Namo shetkari yojna 1st insallmentसाठी सरकारने उघडले निधी वितरणासाठी बँक खाते
मित्रांनो तुमच्यासाठी हि बातमी खूप खास आहे कारण आता आता तुमच्या खात्यामध्ये Namo shetkari yojna 1st insallment लवकरच येणार आहे.मित्रांनो या योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट व सोबतच महत्वाचा शासन निर्णय ( GR ) आपण पाहणार आहोत.
या योजनेच्या बाबतीत आता आपण महत्वाची अपडेट पाहणार अहो.मात्र मित्रानो अशाच नवीन योजना व महत्वाच्या अपडेट थेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता.खाली ग्रुप लिंक दिली आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून pm किसान योजने प्रमाणेच नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ₹6000 वार्षिक मानधन हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्यामुळे आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांचा मानधन दिला जाणार आहे.
मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिला जातो हे तुम्हाला तर माहितच आहे आणि ज्याचा १४ वा हप्ता आता 27 जुलै 2023 रोजी वितरित देखील करण्यात आलेले आहे.नमो शेतकरी योजनेची घोषणा मागील बऱ्याच दिवसा अगोदर करण्यात आली. त्याचा GR देखील प्रसिद्ध झाला.त्यानुसार पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी आता या योजनेसाठी पात्र केले जाणार तशी माहिती देखील देण्यात अली.
नमो शेतकरी योजनेसाठी ४००० कोटी निधीची मागणी.
याच्यासाठीचा लेखाशीर्ष तयार झाला,सोबतच पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी पुरवणी मागणी द्वारे 4000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.आणि या योजनेचा पहिला हप्ता हा pm किसानच्या हप्त्याबरोबर येणार अशा चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र याचं वितरण झालं नाही. आज एक अतिशय महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.
आणि योजनेच्या वितरणाचा निधीसाठी राज्य शासनाने एक मध्यवर्ती खाते उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्या अंतर्गत पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेला निधी हा आता खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल आणि केवायसी झालेल्या,सर्व पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खात्यामधून थेट अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल.
मित्रांनो लवकरच आता राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या हप्त्याची याची तारीख जाहीर केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम पाठविली जाईल. तर हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हा GR डॉनलोड करू शकता.
नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर आणि pm kisan yojna हप्ता या तारखेला येणार
pm kisan yojna :-नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या २००० रुपयाची वाट पाहत असत तर तुमच्यासाठी हि महत्वाची मोठी बातमी आहे.तुम्ही हे एकल आहे कि नमो शेतकरी योजनेला मंजुरी मिळाली हे खार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना pm kisan yojna यामधून शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांच्या वार्षिक मानधनासोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून देखील 6 हजार रुपयांचा वार्षिक मानधन दिला जाणार आहे याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केलेली आहे.
अशा योजना व शेती विषयक माहिती तुमच्या मोबाईल वर अगदी मोफत मिळविण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. खाली लिंक दिली आहे
या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळून तसेच याच्या संदर्भातील GR म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र असलेले सर्व लाभार्थीच या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असतील असे देखील तुम्ही ऐकले असेल आणि याच्यामध्ये नवीन काही बदल देखील केले जातील अशा प्रकारची माहिती या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
pm kisan चे पोर्टल आता नमो शेतकरी योजनेच्या पोर्टल बरोबर एकत्रीकरण केलं जाणार आहे.दोन्हीचा डाटा या ठिकाणी घेतला जाईल आणि या योजनेमध्ये पात्र असलेले लाभार्थी पात्र करून केंद्र शासनाच्या सहा हजार रुपया सोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक मानधन दिला जाईल अशा प्रकारे त्याच्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे.
नमो शेतकरी योजनेचा लेखाशिर्ष ला मंजुरी | पहिला हप्ता कधी मिळणार?
कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यासाठी निधी मंजूर होणे गरजेचं असते.आणि निधी पाहिजे असेल तर त्याचा लेखाशिर्ष तयार होणे गरजेचं असते.मात्र मित्रांनो अद्याप देखील निधी वितरण करण्याच्या जरी घोषणा केलेल्या असल्या तरी या योजनेसाठी लेखाशीर्ष निर्माण करण्यात आलेलं नव्हतं.राज्य शासनाच्या माध्यमातून हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधीची तरतूद त्याच्यासाठी राज्य शासनाकडून निधीचा वितरण हे सर्व होण अपेक्षित असताना महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठीच लेखाशीर्ष आलेला आहे.
आज म्हणजेच 3 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्णअसा शासन निर्णय निर्गमित करून या योजनेसाठी लेखाक्षर्ष निर्मितीस मंजुरी देण्यात आलेली आहे.आणि हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .आता याच लेखा शीर्षाच्या अंतर्गत या नमो शेतकरी योजने करीत निधीचा वितरण केले जाणार आहे.
आता लवकरच शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या वार्षिक मानधनाचा वितरण केले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा एक महत्त्वाचा आणि अंतिम असा टप्पा या ठिकाणी आज पार पाडण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सुरुवात होईल .
सध्या नमो शेतकरी योजनेसाठी पुरवणी मागण्या सादर केलेले आहेत, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केल्या जातील मात्र पावसाळी अधिवेशनापूर्वीच पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही.
मित्रांनो अजून पर्यंत पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली नाही, त्याच्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता याचबरोबर राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल असे जाणकार सांगत आहेत.
आताच्या घडीची हि सर्वात मोठी घोषणा आहे. namo shetkari yojna 2023 लागू होणार आहे असे आपण सांगितले होते.हि योजना लागू झाल्यास शेतकऱ्याना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार ,अशी जोरदार चर्चा चालली होती.आता मात्र या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या मानधनांसोबत आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच cm kisan yojna ला मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत आता वार्षिक 6 हजार रुपये असे एकूण 12000 रुपये मानधन मिळणार आहेत.कारण या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 15 जून 2023 रोजी काढण्यात आलेला आहे
चला तर शेतकरी मित्रानो,या शासन निर्णयाच्या माध्यमातून हि शेतकरी योजना कशाप्रकारे राबवली जाणार ?योजने अंतर्गत कोणते लाभार्थी पात्र होणार ?अर्ज कसा व कुठे करायचा ? पहिल्या हप्त्याचे वितरण कधी केले जाणार? या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याघेणार आहोत.
मित्रांनो ३० मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळीय बैठकीत 2023 च्या बजेटमध्ये केलेली एक महत्त्वाचे अशी घोषणा केली होती.ती म्हणजे शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना शेतकऱ्यासाठी लागू केली जाणार. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र त्या बाबतचा ठोस शासन निर्णय अजून पर्यंत आला नव्हता.आता मात्र हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
२०१९ मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी pm kisan yojna हि लागू करण्यात अली होती .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना वार्षिक ६ हजार मिळत होते.हे ६ हजार एकूण चार चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येत होते.आणि मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी मुले शेतकरी हतबल झाला असल्याने त्यांना हक्काचं वाढीव उत्पन्न उपलब्ध करून देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात अली आहे.
या देखील योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये देणार येणार असून तीन तीन महिन्याच्या अंतराने २ +२+२ असे ६ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत.एकूणच काय तर कमी किसान योजना लागू झाल्यावर शेतकर्याना थेट 12 हजार मिळणार आहेत.या योजनेची अंमलबजावणी आता आज रोजी प्रसारित झालेल्या शासन निर्णया नुसार केली जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी पात्रता काय?
namo shetkari yojna 2023:-या योजनेचा लाभ जर शेतकरी मित्राना मिळवायचा असेल तर काही निकस हे राज्य सरकारच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले आहेत या निकषांची पूर्ती करणारा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना या योजनेसाठी प्रमाण म्हणून वापरण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2020 मध्ये निर्गमित करण्यात आलेलया आहेत.या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून राज्यांमध्ये ही cm किसान योजना राबवली जाणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी/निकष व पात्रता खालील प्रमाणे आहेत.
१) पाम किसान योजनेत पात्र असणारा प्रत्येक पात्र लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहील . २) पाम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेला मात्र पाम किसान योजनेसाठी पात्र असणारा लाभार्थी देखील पात्र राहील.
नमो शेतकरी योजना कशी राबविली जाणार त्याची कार्यपद्धती कशी राहणार ?
शेतकरी मित्रानो,पाम किसान योजने प्रमाणेच या योजनेची कार्यप्रणाली असणार आहे.ज्या पद्धतीने चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळते त्याच पद्धतीने या देखील योजनेची प्रक्रिया राहणार आहे.वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.cm किसान योजनेचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.
नमो शेतकरी योजना अर्ज कुठे करावा ?
namo shetkari yojna 2023 : -या योजनेसाठी स्वतंत्र असा अर्ज करण्याची गरज नाही ,कारण ज्या शेतकऱ्याना pm किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्वांना या योजनेत पात्र केलं जाणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी रखुम ठेवलेल्या निधीतून लाभ देण्यात येणार आहे.सध्या या योजनेच्या कार्यप्रणालीसाठी कोणतेही पोर्टल उपलब्ध नाही.
मात्र लवकरच त्यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे अशी सूचना देण्यात अली आहे.pm किसान योजना व cm किसान योजना यांचे पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात यावे व एकाच वेळी त्यांना हे अनुदान मिळण्यास मदत होईल तसेच दोन्ही लाभार्थ्याच्या संख्येत होणारा बदल लक्षात येईल व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धत कशी असणार?
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतगधत कें द्र शासनाच्या PM-KISAN योजनेनुसार खालील खालील वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट रकम पाठविण्यात येणार.खालील प्रमाणे खात्यात येणार पैसे.
अ.क
हप्ता
कालािधी (महिना )
रक्कम
1
पहिला हप्ता
एप्रिल ते जुलै
2000 रुपये
2
दुसरा हप्ता
ऑगस्ट ते नोव्हेंबर
2000 रुपये
3
तिसरा हप्ता
डिसेंबर ते मार्च
2000 रुपये
नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र होणार
जर तुम्ही pm किसान योजनेत अपात्र असाल तर या योजनेसाठी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता. या काही गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होऊ शकतात.
१) जर शेतकऱ्यानी pm किसान सन्मान निधी योजनेची ekyc केली नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता. २) तुम्ही तुमच्या बँक खात्याची kyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. ३) तुमचे धार कार्ड अपडेट न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. ४) तुमचे बँक खाते बंद पडल्यास तुमच्या खात्यात हि रक्कम येणार नाही या कारणाने देखील तुम्ही अपात्र होऊ शकता. ५) तुम्ही लँड शेडींग न केल्यास अपात्र होऊ शकता.
PM KISAN EKYC कशी करायची?
चला तर आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान खात्याची ekyc कशी करायची.ekyc करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्राला भेट देऊ शकता.हे केंद्रचालक काही फी घेऊन तुमची ekyc करून देतील.हि प्रक्रिया करायला फक्त ५ मिनिटे लागतात.ekyc करायला जात असताना आपले आधार कार्ड व pm किसान पोर्टल सोबत जोडून असलेला मोबाईल सोबत घेऊन जावे,कारण या मोबाईल वर opt येतो.
बँकेची kyc कशी करावी / बँकेत आधार प्रमाणीकरण कसे करावे?
आता कोणत्याही योजनेची निधी /पैसा तुमच्या खात्यावर येण्यासाठी बँकेची kyc करणे खूपच गरजेचं झालं आहे.कारण आता कोणतेही पेमेंट आधार बेस झाले आहे.तुम्ही बँकेचे आधार प्रमाणीकरण केले नाही तर मात्र तुमच्या खात्यावर येत नाही हे लक्षात घ्यावे.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि बँकेत तुम्हाला kyc अर्ज मिळतो तो अर्ज पूर्ण अचूक भरून बँकेत द्यायचा आहे.त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे.आधार प्रमाणीकरण होण्यासाठी ४ ते ५ दिवसाचा कालावधी लागतो .
पी एम किसान खात्याची लँड शेडींग कशी करायची
लँड शेडींग हि अतिशय महत्वाची आहे यावरून ठरते कि तुम्ही शेतकरी आहेत कि नाही.हि प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे कारण बरेच बोगस शेतकरी/लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. लँड शेडींग करण्यासाठी तुमचा ७/१२ व ८ अ हे घेऊन तुमाला तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे .तिथे गेल्या नंतर समोरील सर्व प्रक्रिया ते कर्मचारी करून देतात .
तुमचे बँक खाते कसे सुरु करावे ?
खरं पाहाता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे बँक खाते सुरु असणे आहे.कारण जर तुमचे खातेच चालू नसतील तर मात्र तुमच्या खात्यावर पाठविले जाणारे कोणतेच पैसे येणार नाहीत व तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही.तेव्हा बँक खाते कसे सुरु करावे व त्यासाठी कोणाला भेटावे हे आता पाहूया.या साठी तुम्हाला थेट बँकेत जायचं आहे.तिथे गेल्यावर तेथील मॅनेजरला तुम्हाला भेटून तुमचे खाते बंद झाल्याचं सांगायचं आहे.
पुढे तुमचे बँक खाते का बंद पडले हे ते तुम्हाला सांगतील आणि बँक खाते सुरु करण्यासाठी तुमची मदत करतील.तुम्ही बऱ्याच दिवसा पासून बँकेत व्यवहार न केल्याने तुमचे बँक खाते बंद पडू शकते .अशा वेळी तुम्हाला तुमच्या खात्यात १०० रुपये भरणा करायचा आहे.तुमचे खाते आता activate म्हणजे चालू होईल.तुम्ही kyc केली नसेल तरी तुमचे खाते बंद पडू शकते अशावेळी तुम्ही kyc करून घ्या खाते आपोआप सुरु होईल .