monsoon update आता शेतकऱ्यांची काळजी मिटणार राज्यात रात्री या ६ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता
नमस्कार शेतकरी मित्रानो आताची monsoon update बातमी.तुमच्यासाठी हवामानाची महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. हवामान खात्याचा महत्त्वाचा अपडेट अली आहे.आज दुपारनंतर राज्यातील 21 जिल्ह्यात पाऊस वाढणार.कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार? कोणत्या जिल्ह्याना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला? चला तर पाहूया आजचे संपूर्ण हवामान अंदाज .पाहूया सविस्तर माहिती.
हा पावसाचा अंदाज,havaman andaj व सोबतच शेती व योजनांची माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळविण्यासाठी आमचा खाली दिलेला whatsapp ग्रुप जॉईन करा .
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
राज्यात मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले मात्र पावसाने जोरदार आगमन केले आहे. चार दिवसापूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला असून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे.कोकणात आणि जिल्ह्यांमध्ये सकाळपासून तुफान पावसाला सुरुवात झाली असून कोकण आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
खरं तर राज्यात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे.कारण पावसाला उशीर झाल्याने दुष्काळ पडेल का काय असा शेतकऱ्यांना वाटत होत. शिवाय पेरणीला उशीर होतं होता. गेल्या २ ते ३ दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्याने आता बऱ्याच ठिकाणी पेरणीची लगबगी सुरू झाली आहे.
पहा कोणत्या जिल्ह्यात माध्यम व हलका पाऊस ? कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार
monsoon update :- सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे राज्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.आता पावसाची बातमी अशी कि,आज दुपारनंतर राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांना १००% अनुदानावर मिळणार ह्या ३ योजना -लगेच अर्ज करा.
त्यासाठी इथे क्लिक करा.
havaman andaj :- हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे आज दुपारनंतर राज्यातील जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर,नंदुरबार, धुळे, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ,मुंबई,ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,वर्धा,नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर पुढील ६ जिल्ह्याना मोठा धोका निर्माण होणार असून पालघर रत्नागिरी रायगड नाशिक पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.