Tag Archives: Maha DBT Lottory

Maha DBT Lottory २०२३ – महा DBT लॉटरी लागली लगेच कागदपत्र अपलोड करा.

कृषी यांत्रिकीकरण व इतर घटकांची लॉटरी लागली -पात्र लाभार्थाची यादी आली

Maha DBT Lottory २०२३ नमस्कार शेतकरी मित्रानो,तुम्हाला तर माहीतच आहे कि, महा डीबीटी पोर्टलच्या माह्यामातून अर्ज एक योजना अनेक हा कार्यक्रम राबविला जाते.शेतकरी मित्रानी विविध बाबीसाठी अर्ज केले होते आणि बरेच शेतकरी या अर्जाची सोडत कधी होते याची वाट पाहत होते.आता मात्र तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या लॉटरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे.

Maha DBT Lottory २०२३

कापसाचे हे अंतर सगळ्यात फायद्याचे-जमिनी निहाय अंतर पद्धती

मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून एकात्मिक कृषीयांतरीकरण,सिंचन साधने व सुविधा, बी बियाणे खते औषधे याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष घटक यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आणि याच्यासाठी अर्ज केलेले आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांची सोडत झालेली आहे, लॉटरी लागलेली आहे.

जे शेतकरी या Maha DBT Lottory २०२३ पात्र झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना महा dbt सोडतीमध्ये नंबर लागलेला आहे. आपण लॉटरीमध्ये पात्र झालेला असाल तर त्यांनी लॉगिन केल्यानंतर त्यांना विनर असं दाखवला जात आहे .काही शेतकऱ्याना मोबाईलवर मेसेज देखील आला असेल.आता तुम्हाला आणि सात दिवसाच्या आतमध्ये कागदपत्र अपलोड करावे, अशा प्रकारचा अहवान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सोडतीत लागू असणाऱ्या योजना | Maha DBT Lottory scheme list २०२३

तशा तर अनेक योजना या पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जातात मात्र सध्या काही निवडकच योजनेची सोडत करण्यात अली आहे.सध्या सोडतीत बलागु असणाऱ्या योजनेची ची लिस्ट हि खालील प्रमाणे आहे.

अनुक्रमांकलागू योजना
1सिंचन साधने आणि सुविधां
2एकात्मिक फलफलोत्पादन
3बी-बियाणे /खते औषधे
4विशेष घटक

काय आहे पुढील प्रक्रियातुम्ही पात्र झाल्यास पुढे काय करायचं

महा dbt सोडतीत तुम्ही पात्र झाल्या तुम्हाला पुढे महत्वाचे काम करायचे आहे हे काम तुम्ही केले तरच तुम्हाला पात्र झालेल्या योजनेचा लाभ मिळतो अन्यथा तुम्हाला या योजनेपाससून अपात्र केलं जाते.तुमची कोणत्याही योजनेसाठी निवड झाल्यास तुम्हाला येता २ दिवसाच्या आत मेसेज येतो किंवा कृषी विभागाकडून तुम्हाला फोन येतो.त्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेच्या स्वरूपानुसार कागदपत्र अपलोड करायला सांगितले जातात.

हि कागदपत्र तुम्ही ७ दिवसाच्या आत सडत करावी लागतात .आपण हे कागदपत्र अपलोड न केल्यास तुम्ही निवड रद्द केली जाते.किंवा तुम्हाला आणखी काही दिवसाचा वेळ दिला जाऊ शकतो.तुम्ही संपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्या नंतर पुढील ८ ते १० दिवसात तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते व संपूर्ण कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला मंजुर झालेल्या साधन घेण्यास पूर्व संमती दिली जाते.

हि पूर्व संमती मिळण्या अगोदर तुम्ही ते साधन खरेदी करू शकत नाही आणि असे केल्यास तुम्हाला या योजनेचं अनुदान मिळत नाही, हे सर्व शेतकऱ्यानी लक्षात घ्यावे.आता साधन खरेदी केल्या नंतर तुम्हाला त्याची बिल हि dbt पोर्टलवर अपलोड करावी लागतात आणि त्या नंतर तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

लॉटरी लागली कि महा DBT पोर्टल वर कोणती कागदपत्र अपलोड करावी लागतात

Maha DBT Lottory योजनेसाठी लागू आलेल्या संपूर्ण कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

१ ) आधार कार्ड
२ ) शेतकऱ्याचा ७/१२ व ८ अ
३ ) बँक खाते
४ ) उत्पनाचा दाखला
५ ) शेताचा नकाशा
६ ) राखीव प्रवर्ग असल्यास जातीचे प्रमाणपत्र
७) रहिवाशी दाखला
८ ) महिला असल्यास २ नावाची व्यक्ती एक असल्याचे प्रमाणपत्र
९ ) साधनाचे कोटेशन