bhu naksha-आता ऑनलाईन रेकॉर्ड पाहणे झाले सोपे
मित्रानो,आजचा जमाना ऑनलाईन झाला असून कोणतेही कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन घरच्या घरी पाहू शकता आणि तेही अगदी मोफत.आता (नकाशा) bhu naksha तुम्ही मोबाईल वर पाहू शकता. आणि मोठी गोष्ट अशी कि हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईल वर काढू शकता.शेतीचा नकाशा हा तुम्हाला नेहमी कुठे ना कुठे कामी लागतो.
मात्र आपण हा नकाशा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागात गेलो तर मात्र खूप वेळ आणि पैसा देखील लागतो.चला तर आता आपण हा नकाशा मोबाईल वर कसा काढायचा या बद्दलची सविस्तर माहिती पाहूया.मात्र जर अशाच नवीन माहिती व योजना तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मिळवायच्या असतील तर आमचा whatsapp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजनेची माहिती whatsapp जॉईन साठी इथे क्लिक करा
मोबाईल वर नकाशा पाहण्यासाठी अशी करा प्रक्रिया
चला पाहूयात शेताचा नकाशा,जमीन किंवा घर,प्लॉटचा नकाशा आपल्या मोबाईल वर कसा पाहायचा. मित्रांनो नकाशा पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा गूगल वर यायचे आहे आणि गुगल वर टाईप करायचं नकाशा.आता पहिलीच वेबसाईट येईल, Bhu Naksha .
आता या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.आता तुमच्यासमोर हा नवीन पेज उघडेल .जसे कि खाली फोटोमध्ये दिसत आहे. तुम्हाला इथे काय करायचे हे लक्षात द्या. इथं डाव्या बाजूला तीन डॉट दिसत आहेत आता त्या तीन डॉट वर क्लिक करायचं. तीन डॉट वर तुम्ही क्लिक केल्या नंतर अशा प्रकारचा होम ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालील सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
हे आहेत राज्यातील नवीन 22 प्रस्तावित जिल्हे New district in Maharashta | पहा तुमचा जिल्हा बदलला का?
ज्यामध्ये पहिले आपले राज्य,नंतर जिल्हा,त्यानंतर,तालुका व शेवटी गाव टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅप हे ऑपशन क्लिक करा.आता तुमच्यासमोर हा नकाशा दिसेल.जसा कि फोटो तुम्हाला दिसत आहे. हा तुमच्या संपूर्ण गावाचा नकाशा असेल.आता नकाशा झूम करायचा आहे आणि झूम केल्यानंतर तुम्हाला गट नंबर दिसतील.
आता जे गट नंबर तुम्हाला पाहायचा असेल तो तुम्ही क्लिक करा.यामध्ये त्या ठिकाणचा तुम्हाला रस्ता बघता येऊ शकतो.हेच काय तर तुम्ही आणखी काही ऑपशन निवडून झाडे व इतर गोष्टी देखील बघू शकता.