नाही,

तुमचे बँकेत खाते नसतील तरीही तुम्हाला २ हजाराच्या नोटा बदलून मिळतील मात्र त्यासाठी तुम्हाला ओळखपत्र किंवा काही कागदपत्र दाखवावे लागतील..हे कागदपत्रे खालील प्रमाणे असतील.

नोटा बदलताना लागणारी कागदपत्रे

तुमचे बँकेत खाते नसल्यास २ हजार रुपयाच्या नोटा बदलून घेण्यासाठी खालील पैकी कोणतेही एक ओळखपत्र बँक तुम्हाला मागू शकते.तुमच्याकडे ओळखपत्र नसल्यास मात्र तुम्हाला नोट बदलून मिळणार नाही

2000 note banned news

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) ड्रायविंग लायसन्स
४) पासपोर्ट

FAQ

1) २००० च्या नोटा वैध आहेत का ?


३० सप्टेंबर पर्यंत २ हजाराची नोट चलनात राहणार आहे ती बंद झाली असं म्हणून ती घेणे कोणताच दुकानदार नाकारू शकत नाही.दुकानदाराने असा कोणताही प्रकार केल्यास त्या दुकानदारावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.

2) २००० च्या नोटा कशा बदलून घेता येणार?

२ हजार रुपयांची नोट कोणत्याही बँकेत किंवा बँकेच्या शाखेत बदलून घेता येणार.मात्र तुमचे बँक शाखेत खाते नसल्यास तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.

3) २ हजाराच्या नोटा बदलण्याची मर्यादा किती? What is the maximum limit of return 2000 note to bank?

तुम्हाला २ हजार रुपयांची नोट बदलून दिली जाणार आहे, मात्र त्यासाठी RBI बँकेने मर्यादा घातली आहे.एक
व्यक्ती एक दिवस फक्त २० हजार रुपये बदलू शकतो. या पेक्षा जास्त नोटा बदलायच्या असल्यास तुम्ही घरातील अनेक सदस्यांना बँकेत घेऊन येऊन जास्त नोटा बदलू शकता.

4) बँकेत ओळखपत्राची गरज आहे का ?

तुम्हाला २ हजाराची नोट बदलवायची असेल तर हा मुद्दा जरूर समजून घ्या.तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्हाला बँकेत कोणतेही ओळख प्रमाणपत्र लागणार नाही. मात्र जर बँकेत तुमची खाती नसतील तर मात्र तुम्हाला बँकेत ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.