Maha DBT ; पोर्टल मध्ये पुन्हा मोठे बदल – आता योजना मिळणे झाले सोपे.
नमस्कार शेतकरी बंधुनो,आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी,maha dbt च्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मिळणार मागेल ती योजना .राज्यच नवं सरकार स्थापन झालं आणि लगेचच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय देखील घेण्यात आला आहे.तेव्हा मित्रानो आज आपण याच बद्दल सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.
त्या अगोदर जर अशाच योजना व शेती विषयक माहिती थेट मोबाइलला वर पाहिजे असतील तर तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
तुम्हाला तर माहीतच आहे कि, राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी ( MAHA DBT ) पोर्टल च्या माध्यमातून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात. अर्ज एक योजना अनेक आता शेतकऱ्यांना मिळत आहेत.एका क्लिकवरती शेतकऱ्यांना सर्व अर्ज भरता येतात.
मित्रांनो याच पोर्टलच्या माध्यमातून महत्वाच्या १० योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात.आणि जर शेतकऱ्यांनी एखाद्या योजनेसाठी अर्ज केला तर त्यांना ती योजना मिळायला पाहिजे होती कारण.ह्या योजना मागेल त्याला योजनाच्या स्वरूपामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती.
मागेल त्याला योजनेत झाला मोठा बदल – पहा नवीन बदल.
ज्याच्यामध्ये मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला ठिबक किंवा मागेल त्याला बीबीएफ यंत्र.आता या योजना नावापुरत्याच राहिल्या होत्या.कारण शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज भरल्यानंतर सुद्धा लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते.अर्जात मागणी केलेल्या शेतकऱ्यांना तर लाभ मिळत नाही.
याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे कारण मागेल त्याला योजना च्या नावावरती अर्ज भरल्यानंतर सुद्धा लॉटरी पद्धतीने त्याची निवड करणं हे अतिशय चुकीचं आहे. मित्रांनो याच पार्श्वभूमी वरती कृषी विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्याच्यामध्ये मागील त्याला योजनाच्या अंतर्गत समावेश केल्या 10 योजना लॉटरी पद्धतीने न राबवता, ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये पात्र करून त्यांना लाभ देण्यात यावा असे निर्देश त्यांनी आढावा बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत.
अखेर pm किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स
इथे तारीख पहा
या पद्धतीने या योजनेची जर अंमलबजावणी केली तर अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत लावजरच लाभ मिळणार आहे. मित्रांनो अतिशय दिलासा दायक असा निर्णय आणि अतिशय दिलासा निर्देश कृषी मंत्री यांच्या माध्यमातून दिलेले आहेत ज्याच्यामुळे नक्कीच या योजनांच्या अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .