pikvima batmi : दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना पीकविमा देऊ ; धनंजय मुंडे ( कृषी मंत्री )
राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती मोठ्या हलाखीची असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार या कडे सरकारचे लक्ष लागले आहे.त्यासाठी राज्याच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यांना लवकरच पिकविम्याचं वाटप होणार आहे.पुढील बातमी पाहण्याअगोदर जर तुम्हाला अशा माहितीचे अपडेट जर मोबाईल वर पाहिजे असतील तर मात्र तुम्ही आमचा whatsapp ग्रुप जॉईन करू शकता,खाली ग्रुप लिंक दिली आहे.
शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचे हवामानातील बदलामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यात अल्प पाऊस झाला तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.कोणत्या न कोणत्या कारणाने शेतकऱ्यांची शेतपिके वाया गेले.परिणामी शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली.
आणि अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याची दिवाळी नाही तर दिवाळे निघायची वेळ अली आहे.मात्र या सर्वांचा विचार करून राज्यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना पीकविमा वाटपाचे आदेश दिले आहे.
pikvima batmi : राज्यात अनेक जिल्ह्यात ओला आणि कोरडा दुष्काळ पडल्याने नुकसानग्रस्त क्षेत्राचे अंतिम सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले आहे.झालेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ३५ लाख शेतकरी पिकविम्यासाठी पात्र ठरले आहे.आणि आता पिकविम्याची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मागील दोन दिवसापासून पीकविमा वाटपाला सुरवात झाली असल्याची माहिती देखील समोर अली आहे.
kanda bajar bhav | कांदा लिलाव बंदमुळे शेतकरी त्रस्त | कांदा भाव वाढणार का ?
हाती आलेल्या माहिती नुसार ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांनाच्या खात्यावर १ हजार ७४३ कोटी एव्हढी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.मात्र काल पासून एकही शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा न झाल्याने शेतकर्या सह विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे.
सरकारची कोणतीही मदत,पीकविमा खात्यात जमा होई पर्यन्त त्यांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांत जोरदार होत आहे.