Tag Archives: mahabms

pashusavardhan vibhag yojna | पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी नागरिकांना अर्ज करण्याचे आव्हान.

गाई-म्हशी, शेळी-मेंढी सह कुकूटपालनासाठी करता येणार अर्ज.pashusavardhan vibhag yojna

pashusavardhan vibhag yojna : राज्यातील विविध योजनेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांनसाठी आता मोठी बातमी समोर येत आहे बातमी अशी कि,आता राज्यातील विविध गरजू पशुपालक,शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक,युवती व महिला यांना वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. मात्र बातमी पुढे पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षाला pashusavardhan vibhag yojna नागरिकांनसाठी विविध योजना राबवत असतो. या वर्षाला म्हणजेच २०२३-२४ या वर्षासाठी या विभागाने नागरिकांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु केली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि ८ डिसेंबर २०२३ हि आहे.तेव्हा या विभागाच्या माध्यमातून जनतेला अर्ज भरण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.


यामध्ये नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजनेअंतर्गत शेळी-मेंढी,दुधाळ गाई-म्हशी यांचे वाटप सोबतच १ हजर मांसल कुक्कुट पक्षी, तसेच त्यासाठी शेड उभारणी अर्थसाह्य,१०० कुक्कुट पिलांची वाटप व २५ अधिक ३ तेलंग गट या विविध योजनेसाठी नागरिकांना अर्ज करता येतील.


हि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून इच्छुक नागरिकांनी ah.mahabms.com या वेबसाइट वर जाऊन ८ डिसेंबर पूर्वी अर्ज भरावे.यामध्ये वरील सर्व योजनेसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेसाठी तसेच विविध योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्यात अली आहे.

dushkal yadi news : राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर,पहा यादी.


या साईट वर केलेला अर्ज हा ५ वर्षासाठी लागू असून निवड प्रक्रिया ऑनलाईन प्रकारे असते.अर्ज भरणा करत असताना वापरण्यात येणारा मोबईल नंबर हा सांभाळून ठेवावा कारण योजनेच्या निवडी संदर्भात येणारे अपडेट हे याच नंबरवर पाठविण्यात येतात.

ऑनलाईन अर्ज भारत असताना नागरिकांना खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात.


१) आधार कार्ड
२) बँक खाते
३) पासपोर्ट साईज फोटो.


मात्र यापैकी कोणत्याही योजनेसाठी निवड झाली तर मात्र इतर कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून ofline पद्धतीने फाईल बनवून पशुसंवर्धन विभागात नेऊन द्यावे लागतात तेव्हाच आपली अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण होईल.