राज्यातील शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने केली मोठी घोषणा.आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मिळणार Ativrushti Nuksan Bharpai .चला तर शेतकरी मित्रानो जाणून घेऊया, हि मदत कोणाला मिळणार ? योजनेच्या पात्रतेची अट काय? कोणकोणते योजनेसाठी लागू आहेत? या बाबतची सविस्तर माहिती.
मात्र त्या अगोदर अशाच नवनवीन योजना व शेती विषयक माहिती थेट तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळवायची असेल तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.असे केल्यास थेट मेसेज तुम्हाला पाठविली जातील.ग्रुप लिंक खाली दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
१० हजाराची Ativrushti Nuksan Bharpai किती मिळणार ? कशी मिळणार?
राज्यात मागील ८ दिवसापासून अतिवृष्टी होत आहे त्यामुळे पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना शासनाच्या माध्यमातून १० हजार रुपयाची तात्काळ मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ज्याच्यामध्ये यवतमाळ वर्धा रायगड बुलढाणा या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
गेल्या दोन ते दिवसांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या परिस्थितीमुळे त्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेले अनेक गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरले,पीक व जनावराचे देखील मोठी हानी झाली.खरं पाहिलं तर अशा प्रकारे पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये नुकसान ग्रस्ताला दिले जातात.
आता मात्र शेतकरी मित्रांना नव्या सरकारचा मोठा तोफा म्हणजे आता ५ हजार ऐवजी आता राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या या नागरिकांना १० हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे.
१० हजार आर्थिक मदत मिळणाऱ्या नुकसानग्रस्त जिल्ह्याची यादी
Ativrushti Nuksan Bharpai : मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर,जळगाव,जामोद या भागामध्ये याच प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये याचप्रमाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने कहर केला आहे.
खरं पाहिलं तर ज्या गावांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्या गावात पंचनामे होतात.आणि त्या नंतरच शासनाची मदत मिळते, मात्र सध्या आपल्या कृषी मंत्र्यांनी ह्या अटीचा विचार न करता थेट तात्काळ निर्णय घेऊन अशा या नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मित्रांनो या जिल्ह्या व्यतिरिक्त सुद्धा शेती पिकांचा नुकसान झालेल्या जिल्ह्याचे पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर केली जाईल परंतु तातडीची मदत म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही दहा हजार रुपयाची मदत हा शेतकऱ्यांना एक मोठा आधार आहे.