Tag Archives: Amrut Pattern cotton

Amrut Pattern cotton | Amrut Deshmukh यांचे अमृत पॅटर्न कापूस लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती | Amrut Pattern kapus lagvad

एकरी ५१ क्विंटल उत्पन्न घेण्यासाठी Amrut Pattern cotton लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती

Amrut Pattern cotton लागवड पद्धत देते एकरी ३० क्विंटलची सहज हमी. शेतकरी मित्रानो, तुम्हाला कुणी विचारलं कि तुम्ही कापसाचे एकरी किती उत्पन्न घेता तर तुमचं उत्तर असेल ४ ते ५ क्विंटल.काही शेतकरी १० ते १५ क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न घेतात मात्र एकरी ५० क्विंटल उत्पन्न घेणारा एक शेतकरी आहे असे म्हणलं तर मात्र तुमचा विस्वास बसणार नाही.हो शेतकरी मित्राणो असा एक शेतकरी आहे आणि खरचं ५० क्विंटल उत्पन्न त्यांनी घेतलं आहे.हे सर्व फक्त Amrut Pattern cotton पद्धतीमध्येच शक्य आहे.

चला तर शेतकरी मित्रानो आपलं देखील उत्पन्न आता ५ ते १० क्विंटलहून वाढून ३० क्विंटल पर्यंत नेऊया .आज आपण या शेतकऱ्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.त्यांच्या लागवड तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत.हा शेतकरी कुठला आहे?त्यांचं तंत्र काय?त्यांची लागवड पद्धत कशी आहे? हि संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

अमृत पॅटर्न काय आहे त्याचा उदय कसा झाला? | Amrut Pattern cotton farming

Amrut Pattern cotton :-भारतातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी हि लागवड पद्धत असून, हि पद्धत अंबोडा गावातील महागाव तालुका असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील अमृतराव देशमुख यांनी विकसित केली आहे.सुरुवातीपासूनच अमृतराव देशमुख( amrut deshmukh ) यांना शेतीची मोठी आवड होती. मात्र वडिलांनी शेतीची जबाबदारी खांद्यावर टाकली तेव्हापासून त्यांनी आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करायला सुरुवात केली.असा करत असताना पट्टा पद्धत म्हणजेच जोडओळ पद्धत फायद्याची वाटली.

कारण त्यांनी अगोदर सूर्यप्रकाश आणि हवा यावर खूप अभ्यास करून त्याच्या लक्षात आलं होत कि पिकांना जेव्हढा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहात तेव्हढं उत्पन्न वाढत आहे.त्यामुळे पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला आता हळू हळू त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ लागली .त्यांची शेती पाहण्यासाठी अंबोडा गावात शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली.पाहता पाहता त्यांचे एकरी उत्पन्न ३० क्विंटलवर पोहचले.

सोयाबीनचे एकरी ३० क्विंटल उत्पन्न पाहिजे असेल तर इथे क्लिक करा.

एव्हढे जास्त उत्पन्न त्यांना घेण्यासाठी त्यांना खूपच कमी खर्च येत होता.मात्र सर्वसामान्य लोकांना खर्च जास्त आणि उतपन्न कमी होत होत त्यामुळे लोकांना त्यांची पद्धत जास्तीच फायदेशीर वाटली आणि भेट देणार्या शेतकऱयांनी या पद्धतीला अमृत देशमुख यांचंच नाव देऊन अमृत पॅटर्न पद्धत उदयास आली.आता पर्यंत हजारो शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न चा अवलंब केला असून त्यांच्या उत्पन्नात दुपटीची वाढ झाली आहे.

चला तर शेतकरी मित्रानो आपण आता अमृत पॅटर्न चे पूर्वमशागत पासून तर काढणी पर्यंतचे पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.हे खालील मुद्याच्या आधारे आपण समजून घेऊया.

अमृत पॅटर्न जमिनीची पूर्व मशागत व्यवस्थापन

नांगरणी

पूर्वी जमिनीची मशागत बैलाच्या साहायाने नगर वापरून करत होत होती.मात्र जमीनीची मशागत करण्यासाठी आज शेतकरी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे.हि पूर्वमशागत कधी करावी हेच शेतकर्याना काळात नाही.कारण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बरेचसे शेतकरी ऐन पेरणीच्या वेळेस नांगरणी करतात.हे चुकीचे
आहे.

जमीनीची मशागत खरीप / रब्बी पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर लगेच करावी.त्यामुळे जमिनी चांगल्या तापल्या जावून जमिनीत असलेले शत्रु कीडींचा होते .त्याचबरोबर हानिकारक बुरशीचा नाश होईल.यामुळे किडींचे एकात्मीक नियंत्रन देखील करता येईल. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची पूर्व मशागत हि तीन फाळी नांगराच्या साहाय्याने करावी. बरेचसे शेतकरी ट्रॅक्टरनेच आरे पाडून नांगरणी करतात. त्यामुळे जमिनीची लेवल बिघडते. शेतात काही ठिकाणी नाल्या पडून बांध तयार होतात.

त्यामुळे कापुस उत्पादनात ३ ते ४ क्विंटल घट येते. म्हणुन जमिनीची मशागत ट्रॅक्टरने करीत असतांना तीन फाळी पलटी नांगराचे साहाय्याने मशागत करावी.किंवा जमिनीची लेव्हल बिघडल्यास रोटरने लेव्हल करून घ्यावी. जमीन चिबाडी असल्यास किंवा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यास जमीनीमध्ये रोटाविटरच्या सहायाने मशागत करावी. यामुळे जमीन भुसभुशीत होता.व पेरणीला/लागवडीला सोपे जाते.

वखरणी


नांगरणी केल्यानंतर जमीन चांगली तापू द्यावी व त्या नंतर एकदा वखरणी करून घ्यावी.त्यानंतर पेरणीपुर्वी एकदा जमिनीची चांगली वखरणी करावी.हि वखरणी केल्यास जमिनीतून निघत असलेले टॅन मारते.सोबतच २० % तणांचा प्रार्दुभाव कमी होतो. तसेच जमीन भुसभुशीत होते.

जमीनीची मशागत करण्याबरोबर जमीनीचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. जमीनीमध्ये अधिक प्रमाणात चढ उतार असल्यास पाणि जास्त प्रमाणात झाल्यास पाणी वेगाने वाहून जाते. तसेच सोबत वरची सुपीक माती सुध्दा वाहून जाते. त्यामुळे जमीनीमधील सुपीकता कमी होते. पाणी देण्यास अडचण होते. जमिनीचे सपाटीकरण करणे अतिषय महत्वाचे असते.तेव्हा हे देखील काम करून घ्यावे.

लागवडी पूर्व शेणखताचा वापर (नियोजन)

अमृतराव देशमुख यांच्या मते शेतकरी मित्र आता मोठ्या प्रमाणावर रासायनिक खातांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. शेतकऱयांनी जर या वर्षी शेतात ४ बॅग रासायनिक खत दिले तर दुसऱ्या वर्षी ६ बॅग टाकावे लागतील आणि नंतर तेवढेच उत्पादन घेण्याकरीता तिसऱ्या वर्षी ८ बॅग रासायनिक खताचा उपयोग करावा लागेल.अशा रासायनिक खतांच्या वापरामुळे कालांतराने आपली शेती पिकणार नाही तर शेती बंजर होईल/नापीक होईल.

रासायनिक खतांच्या अतिवापराने शेतातील जिवाणु नष्ठ होत आहेत. परिणामी उत्पन्नात मोठी घाट होते.त्यामुळे शेतीतील उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतामध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा लागणार आहे.जर तुम्हाला आपल्या शेतीमध्ये ३० क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर एक एकर जमीनीमध्ये ८ बैलगाड्या किंवा दोन ट्रॉली शेणखत टाकणे आवश्यक आहे.असे खताचे व्यवस्थापन केल्यास हे शक्य होईल.

शेणखत तयार करण्याची सोपी पध्दत

शेणखत हे आपल्या जमिनींसाठी खूप महत्वाचं आहे,शेणखत हे खत नसून जण=मिनिट असलेल्या आवश्यक जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणून रासायनिक खत व्यवस्थापण सुर्यप्रकाश / पाणी व्यवस्थापण जेवढे महत्वाचे आहे तेवढेच शेणखताची प्रक्रिया सुध्दा महत्वाची आहे.अमृतराव देशमुख यांनी शेणखतामध्ये पण बरेच प्रयोग केलेले आहे. इतर प्रयोगापेक्षा हा प्रयोग कमी मेहनतीचा असून जिवाणूंची संख्या या पध्दतीमध्ये भरपुर प्रमाणात वाढते. शेतकरी शेणखत शेतात नेवून टाकत असतात. तेव्हा आपण ते शेणखत पाहीले तर ओल्या चिखला प्रमाणे तसेच थापीच्या थापी निघतात.

त्या शेणखतात भरपुर प्रमाणात उष्णता असते. ही शेणखत गरम असल्यामुळे त्या शेणखतामध्ये जिवाणूंची संख्या वाढणार नाही. आपण पाहीले तर उकंडयाच्या वरच्या बाजुस मोकळया जागेवरील शेणखत चहा पत्ती सारखे मोकळे दिसते. कारण त्या शेणखतामध्ये जिवाणूंची संख्या भरपुर वाढलेली असते. त्यामुळे उष्ण असलेल्या उकंडयात जिवाणूंची संख्या वाढणार नाही आपणांस व या शेणखतास जिवाणूंची संख्या वाढवायची असल्यास ते शेणखत मार्च ते एप्रिल महिन्यात उपसून ज्या शेतात आपल्याला कापसाची लागवड करावयाची आहे. त्या शेतात झाडाच्या सावलीखाली १० बाय १५ चा ‘ढिग करावा.

शेतात झाडाची सावली नसेल तर त्यावर पोत्याच्या साह्याने चांगले झाकून ठेवावे.किंवा नेटची बांधणी करून तुम्ही सावली तयार करू शकता जेणेकरून ते खत थंड राहील व त्यातील उष्णता निघून जाईल.व शेण खतातील उष्णता आपल्याला काढून टाकायची आहे त्यासाठी त्या शेणखतावर भरपूर पाणी टाकायचे आहे आणि पूर्ण खत थंड झाल्यानंतर आता समोर आपल्याला काही काम करायचं आहे ते म्हणजे आता आपल्याला शेणखताची प्रक्रिया करायची आहे.

त्यामध्ये अझीटोबॅक्टर ४ किलो अधिक PSB ४ किलो अधिक ट्रायकोडर्मा ४ किलो हे जिवाणूखाते व बुरशीनाशके ५० लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिश्रण करून टाकलेल्या शेणखतावर शिंपडून द्यावे व मग त्या खताला पोत्याच्या किंवा शेतात असलेल्या कुटाराच्या साह्याने झाकून ठेवावे .आणि ४ ते ५ दिवसाने त्यावर पाणी टाकत राहावे. ते शेणखत ओले राहील यांची काळजी घ्यावी .आता ते चांगल्या प्रकारचे कुजलेले खत तयार होईल.

अमृत पॅटर्न मध्ये कोणत्या कापूस वाणाची निवड करावी | cotton seeds

कापूस पीक घ्यायचे असेल तर मात्र वाणाची निवड हि खूप विचार पूर्वक करावी लागते.तेव्हा कापसाची वाण निवडताना तो वाण आपल्या जमिनीच्या व कालावधीच्या हिशोभाने निवडावे.म्हणजेच भारी जमीन असल्यास तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास उशिरा येणारे वाण निवडावे व माध्यम जमीन किंवा कोरडवाहू असल्यास
तोंडही लवकर जाणारे वाण निवडावे.

कापूस लागवड करत असताना वेळ हि देखील खूपच महत्वाचे ठरते.खार पाहिलं तर पाण्याची उपलब्धता असेल तर २० मी ते १ जून दरम्यान कापूस लागवड करावी .या कालावधीच्या पिकांना जास्त उत्पन्न मिळते आणि जर कोरडवाहू किंवा मध्यम जमीन असेल तर १ जून ते २५ जून पर्यंत लागवड व्हायला पाहिजे .
वाण निवडत असताना काही विशेषता वाणात असाव्या.

१) वाण लांब धाग्याचे असावे. त्याला बाजार भाव चीनला लागतो.
२) वाण हवामानातील बदलास सहनशील असावे.
३) किडी व रोगास बाली पडणारे वाण नसावे.
४) बागायती जमिनींसाठीचे वाण पुनरबहार घेण्यायोग्य असावे
५) वाणाचे बॉण्ड मोठे असावे.
६) वेचणीस सोपे असावे.

अमृत पॅटर्न ची लागवड पध्दत


अमृत पॅटर्न चे उत्पन्न वाढीसाठी काही मुद्दे खूपच महत्वाचे आहे.आणि याच आधार हि पद्धत एव्हढे जास्त उत्पन्न देऊ शकते.सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि योग्य पिक पोषण या तीन गोष्टी कोणत्याही पिकासाठी महत्वाच्या असतात. यापैकी सुर्यप्रकाश आणि हवा नैसर्गीक घटक प्रत्येकाकडे सहजच उपलब्धआहेत.मात्र ते भरपुर प्रमाणात पिकांना कसे मिळतील यावर शेतकऱ्यांना जास्त काम करायचं आहे.असे केल्यास त्याचा उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो.यासाठी पिकाची लागवड करतांना दक्षता घ्यावी लागते.


पिक पेरणी करतांना किंवा लागवड करतांना पिकाच्या दोन ओळीत योग्य अंतर ठेवायचे आहे ज्यामुळे पुढे पिकाला जास्त प्रमाणात सुर्यप्रकाश आणि हवा मिळेल. हे अंतर कीती असावे आणि अंतर असून एकरी झाडांची संख्या अधिक असावी. यावर अमृतराव देशमुख यांनी अनेक वर्षापासून प्रयोग केलेले आहेत .गेल्या ४ वर्षापासून कापुस लागवडीमध्ये त्यांनी पट्टा पध्दतीचा (जोडओळ) अवलंब केला आहे. पट्टा पध्दतीमध्ये पिकास भरपुर प्रमाणात सुर्यप्रकाश व हवा मिळते. त्यामुळे याच पट्टा पध्दतीचा अवलंब शेतकरी मित्रानो तुम्हाला करायचा आहे.

ही पद्धत वापरून त्यांनी मागील वर्षी एकरी ५१ क्विंटल कपासीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
त्यांनी वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळी पद्धत सांगितली आहे.या पद्धती तुमच्या असणाऱ्या जमिनीनुसान असणार आहेत.त्यांनी एकूण चार पद्धती सांगितल्या आहेत ज्या खालील प्रमाणे आहेत आणि त्या आता आपण सविस्तर पाने पाहणार आहोत.

जमीन ओळीतील अंतर झाडातील अंतर एकरी झाडाची संख्या एकरी उत्पन्न
भारी 5 x 5 x 7 x 11726045 ते 50 क्विंटल
भारी 4 x 4 x 8 x 1 1 726035 ते 39 क्विंटल
माध्यम4 x 4 x 6 x 11871230 ते 35 क्विंटल
माध्यम3 x 3 x 6 x 11968022 ते 28 क्विंटल

5 x 5 x 7 x 1 अंतर लागवड पद्धत


हि लागवड पद्धत फक्त तुम्हाला भारी जमिनीतच वापरायची आहे.कारण हे अंतर खूप मोठं आहे आणि भारी जमिनीतच झाडाचा चांगला विकास होतो आणि योग्य व्यवस्थापन देखील करता येते.चला आता लागवड पद्धत समजून घेऊ या पद्धती मध्ये एक पट्टा ७ फुटाचा असतो तर त्यानंतरचा दुसरा व तिसरा पट्टा यातील अंतर ५ फुटाचे असते म्हणजेच इथे ५ फुटाची जोडओळ असते आणि त्यानंतर परत ७ फुटायचा पट्टा असते.

अशा प्रकारे संपूर्ण शेतात लागवड केली जाते.आता समजून घेऊया दोन झाडातील अंतर.अशी लागवड करत असताना दोन तासात अंतर जास्त असल्याने आता दोन झाडातील अंतर कमी करून जास्त झाडाची संख्या एकरी वाढविण्यासाठी दोन झाडातील अंतर फक्त १ फूट ठेवावे.यापेक्षा जास्त अंतर ठेऊ नये झाडाची संख्या कमी बसेल.

हे अंतर कसे आहे हे खालील आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊ

4 x 4 x 8 x 1 अंतर लागवड पद्धत

हि लागवड पद्धत देखील तुम्हाला भारी जमिनीतच वापरायची आहे.तशी हि पद्धत तुम्हाला मध्यम जमिनीत देखील वापरता येते मात्र तुम्हाला पाण्याची आवशकता लागेल.या पद्धतीत ४ फुटाचे ठिबक चांगल्या प्रकारे काम करते.चला आता लागवड पद्धत समजून घेऊ. या पद्धती मध्ये एक पट्टा ८ फुटाचा असतो तर त्यानंतरचा दुसरा व तिसरा पट्टा यातील अंतर 4 फुटाचे असते म्हणजेच इथे 4 फुटाची जोडओळ असते आणि त्यानंतर परत ८ फुटायचा पट्टा असते.

दोन झाडातील अंतर कमी करून जास्त झाडाची संख्या एकरी वाढविण्यासाठी दोन झाडातील अंतर फक्त १ फूट ठेवावे.यापेक्षा जास्त अंतर ठेऊ नये झाडाची संख्या कमी बसेल.या पद्धतीमध्ये झाडाला चांगला सूर्यप्रकाश व हवा मिळते. या पद्धतीमध्ये कापसाची पातेगल होत नाही या पद्धतीमध्ये ७२६० झाडे बसतात.या लागवड पद्धतीत ३५ ते ४० क्विंटल पर्यंत उत्पन्न होते असे मत अमृतराव देशमुख यांचे मत आहे.


अंतर कसे कसे घ्यावे हे खालील आकृतीत दाखविले आहे.

4 x 4 x 6 x 1 अंतर लागवड पद्धत

हि लागवड पद्धत देखील तुम्हाला माध्यम जमिनीत वापरायची आहे.या पद्धतीत ४ फुटाचे ठिबक चांगल्या प्रकारे चालते.चला आता लागवड पद्धत समजून घेऊ. या पद्धती मध्ये पहिला पट्टा ६ फुटाचा असतो तर त्यानंतरचा दुसरा व तिसरा पट्टा यातील अंतर 4 फुटाचे असते म्हणजेच इथे 4 फुटाची जोडओळ असते आणि त्यानंतर परत 6 फुटायचा पट्टा असते.दोन झाडातील अंतर १ फूट ठेवायचे आहे

.हि पद्धत मध्यम जमिनीसाठी योग्य आहे भारी जमिनीमध्ये असे व्यवस्थापन करू नये.या देखील पद्धतीमध्ये कापसाची पातेगल होत नाही या पद्धतीमध्ये 8712 झाडे लागतात .या लागवड पद्धतीमध्ये ३0 ते 35 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न होते घेता येते.
खालील आकृती पाहून अंतर लक्षात घ्या.

3 x 3 x 6 x 1 अंतर लागवड पद्धत

हि लागवड पद्धत कोरडवाहू किंवा हलक्या जमिनीसाठी योग्य राहील.या पद्धतीमध्ये पहिया तासापासून दुसरे तास ६ फूट असते आणि त्या तासापासून तिसऱ्या तासाचे अंतर ३ चौथ्या तासाचे अंतर ३ फूट अशी जोडओळ असते जी खालची आकृतीमध्ये पाहायला मिळेल.दोन झाडातील अंतर हे एक फुटाचे ठिवावे.

या लागवड पद्धतीमध्ये ९६८० इतकी झाड बसतात. अमृतराव देशमुख यांच्या मते जर पारंपरिक पद्धतीत जर तुम्हाला ५ क्विंटल होत असेल त्यात दुपार वाढ होऊन १० क्विंटल होऊ शकते.बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पर्यंत १५ ते २५ क्विंटल पर्यंत उत्पन्न घेतलेले आहेत.

अंतर कसे कसे घ्यावे हे खालील आकृतीत दाखविले आहे.

Amrut Pattern cotton लागवड करताना ह्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या.

हि लागवड पद्धत काही विशेष गोष्टीवर काम करताना दिसते त्यामुळे आज तुम्हाला अमृत पॅटर्न नुसार शेती करायची असेल तर ह्या गोष्टीचे काटेकोर पाने पालन करा.जर तुम्ही यातील कोणतीही एक गोष्ट चुकविली तरी तुम्हाला उत्पन्नात वाढ होणार नाही हे लक्षत घ्यावे.


१) बियाणे लागवड करताना एका ठिकाणी फक्त एकाच बी लावावी.
२) कापूस जमिनीच्या वर निघाल्यास लगेच चुका भरून घ्याव्या.
३) लागवड करताना सोबत खताचा वापर टाळावा.
४) जमिनीमध्ये ओलावा असतानाच शेणखत टाकावे.
५) झाडाचा शेंडा खुद्द नये.

अमृत पॅटर्न लागवडीचे फायदे


अमृत पॅटर्न पद्धत हि भारतातील सर्वात जास्त विक्रमी उत्पन्न देणारी लागवड पद्धत असून या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.


१) एकरी झाडाची संख्या अधिक बसते.
२) मोकळी जागा असल्याने फवारणी करण्यास खूप सोपे जाते.
३)सर्वात महत्वाची गोस्ट पतंगाला होत नाही.झाल्यास खूपच कमी प्रमाणात होते.
४) कापूस वेचायला सोपा जाते.
५) अंतर मशागतीसाठी सोपे जाते.
६) फवारणी करायला सोपे जाते व फवारणी चांगली होते.
७) तनव्यवस्थापन करायला सोपे जाते मजुरांचा खर्च कमी लागतो.
८) पाणी द्यायला सोपे जाते व पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते.

टीप-राहिलेली माहिती लवकरच अपडेट केली जाईल….धन्यवाद