Tag Archives: kusum solar pump yojana maharashtra

सोलर पंप फक्त 5 हजार रुपयात -pm Kusum Solar yojna शेतकऱ्यांसाठी 95 % सबसिडी |

5 हजारात कसा मिळणार सौर पंप- Pm Kusum Solar yojna

नमस्कार शेतकरी मित्रानो, आजची शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाची योजना असून फक्त 5 हजार रुपयात सौर पंप कसा मिळणार या साठी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत तेव्हा संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या..

सोलर पंप योजना : हि योजना 08 मार्च 2019 रोजी सुरू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेचं नाव मुख्यामंत्री सौर कृषी पंप योजना या नावाने चालविली जात होती आता मात्र प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या नावाने चालू आहे.

हि योजना भारत सरकारच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येत असून पीएम कुसुम सोलर पंप योजना या नावाने चालविली जाते.

हे वाचा -नमो शेतकरी योजनेचे 2 हजार या तारखेला जमा होणार

हि योजना ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली चालविली जात असून . या योजनेचे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे तसेच जीवाश्म इंधनावरील शेतकऱ्यांचे अवलंबन कमी करणे,शास्वत ऊर्जा प्रस्थापित करणे व हे आहे.ही योजना 2030 पर्यंत बिगर-जीवाश्म-इंधन स्त्रोतांपासून विद्युत उर्जेच्या स्थापित क्षमतेचा वाटा 40% पर्यंत वाढविण्याच्या दिशेने पहिले आणि महत्वपूर्ण पाऊल टाकणार आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदान मिळते..हि योजना केंद्र आणि राज्य सरकार कडून राबविण्यात येत असून दोघांचाही सबसिडीच्या 50-50 टक्के हिसा आहे. तर सबसिडी (solar pump subsidy) व्यतिरिक्त 5 किंवा 10% स्वहिस्सा शेतकऱ्यांनाच भरावा लागतो..हे आनुदान तुम्हाला कसे मिळेल हे आपण आता जाणून घेऊ..

सोलर पंप योजना (Pm Kusum Solar pump yojna) 5 हजारात कशी मिळेल ?

खरं तर हि योजना जवळजवळ शेतकऱ्यांना 90% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे अनुदान 95 टक्के आहे..आणि याच लाभार्थ्यांना हे सोलर पंप (solar pump) फक्त 5 हजार किंवा 5 टक्के किंमतीत मिळतात. या दोन्ही प्रवर्गातील लाभार्थ्या व्यतिरिक्त इतरांना 90 % अनुदानावर किंवा 10% किंमतीत solar pump yojna पुरविली जाते..

कुसुम सोलर पंप योजना नोंदणी कशी कराल | kusum solar pump yojana maharashtra

चला तर आज जाणून घेऊया कोणत्याही लाभार्थ्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन (Pm Kusum Solar yojna online apply ) कशी करायची? कुठे करायची? हे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो . हि प्रक्रिया अगदी सोपी आहे मात्र जर तुम्हालाआ यातील काहीच समजत नसल्यास आपण जवळच्या csc केंद्रावर जा ते तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करून देतील.आणि जर काय तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया स्वता करायची असेल तर खालील ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन संपूर्ण माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता

कुसुम सोलर पंप योजना नोंदणीसाठी खालील बटन क्लीक करा

सौर पंप योजनेसाठी पात्रता अटी व नियम

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभ घेण्यासाठी नियम व अटी खलील प्रमाणे आहेत

  • अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा
  • तो शेतकरी असावा
  • त्याच्या नावाने शेतीचा 7/12 असावा
  • प्रति मेगावॅटसाठी सुमारे २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

1)आधार कार्ड,ओळखपत्र


2) रेशनकार्ड/शिधापत्रिका


3)नोंदणीची प्रत,


4)बँक खाते. पासबुक ,


5)7/12 व 8 अ


6) शेताचा नकाशा

7) शेजाऱ्यांचे लाईट बिल

8)पासपोर्ट आकाराचा फोटो,


9)मोबाईल क्रमांक

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र?

१) शेतकरी
२) सहकारी संस्था
३) शेतकर्‍यांचा गट
४) जल ग्राहक संघटना
५) शेतकरी उत्पादक संस्था

सौर पंप किंमत | solar water pump price

सोलर पंप HPसोलर पंप किंमत
3 HP सोलर पंपकिंमत : 1,56,000
5 HP सोलर पंपकिंमत : 2,32,000
7.5 HP सोलर पंपकिंमत : 3,80,000
10 HP सोलर पंपकिंमत : 4,68,000