Tag Archives: kanda bajar bhav nashik

kanda bajar bhav | कांदा लिलाव बंदमुळे शेतकरी त्रस्त | कांदा भाव वाढणार का ?

दिवाळीमध्ये 10 ते 12 दिवस बाजार समिती राहणार बंद. kanda bajar bhav वाढणार कि घटणार ?

kanda bajar bhav nashik : शेतकऱ्याची दिवाळी हि शेतीतील पिकाच्या भरोस्यावर असते. दिवाळी असो व कोणताही सण घरातील माल विक्री केल्याशिवाय तो साजरा होत नाही, त्यातच कांदा पिकाचे दर सध्या बरे आहेत मात्र कांदा भाव दिवाळीत तेजी घेतील या आशेवर कांदा घरात ठेऊन बसलेले शेतकरी आता अडचणीत आले आहेत.पुढील बातमी पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर ठरत मोबाइलला वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा व्हात्साप्प ग्रुप जॉईन करा,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

दिवाळीमुळे सर्व विभागात सुट्ट्या असतात या वर्षाला मात्र बाजार समितीने देखील मोठी सुट्टी घेतल्याने यंदा शेतकऱ्याची दिवाळी मोठ्या अडचणीत अली आहे.दुष्काळाने पहिलेच शेतकरी हतबल झाला आणि आता पुन्हा १० दिवस बाजार समित्या बंद त्यामुळे kanda bajar bhav वाढीच्या आशेवर बसलेला शेतकरी आपली दिवाळी कशी साजरी करेल हा प्रश्न कधी न सुटणारा आहे.


उद्या १० तारखेपासून दिवाळीला सुरवात होत असून ५ दिवस चालणारी दिवाळी हि बाजार समितीतील कामगारांच्या सुट्टीमुळे १८ तारखेपर्यंत समिती बंद राहणार आहे.या कालावधीत नाशवंत भाजीपाला सोडून सर्व धान्य पिके मालाचा लिलाव बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे .मात्र २० नोव्हेंबर पासून सर्व माल खरेदीला पुन्हा सुरुवात होणार आहे .

dushkal yadi 2023 : राज्यातील आणखी काही जिल्हे होणार दुष्काळी जाहीर

दिवाळीत कांदा तेजी धरेल या आशेवर बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता मात्र १० दिवसाच्या सुट्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान होण्याची भीती आहे.कारण जास्त दिवस कांदा साठवणूक केल्यास तो खराब तर होईलच सोबतच कांदा दर घसरण झाली तर मात्र शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

मागील काही दिवसात कांद्याचे दर घसरत असताना ५ हजारावर गेलेला कांदा तेराशे रुपयांनी घसरला आहे त्यामुळे पढील आठवडा भरात त्यात आणखी घाट होईल कि काय या मुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.