Tag Archives: pm kisan yojna

PM kisan kyc UPDATE | PM किसान योजनेत मोठा बदल | आता kyc ची गरज नाही-सर्वच शेतकरी होणार पात्र

आता PM KISAN KYC UPDATE करा एका मिनिटात-आता सरकारने काढला नवा पर्याय

PM kisan kyc UPDATE:- शेतकरी मित्रांनो,आता pm kisan samman nidhi yojana मध्ये एक मोठा झाला आहे.बी बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे. या निर्णयामुळे राज्यसह देशातील अपात्र होणारे लाखो शेतकरी आता पात्र होणार आहेत.लाखो शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे.

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की PM KISAN YOJNA अंतर्गत लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी pm kisan ekyc करणं अनिवार्य केलं होत.हे करत असताना फिजिकल वेरिफिकेशन करने तसेच याबरोबर आणखी काही निकष व अटी बांधनकारक करण्यात आलेल्या आहेत. लाखो शेतकऱ्यांचे फिंगरप्रिंट वेरिफिकेशन होत नव्हते त्यामुळे केवायसी देखील होत नव्हती.pm kisan ekyc otp देखील येत नव्हता कारण त्यांच्या आधार कार्ड ला मोबाइलला लिंक नव्हता.

namo shetkari yojna 2023 | अखेर योजनेला मंजुरी मिळाली
GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

देशातील मोठ्या प्रमाणात pm kisan samman nidhi yojana अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वयोवृद्ध लाभ घेत आहेत आणि अशातच त्यांना kyc लागू केल्यानंतर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता,ज्यामध्ये त्या लाभार्थ्यांचे बायोमेट्रिकने केवायसी करताना त्यांचे बोटाचे ठसे जुळत नव्हते,त्यामुळे त्यांची pm kisan ekyc करण शक्य नव्हतं.आणि त्यांचं आधार update देखील शक्य नव्हतं त्याच बरोबर अशा वयोवृद्ध लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे शक्य होत नाही.

pm kisan kyc

यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शिबीर आयोजित करण्यात आले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.शेतकऱ्यांना केवायसी करण्याचा आवाहन करण्यात आलं परंतु अशा शेतकऱ्यांची केवायसी कुठेही करणं शक्य होत नाही कारण वरील कारणाने ते शक्य नाही. त्याच्यामुळे हे प्रत्येक शेतकरी आता अपात्र होणं हे खर होत.

आता मात्र या गोष्टीवर तोडगा काढण्यात आला असून आता अशा सर्व शेतकऱ्याची pm kisan kyc करता येणार आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून आता तोडगा काढला आणि मित्रांनो आणि आता kyc नवा मार्ग केंद्र सरकारने शोधला आहे.आता केंद्र शासनाच्या माध्यमातून PM kisan app अपडेट करण्यात आलेले आहे व त्यात नवीन बदल करण्यात आलेले आहेत.आणि या आपलिकेशनच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना केवायसी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

कारण आता pm kisan kyc करताना pm kisan ekyc otp ची तुम्हाला आता गरजच भासणार नाही . किंवा कुठल्याही प्रकारचा बायोमेट्रिक करण्याची गरज नाही.आता फेस व्हेरिफिकेशन चा नवा पर्याय जोडण्यात आला आहे.आणि आता त्या शेतकऱ्याचं फेस वेरिफिकेशन करून त्या शेतकऱ्याचा फोटो घेऊन केवायसी करणं शक्य होणार आहे.

याच्यासाठी 22 जून 2023 रोजी पीएम किसान योजना आपलिकेशन ( pm kisan app)अपडेट करण्यात आलेले आहे.आणि मित्रांनो ही केवायसी करण्यासाठी हे मोबाईल आपलिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला नवीन स्वरूपातील अपडेटेड पीएम किसानच अप्लिकेशन इन्स्टॉल करावा लागणार आहे.या pm kisan app च्या माध्यमातून तुम्ही स्वतःच स्टेटस पाहू शकता त्याच बरोबर स्वतःची केवायसी करू शकता आणि स्वतःचे लॉगिन करून इतरांची केवायसी करू शकता.तर मग आहे न खऱोभर नवीन महत्वाचं उपडेट.


मित्रांनो हि pm kisan app तुम्हाला Google play store वर अगदी मोफत मिळणार आहे त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि आपल्या गावातील गरजू राहिलेल्या शेतकऱ्यांनो pm kisan kyc करून द्या.हि kyc तुम्ही स्वतः मोबाइलला वर करू शकता किंवा pm kisan kyc csc केंद्रावर देखील करता येईल.आता तुम्ही ठरवा kyc कुठे करायची

pm kisan samman nidhi yojna | PM किसान योजनेत मोठा बदल -लगेच करावे लागणार हे काम

आता pm kisan samman nidhi yojna आलेली असून शेतकऱ्यासाठी आताची हि मोठी बातमी आहे.तुम्हाला तर माहीतच आहे कि केंद्र सरकारच्या माध्यमातून pm kisan yojna राबविली जात होती. या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्याना वर्षाकाठी ६००० हजार रुपये मिळत होते आता मात्र या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.नेमका काय बदल झाला आता कोणते शेतकरी पात्र राहणार? कोणते शेतकरी अपात्र होणार?

pm kisan samman nidhi yojna

cm kisan yojna 2023 म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या बाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आला असून आता खर्च शेतकऱ्याना ६ हजार ऐवजी १२००० मिळणार का या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय ( GR ) आलेला आहे .हीच संपूर्ण माहिती आजच्या लेखात तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा ..

शेतकरी मित्रानो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यात मान्यता देण्यात अली असून या संदर्भातील अतिशय महत्वाचा शासन निर्णय १५ जून २०२३ रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.या मध्ये बरेच निर्णय घेण्यात आलेले असून आता आपण सविस्तर पाहूया.

पीएम किसान योजनेचं स्वरूप व अडचणी | PM KISAN YOJNA

केंद शासनाने शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM kisan yojan) सुरू केली होती.हे तर तुम्हाला माहीतच आहे,आणि त्यानुसार फक्त शेतकरी कुटुंबास म्हणजे पती-पत्नी व 18 वर्षा खालील त्यांचा मुलं यांचा त्यात समावेश होता.

pm kisan yojna update :- या शेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष ६ हजार रुपये लाभ दिला जात होता.यामध्ये दर चार मकहन्यांनी रु. 2000/- अशी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होती होती. आणि आतापर्यन्त हि योजना सुरळीत चालू देखील आहे. मात्र मधेच काही शेतकर्याचे हे पैसे मिळणे बंद झाले त्यामुळे बरेच शेतकरी गोंधळले होते.मग सरकारच्या माध्यमातूम बोगस शेतकऱ्याना हटविण्यासाठी पाम किसान खात्याची ekyc केली गेली आणि जे शेतकरी नव्हते ते अपात्र ठरविण्यात आले.

तुम्हाला २ हजाराचा हप्ता मिळत नाही मग -मोबईल वर करा ekyc फक्त 5 मिनिटात

आता पात्र शेतकऱ्यासाठी हि योजना सुरळीत चालू आहे .हि योजना चांगल्या प्रकारे चालविली जात असल्याने pm kisan samman nidhi yojna ची नोंद देश पातळीवर घेण्यात आली. मात्र 2021 पासून सदर योजनेच्या कामकाजात अडथळे येऊ लागले नंतर पी.एम.किसान योजना कृषी विभागाकडे द्या अशी मागणी होऊ लागली.मात्र असं न होता विविध विभागांनी या योजनेचं काम सांभाळायला सुरुवात केली

.आणि यातूनच हि योजनेच्याअडचणी आणखीच वाढल्या .सादर पी.एम.किसान योजना राबविण्यात येणा-या अडचणी विचारात घेवून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी 30 मे २०२३ रोजीच्या मंत्रीमंडलाच्या बैठिीत मान्यता देण्यात आली .

पीएम किसान योजने बाबत मह्त्वाचा शासन निर्णय |pm kisan samman nidhi yojna

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 15 फे ब्रुवारी 2019 च्या शासन निर्णया नुसार
राज्यात येण्यासाठी तसेच सदर योजना राबविताना बऱ्याचशा येणा-या अडचणी विचारात घेऊन या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा हा मुख्य हेतू आहे.

कुणीही पात्र लाभार्थी या योजने अंतर्गत वंचित राहू नाही या करिता प्रत्येक विभाग निहाय कामे वाटून देण्यात आलेली आहेत.आता प्रत्येक विभागासाठी कार्यपद्धती सोपविण्यात आलेली आहे.आणि ह्या जबाबदाऱ्या त्या त्या विभागाला चोख पार पाडाव्या लागणार आहेत.अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही होईल असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोणत्या विभागाला काय कार्य पार पडावे लागणार | विभाग निहाय जबाबदाऱ्या व कर्तव्य

शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या

प्रत्येक विभागाला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत मात्र शेतकऱ्याना देखील काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.
१) pm किसान योजनेसाठी अर्ज करणे
२) pm kisan ekyc करणे.
३) बँक खाते आधार सोबत जोडणी करणे.
४) आधार कार्ड नियमित अपडेट करणे.
५) शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे .

कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या काय?

कृषी विभागाला खूप जास्त जबाबदाऱ्या दिल्या असून शेतकऱ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आलेलं आहे.कृषी विभागाचे काही काम व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.


१) स्वता अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मान्यता देणे.
२) तालुका स्तरावर पोर्टलवर लाभार्थ्याची नोंदणी करणे .
३) अपात्र लाभार्थ्याला पडताळणी करून बॅड करणे.
४) वेळोवेळी डेटा दुरुस्त झाल्यास नोंद ठेवणे
५) शेतकऱ्यांची भौतिक तपासणी करणे.
६) चुकीने अपात्र झालेल्या शेतकऱ्याना पात्र करणे.
७) लाभार्थी मयत झाल्यास त्याची नोंद करून बाहेर काढणे.
८) शेतकऱयांच्या तक्रारी सोडविणे व त्यांना मदत करणे .
९) योजना अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रचार व प्रसार करणे.

महसूल विभागाच्या जबाबदाऱ्याव कार्य


कृषी विभागा प्रमाणे महसूल विभागाल देखील बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या आहेत.शेतकऱ्याना वेळोवेळी आलेल्या काही अडचणी महसूल विभागाला सोडवाव्या लागणार आहेत.या विभागाचे काही काम व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.
१) भूमी अभिलेख नोंदणी योग्य आहे पाहणे.
२) लँड शेडींग अपडेट करून पात्र शेतकऱ्याना प्रमाणित करणे.
३) ७/१२ व ८ बाबत काही अडचण आल्यास त्या सोडविणे.
४) अपात्र लाभार्थ्याने योजनेच्या माध्यमातून मिळविलेल्या रकमा परत घेणे.
५) अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेल्या माहिती पोर्टल ला देणे.

pm किसान योजनेत काय बदल झालेत नवीन कार्य पद्धती काय

खरं तर ११ कोटीहून अधिक शेतकऱ्याचे या योजनेसाठी अर्ज केले होते सुरुवातीला शेतकर्याना सुरळीत हप्ते देखील मिळत होते मात्र जस जसे एक एक वर्ष निघून जात होते तास तसे या योजनेच्या अडचणी वाढत जाऊन मोठ्या प्रमाणावर शेतकरी नाराज होऊ लागले कारण त्यांना मिळणारा हप्ता बंद झाला होता.त्यानंतर सरकारच्या माध्यमातून ekyc करायला लावली ,बँक खात्याला आधार जोडायला सांगिले,लँड शेडींग करायला सांगितले.

एव्हढाच काय तर आधार कार्ड अपडेट करायला सांगितले.ह्या साऱ्या गोष्टी करून देखील लाखो शेतकऱ्याचे हप्ते पेंडिंग राहिले.अजूनही ते शेतकरी या कार्यालयातून त्या कार्यालयात पायपीट करत आहेत.या सर्व अडचणीच्या अनुशंगाने आता मात्र नवीन कार्यपद्धती लागू करण्यात अली आहे.
या कार्यपद्धतीचे खालील काही म्हणत्वाचे मुद्दे आहेत.

१) अर्जदाराने केंद्र सरकारच्या पोर्टलवर स्वता नोंदणी करावी किंवा तालुका कृषी अधिकार्याच्या मदतीने सल्ल्याने कंसच मार्फत आवश्यक कागद \पत्रासह नोंदणी करावी.

२) अर्जदाराणे नोंदणी केल्यानंतर तो अर्जदार खर्च शेतकरी आहे का यांची पूर्ण पडताळणी करण्यासाठी तहसीलदाराला पोर्टल उपलब्ध करून देणे

३) तहसीलदाराने संबंधित अर्जदार शेतकऱ्याचे कागदपत्र पडताळणी करून शेतकऱ्याना पात्र असेच अपात्र ठरवतील.

४) तहसीलदाराने पात्र ठरविल्या नंतर आता महसूल विभाग पुन्हा त्याचे फेर पडताळणी करून पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाला माहिती सादर करतील.

५) तालुका व जिल्हा कृषी अधिकारी यानंतर लाभार्थी इतर नियमात बसतात का हे पडताळणी करतील.

६) तहसील दाराची सर्व प्रक्रिया झाल्या नंतर तालिका व जिल्हा कृषी अधिकारी हा शेतकरी पात्र आहे कि अपात्र आहे हे ठरवतील.अपात्र ठरविल्यास पोर्टल वर त्याचे कारण स्पस्ट करतील.

७)आता तालुका व जिल्हा स्तरावरून संपूर्ण प्रक्रिया पार पडल्या नंतर राज्यस्थरावरून त्याची शेवटची मान्यता देण्यात येईल.

राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची जबाबदारी


pm किसान योजनेसाठी शेतकऱ्यानी अर्ज केल्यापासून तर तालुका स्तरावरील संपूर्ण प्रक्रिया पार पडल्या नंतर आता काम सुरु होते ते राज्यस्तरीय समितीच.या समितीला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत ज्या खालील प्रमाणे आहेत.

१) पाम किसान योजनेशी संबंधित सर्व विभागावर देखरेख ठेवणे व त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या दूर करणे.

२) योजना सुरळीत चालू आहे कि नाही यावर लक्ष्य ठेवणे.

३) राज्य व केंद्र सरकार यांच्यात समन्वय प्रथापित करणे व वेळोवेळी योजनेचा पाठपुरावा करणे.

४) योजनेत काही अडचणी आल्यास त्या दूर करणे व त्याच्या बदला बाबत निर्णय घेणे.

५) प्रत्येक सहा महिन्यात हि योजना सुरळीत चालू आहे? का त्यात काही अडचणी आहेत का?या साठी आढावा बैठक घेणे.

राज्यस्तरावरील अंमलबजावणी प्रमुख


राज्यस्तरीय समितीची रचना करत असताना त्यात मुख्य अंमलबजावणी प्रमुखांची निवड करण्यात अली आहे.या समितीतील सर्व सदस्यांना विस्वासात घेऊन या अंमलबजावणी प्रमुखाला कार्य करावे लागते.या प्रमुखाला देखील जबाबदाऱ्या व कार्य देण्यात आले आहेत.

१) पाम किसान योजनेशी संबंधित अर्जाची पडताळणी करून त्यांना पात्र व अपात्र करणे.

२) योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी आलेल्या शंका व तक्रारींचे निवारण करणे.

3) प्रत्येक तीन महिन्यात हि योजना सुरळीत चालू आहे? का त्यात काही अडचणी आहेत का?या साठी आढावा बैठक घेणे व त्याची आमल बजावणी करणे.

ग्रामस्तरीय समितीचे कार्य व जबाबदारी :-


या समितीच खूप महत्वाचं काम असून इतर समित्या प्रमाणे हि समिती आपले कार्य पार पडत असते.या समितीच्या नावावरूनच लक्षात येते कि हि गाव पातळीवर काम करणारी समिती आहे.या समितीमध्ये गाव स्तरावरील विविध विभागाचे कर्मचारी आहेत.या समितीत पुढील प्रमाणे सदस्य असतात


१) कृषी सहायक.
२) तलाठी
३) ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी
४) सचिव वि.का.से.स .सो.

या समितीच्या खालील प्रमाणे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

१) योजनेची प्रसिद्धी व प्रसार करणे.
२) गाव पातळीवर शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी सोडवणे.
३) केंद्र व राज्य सरकारने बाबी लाभार्थाकडून पूर्ण करून घेणे

namo shetkari yojna 2023 | अखेर योजनेला मंजुरी मिळाली GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार

आताच्या घडीची हि सर्वात मोठी घोषणा आहे. namo shetkari yojna 2023 लागू होणार आहे असे आपण सांगितले होते.हि योजना लागू झाल्यास शेतकऱ्याना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार ,अशी जोरदार चर्चा चालली होती.आता मात्र या योजनेला मंजुरी मिळाली आहे.

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या मानधनांसोबत आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच cm kisan yojna ला मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत आता वार्षिक 6 हजार रुपये असे एकूण 12000 रुपये मानधन मिळणार आहेत.कारण या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 15 जून 2023 रोजी काढण्यात आलेला आहे

namo shetkari yojna 2023

चला तर शेतकरी मित्रानो,या शासन निर्णयाच्या माध्यमातून हि शेतकरी योजना कशाप्रकारे राबवली जाणार ?योजने अंतर्गत कोणते लाभार्थी पात्र होणार ?अर्ज कसा व कुठे करायचा ? पहिल्या हप्त्याचे वितरण कधी केले जाणार? या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याघेणार आहोत.

मित्रांनो ३० मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळीय बैठकीत 2023 च्या बजेटमध्ये केलेली एक महत्त्वाचे अशी घोषणा केली होती.ती म्हणजे शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना शेतकऱ्यासाठी लागू केली जाणार. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र त्या बाबतचा ठोस शासन निर्णय अजून पर्यंत आला नव्हता.आता मात्र हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

cm kisan yojna २०२३ काय आहे? | namo shetkari yojna 2023 चे स्वरूप

२०१९ मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी pm kisan yojna हि लागू करण्यात अली होती .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना वार्षिक ६ हजार मिळत होते.हे ६ हजार एकूण चार चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येत होते.आणि मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी मुले शेतकरी हतबल झाला असल्याने त्यांना हक्काचं वाढीव उत्पन्न उपलब्ध करून देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात अली आहे.

या देखील योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये देणार येणार असून तीन तीन महिन्याच्या अंतराने २ +२+२ असे ६ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत.एकूणच काय तर कमी किसान योजना लागू झाल्यावर शेतकर्याना थेट 12 हजार मिळणार आहेत.या योजनेची अंमलबजावणी आता आज रोजी प्रसारित झालेल्या शासन निर्णया नुसार केली जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी पात्रता काय?

namo shetkari yojna 2023:-या योजनेचा लाभ जर शेतकरी मित्राना मिळवायचा असेल तर काही निकस हे राज्य सरकारच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले आहेत या निकषांची पूर्ती करणारा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना या योजनेसाठी प्रमाण म्हणून वापरण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2020 मध्ये निर्गमित करण्यात आलेलया आहेत.या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून राज्यांमध्ये ही cm किसान योजना राबवली जाणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी/निकष व पात्रता खालील प्रमाणे आहेत.

हे वाचा :- 14 व्या हप्त्यासाठी करा हे 3 काम नाहीतर मिळणार नाहीत २००० रुपये .


१) पाम किसान योजनेत पात्र असणारा प्रत्येक पात्र लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहील .
२) पाम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेला मात्र पाम किसान योजनेसाठी पात्र असणारा लाभार्थी देखील पात्र राहील.

नमो शेतकरी योजना कशी राबविली जाणार त्याची कार्यपद्धती कशी राहणार ?


शेतकरी मित्रानो,पाम किसान योजने प्रमाणेच या योजनेची कार्यप्रणाली असणार आहे.ज्या पद्धतीने चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळते त्याच पद्धतीने या देखील योजनेची प्रक्रिया राहणार आहे.वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.cm किसान योजनेचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.

नमो शेतकरी योजना अर्ज कुठे करावा ?

namo shetkari yojna 2023 : -या योजनेसाठी स्वतंत्र असा अर्ज करण्याची गरज नाही ,कारण ज्या शेतकऱ्याना pm किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्वांना या योजनेत पात्र केलं जाणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी रखुम ठेवलेल्या निधीतून लाभ देण्यात येणार आहे.सध्या या योजनेच्या कार्यप्रणालीसाठी कोणतेही पोर्टल उपलब्ध नाही.

मात्र लवकरच त्यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे अशी सूचना देण्यात अली आहे.pm किसान योजना व cm किसान योजना यांचे पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात यावे व एकाच वेळी त्यांना हे अनुदान मिळण्यास मदत होईल तसेच दोन्ही लाभार्थ्याच्या संख्येत होणारा बदल लक्षात येईल व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धत कशी असणार?


“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतगधत कें द्र शासनाच्या PM-KISAN
योजनेनुसार खालील खालील वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट रकम पाठविण्यात येणार.खालील प्रमाणे खात्यात येणार पैसे.

अ.कहप्ता कालािधी (महिना )रक्कम
1पहिला हप्ता एप्रिल ते जुलै2000 रुपये
2दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर2000 रुपये
3 तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च2000 रुपये

नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र होणार


जर तुम्ही pm किसान योजनेत अपात्र असाल तर या योजनेसाठी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता.
या काही गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होऊ शकतात.

नमो शेतकरी योजनेला मिळाली मंजुरी पहा सविस्तर माहितीचा GR | GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा


१) जर शेतकऱ्यानी pm किसान सन्मान निधी योजनेची ekyc केली नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता.
२) तुम्ही तुमच्या बँक खात्याची kyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता.
३) तुमचे धार कार्ड अपडेट न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता.
४) तुमचे बँक खाते बंद पडल्यास तुमच्या खात्यात हि रक्कम येणार नाही या कारणाने देखील तुम्ही अपात्र होऊ शकता.
५) तुम्ही लँड शेडींग न केल्यास अपात्र होऊ शकता.

PM KISAN EKYC कशी करायची?

चला तर आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान खात्याची ekyc कशी करायची.ekyc करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्राला भेट देऊ शकता.हे केंद्रचालक काही फी घेऊन तुमची ekyc करून देतील.हि प्रक्रिया करायला फक्त ५ मिनिटे लागतात.ekyc करायला जात असताना आपले आधार कार्ड व pm किसान पोर्टल सोबत जोडून असलेला मोबाईल सोबत घेऊन जावे,कारण या मोबाईल वर opt येतो.


pm किसान योजेची मोबाईल वर ५ मिनिटात ekyc करा -त्यासाठी इथे क्लिक करा .

बँकेची kyc कशी करावी / बँकेत आधार प्रमाणीकरण कसे करावे?


आता कोणत्याही योजनेची निधी /पैसा तुमच्या खात्यावर येण्यासाठी बँकेची kyc करणे खूपच गरजेचं झालं आहे.कारण आता कोणतेही पेमेंट आधार बेस झाले आहे.तुम्ही बँकेचे आधार प्रमाणीकरण केले नाही तर मात्र तुमच्या खात्यावर येत नाही हे लक्षात घ्यावे.


आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि बँकेत तुम्हाला kyc अर्ज मिळतो तो अर्ज पूर्ण अचूक भरून बँकेत द्यायचा आहे.त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे.आधार प्रमाणीकरण होण्यासाठी ४ ते ५ दिवसाचा कालावधी लागतो .

पी एम किसान खात्याची लँड शेडींग कशी करायची


लँड शेडींग हि अतिशय महत्वाची आहे यावरून ठरते कि तुम्ही शेतकरी आहेत कि नाही.हि प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे कारण बरेच बोगस शेतकरी/लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
लँड शेडींग करण्यासाठी तुमचा ७/१२ व ८ अ हे घेऊन तुमाला तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे .तिथे गेल्या नंतर समोरील सर्व प्रक्रिया ते कर्मचारी करून देतात .

तुमचे बँक खाते कसे सुरु करावे ?


खरं पाहाता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे बँक खाते सुरु असणे आहे.कारण जर तुमचे खातेच चालू नसतील तर मात्र तुमच्या खात्यावर पाठविले जाणारे कोणतेच पैसे येणार नाहीत व तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही.तेव्हा बँक खाते कसे सुरु करावे व त्यासाठी कोणाला भेटावे हे आता पाहूया.या साठी तुम्हाला थेट बँकेत जायचं आहे.तिथे गेल्यावर तेथील मॅनेजरला तुम्हाला भेटून तुमचे खाते बंद झाल्याचं सांगायचं आहे.

पुढे तुमचे बँक खाते का बंद पडले हे ते तुम्हाला सांगतील आणि बँक खाते सुरु करण्यासाठी तुमची मदत करतील.तुम्ही बऱ्याच दिवसा पासून बँकेत व्यवहार न केल्याने तुमचे बँक खाते बंद पडू शकते .अशा वेळी तुम्हाला तुमच्या खात्यात १०० रुपये भरणा करायचा आहे.तुमचे खाते आता activate म्हणजे चालू होईल.तुम्ही kyc केली नसेल तरी तुमचे खाते बंद पडू शकते अशावेळी तुम्ही kyc करून घ्या खाते आपोआप सुरु होईल .

नमो शेतकरी योजनेला मंजुरी | Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023 कशी असेल नमो शेतकरी योजना?

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023 मंजुरी मिळाली.३० मे रोजी मंत्रिमंडळात झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना 12 हजारांचा निधी मिळणार. 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

बियाणे अनुदान योजना 2023 | Biyane Anudan Yojna 2023 -यांनाच मिळणार योजनेचा लाभ


pm kisan yojna च्या धरतीवर cm kisan yojna राज्य सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार त्याच बरोबर केंद्र सरकार देखील शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणार आहेत. केंद्राच्या pm किसान योजनेचे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.असा निर्णय ३० मे २०२३ रोजी घेतलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ज्या प्रमाणे pm किसान योजनेत शेतकऱ्याना वर्षाकाठी ६००० रुपयांची रक्कम मिळणार आहे त्याच प्रमाणे या योजनित आणखी ६००० हजार रुपयांची रक्कम वाढून एकूण १२००० रुपये शेतकऱ्याना दिले जाणार आहेत.
त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे असे म्हणता येईल.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna 2023 | कधी पासून लागू होणार . शेतकऱ्याना किती पैसे मिळणार.

शेतकऱ्याना आर्थिकदृष्ठ्या सक्षम करण्यासाठी या योजनेची रचना करण्यात अली असून,पूर्वी मिळणारा पैसा शेतकऱ्याना अपुरा होत असलेल्या कारणाने आता निधीत मोठी वाढ करण्यात अली आहे.बऱ्याच दिवसा पासून हि योजना लागू होणार अशी चर्चाच होत होती, मात्र अजून पर्यंत त्यावर ठोस निर्णय झाला नव्हता .

आता मात्र मागे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून योजनेला प्रशाशकीय मान्यता देखील देण्यात अली आहे.हि योजना जून महिन्याच्या दुसर्या किंवा तिसर्या हप्त्यात सुरु करण्यात येणार असून जूनच्या शेवटच्या हप्त्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला चार महिन्याच्या अंतराने २००० मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.तेव्हा या योजनेचा पहिला हेपता २००० रुपये शेतकर्याच्या खात्यात येणार आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna चा अर्ज कुठे करायचा? कागदपत्र काय लागणार ?

Namo Shetkari Mahasanman Nidhi या योनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही कारण हि योजना pm kisan nidhi योजनेत विलीन करण्यात येणार असून या योजनेसाठी पात्र असलेले सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार आहेत.

मात्र हि योजना सुरु झाल्यानंतर शेतकऱ्याना काही कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.त्या कागदपत्रासाची यादी खालील प्रमाणे प्रमाणे आहे.


१) आधार कार्ड


२) बँक खाते


३) ७/१२ व ८ आ


४)राशन कार्ड


५) मोबाईल नंबर


६) pm किसान ekyc स्लिप

नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी करावे लागणार ३ कामसविस्तर माहिती

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ३ काम करावे लागणार आहेत.


१) pm किसान खात्याची kyc करणे
२) बँक खात्याची kyc करणे
३) land सीडींग करणे


ह्या तीन गोष्टी सविस्तर समजून घेण्यासाठी वरील लिंक क्लिक करा.

pm kisan yojna kyc on Mobile | मोबईल वर करा ekyc फक्त 5 मिनिटात

pm Kisan yojna ची ekyc करा नाहीतर बंद होतील ६ हजार रुपये

pm kisan yojna kyc :- नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण आपल्या मोबाईल वर घरच्या घरी ( pm kisan ekyc mobile ) कशी करायची तीही अगदी ५ मिनिटात या बद्दलची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तीही स्टेप बाय स्टेप तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा ..

pm kisan yojna kyc

pm kisan yojana kyc update करणे अतिशय गरजेचं आहे. PM Kisan खात्याची E KYC Online केल्याशिवाय या पुढे तुमचे १२ हजार रुपये मिळणार नाहीत तेव्हा हि ekyc नक्की करून घ्या.आता pm Kisan sanman nidhi yojna व namo shetkari mahasanman nidhi yojna या दोन्ही खात्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत.

४००० हजार रुपये या तारखेला जमा होणार-बघा काय आहे तारीख

हि ekyc करण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत स्तरावर मोठे प्रयत्न केले जात असून सक्तीने pm kisan yojna kyc करण्याचं काम केलं जात आहे.सोबतच pm kisan yojna kyc last date देखील अपम तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा आता आम्ही सांगत असलेल्या प्रकारे तुम्ही प्रक्रिया करत जा .हि प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहोत.

अशी करा मोबईल वर pm kisan yojna kyc on mobile | pm kisan yojna ekyc

pm kisan yojna kyc :-हि प्रक्रिया अगदी सोपी आहे चला आता स्टेप बाय स्टेप संजूम घेऊ ..सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबईल मध्ये क्रोम ब्राऊझर ( crome browser ) उघडा व pmkisan.gov.in हे search bar मध्ये type करा लगेच pm किसान योजनीची official वेबसाईट उघडेल व खालील प्रमाणे page तुम्हाला दिसेल .

लगेच हे काम करा-शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज पहा काय आहे योजना

आता तुम्हाला सर्वात पहिले दिसत असलेलं किसान कॉर्नर नावाखाली दिसत असलेलं EKYC हे ऑपशन क्लिक करायचं आहे.वेबसाईट ची भाषा हिंदी असेल तर तुम्हाला ई-केवायसी असं नाव दिसेल नाहीतर वरील प्रमाणे इंग्लिश नाव EKYC असं नाव दिसेल.ते क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे page दिसेल.

हि EKYC आधार बेस असल्या कारणाने तुमच्या मोबईल वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून हि kyc होणार आहे.Adhar card no. च्या समोर तुम्हाला तुमचा वैध आधार कार्ड( Adhar card ) टाकून एंटर करायचं आहे.आता तुम्हाला खालील प्रमाणे page दिसेल

आता तुम्हाला आधार सोबत जोडलेला मोबईल नंबर टाकायचा आहे.जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत मोबईल नंबर जोडलेला नसेल तर मात्र तुमची EKYC होणार नाही.कारण आधार संलग्न मोबईल नंबर वर एक OTP येते तो तुम्हाला Adhar ragisted mobile या पुढील रकान्यात टाकून Get mobile OTP यावर क्लिक करा ..मग आणखी एक ऑपशन दिसेल जे खालील प्रमाणे असेल..

आता mobile OTP या समोरील रकान्यात तुमच्या मोबईल वर आलेला ६ अंकी OTP टाकून submit OTP यावर क्लीक करा ..हे क्लिक करता क्षणी तुमची pm Kisan yojna ची EKYC पूर्ण होईल व खालील प्रमाणे तुम्हाला तुमची EKYC पूर्ण झाली असा मेसेज येईल.

बघा kyc करण्याची शेवटची तारीख काय | pm kisan yojana kyc last date

pm Kisan yojna खात्याची kyc करण्याची अंतिम तारीख हि ३१ मे २०२३ आहे. या तारखेच्या आत आपण आपल्या खात्याची kyc करून घ्यावी अन्यथा हि योजना आपल्यासाठी कायम बंद होणार आहे.आपण हि kyc नाही केल्यास नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील आपल्याला मिळणार नाही .

pm Kisan yojna मागील किती हप्ते मिळाले व तारखा जाणून घ्या सविस्तर

pm Kisan yojna मागील किती हप्ते मिळाले व तारखा जाणून घ्या सविस्तर
खरं तर हि योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात अली होती व तेव्हापासून आताही हि योजना चालू असून आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण १३ हप्ते मिळाले आहे. १४ वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.
खालील प्रमाणे मिळाले आहेत एकूण १३ हप्ते

अनुक्रमांकवर्ष/महिनारक्कम/शेतकरी
1 हप्ताAPR-JUL 2018-193,16,15,378
2 हप्ताAPR-JUL 2019-206,63,58,339
3 हप्ताAUG-NOV 2019-208,76,32,639
4 हप्ताDEC-MAR 2019-208,96,97,773
5 हप्ताAPR-JUL 2020-2110,49,41,022
6 हप्ता AUG-NOV 2020-2110,23,47,967
7 हप्ताDEC-MAR 2020-2110,23,60,189
8 हप्ताAPR-JUL 2021-2211,18,54,687
9 हप्ता AUG-NOV 2021-2211,19,54,909
10 हप्ता DEC-MAR 2021-2211,16,17,012
11 हप्ता APR-JUL 2022-2311,27,84,662
12 हप्ता AUG-NOV 2022-239,00,80,031
13 हप्ताDEC-MAR 2022-238,81,04,031

PM Kisan KYC ऑनलाइन कैसे करें?

मोबाइल से किसान पंजीकरण कैसे करें?

14 किस्त कब आएगी 2023?

किसान सम्मान निधि योजना लिस्ट में अपना नाम कैसे देखें 2023?

घर बैठे KYC कैसे करे?

कैसे पता करें कि केवाईसी हो गया है?