Tag Archives: Animal feed

पशुखाद्य व वैरण योजना | Pashu khady vairan yojna | शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान

पशुखाद्य व वैरण योजना –शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान

शेतकरी मित्रांनो,तुम्ही जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर मात्र आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Pashu khady vairan yojna जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.

या बाबतचा शासनाकडून GR देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. ही योजना कशी असणार आहे? नेमका कोणाला लाभ मिळणार? तर पाहूयात याबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

दिनांक 21 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने हा हा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे.आणि या GR च्या माध्यमातून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.आता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत खालील नमूद विविध सहा उपघटकांचा समावेशकरण्यात आलेला आहे.

हि योजना सन २०२३-24 पासून राज्यात राबविण्यात शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आलेली आहे. खालील सहा उपघटकांचा एकेक करून या ठिकाणी आपण माहित पाहणार आहोत. शेतकऱ्यांच्या शेतावर वेरण उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा सरकारचा उद्देश आहे.शेतकरी मित्रानो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घायचा असेल तर लाभार्थीकडे वरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असणे आवश्यक असणार आहे

रेशन बाबत मोठी घोषणा-आता धान्या ऐवजी मिळणार पैसे
पहा तुम्हाला मिळणार का ?त्यासाठी इथे क्लिक करा.

या कार्यक्रमांतर्गत खालील वैरणीचे बियाणे वाटप केले जाणार आहेत.


१) ज्वारी
२) मका
३) बाजरी
४) बरसिम
५) लुर्सन
६) न्यूट्री फीड
७) नेपियर
८) यशवंत
९) जयवंत

अशाप्रकारे शेतकर्याना सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातीचे ठोंबरे वाटप केले जाणार आहेत.या योजनेअंतर्गत या ठिकाणी उल्लेख केलेले वैरण्य तसेच संदर्भातले बियाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत. शेतकरी मित्रानो ज्या लाभार्थीकडे स्वतःची पाकीट कमी तीन ते चार जनावरे आहेत अशा लाभार्थींना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.प्रत्येक लाभार्थीला एक एकरच्या क्षेत्रात चारा पीक उत्पादन घेण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर 1500 रुपये च्या मर्यादेत वैरणीच्या बियाण्यांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

हि वैरणीची नेमकी कुठून मिळणार :- वेरणीची बियाणे व ठोंब्याची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य बियाणे महामंडळ महाबीज किंवा इतर शासकीय संस्था किंवा कृषी विद्यापीठे,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र किंवा पशुधन विकास मंडळांतर्गत ची प्रक्षेत्रे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळा अंतर्गत ची प्रक्षेत्रे यांच्याकडून करण्यात यांच्या माध्यमातून उपलध करण्यात येणार आहेत.

संकरित किंवा देशी गोवंशीच्या कालवडी तसेच सुधारित देशी पारड्याची जोपासना करण्यासाठी अर्थसाह्य

पशुपालकांकडील संकरित / देशी कालवडी व सुधारित / देशी म्हशीच्या पारडया शास्त्रोक्त पध्दतीने जोपसण्यासाठी त्यांना सकस खाद्य देऊन तसेच, पशुपालकांना प्रशिक्षित करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित गायी व सुधारित म्हशींची निर्मिती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सदर योजनेमध्ये पशुखाद्याच्या स्वरुपात अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक व भूमिहीन शेतमजूरांस ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे व पशुपालकांकडील संकरीत / देशी कालवडी / सुधारीत / देशी पारड्यांचा विमा उतरविणे या सर्व गोष्टीवर भर देण्यात येणार आहे.


Pashu khady vairan yojna :- शेतकरी मित्रानो लाभार्थीकडील संकरित / देशी असलेल्या कालवडीस तिच्या वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ३२ महिन्यांपर्यंत खाद्य पुरविले जाणार आहे .त्यासोबतच सुधारित / देशी पारडीला वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ते ४० महिन्यांपर्यंत ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरविण्यात पुरविण्यात येण्याची तरतूद करण्यात अली आहे.

शेतीविषयक योजना व माहिती मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.
इथे क्लिक करा


हा खाद्य पुरवठा प्रत्येक महिन्याला देण्यात येणार नाही. खाद्य देणे सुरू केलेल्या तारखेपासून दर तीन महिन्याने खाद्य पुरवठा करण्यात येणार आहे.
खालील तक्त्या प्रमाणे खाद्य पुरवठा करणे बंधन कारक असणार आहे.

अ.क्र. कालवड / पारडीचे वय (महिना)प्रतिदिन पशुखादयएकुण पशुखादय
1४ था महिना१ कि.ग्रॅ.३० कि.ग्रॅ.
2५ वा महिना१.५०० कि.ग्रॅ.४५ कि.ग्रॅ.
3६ वा महिना१.७५० कि.ग्रॅ.५२.५०० कि.ग्रॅ.
4७ ते १८ महिने२ कि.ग्रॅ.७२० कि.ग्रॅ.
5१९ ते ३२ महिने २.५०० कि. ग्रॅ.१०५० कि.ग्रॅ.
6१९ ते ४० महिने२.५०० कि. ग्रॅ.१६५० कि. कि.ग्रॅ.

मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देण्याअंतर्गत सायलेज बॅक खरेदी 50% अनुदान.

Pashu khady vairan yojna :-शेतकरी मित्रांनो,बऱ्यापैकी शेतकरी घरच्या घरी मुरघास तयार करतात.मात्र ती साठवण करण्यासाठी शेतकऱ्याकडे बॅग उपलब्ध नसतात आता मात्र शेतकर्याची काळजी मिटली आहे. आता सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून मुरघास तयार केल्यानंतर त्याची साठवणूक करणाऱ्या बॅक खरेदी वर या 50% अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे.

Animal feed:-मित्रांनो या ठिकाणी मुरघास निर्मितीसाठी एकूण दहा पॉलिथिन बॅक खरेदी करतात प्रति पशुपालक 50 टक्के अनुदान याप्रमाणे रुपये 3000 रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी चांगली गोस्ट आहे.

त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी चांगली गोस्ट आहे.आणि मुरघास साठवणूक करण्यासाठी आता शेतकऱ्यांना खूप सोयीचे जाणार आहे.तेव्हा शेतकरी मित्रानो तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता.

मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान | शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान

Pashu khady vairan yojna :- शेतकरी मित्रांनो चौथा उपघटक खूप खास आहे कारण अगोदरच्या काही घटकामध्ये इतर गोष्टी मिळणार आहेत मात्र चौत्या उपघटक नुसार मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान या ठिकाणी मित्रांनो दिल्या जाणार आहे त्यामुळे हि शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल.

मुरघास खरेदी करिता कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान रुपये 7300 प्रति पशुपालक प्रति वर्ष इतके अनुदान या उपघटकांतर्गत दिले जाणार आहे.सोबतच मित्रांनो या ठिकाणी पाचवा उपघटकामधे टी एम आर टोटल मिक्स रेशन वापरासाठी दोन दुधाळ पशुधनासाठी प्रोत्साहन पर 33% अनुदान या ठिकाणी शेतकर्याना दिले जर आहे.

मित्रांनो टी एम आर खरेदी करिता कमल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान म्हणजेच या ठिकाणी 60 हजार रुपये प्रति पशु पालक प्रति वर्ष इतके या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो सहावा उपघटक आहे खनिज मिश्रण वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान मित्रांनो या ठिकाणी खनिज मिश्रण खरेदी करिता कमल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान रुपये 600 रुपये प्रति दुधाळ पशुधन प्रतिवर्ष अनुदान दिले जाणार आहेत.

एकरी ५१ क्विंटल उत्पन्न घेण्यासाठी Amrut Pattern cotton लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती