Tag Archives: Ayushman bharat yojana

Ayushman bharat yojana आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार-मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Ayushman bharat yojana व mahtma fule jan arogy yojna यात झाला मोठा बदल.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची Ayushman bharat yojana यात आता मोठा बदल करण्यात आला असून लवकरच हे बदल झाल्यानंतर नवीन स्वरूपाच्या योजना लागू होणार आहेत.हा निर्णय नागरिकांसाठी महत्वाचा असून देशातील लाखो नागरिकांना आता मोठा फायदा होणार आहे.


चला तर पाहूया योजनेत काय बदक झाला कधी पासून नवीन योजना लागू होणार? कोणत्या नागरिकांना योजनेचा लाभ होणार या बाबतची सविस्तर माहिती.योजना व शेती विषयक माहिती आपल्या मोबाइलला वर मोफत मिळविण्यासाठी आमचा खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजनेत बदल झाला असून आता या योजनेअंतर्गत देशातील सर्वांना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 5 लाख रुपये विमा असलेले संरक्षण आता मिळणार आहे.आता लवकरच कार्ड वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहेत.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निरणार्यापैकी हा महत्वाचा निर्णय आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये राज्याच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तुम्हाला तर माहीतच असेल पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब 1.5 लाख होते आता त्यात बदल झाला असून 5 लाख रुपये एव्हढा करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचा लाभ आता घेता येणार आहे.

अगोदर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ फक्त अंतोदय व केशरी शिधापत्रिका धारकांना देण्यात येत होता आता मात्र राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना हा लाभ मिळणार आहे आणि हि सर्वात महत्वाचा निर्णय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अधिवास प्रमाणपत्र धारान करणाऱ्या सर्व नागरिकांना हि योजना अगदी मोफत मिळणार आहे असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार आहे.

नवीन योजनेचे वैशिष्ट्य नक्की काय आहेत हे पहा.

१) अगोदर फक्त हा लाभ केशरी शिधापत्रिका व अंतोदय शिधापत्रिकांना मिळत होता .आता मात्र सर्वांना हा लाभ मिळणार आहे.

२) पहिले आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब १.५ लाख रुपये मिळत होते. आता संरक्षण प्रति कुटुंब 5 लाख रुपये एवढे करण्यात आलेले.

३) दोन्ही योजनांसाठी आता एकच कार्ड लागू होणार आहे आणि कार्ड वाटप सुद्धा लवकर सुरू होणार आहे.

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेत मोठा बदल-लाभार्थ्यांना मोठा दिलास – पहा सविस्तर

४) दोन्ही योजनांच्या अनुशंगाने रुग्णाचा उपचार होणार आहे.

५) महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 96 तर आयुष्मान भारत योजनेमध्ये १२०९ असे एकूण १३५६ उपचार रुग्णांना लागू होणार.

६) मूत्रपिंड शस्त्रक्रिया मर्यादा २.5 हुन ४.५ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे.

७) महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यात 10 अतिरिक्त रुग्णालयात योजना सुरु करणार.

८) अपघातविमा उपचारांची संख्या 74 वरून आता 184 इतकी वाढविण्यात आली.